Search This Blog

MPSC MAINS :मुख्य परीक्षेतील मराठी विषयाची तयारी

मुख्य परीक्षेतील मराठी विषयाची तयारी


मराठी व इंग्रजी या अनिवार्य विषयांच्या अभ्यासाची तयारी कशाप्रकारे करावी, या संबंधी शक्य तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.

मराठी व इंग्रजी या विषयांचे स्वरूप
मराठी व इंग्रजी हे दोन्ही भाषा विषय एमपीएससी मुख्य परीक्षेसाठी अनिवार्य स्वरूपाचे असतात. म्हणजेच या प्रश्नपत्रिकेत मिळालेले गुण मुख्य परीक्षेच्या एकूण गुणांमध्ये ग्राह्य धरले जातात, हे आवर्जून सांगण्याचे कारण म्हणजे बहुसंख्य मुले एमपीएससी व यूपीएससीचा एकत्रितपणे अभ्यास करत असतात. यूपीएससी मुख्य परीक्षेला भाषा गुण हे चाळणी स्वरूपाचे असतात. या विषयांमध्ये आखून दिलेल्या मर्यादेएवढे मार्क्स मिळाल्यासच त्या उमेदवाराचे इतर प्रश्नपत्रिका तपासल्या जातात. यूपीएससीमध्ये भाषा विषयांचे गुण टोटल स्कोअरमध्ये काऊंट केले जात नाहीत. मात्र, एमपीएससी मुख्य परीक्षेत ते काऊंट केले जात असल्यामुळे प्रत्येक उमेदवाराला या विषयांचा अभ्यास गांभीर्याने करणे आवश्यक बनते. सर्वसाधारणपणे भाषा विषयांमध्ये चांगले गुण आवश्यक ठरतात. 
1) वाचन, 2) लेखन, 3) सराव, 4) व्याकरणविषयक नियमांची माहिती. हा फक्त एक सर्वसाधारण अंदाज देण्यात आला आहे, हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे. आता याच बाबींविषयी थोडी विस्ताराने माहिती घेऊ.

1) वाचन : भाषा विषयांमध्ये जर तुमचे वाचन चांगले असेल तर त्याचा तुम्हाला नकळतपणे खूप फायदा होतो. अनेक उमेदवारांना फारसे कष्ट न घेताही चांगले गुण मिळतात. तेव्हा त्यांना असलेली वाचनाची आवड अत्यंत उपयोगी पडल्याचे दिसते. चांगल्या वाचनाचा तुम्हाला निबंधलेखनात वेगवेगळी उदाहरणे संदर्भ देण्यासाठी तसेच पत्रलेखनातील विविध विषय हाताळण्यासाठी फायदा होतो.
2) लेखन : अनेक उमेदवारांना वाचनाची आवड असली तरी वाचलेले, सुचलेले स्वत:च्या शब्दांत मांडणे अनेकांना कठीण जाते. अशा वेळी ज्ञान असूनही ते योग्य प्रकारे मांडता येत नसल्याने विद्यार्थी हतबल होतात. म्हणूनच भाषा विषयांची तयारी करताना लेखन हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा बनतो.
3) सराव : अनेक उमेदवारांचे वाचन खूप चांगले असते. ते शब्दांत व्यक्त करता येते. मात्र, त्यांच्यावर वेळेचे बंधन/मर्यादा लावल्यास त्यांना योग्य प्रकारे प्रश्नपत्रिकेतील निबंध, पत्रलेखन, सारांशलेखन करता येत नाही. कधी त्यांच्या विचारांचा वेग कमी पडतो तर कधी त्यांच्या लिहिण्याचा वेग कमी पडतो. म्हणूनच या दोन्ही बाबींचा सराव करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
4) व्याकरणविषयक नियमांची माहिती : अनेक उमेदवारांकडे चांगले वाचन, लेखन व सराव यांसारख्या बाबींची पूर्तता झाल्यावरही चुका आढळतात. उदाहरणार्थ, मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत मुले वेलांटी, उकार यासंदर्भात कायम गफलत करतात व प्रश्नपत्रिका चांगल्या पद्धतीने लिहूनही त्यांना चांगले गुण मिळत नाहीत.

मराठी -विषय
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या एकूण 800 गुणांपैकी या पेपरला एकूण 100 गुण आहेत व प्रश्नपत्रिका सोडवण्याचा कालावधी 3 तासांचा आहे. या प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणा-या प्रश्नांचा स्तर हा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेला अनुसरून ठेवला जातो. या प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणा-या विविध प्रश्नांना अनुसरून आपण त्या बाबींविषयीची माहिती करून घेऊ.

1) निबंधलेखन : 
**निबंधलेखनासाठी एकूण पाच विषय दिले जातात. त्यापैकी कोणत्याही एका विषयावर 500 शब्दांचा निबंध लिहावयाचा असतो. त्यासाठी 30 गुण असतात. आधी 5 वर्षांत आलेल्या निबंधांचा अभ्यास करून त्याप्रमाणे वेगवेगळ्या विषयांवर निबंध लिहिण्याचा सराव करा. सुरुवातीला वेळ न लावता चांगल्या प्रकारे एका विशिष्ट फ्लोमध्ये काही उदाहरणे, संदर्भ वापरून लिहिता येते का? तसेच निबंधाची सुरुवात, शेवट चांगल्या प्रकारे लिहिता येतो का? हे तपासा. त्याचा सराव झाला की मग काही निबंध वेळ लावून लिहा. निबंधाचा प्रश्न घेऊ नका. निबंध सर्वात शेवटी लिहावा. कारण सुरुवातीला लेखनाचा व विचारांचा वेग थोडासा मंद असतो व त्यामुळे जर निबंध लिहायला जास्त लागला तर वेळेअभावी प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न सोडवायचे राहतील. याउलट पेपरच्या शेवटाला लेखनाचा तसेच विचारांचा वेग वाढलेला असतो. त्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त व चांगल्या प्रकारे निबंध लेखन होते. समजा निबंध फक 100, 200 शब्दच लिहून झाला व तितक्या शेवटची 10 मिनिटे राहिल्याची घंटा वाचली तर तो निबंध कधीच अर्धवट सोडू नये. त्याचा लगेचच योग्य शब्दांत समारोप करावा. यामुळे निबंधाला पूर्णत्व प्राप्त होते व निबंध चांगला लिहून झाला असेल तर मिळणा-या गुणांत फरक पडू शकतो.

**निबंधाची सुरुवात शक्यतोवर एखादा सुविचार, एखादी कविता, एखाद्या चित्रपटातील चार विषयांशी सुसंगत अशा अर्थपूर्ण ओळी- मग त्या गाण्यातील असतील, गझल असेल किंवा एखादा डायलॉग असेल तर त्याने करावी. तसेच नुकत्याच घडलेल्या एकाद्या घटनेचा किंवा भूतकाळातील एखाद्या प्रसिद्ध घटनेचा संदर्भ तुम्ही वापरू शकता. उदा. 2011 च्या प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या प्रश्नात हुतात्मा स्मारके बोलू लागली तरयाच निबंधात लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातील गांधीजींच्या तोंडचा डायलॉग तुम्ही खुशीने वापरू शकता. माझे सगळे पुतळे पाडून टाका व मला पुतळ्यांच्या स्वरूपात ठेवण्याऐवजी स्वत:च्या मनात ठेवा.वरील बाबींचा वापरू करूनच तुम्ही निबंधाची शेवटही परिणामकारक करू शकता. तुम्हाला निबंधाच्या सुरुवातीला काही चांगले मुद्दे, उदाहरण आठवल्यास व ते लिहिण्याच्या ओघात विसरून जाण्याची शक्यता वाटत असेल तर ते कच्च्या कामासाठी दिलेल्या जागेवर अगदी तुम्हाला लगेच   क्लिक होईल. अशा एक-दोन शब्दांत लिहून काढावेत. निबंध लेखनात व्याकरणाच्या चुका जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा, खूप चांगली सुरुवात. शेवट व अर्थपूर्ण निबंध लिहूनही अशुद्ध लेखनामुळे गुण कमी होऊ शकतात. तुम्ही ज्या विषयावर निबंध लिहिणार आहेत, त्या विषयाचे जास्तीत जास्त अ‍ॅसपेक्टस कव्हरकरण्याचा प्रयत्न करा. याचा अर्थ आपण व्यवस्थित समजावून घेऊ. कारण अनेक उमेदवारांना सगळे अ‍ॅसपेक्टस कव्हरकरायचे म्हणजे नक्की काय करायचे? हेच समजत नाही. आपण एक उदाहरण घेऊ. 

समजा तुम्हाला डोंगरहा विषय निबंधासाठी दिला तर त्यावर किती प्रकारे विचार करता येऊ शकतो.

-    त्या डोंगराचे भौगोलिक स्थान, विस्तार.
-    त्या डोंगरावरील जीवसृष्टी (वने, झाडे, प्राणी)
-    त्याचा मानवाला होणारा उपयोग.
-    विविध ऋतूंमधील त्याचे स्वरूप इ. अशा विविध दृष्टिकोनातून तुमही विचार करू शकता.

मात्र, विविध अ‍ॅसपेक्टस कव्हरकरत असताना मुळ विषयाशी त्याची नाळ तुटता कामा नये. म्हणजेच मूळ विषयाशी तो दृष्टिकोन तुम्हाला लिंक करता आला पाहिजे.

**मराठी विषयाच्या निबंधात तुम्ही एखादे प्रसिद्ध इंग्रजी वाक्य, सुविचार वापरू शकता. मात्र, ते वापरल्यावर लगेचच पुढील परिच्छेदात त्याचा मराठी अर्थ थोडक्यात विशद करावा.


**निबंध सरळ साध्या सोप्या शब्दांत लिहावा. तुम्हाला लिहिताना सहजपणे एखादा वाक्प्रचार, एखादी म्हण किंवा नेहमीच्या शब्दांऐवजी वेगळा शब्द सुचला तर टाळावा. मात्र, जाणीवपूर्वक नाहीतर निबंधातील सहजता निघून जाते व तपासण्यास तो इरिटेटिंग वाटू शकतो व त्याचा परिणाम गुणांवर होऊ शकतो.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets