Search This Blog

स्पर्धा परीक्षेतील हमखास यशासाठी

हाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विश्व म्हणजे ऊन आणि पावसाचा खेळ झाला आहे. दुर्दम्य आशावाद आणि टोकाची निराशा एकाच वेळेस दोन्ही स्पर्धा परीक्षा विश्वातील उमेदवार अनुभवत आहे.
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने संपूर्ण शिक्षण व्यवस्था ताब्यात घेतलेली असताना स्पर्धा परीक्षा एकच विश्व असे आहे जे विद्यार्थ्यांना पैसा आणि वशिल्याच्या शिवाय समाजाच्या मुख्य प्रवाहात आणू शकते.
परंतु सध्याच्या वातावरणात प्रचंड अस्थिरता स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी अनुभवताहेत. लाखोच्या संख्येने असणारे विद्यार्थी आणि दिवसेंदिवस कमी होत जाणाऱ्या नोकऱ्या यांचे समीकरण काही केल्या बसत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पैसा आणि इंग्रजीची भीती या दोन गोष्टी स्पर्धा परीक्षा शिवाय असणाऱ्या संधींची दरवाजे उघडू देत नाहीत अशा दुहेरी कात्रीत अडकलेला स्पर्धा परीक्षांचा विद्यार्थी सध्या प्रचंड दडपणाखाली जगत आहे परंतु ही स्पर्धा परीक्षा विश्वाची एक बाजू असली तरी दुसरी बाजू सुद्धा समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे आज स्पर्धा परीक्षा विश्वातील विद्यार्थ्यांना पारंपारिक एक किंवा दोनच परीक्षांच्या तयारी शिवाय राज्य आणि देश पातळीवरील उपलब्ध वेगवेगळ्या  पर्यायांचा वापर करणे क्रमप्राप्त आहे.
यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगा शिवाय Staff सिलेक्शन कमिशन, बँकिंग सेक्टर, Defence सेक्टर (CAPF, CDS etc.) ज्यामध्ये अनेक वर्ग-1 व वर्ग-2 वर्ग तीन आणि चार च्या सुद्धा हजारो जागा उपलब्ध आहेत. या सर्वांच्या तयारीला विद्यार्थ्यांनी सुरुवात केली पाहिजे. याशिवाय पुढील काही गोष्टी स्पर्धा परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांनी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत.
1) स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी वयाच्या शक्य तेवढ्या लवकर हा पर्याय निवडून व्यावसायिक पद्धतीने तयारी केली पाहिजे. याचा अर्थ प्रत्येकाने क्लासच लावला पाहिजे असे अजिबात होत नाही. परंतु प्रत्येक विद्यार्थी व्यावसायिक पद्धतीने तयारी करू शकतो. पैशाशिवाय अशी तयारी करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत ज्ञानज्योती फ्री लर्निंग युनिव्हर्सिटी हा असाच एक उपक्रम आहे.
2) स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला तयारीसाठी चा कालावधी आधीच निश्चित करून ही कालमर्यादा कुठल्याही परिस्थितीत पाळली पाहिजे वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेच्या तयारी मध्ये घालण्यापेक्षा ठराविक कालमर्यादेच्या बंधनात राहून स्पर्धापरीक्षेची तयारी करणे अधिक फायद्याचे आहे. हे कसे साध्य करावयाचे ते योग्य नियोजन आणि मार्गदर्शकाच्या मदतीने ठरवावे.
3) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयारी सोबतच कौशल्य विकासाचे काही कार्यक्रम पूर्ण करून व्यावहारिक जगामध्ये सक्षम करिअरचा पर्याय उभा करून ठेवला पाहिजे.
4) स्पर्धा परिक्षांचे जग हे बेभरवशाचे आहे हे खरे असले तरी लेखामध्ये वर उल्लेख केलेल्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या एकत्रित तयारीने आणि वरील तीन मुद्द्यांच्या अनुषंगाने तयारी केली असता शंभर टक्के यशाची खात्री उमेदवार स्वतःच स्वतःला देऊ शकतो. चमकते ते सगळेच सोने नसते. जाहिरातींच्या आधारावर यशाचे खोटे वलय उभे करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पासून स्वतःला वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःची बुद्धी वापरली पाहिजे.

विशाल भेदुरकर 

वित्त आणि लेखा अधिकारी पुणे
iasvishalbhedurkar@gmail.com    |    9975806127

बेटी बचाव बेटी पढाओ योजना

सुरुवात – 22 जानेवारी 2015
दूत – साक्षी मलिक  
  • बाल लिंगगुणोत्तर सुधारणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • हरियाणा येथील पानिपत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
  • ‘बेटा बेटी एक समान’ हा आपला मंत्र असला पाहिजे असे सांगत लिंग भेदभाव संपुष्टात आणला पाहिजे.
  • हरियाणातील बाल लिंगगुणोत्तर परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे या योजनेच्या उद्घाटनासाठी हरियाणाची निवड करण्यात आली. यात 10 वर्षाखालील मुलींचे बँक खाते उघडावे लागते.
  • भारतीय टपाल खात्याच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ टपाल तिकिटेही काढण्यात आली. सध्या भारतातील 100 जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर लागू
महाराष्ट्रातील निवड करण्यात आलेले जिल्हे (लिंगगुणोत्तर दर)
2001 – 2011
1) बीड – 894 – 807 
2) जळगाव – 880 – 842 
3) अहमदनगर – 884 – 452 
4) बुलढाणा – 908 –  855
5) औरंगाबाद – 890 – 858 
6) वाशिम – 918 – 863 
7) कोल्हापूर – 839 – 863 
8) उस्मानाबाद – 894 – 867 
9) सांगली – 867 – 851 
10) जालना – 903 -870

चालु घडामोडी वन लाईनर्स, १३ जुलै २०१९

● जूनमध्ये किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा ३.१८ पर्यंत पोहचला
● नोव्हाक जोकोव्हीच २०१९ विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल
● राँजर फेडरर २०१९ विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल
● आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंच म्हणून श्रीलंकेचे कुमार धर्मसेना व दक्षिण अफ्रिकेचे मारियस इरॅस्मस यांची नियुक्ती करण्यात आली
● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या ८१ किलो वजनी गटात सचिन सिंहने सुवर्णपदक पटकावले
● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या ८१ किलो वजनी गटात पापुल चांगमईने रौप्यपदक पटकावले
● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या ८७ किलो वजनी गटात पी अनुराधाने सुवर्णपदक पटकावले
● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या ८९ किलो वजनी गटात आर वी राहुलने रौप्यपदक पटकावले
● यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा तुर्की मध्ये आयोजित करण्यात आली
● यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत मंजु कुमारीने ५९ कीलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले
● यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत सीमा कुमारीने ५० कीलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले
● यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत उत्कर्षा काळेने ६१ कीलो वजनी गटात कांस्यपदकपदक पटकावले
● यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत राहुल आवारेने पुरुषांच्या ६१ कीलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले
● टीव्हिएस मोटर्सने भारतातील पहिली इथेनॉलवर चालणारी दुचाकी लाँच केली
● स्टेट बँक आँफ इंडियाकडून एनईएफटी , आरटीजीएस व्यवहारांवरील शुल्क रद्द
● अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने क्रिकेटच्या सर्व प्रकारासाठी राशिद खानकडे कर्णधार पदाची जबाबदारी स्वीकारली
● अंशुला कांत यांची जागतिक बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नेमणूकझाली आहे
● जागतिक बँकेच्या मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत
● उत्तराखंड २८ जुलैरोजी मसुरी येथे पहिली हिमालयी राज्य परिषद आयोजित करणार
● पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर मध्ये अमेरिकेला भेट देणार आहेत
● २०-२३ जुलै दरम्यान होणा-या संयुक्त राष्ट्र महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील
● कर्नाटक सरकारने २०१८ साठी कन्नड आणि संस्कृती विभागाच्या राष्ट्रीय पुरस्कारांची यादी जाहीर केली
● स्वातंत्र्यसैनिक एच एस डोरेस्वामी यांना कर्नाटक सरकारकडून “बसवा राष्ट्रीय पुरस्कार” जाहीर
● चनम्मा हल्लीकेरी यांना कर्नाटक सरकारकडून “भगवान महावीर राष्ट्रीय शांतता” पुरस्कार जाहीर
● सी टी मालगे व हिंकल महादेवीया यांना कर्नाटक सरकारकडून “जनपद राष्ट्रीय” पुरस्कार जाहीर
● भारतीय महिला फुटबॉल संघ ताज्या फीफा वर्ल्ड क्रमवारीत ५७ व्या क्रमांकावर
● नेपाळ १७ जुलैपासून पर्यटकांसाठी व्हिसा फी मध्ये वाढ करणार
● दक्षिण कोरियाचे पंतप्रधान ली नॅक-यु १३ जुलैरोजी बांग्लादेशला भेट देणार आहेत
● अच्युत सामंता यांना गांधी मंडेला शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
● जी साथियान व ए अमलराज जोडीने ऑस्ट्रेलिया टेबल टेनिस ओपन स्पर्धेत कांस्यपदक पटकावले
● १९ वा वार्षिक ग्रीनटेक पर्यावरण पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथे संपन्न
● एनबीसीसीला १९ वा वार्षिक ग्रीनटेक पर्यावरण पुरस्कार प्रदान करण्यात आला
● जर्मनी २०२० मध्ये ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग इंडियलायझेशन परिषद आयोजित करणार
● २०१९ आफ्रिकन युनियन परिषद नायजर मध्ये आयोजित करण्यात आली
● जागतिक आरोग्य संघटनेने श्रीलंकेला “गोवर मुक्त” देश म्हणून घोषित केले
● भारत – आशियान देशांच्या व्यापार मंत्र्यांची बैठक नवी दिल्ली येथे पार पडली
● पहिली जागतिक मिडीया परिषद लंडनमध्ये आयोजित करण्यात आली
● आयएसएफएफ ज्युनियर नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धा आजपासून जर्मनीत सुरु होणार
● लोकसभेने केंद्रीय विद्यापीठे (दुरुस्ती) विधेयक, २०१९ पारीत केले
● पर्यावरण प्रबंधन व हवामान बदलावर आयोजित २१ वी परिषद बंगळुरूमध्ये पार पडली
● नालकोला “गोल्डन पीकॉक पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार २०१९” ने सन्मानित करण्यात आले
● मोहम्मद बर्किंडो यांची पुन्हा ओपेकच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली
● आॅडी इंडियाचे प्रमुख म्हणून बलिबीर सिंह ढिल्लोन यांची नियुक्ती करण्यात आली
● गोवा शिपयार्ड लिमिटेडचे ​​संचालक म्हणून श्री जगमोहन यांची नियुक्ती करण्यात आली
● उरुग्वेमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून दिनेश भाटिया यांची नियुक्ती करण्यात आली
● भारत – पाकिस्तान दरम्यान करतारपुर कॉरिडॉरवरील बैठक १४ जुलै रोजी वाघा बाॅर्डरवर होणार आहे .
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets