Search This Blog

MPSC Prelims- जगाचा भूगोल

From Loksatta...
येत्या वर्षांच्या म्हणजेच २०१४च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तारीख आयोगाने जाहीर केलेली आहे. जर वेळापत्रकात काही बदल झाला नाही तर ही परीक्षा २ फेब्रुवारी २०१४ रोजी घेण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिना जसाजसा जवळ येईल तसतसे राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी तयारी करणाऱ्या परीक्षार्थीच्या मनावर ताण वाढण्यास सुरुवात होते. जे विद्यार्थी सलग तीन ते चार वर्षांपासून या परीक्षांसाठी तयारी करत आहेत, मात्र कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांना यश मिळाले नाही, अशा विद्यार्थ्यांच्या मनावर परीक्षेचे दडपण अधिक असते. पण हे लक्षात ठेवा की, तणावग्रस्त परिस्थितीत केलेले सोपे कामदेखील यशस्वी होत नाही. योग्य नियोजन, योग्य संदर्भसाहित्याचा वापर आणि वेळेचे काटेकोर नियोजन केल्यास या परीक्षेत यश मिळवणे शक्य आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे स्वरूप १८० अंशात बदलला आहे, याची दखल विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अभ्यास करताना लक्षात घ्यावी.
या परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार भूगोल या घटकात जागतिक भूगोलाचा अभ्यास समाविष्ट केलेला आहे. जगाचा भूगोल अभ्यासताना आपल्याकडे जगाचा नकाशा असणे आवश्यक आहे. वेळ मिळेल तेव्हा जगाच्या नकाशात महत्त्वाची शहरे, डोंगररांगा, नद्या तसेच वृत्तपत्रांत एखाद्या शहराचा उल्लेख आला असेल तर ते शहर न्याहाळावे, म्हणजे अभ्यास लक्षात ठेवणे सोपे होते तसेच अभ्यास रंजकही होतो. जगाचा अभ्यास खंडांनुसार केल्याने तो सोप्या पद्धतीने होतो. उदा. आशिया खंड अभ्यासताना आशिया खंडातील देश, तिथल्या डोंगररांगा, नद्या, हवामान, आढळणारी खनिज संपत्ती व वाहतूक प्रणाली याचा अभ्यास करावा. आज आपण युरोप खंड अभ्यासणार आहोत. 
युरोप खंड
 युरोप हा जगातील सर्वाधिक दाट लोकवस्तीचा, मोठय़ा प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेला खंड आहे. त्याच्या उत्तरेला बेरेन्टस् समुद्र, पश्चिमेला अटलांटिक महासागर आणि दक्षिणेला भूमध्य समुद्र आहे. ग्रेट ब्रिटन, आर्यलड आणि आइसलंड ही युरोपातील प्रमुख बेटे आहेत. याशिवाय ओर्कने, शेटलँड, फेरोस, सिसिली, साíडना इ. अन्य लहान बेटे आहेत.
युरोप खंडातील महत्त्वाच्या नद्या
* पो नदी - इटलीमधून वाहणाऱ्या या नदीच्या किनाऱ्यावर व्हेनिस  शहर वसलेले आहे.
* तिबर नदी - ही नदी इटलीतून वाहते. रोम शहर या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.
* होर्न नदी - ही नदी स्वित्र्झलडमधील जिनिव्हा सरोवरातून वाहत पुढे भूमध्य सागराला जाऊन मिळते.
* डॅन्युब नदी -  ही जगातील एकमेव नदी अशी आहे, जी आठ देशांमधून वाहात, मध्य युरोपातून वाहत पुढे काळ्या समुद्राला जाऊन मिळते. या नदीच्या किनाऱ्याला व्हिएन्ना, बुडापेस्ट, बेल्ग्रेड इ. महत्त्वाची शहरे वसलेली आहेत.
* व्होल्गा नदी - ही युरोपातील सर्वात लांब नदी आहे. (३६९० कि.मी.)
युरोप खंडातील महत्त्वाचे देश 
स्कँडिनेव्हियन देश - युरोपातील आइसलँड, नॉर्वे, स्विडन, फिनलँड, डेन्मार्क या देशांना स्कँडिनेव्हियन देश असे म्हणतात. 
* फिनलँड - फिनलँड हा (रशिया वगळून) युरोपातील पाचवा क्रमाकांचा देश आहे. इमारती लाकूड आणि कागदाच्या उत्पादनात फिनलँड हा आघाडीचा उत्पादक आहे. येथील अर्थव्यवस्था मोठय़ा प्रमाणावर वनोद्योगावर आधारित आहे. लाकडाची प्रक्रिया, लाकडाचा लगदा आणि कागद बनवणे हा येथील महत्त्वाचा उद्योग आहे. सरोवर आणि बेटांचा देश असे फिनलँडचे वर्णन केले जाते. फिनलँडची राजधानी हेलसिंकी आहे.
* आइसलँड - ग्रेट ब्रिटननंतर आइसलँड हे युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बेट आहे. उत्तर अटलांटिक महासागरात आíक्टक वर्तुळाच्या दक्षिणेला लगेच असलेले हे बेट नॉर्वेच्या पश्चिमेला आहे. राजधानी रेकजाविक (Reykjavik) ही राजधानी जगातील सर्वात उत्तरेकडील असलेली राजधानी आहे.
* नॉर्वे - या देशाचा उल्लेख 'मध्यरात्रीच्या सूर्याचा देश' असा केला जातो. उत्तर समुद्रामुळे ब्रिटन आणि नॉर्वे एकमेकांपासून अलग झालेले आहेत. या देशात कोळसा व खनिज तेल फारच कमी प्रमाणात सापडत असल्याने या देशाने जलविद्युत शक्तीचा वापर योग्य पद्धतीने केलेला आहे. राजधानी ओस्लो हे नॉर्वेतील महत्त्वाचे बेट आहे. नॉर्वेच्या उत्तरेला लोफोटन द्विपसमूह असून या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर कॉड माशांची शिकार होते.

* स्वीडन - स्वीडन हा सर्वात मोठा स्कॅन्डिनेव्हियन देश आहे. स्वीडनमधील प्रमुख नद्यांचा उगम वायव्येकडील पर्वतश्रेणीमध्ये होतो आणि त्या दक्षिणेला बोयानियाच्या आखाताला मिळतात. स्वीडनची ५५ टक्के भूमी वनाच्छादित असून दक्षिण स्वीडनमधील वनांत बीच, ओक आणि अन्य पानगळीचे वृक्ष आढळतात. स्वीडनमधील किरूना आणि गॅलिव्हरा या ठिकाणी उच्च प्रतीचे मॅग्नेटाइट याप्रकारचे लोखंडाचे साठे आढळतात. राजधानी स्टॉकहोम ही आहे.
* डेन्मार्क - डेन्मार्कच्या पश्चिमेला उत्तर समुद्र व आग्नेयला बाल्टिक समुद्र आहे. ग्रीनलंड हे जगातील सर्वात मोठे बेट व फेरो बेट (Faroe Islands) डेन्मार्कच्या ताब्यात आहे. डेन्मार्कचे हवामान समशीतोष्ण याप्रकारचे आहे. डेन्मार्कची अर्थव्यवस्था प्रामुख्याने दुग्धव्यवसाय, लोणी, चीज तसेच खारवलेले मांस यांच्या निर्यातीवर अवलंबून आहे. राजधानी कोपेनहेगन असून हे प्रमुख औद्योगिक केंद्र व मुख्य बंदर आहे.
* स्पेन - स्पेन हा युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचा उंचवटय़ावरील देश आहे. (स्वित्र्झलड हा पहिल्या क्रमाकांचा उंचवटय़ावरील देश आहे.) तागुस आणि एब्रो या स्पेनमधील महत्त्वाच्या नद्या आहेत. तागुस ही नदी पोर्तुगालमधून पुढे अटलांटिक महासागराला तर एब्रो नदी भूमध्य समुद्राला जाऊन मिळते. स्पेन हा ऑलिव्ह आणि कॉर्कचा जगातील महत्त्वाचा उत्पादक आहे. स्पेनची राजधानी माद्रिद ही आहे.
* पोर्तुगाल - पोर्तुगालची राजधानी लिस्टबन असून येथील हवामान भूमध्य समुद्री प्रकारचे आहे. अटलांटिक महासागरावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे येथील वष्रेभरातील तापमान सौम्य असते. पोर्तुगाल हा युरोपातील टंगस्टनचा अग्रगण्य उत्पादक आहे. याशिवाय कोळसा व तांब्याचे साठेदेखील येथे आढळतात. येथील पोटरे वाइन ही जगप्रसिद्ध आहे.
* स्वित्र्झलड - स्वित्र्झलड हा पश्चिम-मध्य युरोपातील भूवेष्टित देश आहे. याच्या ३/५ भूमीवर आल्प्स पर्वताच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत. राजकीय व सामाजिक दृष्टीने स्वित्र्झलड हा जगातील अत्यंत स्थिर देशांपकी एक देश आहे. जगातील अतिप्रगत औद्योगिक देशांपकी हा देश असून उच्च प्रतींच्या घडय़ाळांसाठी हा देश प्रसिद्ध आहे. आल्प्स पर्वतांमुळे या देशाचे नसíगक सौंदर्य अधिक वाढले असून पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण देश आहे. या देशाची राजधानी बर्न आहे. झुरीक हे येथील मोठे शहर आहे.
* इटली - हा भूमध्यसागरातील सर्वात दाट लोकवस्तीचा देश आहे. इटलीच्या पूर्वेला एॅड्रियाटिक समुद्र आहे. साíडनीया आणि सिसिली ही दोन मोठी बेटे तसेच अनेक लहान बेटांचा इटली या देशात समावेश आहे. इटलीची राजधानी रोम असून हे शहर तिबर नदीच्या किनारी आहे. ऐतिहासिक दृष्टय़ा हे महत्त्वाचे शहर आहे. पोही इटलीची सर्वात लांब नदी असून तिबर ही दुसरी महत्त्वाची नदी आहे. इटलीचा बराचसा भाग आल्प्स पर्वताने व्यापलेला आहे. इटलीत गंधक आणि पारा या खनिजांचे भरपूर साठे आहेत. साíडनीयात कोळशाचे साठे आहेत, तर सिसिलीमध्ये पेट्रोलियम व नसíगक वायूंचे मर्यादित साठे आढळतात. पो नदीच्या खोऱ्यात शेती केली जाते. इटलीतील मिलान हे शहर कापड उद्योगासाठी प्रसिद्ध असून याचा उल्लेख 'इटलीचे मँचेस्टर' असा केला जातो.
* व्हॅटिकन सिटी - ४४ चौ. कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे. व्हॅटिकन सिटी हा देश रोम शहरात तिबर नदीजवळ वसलेला आहे. व्हॅटिकनचे नागरिक हे पॅपल व कॅथोलिक चर्च प्रशासनाचे सदस्य आहेत. व्हॅटिकन सिटी हीच व्हॅटिकन सिटीची राजधानी आहे.
* फ्रान्स - फ्रान्स हा रशिया आणि युक्रेननंतर युरोपातील सर्वात मोठा देश आहे. फ्रान्स हा षटकोनी आकाराचा देश असून याच्या वायव्येला इंग्लिश खाडी, पश्चिमेला अटलांटिक व बिस्केचा उपसागर व आग्नेयला भूमध्य सागर आहे. फ्रान्स हा युरोपातील आघाडीचा शेतीप्रधान देश आहे. इतर विकसित देशांची तुलना करता शेती फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. फ्रान्समधील लॉरेन्स (Lorraine) या ठिकाणी लोखंडाचे मोठे साठे आहेत. देशाच्या विद्युत शक्तीच्या गरजेच्या ७७ टक्के भाग हा अणुऊर्जा प्रकल्पाव्दारे पूर्ण केला जातो. फ्रान्समधील धातू शुद्धीकरण यांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकी हे प्रमुख उद्योग आहेत. फ्रेंच रेल्वे इंजिन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, अणुशक्तीची सयंत्रे, पाणबुडय़ा यांसाठी प्रसिद्ध आहे. मिराज हे फ्रेंच विमान प्रसिद्ध आहे. 
फ्रान्समधील महत्त्वाची शहरे -
पॅरिस - फ्रान्सची राजधानी पॅरिस आहे. हे शहर सीन (Seine) नदीच्या किनाऱ्याला वसलेले आहे. हे शहर नागरी व औद्योगिक केंद्र आहे. पॅरिस हे जागतिक फॅशनच्या प्रमुख केंद्रांपकी एक आहे.
मास्रेली - हे शहर भूमध्य समुद्राच्या किनाऱ्याला असलेले महत्त्वाचे बंदर आहे. या ठिकाणी तेलशुद्धकरण, जहाजबांधणी यांसारखे उद्योग चालतात.
लियोन - फ्रान्समधील सिल्क उद्योगासाठी प्रसिद्ध शहर.
फ्रान्समधील महत्त्वाच्या नद्या -
सीन (Seine) , लॉएर (Loire), गॅरॉन (Garrone)
* जर्मनी - जर्मनीची राजधानी बíलन आहे. जर्मनी हे जगातील महान औद्योगिक सत्तांपकी एक आहे. जर्मनीच्या उत्तरेला उत्तर समुद्र, डेन्मार्क आणि बाल्टिक समुद्र, पूर्वेला पोलंड आणि झेकोस्लोव्हीया, दक्षिणेला ऑस्ट्रिया व स्वित्र्झलड आणि पश्चिमेला फ्रान्स, लक्झेम्बर्ग, बेल्जियम व नेदरलँड्स हे देश आहेत. हा देश खनिजसंपत्तीने समृद्ध आहे. रूर ((Ruhr) येथील कोळशाच्या खाणी युरोपातील सर्वात मोठय़ा खाणी म्हणून प्रसिद्ध आहेत. जर्मनीत कोळसा, लोखंड, पॉटेश, लिग्नाइट इ. खनिजे आढळतात. खनिज संपत्ती मुबलक असल्याने येथे पोलाद व रसायने यांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होते. मोटारगाडय़ा वाहतुकीची साधनसामग्री, अवजड यंत्रे इ.चा प्रमुख उत्पादक जर्मनी आहे. जर्मनीतील रूर खोऱ्याजवळ पोलाद उद्योगाचे मोठय़ा प्रमाणावर केंद्रीकरण झाले आहे. जर्मनीत नद्यांचे विस्तुत जाळे आहे. बहुतेक नद्या या बाल्टिक व उत्तर समुद्रास मिळतात. डॅन्युब नदी याला अपवाद आहे, कारण ती काळ्या समुद्रास मिळते. हाईन नदी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची नदी आहे. याशिवाय एल्ब, ओडेर, वेसर या महत्त्वाच्या नद्या आहेत. हॅम्बर्ग हे शहर एल्ब नदीच्या मुखाजवळ वसलेले आहे.
जर्मनीतील महत्त्वाची शहरे -
फ्रँकफर्ट (Frankfurt) - हे  शहर ऱ्हाईन नदीच्या किनारी वसलेले असून जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या ठिकाणी अवजड यंत्र, मोटार गाडय़ा तयार करण्याचे कारखाने आहेत.
म्युनिक (Munich) - फोटोग्राफी संबंधित महत्त्वाची उपकरणे, संगीत उपकरणे तयार करण्यासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. 
ड्रेस्डेन - हे शहर जर्मनीतील प्राचीन शहर असून एल्ब नदीच्या किनाऱ्याला आहे.
बॉन - १९४९ ते १९९० मध्ये जर्मनीचे एकीकरण होईपर्यंतच्या काळातील जर्मन संघराज्यीय गणराज्याची राजधानी हे शहर होते. सध्या जर्मनीतील हे शैक्षणिक केंद्र आहे.
हॅम्बर्ग - उत्तर जर्मनीतील महत्त्वाचे औद्योगिक शहर आणि बंदर आहे. पेट्रोलियम उद्योग आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगासाठी हे शहर प्रसिद्ध आहे.
ग्रीस - दुसऱ्या महायुद्धात ग्रीस जर्मनीच्या नियंत्रणाखाली होता. यानंतर ग्रीसचा तुर्कस्तान, अल्बानिया आणि मॅसिडोनियाशी संघर्ष झाला होता. हा जगाचा एक अस्थिर भाग होता. ग्रीसच्या सीमा तुर्कस्तान, बल्गेरिया, मॅसिडोनिया आणि अल्बानिया या देशांशी आहेत. ग्रीसचे हवामान भूमध्य समुद्रीय आहे. येथील उन्हाळा कोरडा तर हिवाळा सौम्य असतो. ग्रीसमध्ये गव्हाच्या पिकाएवजी सातूचे पीक घेतले जाते. कारण ग्रीसच्या हवामानाबरोबर जमवून घेण्याची क्षमता सातूमध्ये आहे. ऑलिव्ह, द्राक्ष, िलबू ही येथील महत्त्वाचे फळ, पिके आहेत. द्राक्षाचा मुख्य उपयोग वाइनसाठी होतो. ग्रीसची राजधानी अथेन्स आहे. २००४ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा येथे भरल्या होत्या. अथेन्स हे सांस्कृतिक केंद्र असून ते प्राचीन भव्य वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.
* युनायटेड किंग्डम - ग्रेट ब्रिटन व उत्तर आर्यलड यांनी बनलेला युनायटेड किंग्डम, इंग्लिश खाडी व उत्तर समुद्राने युरोपच्या मुख्य भूमीपासून वेगळा झाला आहे. यामध्ये इंग्लंड, स्कॉटलंड यांचा समावेश होतो. या तीन भागांना 'ग्रेट ब्रिटन' असे नाव आहे. ग्रेट ब्रिटन व उत्तर आर्यलड परगण्यांना मिळून युनायटेड किंग्डम असे नाव देण्यात येते. युनायटेड किंग्डमची प्राकृतिक व सांस्कृतिक भूरचना विविध प्रकारची आहे. युनायटेड किंग्डमचे अध्ययनाच्या दृष्टीने योग्य आकलन होण्यासाठी खालील तीन भागांचे स्वतंत्रपणे अध्ययन करणे आवश्यक आहे.
१. इंग्लंडच्या उंचवटय़ांचा प्रदेश  
२. वेल्स व स्कॉटलंड   
३. उत्तर आर्यलड
इंग्लंडच्या उंचवटय़ांचा प्रदेश -
उत्तर आणि पश्चिम इंग्लंडमध्ये उंचवटय़ांचे प्रदेश आहेत. उत्तर इंग्लंडच्या लेक डिस्ट्रीक्टमधील पेनांइझ (ढील्लल्ली) पर्वत हा सर्वात विस्तीर्ण उंचवटय़ाचा प्रदेश आहे. पेनांइझ पर्वताच्या दोन्ही बाजूला कोळशाच्या खाणी आहेत. पेनाइंझ पर्वताच्या पश्चिमेला लँकेशायर याचा मदानी प्रदेश आहे.
वेल्स व स्कॉटलंड - स्कॉटलंड व वेल्सची भूरचना पर्वत व उंचवटय़ाची आहे. स्नोडेन हे वेल्समधील सर्वोच्च शिखर आहे.
उत्तर आर्यलडमधील कमी उंचीची रमणीय पर्वत आर्यलडच्या सभोवताली पसरलेली आहे.
युनायटेड किंग्डममधील संसाधने - ऊर्जेच्या बाबतीत यू.के. हे समुद्ध आहे. उत्तर समुद्रातील पेट्रोलियम व नसíगक वायूचे मोठे साठे आहेत. अन्य खनिजांमध्ये लोह, चिनीमाती, मोठय़ा प्रमाणात आढळते.
उद्योग - कोळशाच्या खाणी, लोखंड, पोलाद, सुतीकापड, लोकरी कापड आणि जहाजबांधणी हे यू.के.मधील पाच प्रमुख उद्योग आहेत.
महत्त्वाची शहरे - 
लंडन - टेम्स नदीच्या किनारी वसलेले हे शहर राजधानीचे शहर आहे.
ब्रिस्टल - नर्ऋत्य इंग्लंडमध्ये हे शहर कोळसा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
लीड्स (Leeds) - तयार कपडे व वस्त्रोद्यागासाठी प्रसिद्ध असलेले इंग्लंडमधील महत्त्वाचे औद्योगिक शहर.
मँचेस्टर - इंग्लंडमधील कापड उद्योगासाठी जगप्रसिद्ध आहे.
ऑक्सफर्ड लंडन व केंब्रिज ही शहरे जगप्रसिद्ध शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहेत.

Deputy Education Officer (उपशिक्षणाधिकारी)

From Loksatta ....
उपशिक्षणाधिकारी पदासाठी परीक्षेचा आराखडा आणि सुधारित अभ्यासक्रमांची माहिती देत या परीक्षेची तयारी कशी करावी, यासंबंधीचे मार्गदर्शन-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अनेक परीक्षांच्या अभ्यासक्रमांत बदल केलेला आहे. त्यात उपशिक्षणाधिकारी गट- ब या परीक्षेचाही समावेश आहे. पूर्वी उपशिक्षणाधिकारी व्हायचे असेल तर परीक्षार्थीची शैक्षणिक पात्रता पदवी + बी.एड्., उच्च पदवी + एम.एड्. तसेच अध्यापन क्षेत्रातील काही वर्षांचा अनुभव असावा लागत असे. परंतु दिवसेंदिवस वाढती स्पर्धा लक्षात घेऊन प्रवेश परीक्षेतून चिकित्सक उपशिक्षणाधिकारी शैक्षणिक खात्याला मिळावेत, यासाठी आयोगाने उपशिक्षणाधिकारी पदाची परीक्षा पदवीधरांसाठी खुली केली आहे. डी.एड्., बी.एड्., व एम.एड्. यांच्या कोणत्याही अभ्यासक्रमाचा निकष या परीक्षेसाठी आयोगाने लावलेला नाही. त्यामुळे बी.एड्. पदवीधारकांसोबतच फ्रेशर पदवीधारकांना या परीक्षेच्या निमित्ताने एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. 
नव्या अभ्यासक्रमानुसार, या परीक्षेची मांडणी आपल्याला तीन टप्प्यांत करता येईल-
१. अभ्यासक्रमाची माहिती करून घेणे : येत्या ५ जानेवारीला उपशिक्षणाधिकारी पदासाठी आयोग परीक्षा घेणार आहे. ती परीक्षा १०० गुणांची असून त्यात १०० बहुपर्यायी प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी एक तासाचा असतो. याचा अर्थ असा की, आयोगाला आपल्याकडून वेळेचे नियोजन, अचूकता व काटेकोरपणा अपेक्षित आहे. या परीक्षेचे नियोजन परीक्षार्थीनी योग्य पद्धतीने केले तर परीक्षेत प्रावीण्य मिळवणे फारसे कठीण नाही. आयोगाच्या अभ्यासक्रमात एकूण १० घटकांचा समावेश आहे. त्यात चालू घडामोडी, भारताचा- विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल- महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, राजकीय यंत्रणा (विशेषत: महाराष्ट्राच्या संदर्भात), अर्थव्यवस्था व नियोजन, संगणक व माहिती तंत्रज्ञान, माहिती अधिकार अधिनियम - २००५, मानवी हक्क व जबाबदाऱ्या, सामान्य विज्ञान, बुद्धिमापन चाचणी.
 प्रत्येक घटकाचे अपेक्षित गुण व आधारित अभ्यासक्रम याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

१. चालू घडामोडी : प्रत्येक परीक्षेत सुमारे १५ टक्के वेटेज चालू घडामोडी या घटकाला दिले जाते. ज्यात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय चालू घडामोडी यावरील प्रश्न अपेक्षित असतात. उपशिक्षणाधिकारी परीक्षांचा विचार करून जर चालू घडामोडी अभ्यासल्या तर आपल्याला राज्यस्तरीय ६० टक्के, राष्ट्रीय ३० टक्के व आंतरराष्ट्रीय १० टक्के प्रश्न अपेक्षित आहेत. ज्यात आपल्याला सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा, अर्थ व वाणिज्य, विज्ञान व तंत्रज्ञान, भौगोलिक, ग्रंथसंपदा व लेखन, विविध पुरस्कार व नामांकन, अर्थसंकल्प (केंद्रीय, राज्य व रेल्वे), महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या, महत्त्वाच्या वैज्ञानिक प्रगती इत्यादी. परीक्षार्थीनी चालू घडामोडींचा अभ्यास करताना राज्य सरकारचे लोकराज्य मासिक, केंद्र सरकारचे योजना, कुरुक्षेत्र इयर बुक तसेच आघाडीची वृत्तपत्रे, काही शासकीय वेबसाइट्स यांचे वाचन करावे. उपयुक्त माहितीचे संकलन करणेही परीक्षेसाठी उपयुक्त ठरते. 
२. भारताचा- विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास : या घटकामध्ये आयोगाला परीक्षार्थीकडून ब्रिटिश सत्तेची स्थापना देशामध्ये केव्हा झाली, त्यांचे आगमनसामाजिक व सांस्कृतिक बदल, सामाजिक, íथक जागृती, राष्ट्रीय चळवळ, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारत, राज्यातील समाजसुधारक- ज्यात गोपाळ गणेश आगरकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज हे महत्त्वाचे समाजसुधारक अभ्यासणे गरजेचे आहे. या घटकावर साधारणत: ९ ते १० प्रश्न परीक्षेला अपेक्षित आहेत. ज्यात ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना (दोन प्रश्न), सामाजिक व सांस्कृतिक बदल (एक प्रश्न), सामाजिक व आíथक जागृती (एक प्रश्न), राष्ट्रीय चळवळ (एक प्रश्न), स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारत (दोन प्रश्न), महाराष्ट्रातील समाजसुधारक (तीन प्रश्न) अपेक्षित आहे. या घटकांसाठी संदर्भग्रंथ राज्य मंडळाच्या पाठय़क्रमाची इतिहासाची पुस्तके, एनसीईआरटीची इतिहासाची अभ्यासक्रमानुसारची पाठय़पुस्तके, ग्रोवर व बेल्लेकर, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसारचे इतिहास घटक, जयसिंगराव पवार इत्यादी संदर्भग्रंथ म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यासायला हरकत नाही.
३. भूगोल : या घटकात परीक्षार्थीना प्राकृतिक भूगोल, महाराष्ट्राचा आíथक भूगोल, महाराष्ट्राचा मानवी व सामाजिक भूगोल, पर्यावरणीय भूगोल, लोकसंख्या, भूगोलशास्त्र व हवामान अभ्यासावे. साधारणत: आठ ते दहा प्रश्न अपेक्षित आहेत. भूगोलाचा अभ्यास करताना नकाशा प्रामुख्याने वापरणे गरजेचे असते. नकाशाद्वारे भूगोलाचा अभ्यास केल्यास कमी वेळेत उत्तम आकलन होऊ शकते. राज्याच्या भूगोलात नसíगक सीमा, राज्याची प्राकृतिक रचना, नदीप्रणाली, राज्याचे हवामान, वनस्पती जीवन, प्राणीसंपत्ती/ अभयारण्ये/ राष्ट्रीय उद्याने, जलसिंचन, विविध जलाशये, राज्यातील नदीप्रकल्प व जिल्हा, राज्यातील जलविद्युत प्रकल्प, राज्याचे आंतरराष्ट्रीय प्रकल्प व सहकारी राज्ये, राज्यातील औष्णिक विद्युत केंद्रे, खनिज संपत्ती, उद्योगधंदे, वीजनिर्मिती, वाहतूक व दळणवळण, पर्यटन, राज्यातील प्रमुख किल्ले, विविध संशोधन संस्था, विकास योजना, पर्यावरण, हवामानाचा इतर घटकांवर होणारा परिणाम, राज्यातील लोकसंख्यावाढ व विकास इत्यादी घटक अभ्यासणे महत्त्वाचे आहे. भूगोल या घटकाच्या अभ्यासासाठी परीक्षार्थीनी राज्य शिक्षण मंडळाची भूगोलाची पाठय़पुस्तके, एनसीईआरटीची भूगोलाच्या अभ्यासक्रमानुसारची पाठय़पुस्तके, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांची भूगोल अभ्यासक्रमावरील पाठय़पुस्तके महत्त्वाची आहेत.
४. राजकीय यंत्रणा (शासकीय रचना, अधिकार व काय्रे) : उपशिक्षणाधिकारी परीक्षेसाठी आयोगाकडून या घटकावर सात ते आठ प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. या घटकामध्ये प्रामुख्याने राज्यघटना, भारतीय घटनेची उगमस्थाने, घटनेचा सरनामा, मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्ये, घटनात्मक अधिकार, घटनादुरुस्ती, भारताचे संघराज्य, कार्यकारी मंडळ (राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ), कायदेमंडळ (संसद), लोकसभा, राज्यसभा, संसदीय समित्या, राज्याचे विधिमंडळ (कलम १६८), विधानसभा, विधान परिषद, राज्याचे कार्यकारी मंडळ (राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ), भारतीय न्याय व्यवस्था, सर्वोच्च न्यायालय (कलम १२४), उच्च न्यायालय (कलम २१४), कनिष्ठ न्यायालये, केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग, निर्वाचन/ निवडणूक आयोग, महान्यायवादी (कलम ७६), महाधिवक्ता (कलम १६५), नियंत्रण व महालेखापरीक्षक (कलम १४८) व भारताची मानचिन्हे इत्यादी घटकांवर अभ्यास करणे गरजेचे आहे. यासाठी परीक्षार्थीनी संदर्भग्रंथ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांची अभ्यासक्रमानुसारची पाठय़पुस्तके, राज्य शिक्षण मंडळाची नागरिकशास्त्र व राज्यघटनेची पाठय़पुस्तके अभ्यासावीत.
५. अर्थव्यवस्था व नियोजन : आयोगाकडून या घटकावर आठ ते नऊ प्रश्न अपेक्षित आहेत. ज्यात प्रामुख्याने भारतीय अर्थव्यवस्था, नागरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास, उद्योग - गरजा, सहकार, íथक सुधारणा, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ, गरिबीचे निर्देशांक व अंदाज, रोजगार निर्धारणाचे घटक, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हे प्रमुख घटक होत. दिलेल्या घटकात भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने, बेरोजगारी व प्रादेशिक असमतोल, नियोजन, प्रक्रिया, प्रकार, पंचवार्षकि योजनेचा आढावा, मूल्यमापन, विकासाचे सामाजिक व आíथक निदर्शक, राज्य व स्थानिक स्तरावरील नियोजन, विकेंद्रीकरण संबंधातील ७३वी व ७४वी सुधारणा, ऊर्जा, पाणीपुरवठा, स्वच्छता, गृहनिर्माण, परिवहन, संसूचना (टपाल, तारायंत्र, व दूरसंच), रेडीओ नेटवर्क, दूरचित्रवाणी, इंटरनेट महाजाल, केंद्र व राज्यशासनाचे उपक्रम, बी.ओ.एल.टी. (बांधा, वापरा, भाडेपट्टय़ाने द्या), íथक व सामाजिक विकासात उद्योगाचे महत्त्व व भूमिका, विशेषत: राज्याच्या संदर्भात शिथिलीकरण, खासगीकरण व जागतिकीकरण यांचे लघुउद्योगावरील परिणाम, धोरण उपाययोजना व कार्यक्रम, सहकार-संकल्पना, जुनी नवीन तत्त्वे, राज्यधोरण व सहकार क्षेत्रे, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवली चळवळ, आंतरराष्ट्रीय विकास अभिकरण, गरिबीचे निर्देशांक व अंदाज, राज्याची अर्थव्यवस्था : कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रांची ठळक वैशिष्टय़े, महाराष्ट्रातील दुष्काळ व्यवस्थापन, राज्यातील एफडीआय, विकास व कृषी अर्थशास्त्र आणि भारतीय उद्योग पायाभूत सुविधा व सेवाक्षेत्र हे घटक बारकाईने अभ्यासणे गरजेचे आहे. प्रामुख्याने अर्थव्यवस्था व नियोजन या घटकांवर आकडेवारी कशी लक्षात ठेवता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या घटकासाठी संदर्भग्रंथ प्रतियोगिता किरण - अर्थव्यवस्था मिनिस्ट्री ऑफ इन्फॉम्रेशन अ‍ॅण्ड ब्रॉडकािस्टग वेबसाइटवरून चालू आकडेवारी विद्यार्थ्यांनी गोळा करावी. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या वित्त मंत्रालयाच्या शासकीय संकेतस्थळावरून माहिती गोळा करायला पाहिजे.
६. संगणक व माहिती तंत्रज्ञान : आजचे युग हे संगणक युग आहे. त्यामुळे प्रशासनाला संगणक ही एक अत्यंत गरजेची बाब बनलेली आहे. प्रशासकीय व्यक्तीला संगणक हाताळता यावेत व त्याचे ज्ञान असावे यासाठी आयोगाकडून या घटकावर सात ते आठ प्रश्न परीक्षेला विचारणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिका बहुपर्यायी असल्यामुळे त्या घटकाची संपूर्ण माहिती आपल्याला अचूक असेल तर परीक्षार्थी अचूक पर्यायापर्यंत पोहचू शकतात. त्यासाठी त्यांनी माहिती तंत्रज्ञान, शैक्षणिक तंत्रविज्ञान, दृक्श्राव्य साधने, संगणकाचा इतिहास, संगणकाचे गुणधर्म आणि वैशिष्टय़े, द्विमान पद्धती, डिझाईन टुल्स आणि प्रोग्रािमग भाषा, संगणकाची उपकरणे, स्मृती, संगणकाची कार्यपद्धती, मायक्रोसॉफ्ट िवडोज, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट, मायक्रोसॉफ्ट एक्सेस, आधुनिक समाजात संगणकाची भूमिका, संप्रेषण/कम्युनिकेशन मीडिया, सायबर गुन्हा, आय.टी. अमेंडमेंट अ‍ॅक्ट २००, शासनाचे कार्यक्रम व माहिती तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य, संगणक संक्षिप्त संज्ञा व त्यांचा विस्तार इत्यादी घटक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. संदर्भग्रंथ म्हणून विद्यार्थ्यांनी एम.एस.सी.आय.टी.चा अभ्यासक्रमाची पुस्तके वाचावी.
७. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ :  उपशिक्षणाधिकारी परीक्षेत या घटकावर सात ते आठ प्रश्न आयोगाकडून अपेक्षित आहेत. माहिती अधिकार मूलभूत माहिती- अभ्यासक्रम (स्पर्धा परीक्षांचा), माहितीची गरज, माहितीचे सामथ्र्य, अभिव्यक्तीचा अधिकार, माहिती कशासाठी व कोणती मागावी, माहितीचा अधिकार अधिनियम २००५, माहिती अधिकार कायद्याची महत्त्वाची उद्दिष्टे, पाश्र्वभूमी, जागतिक इतिहास, भारतातील चळवळ, माहिती अधिकारामुळे काय होईल, माहितीचा अधिकार कोणासाठी कायदा, माहितीच्या अधिकारात कोणती माहिती मिळेल, जन माहिती अधिकारी कोण असतो? काय काम करतो? अर्ज न करताही माहिती मिळेल, माहिती अधिकाराचा अर्ज कसा भरावा, माहिती मिळविण्यासाठी नागरिकांचा मार्ग - तक्ता, माहिती अधिकारात माहिती किती दिवसांत मिळेल? कोण देईल? कोणती माहिती मिळणार नाही, माहिती अधिकाऱ्याकडून माहिती मिळाली नाही तर काय करावे, माहिती अधिकाऱ्याला शिक्षा काय होईल, पहिल्या अपिलात माहिती मिळाली नाही तर काय करावे, माहिती आयोग म्हणजे काय, माहिती आयुक्तांची काय्रे, माहिती अधिकाराचे प्रशिक्षण कार्यक्रम, माहिती अधिकाराचे फायदे व अपेक्षित परिणाम, माहिती आयोगाचे पत्ते, माहिती अधिकार अर्जाची नोंदवही - तक्ता, माहितीचा अधिकार अधिनियम २००५ यासाठी विद्यार्थ्यांनी संदर्भग्रंथ म्हणून 'यशदा'ने प्रकाशित केलेली माहितीचा अधिकारपुस्तिका वाचावी. 
८. मानवी हक्क व जबाबदाऱ्या : प्रशासनाच्या दृष्टीने मानवी हक्क व जबाबदाऱ्या हाताळणे महत्त्वाचे असते. परीक्षेत या घटकावर सात ते आठ प्रश्न अपेक्षित आहेत. ते प्रश्न मानव संसाधन विकास : संकल्पना, भारतातील लोकसंख्येची स्थिती, भारतातील बेरोजगारी, मानव संसाधन विकासासाठी कार्यरत शासकीय व निमशासकीय संस्था, शिक्षण आणि मानव विकास संसाधन, भारतातील शिक्षणपद्धतीचा विकास, शिक्षणासंदर्भातील विविध समस्या, विविध सामाजिक घटकांसाठीचे शिक्षण, औपचारिक-अनौपचारिक शिक्षण, शिक्षणातील विविध प्रवाह, देशातील व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणपद्धती, आरोग्य आणि मानव संसाधन विकास, भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, शासनाची आरोग्यविषयक भूमिका, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, आरोग्यविषयक विविध योजना व कार्यक्रम, जागतिक आरोग्य संघटना, भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा इतिहास व विकास, ग्रामीण विकास व पंचायतराज संस्थांची भूमिका, ग्रामीण विकासासाठीचे संस्थात्मक उपाय, ग्रामीण विकास व शाश्वत रोजगार, ग्रामीण विकास व पायाभूत सुविधा, भारताची १५वी जनगणना, आठवा वार्षकि शैक्षणिक स्थिती अहवाल (असर २०१२), सहकार क्षेत्रातील सुधारणा, मानव विकास, सर्वासाठी दर्जेदार, मोफत आरोग्यसेवा, वसाहतकालीन ग्रामीण विकासाचे प्रयत्न, मानव संसाधन विकासातील कार्यरत विविध राष्ट्रीय संस्था या अनुषंगाने अभ्यास करावा. सद्यस्थितीतील घटनांचा अभ्यास करणेही आवश्यक ठरते. 
९. सामान्यविज्ञान : स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सामान्यविज्ञान हा घटक महत्त्वाचा ठरतो. प्रत्येक परीक्षेला या घटकावर प्रश्न विचारले जातात. परीक्षेत या घटकावर १० ते १२ प्रश्न अपेक्षित असतात. ज्यात जीवशास्त्र (तीन ते चार प्रश्न), भौतिकशास्त्र (तीन ते चार प्रश्न), रसायनशास्त्र (दोन ते तीन प्रश्न), आरोग्यशास्त्र (एक ते दोन प्रश्न) व सामान्यविज्ञान (एक ते दोन प्रश्न) अपेक्षित आहेत; परंतु, यात असलेले उपघटक अभ्यासणे गरजेचे ठरते. प्रकाश, ध्वनी, गती, कार्य आणि ऊर्जा, बल व बलाचे वर्गीकरण, चुंबकत्व, धाराविद्युत, उष्णता, रासायनिक संज्ञा व सूत्रे, द्रव्याचे स्वरूप, मूलद्रव्याचे वर्गीकरण, अणू संरचना, कार्बनी संयुगे, सजीवांचे वर्गीकरण, सजीवांतील संघटन, जीवनप्रक्रिया, मानवी शरीर, पोषकद्रव्ये, मानवी आरोग्य या घटकांसाठी विद्यार्थ्यांनी राज्य शिक्षण मंडळाची आठवी ते दहावीपर्यंतची विज्ञान पाठय़पुस्तके, एन.सी.ई.आर.टी.ची विज्ञानाची आठवी ते दहावीपर्यंतची पुस्तके वाचावीत.
१०. बुद्धिमापन चाचणी : योग्य वेळस योग्य निर्णय घेणारी व्यक्ती उत्तम प्रशासनासाठी आवश्यक असते. त्याची चाचपणी करण्याच्या दृष्टीने परीक्षेत साधारणत: १२ ते १५ प्रश्न बुद्धिमापन चाचणीवर अपेक्षित असतात. हे प्रश्न सोडवताना महत्त्वाची भूमिका म्हणजे वेळेचे नियोजन. एक प्रश्न सोडविण्यासाठी आयोगाने आपल्याला ३६ ते ३८ सेकंद वेळ दिलेला असतो. त्यात प्रश्नाचे आकलन करून घेत उत्तर लिहिण्याची कसरत परीक्षार्थीला साधावी लागते. त्यामुळे या घटकासाठी अचूकसराव महत्त्वाचा असतो. प्रामुख्याने यात संख्यांची ओळख, संख्यामालिका, संख्या संबंध, अक्षरमाला - लयबद्ध मालिका, विसंगत घटक, सांकेतिक भाषा, समान संबंध, बठक व्यवस्था, दिशा, घडय़ाळ, नातेसंबंध, दिनदíशका, ठोकळे व सोंगटी, वेन आकृती, तर्क अनुमान, पृथक्करण, कूटप्रश्न, वय-वष्रे, सरासरी, गुणोत्तर प्रमाण, काळ, काम, वेग, शेकडेवारी, भूमिती, संकीर्ण (परीक्षेतील प्रश्न), माहिती विश्लेषण, आकृत्यांची संख्या मोजणे या घटकांवरील परीक्षाभिमुख सराव करणे गरजेचे आहे. 
कोणत्याही परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी एक व्यूहरचना बनवायला हवी. सुमारे ८० टक्के प्रश्न आपण कसे सोडवू, याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करायला हवे. प्रत्येक उदाहरण- काठिण्य पातळी, मध्यम पातळी व सर्वसामान्य पातळी या पद्धतीने ३६ ते ३८ सेकंदांत सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा. या परीक्षेचा अभ्यासक्रम जाणून योग्य त्या संदर्भग्रंथांचा- प्रामुख्याने शासनमान्य संदर्भग्रंथांचा अभ्यास करणे उत्तम. 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets