Search This Blog

महाराष्ट्रातील समाजसुधारक

महाराष्ट्रातील समाजसुधारक 

                           गोपाळ गणेश आगरकर  'सुधारक'   

 • सतीची चालकेशवपन,बालविवाह या प्रथांना विरोध केला.
 • संमतीवय , घटस्फोटपुर्नविवाह यांचा पुरस्कार.
 • बुद्धिवादव्यक्तिवादसमतामानवतावाद यांचा पुरस्कार.
 • सामाजिक सुधारणांना पाठींबा.
 • ग्रंथप्रामाण्यास  चातुर्वर्ण्यास विरोध केला.
 • स्वातंत्र्यासाठी लोकशिक्षण  जनजागृती हे उपाय सांगितले होते
 • 'सुधारक ' या त्यांच्या वृत्तपत्रात राजकीय आणि अर्थशास्रविषयक लेखही येत.
 • हिंदी लोकांच्या दुर्गुणांवर 'गुलामांचे राष्ट्र ' या लेखात हल्ला चढवला.
 • बुद्धीच्या निकषांखेरीज अन्य कोणतेही निकष ते मानीत नसल्यामुळे समाज-सुधारणांचे समर्थन
 • करण्यासाठी स्मृतीवचनांचा आधार घेणे त्यांना मान्य नव्हते .
  
आगरकरांची आणखी काही ग्रंथसंपदा
 1.  गुलामगिरीचे शस्र
 2. स्री दास्य विमोचन
 3. राजकारणाचे अध्यात्म
 4. स्वराज्याच्या दिशेने वाटचाल
 5. वाक्य मीमांसा आणि वाक्य पृथ:करण
 6. शेठ माधवदास रघुनाथदास  धनकुवरबाई यांचे पुनर्विवाहचरित्र
 • सुमारे 125 वर्षांपूर्वी त्यांनी लोकसंख्या मर्यादेसाठी  स्री स्वातंत्र्यासाठी संतती नियमाचा पुरस्कारकेला.
 • स्वातंत्र्यासाठी त्यांनी लोकशिक्षण आणि जनजागृती हे उपाय संगितले होते.
 • त्यांनी "हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी ?" या निबंधात ब्रिटीश सरकार स्वाठी असल्याचे सिद्ध केले.

                     महर्षी धोंडो केशव कर्वे

·         महर्षी म्हणजे महान संत (ऋषी)
·         जन्म : 18 एप्रिल 1858 => शेरवली ( जिल्हारत्नागिरी) =>; जन्म आजोळी झाला.
·         मूळ गावमुरुड तालुकादापोली
·         या ठिकाणी हेही ध्यानात ठेवाकर्वेंनी सन 1886 मध्ये 'मुरुड फंडा 'ची स्थापना केली होतीतसेचपुर्नविवाह केल्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या गावाने ( मुरुड ) बहिष्कार घातला होता.)
·         प्राथमिक शिक्षण : मुरुड
·         1881 साली मॅट्रीक उत्तीर्ण.
·         उच्च  शिक्षणआधी विल्सन  आणि नंतर एलफिस्टन (दोन्हीही मुंबईत.)
·         मुंबईत सुरुवातीला मुलींच्या शाळेत आधी शिक्षक .
·         नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आमंत्रणावरून फर्ग्युसन कॉलेजात गणिताचे प्राध्यापक म्हणूनरुजू.
·         येथून पुढे पुणे हीच त्यांची कर्मभूमी बनली .
·         1892 => डेक्कन एज्युकेशन सोसायटीपुणे चे आजीव सदस्य बनले.
·         1893 => विधवाविवाहास चालना मिळावी म्हणून विधवा विवाहोत्तेजक मंडळी हि संस्था काढली.
·         1895 साली बदलून 'विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी ' असे ठेवले .
·         स्वतः पहिल्या पत्नीच्या निधनानंतर विधवेशी विवाह करून आदर्श घालून दिला.
·         १८९९ साली पुण्यात 'अनाथ बालीकाश्रम ' ह्या संस्थेची स्थापना केली .
·         १९०० साली हि संस्था पुण्याजवळील हिंगणे येथे हलवली.
·         १९०७ साली त्यांनी हिंगणे येथे 'महिला विद्यालया 'ची स्थापना केली.
·         १९१६ साली महिला विद्यापीठाची स्थापना केली,
·         १९२० साली या संस्थेला शेठ विट्ठल दास ठाकरसी यांनी त्यांच्या मातोश्री यांच्या नावाने २० लाखरुपयांची देणगी दिलीत्यामुळे संस्थेला आर्थिक स्थैर्य प्राप्त झालेपरिणामी विद्यापीठाचे 'SNDT'असे नामकरण झाले .
·         महिला विद्यापीठातून मातृभाषेतून शिक्षण देण्याचा सल्ला कर्वेंना  महात्मा गांधीनी  दिला होता .
·         सहावीची  परीक्षा त्याकाळी सरकारी असे आणि त्यासाठी ठराविकच केंद्र असत .कर्वेंना सातारा केंद्रघावे लागले होते आणि त्यासाठी कुंभार्ली घाटातून तब्बल १२५ मैल अन्तर चालून परीक्षेस पोहचलेहोते.
·         १०४ वर्षांचे दिर्घायुष्य लाभले.
·         भारत सरकारने पद्मभूषण आणि भारतरत्न या पुरस्कारांनी सन्मानित केले.
·         १९४२ साली बनारस हिंदू विद्यापीठाने डी.लिट बहाल केली तर १९५१ साली पुणे विद्यापीठाने डी.लिटबहाल केलीसन १९५४ ला एस.एन.डी.टीने डी.लिट बहाल केली.
·         १९५८  साली त्यांना त्यांच्या वयाच्या  शताब्दी साली 'भारतरत्न 'ने सन्मानित करण्यात आले

                महात्मा जोतिबा फुले
बालपण   त्यांचे मूळ गाव - कटगुण (साताराहोतेगोर्हे हे मूळ आडनाव होतेजोतिबांच्या वडिलांचे नावगोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होतेजोतिरावांनी सावित्रीबाईंना शिक्षित करून शिक्षणकार्यास प्रवृत्तकेलेसावित्रीबाई या शाळेच्या मुख्याध्यापिका झालेल्या देशातल्या पहिल्या स्त्री होत्यास्वतंत्रपणे मुलींसाठीस्वतंत्र शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता.तुकारामांप्रमाणेच ते आयुष्यभर अभंगांचीं अखंड रचना करत राहिले. 'गुलामगिरीग्रंथ अमेरिकेतीलकृष्णवर्णीयांना समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियतहा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहेसार्वजनिकसत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर .१८९१ मध्ये प्रकाशित झालासप्टेंबर २३.१८७३ रोजीमहात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलीपुरोहितांकडून होणार्या अन्यायअत्याचारापासून ,गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे  त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचेध्येय होते.
.१८२७ - जन्म कटगुणसातारा जिल्हा
.१८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.
.१८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
.१८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
.१८४७लहूजी बुवांकडे दांडपट्टा  इतर शारीरिक शिक्षण घेतले.
.१८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅनया ग्रंथाचा अभ्यास.
.१८४८ - मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
.१८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केलीबहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
सप्टेंबर .१८५१ - चिपळूणकरांच्या वाड्यात  रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
.१८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.
मार्च १५.१८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
नोहेंबर १६.१८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यातसत्कार.
.१८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग  एज्युकेशन ऑफ महार मांग ऍन्ड अदर्सस्थापन केली.
.१८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली.
.१८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.
.१८५६ - जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
.१८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
.१८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.
.१८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
.१८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
.१८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
.१८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
.१८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.
.१८७५ - शेतकर्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
.१८७५स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
.१८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
.१८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
.१८८० - नारायण मेधाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशनया देशातील पहिल्या कामगार संघटनेच्यास्थापनेत साहाय्य केले.
.१८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगासमोर निवेदन दिलेयात प्राथमिक शिक्षण सक्तीचे  मोफतदेण्याची मागणी केली.
.१८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची  पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवायविवाह घडवून आणण्यास सुरुवात केली .१८८८ड्युक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
.१८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्माही पदवीप्रदान करण्यात आली.
२८ नोव्हेंबर.१८९० - पुणे येथे निधन झाले.
प्रकाशित साहित्य
साहित्यप्रकार
लेखनकाळ
तृतीय रत्न
नाटक
.१८५५
पवाडा राजे छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा
पोवाडा
.१८६९
ब्राह्मणांचे कसब
लेखसंग्रह
.१८६९
गुलामगिरी
लेखसंग्रह
.१८७३
शेतकऱ्यांचा असूड
लेखसंग्रह
.१८९३
सत्सार
नियतकालिक
.१८८५
इशारा
लेखसंग्रह
.१८८५
लेखसंग्रह
.१८८९

'सार्वजनिक सत्यधर्महा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. 'दीनबंधूसाप्ताहिक मुखपत्र म्हणूनचालविले जात असे. 'सर्वसाक्षी जगत्पती  त्याला नकोच मध्यस्ती हे समाजाचे घोष वाक्य होतेसत्यशोधकसमाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची  सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केलीमराठीत मंगलाष्टके रचलीसमाजातीलविषमता नष्ट करणे  तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येयहोते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।                          डॉभीमराव रामजी आंबेडकर 

(एप्रिल १४.१८९१महूमध्य प्रदेश - डिसेंबर .१९५६दिल्लीहे मराठीभारतीय कायदेतज्ज्ञ राजकारणी होतेस्वातंत्र्योत्तर काळात भारताची राज्यघटना बनवणार्या मसुदासमितीचे ते अध्यक्ष होते.दलितांच्या उद्धारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली.१९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्न याभारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले.
सामाजिक आणि अर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्यापिढीमधील ते एक होतेनंतर कायदाअर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांतील अभ्यास  संशोधन यांसाठीत्यांनाकोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून विविध पदव्या मिळाल्या.
सुरुवातीचे जीवन
मोलोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉबाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होतेसुभेदार रामजी हे मालोजीरावांचेसुपुत्र आणि डाबाबासाहेब आंबेडकर याचे आदर्श वडील होतेआजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेचा सॆन्यात शिपाईम्हणुन भरती झाले होतेसॆन्यातील नोकरीमुळे सॆनिकी शाळेत म्हणजेच ’नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले.शिक्षण घेऊन ते सुशिक्षीतसंस्कारसंपन्न  द्न्यानी होऊ शकलेमालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुध्दविचाराला आणि शुध्द आचाराला महत्त्वाचे स्थान होते.
डॉआंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ .१८९१ साली महू या मध्यप्रदेशातील लष्करी छावणी असलेल्या गावात झाला.सुभेदार रामजी सकपाळ आणि भीमाबाई मुरबाडकर यांचे ते १४ वे अपत्य होतेहे कुटुंब मूळचेमहाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या गावचेत्यांचे पूर्वज ब्रिटिश सैन्यात नोकरी करत होतेत्यांच्यावडिलांना मराठी  इंग्रजी भाषांमध्ये थोडे शिक्षण मिळाले होते  त्यांनी आपल्या मुलांना शिकण्याची प्रेरणा दिली.
कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू धर्मातील साहित्याची ओळख करून दिलीइतर जातींतील लोकांच्याविरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागलाजरी शाळेतप्रवेश मिळाला तरी आंबेडकरांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे.
भीमराव वयाने लहान असल्यामुळे ’कॅम्प दापोली’ येथील शाळेत त्यास प्रवेश देता आला नाहीयामुळे घरीचलहानग्या भीमरावास अक्षरओळख आपोआप होऊ लागली.१८९६ मध्ये सुभेदार रामजींनी आपल्यापरिवारासह दापोली सोडलीते सातारा येथे सुरुवातीला साधारण घरात राहीले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्यानेघेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागलेत्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होतेहे वयत्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होतेसुभेदार रामजींनी .१८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात आपल्या दृष्टीनेसुयोग्य अशा तारखेला सातारा येथील ’कॅम्प स्कूल’ मध्ये आपल्या लाडक्या भीमरावाचे नाव दाखल केले.भीमरावाचे नाव दाखल केलेअशा प्रकारे भीमरावांच्या शिक्षणाचा आरंभ झाला!
.१८९६ मध्ये भीमरावांची आई भीमाबाईंचा मस्तक शुळ या आजाराने दु:खद निधन झालेत्यावेळी मातृविहीनभीमरावांचा ममतायुक्त आधार बनण्याचे महत्त्वाचे कार्य आत्या मीराबाईंनी केलेत्या वयाने भाऊ रामजीपेक्षामोठया आणि स्वभावाने प्रेमळ  समजूतदार होत्याम्हणून रामजींसह सर्वजण त्यांचा आदर करीत असत.रामजींनी.१८९८ साली दुसरे लग्न केले आणि कुटुब मुंबईला नेलेतेथे आंबेडकर एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारीशाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले.[] .१९०७ साली त्यांनी मॅट्रिक परीक्षा यशस्वीरीत्या पार केली  ..१९०८ मध्ये मुंबई विद्यापीठाच्याएलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतलाहा प्रसंग त्यांच्या समाजातीललोकांनी अभिमानाने साजरा केलायाआधी .१९०६ मध्ये त्यांचे लग्न दापोलीच्या रमाबाई (वय  वर्षे)यांच्याबरोबर ठरलेयानंतर अमेरिकेतील शिक्षणासाठी त्यांना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी २५ रूपयेप्रति महिना शिष्यवृत्ती दिली.१९१२ साली त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांमध्ये पदवी मिळवली बडोदा संस्थानाच्या सरकारात नोकरीची तयारी केलीयाच वर्षी त्यांचा मुलगा यशवंत याचा जन्म झाला फेब्रुवारी,.१९१३ मध्ये त्यांचे आजारी वडील रामजी यांचा मुंबईमध्ये मृत्यू झाला.
अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष
बाबासाहेबांनी एक आघाडीचे भारतीय विद्वान या नात्याने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट १९१९ च्याबाबत साऊथबरोकमिटीसमोर आपले विचार मांडलेयावेळी आंबेडकरांनी दलित  इतर मागासलेल्या समाजांसाठी वेगळे मतदानविभाग  आरक्षण यांची मागणी केली.१९२० साली त्यांनी मुंबईत मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केलेयावृत्तपत्राच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन त्यांनी सनातनी हिंदू नेत्यांवर आणि जातिभेदाविरुद्ध काहीही करत नसलेल्याभारतीय राजकारण्यांवर टीका केलीकोल्हापुरातील मागासवर्गीयांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या भाषणामुळे छत्रपतीशाहू महाराज खूश झाले  त्यांनी आंबेडकरांबरोबर जेवण करून हिंदू समाजाला धक्का दिलाआंबेडकरांनी यानंतरवकिलीचा व्यवसाय सुरू केला आणि मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा सुरू केली..१९२६ साली ते मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले.१९२७ च्या सुमारास त्यांनीअस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतलात्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी  हिंदू देवळांमध्येप्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी  मोर्चे काढण्यास सुरुवात केलीमहाड येथे चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरूकरण्यासाठी यशस्वी सत्याग्रह केला..१९२८ मध्ये बाँबे प्रेसिडेन्सी कमिटीवर त्यांची नेमणूक करण्यात आली त्यांनी सायमन कमिशनाबरोबर काम केलेनिवडणुकींमधील सुधारणांसाठी त्यांनी काही नवीन मुद्दे सुचवले.
पुणे करार
.१९२० च्या दशकाच्या अखेरीस आंबेडकर दलितांचे एक नामवंत राजकीय नेते बनले होतेजातिसंस्थेविरुद्धकाहीही  करणर्या पक्षांना त्यांनी आपल्या टीकेचे लक्ष बनवलेमहात्मा गांधी आणि अखिल भारतीयकाँग्रेस यांच्यावर दलितांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप केलाब्रिटिश सरकारावरही ते नाराज होते त्यांनी दलितांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली ऑगस्ट १९३० साली मागासवर्गीयांच्या सभेमध्येआंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केलामागासवर्गीयांनी काँग्रेस  ब्रिटिश यांपासून स्वतंत्रझाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत असे त्यानी सांगितलेया भाषणात त्यांनी मिठाच्या सत्याग्रहाचा समाचारघेतलाया टीकेमुळे सनातनी हिंदू संतापले.१९३२ साली राव बहाद्दूर राजा यांनी दोन उजव्या विचारसरणीच्याकाँग्रेस नेते बीएसमुंजे[][]  जाधव यांबरोबर एक करार केलाया करारानुसार मुंज्यांनी राजांना पाठिंब्याच्याबदल्यात काही आरक्षित जागा अनुसूचित जातीमधील लोकांना देण्याचे ठरविलेया घटनेमुळे आंबेडकरांनी संपूर्णभारतात दलितांसाठी विभक्त मतदारसंघांची मागणी केलीआंबेडकरांचे महत्त्व आणि दलितांमधील जनाधारवाढला आणि त्यांना .१९३१ साली लंडन येथील दुसर्या गोलमेज परिषदेचे निमंत्रण आलेया परिषदेत त्यांचेगांधीजींबरोबर विभक्त दलित मतदारसंघावरून मतभेद झालेगांधीजींना धार्मिक वा जातीय आधारावर विभक्तमतदारसंघ मान्य नव्हतेत्यांना यामुळे भविष्यात हिंदू समाज दुभंगण्याची भीती वाटत होतीजेव्हा ब्रिटिशांनीआंबेडकरांची मागणी मान्य केलीतेव्हा गांधीजींनी येरवडा तुरूंगात उपोषण सुरू केलेसनातनी हिंदू समाजालाअस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यास सांगून हिंदूंमध्ये राजकीय आणि सामाजिक एकी आणण्याचे आव्हान केले.गांधीजींच्या उपोषणाला लोकांकडून मोठा पाठिंबा मिळाला आणि हिंदू नेत्यांनी आंबेडकरांबरोबर येरवडा येथे बैठकाघेतल्यागांधीजींच्या मृत्यूनंतर दलित समाजाविरुद्ध दंगली होऊन विनाकारण त्रास होईल असे वाटून आंबेडकरांनीस्वतंत्र मतदारसंघाऐवजी आरक्षित मतदारसंघांसाठी मान्यता दिलीयामुळे स्वतंत्र मतदारसंघ मिळाले नसलेतरीदलितांना जास्त जागा मिळाल्यादलितांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधीजींनी खेळलेली राजकीयचाल असे आंबेडकरांनी या उपोषणाचे नंतर वर्णन केले.
जीवनक्रम
१८९११४ एप्रिल
महू गावी जन्म.
१८९६
त्यांच्या आईचा मृत्यू.
१९०० नोव्हंबर
सातार्याच्या शासकीय शाळेत प्रवेश.
१९०४
एलफिन्स्टन शाळेत प्रवेश.
१९०६
रमाबाईंशी विवाह.
१९०७
मेट्रिक परीक्षा७५० पॆकी ३८२ गुणांनी पास केली.
१९०८
जानेवारी एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश.
१९१२ डिसेंबर
त्यांचा मुलगा यशवंत ह्याचा जन्म झाला.
१९१३
बी.ची परीक्षा मुंबई विद्यापीठातून पास झाले. ( पर्शियन आणि इंग्रजी विषय)
१९१५ जून
एम.ची परीक्षा पास झाले.
१९१६ जून
कोलंबिया विद्यापीठातून पीएचडी.साठी काम पूर्ण करून लंडनला पुढील अभ्यासाकरिता रवाना झाले.
१९१७
कोलंबिया विद्यापीठाने पीएचडीपदवी प्रदान केली.
१९१७ जून
लंडनहून भारतात एमएस्सी. (अर्थशास्त्र)या पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून परतलेकारण बडोदा संस्थानानेत्यांची शिष्यवृत्ती थांबवली होती.
१९२१ जून
लंडन विद्यापीठाने त्यांना एमएस्सी. (अर्थशास्त्र)ही पदवी प्रदान केली.
विचार
राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष
एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झालीप्रांतिक कायदेमंडळांना एक महत्त्वाचेकाम करावयाचे होतेब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य देऊ केले होते आणि स्वतंत्र होणार्या भारताचाराज्यकारभार राज्यघटनेनुसार होत राहावाम्हणून निवडून आलेल्या मध्यवर्ती  प्रांतिक कायदेमंडळांनी काहीप्रतिनिधी निवडून घटना समिती तयार करावी आणि त्या घटना समितीने राज्य घटना तयार करण्याचे काम सुरूकरावेअसे त्यांनी सुचविले होतेत्याप्रमाणे मध्यवर्ती आणि प्रांतिक कायदेमंडळांनी घटना समितीचे प्रतिनिधीसभासद निवडण्याचे काम केले.
मुंबई कायदेमंडळात डाआंबेडकरांच्या शेडयुल्ड कास्ट्स फेडरेशनचे निवडून आलेले सभासद नव्हतेत्यामुळे काग्रेसपक्षाच्या सहकार्याशिवाय ते मुंबई कायदेमंडळातून घटना समितीचे प्रतिनिधी सभासद होऊ शकत नव्हतेअशाप्रतिकूल परिस्थितीतही त्यांना अस्पृश्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घटना समितीचे सभासद होण्याचीआवश्यकता वाटू लागली होतीतोपर्यंत मुंबई कायदेमंडळांच्या काग्रेसच्या सभासदांनी घटना समितीचे सभासदम्हणून मुकुंद जयकर आणि केएममुन्शी या दोघांची निवडही केलीत्यामुळे मुंबई कायदेमंडळाकडून डॉ.आंबेडकरांना निवडून देण्याचा प्रश्नच राहिला नाही.


पण बंगाल प्रांताचे कायदेमंडळ डॉआंबेडकरांना सहकार्य करण्यास तयार झालेजोगेन्द्रनाथ मंडल आणि बंगालप्रांताच्या कायदेमंडळाच्या मुस्लिम लीगच्या सभासदांच्या सहकार्याने डॉबाबासाहेब आंबेडकर घटना समितीचेसभासद म्हणून निवडून येण्यास यशस्वी झालेते प्रथम पसंतीची  मते मिळवून काग्रेसचे उमेदवार सरतचंद्र बोसयांचा पराभव करून विजयी झालेअखेर डॉबाबासाहेब आबेडकर अस्पॄश्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घटनासमितीचे सभासद होण्यात यशस्वी झालेच.


२० अगस्ट १९४७ रोजी घटना समितीच्या अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्या संबंधीच्या सर्व कायदेशीरगोष्टी यांचा विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आल्याचे जाहीर केले आणि त्या समितीच्या सभासदांचीनावेही जाहीर केली - डॉबीआरआंबेडकरजीव्हीमावळणकरपुरुषोत्तमदास टंडनगोपालस्वामी अय्यंगारइत्यादी.
२९ अगस्ट १९४७ रोजी घटना समितीने एक ठराव पास करून स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयारकरण्यासाठी डॉआंबेडकर यांच्यासह सात सभासदाची ’मसुदा समिती’ नियुक्ती केली आणि विधिमंत्री डॉबीआर.आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले.                      शाहू महाराज

चौथे शाहूअर्थात शाहू महाराज, (जून २६.१८७४ - मे .१९२२हे कोल्हापूर संस्थानाचे .१८८४-१९२२सालांदरम्यान महाराज होते.

जीवन
शाहू महाराजांचा जन्म जून २६.१८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झालात्यांचे नाव यशवंतत्यांच्यावडिलांचे अप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई होतेकोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजीमहाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च.१८८४ रोजी यशवंतरावांना दत्तकघेतले शाहू हे नाव ठेवलेएप्रिल .१८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झालाराज्याभिषेक झाल्यानंतर.१९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होतेमुंबई येथे मे .१९२२ रोजी त्यांचेनिधन झाले.

कार्य
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिलात्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिकशिक्षण सक्तीचे  मोफत केलेस्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढलीअस्पृश्यता नष्टकरण्याच्या दृष्टीने त्यांनी .१९१९ साली सवर्ण  अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली.जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.१९१७साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिलीबहुजन समाजालाराजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी संदर्भ हवा ] त्यांनी .१९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयतअसोसिएशन’ ही संस्था स्थापलीवेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष शाहूमहाराजांच्याच काळात झाला.
शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठशेतकर्यांची सहकारी संस्थाशेतकी तंत्रज्ञानाच्यासंशोधनासाठी ‘किंग एडवर्ड ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटाहोताराधानगरी धरणाची उभारणीशेतकर्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अश्या उपक्रमांतूनही त्यांनीकृषिविकासाकडे लक्ष पुरवले.
त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठीतसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होतेत्यांनीचित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले.
राधानगरी धरण कोल्हापूर जिल्ह्यातील एक धरण आहेहे धरण भोगावती नदीवर बांधण्यात आले असून त्याचामुख्य उपयोग शेतीसाठी पाणी पुरवठा  वीज निर्मितीसाठी होतो.

राजर्षी शाहूमहाराजांनी शंभर वर्षांपूर्वी सिंचनाचे महत्त्व ओळखून त्या कामाला सर्वाधिक प्राधान्य दिलेविहिरी,तलावछोटे बंधारे अशा अनेक योजनांचा धडाका लावलाराधानगरी धरण म्हणजे या प्रयत्नांच्या मालिकेतीलमुकुटमणी आहेएका छोट्या संस्थानाच्या माध्यमातून महाराजांनी राधानगरी धरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पसाकार केला१९०७ ला त्यांनी धरणाची योजना पुढे आणली१९ फेब्रुवारी १९०८ ला गाव नव्याने वसवून त्याचे"राधानगरीअसे नामकरण करण्यात आले१९०९ ला धरणाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले१९१८ पर्यंत धरणाचेबांधकाम ४० फुटांपर्यंत पूर्ण झालेपुढे निधीच्या कमतरतेमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास १९५७ साल उजाडलेपण तत्पूर्वीपाणी साठवणे सुरू झाले होतेमहाराष्ट्रातील एक अतिशय भक्कम धरण म्हणून "राधानगरीओळखले जातेबाकीआजही भक्कमपणाच्या बाबतीत या वेदोक्त प्रकरण ,लोकमान्य आणि छत्रपति शाहु महाराज कोल्हापुरचेशाहूमहाराज यांच्या कारकिर्दित सुरुवातीलाच कार्तिकस्नानाचे वेळी राजवाड्यातच एका ब्राह्मणाने स्वतअंघोळ करताच मंत्र सांगण्याचे ठरवले यावरुन वेदोक्ताचा वाद दिवाळी १९०१ च्या सुमारास निर्माण झालाराजोपाध्यायस्वतआजारी असल्याने ते तिथे हजर नव्हतेया ब्राह्मणाने पुराणोक्त मंत्र म्हणावयास सुरुवात केलीजाणाकारांनीशाहु महाराजांच्या लक्षात ही गोष्ट आणून देताच त्यांनी जाब विचारला तेव्हा त्या ब्राह्मणाने "छत्रपतींना वेदोक्ताचाअधिकार नाहिपण पुराणोक्त मंत्रांनी हाच विधी करता येतो!" पण छत्रपती शाहु महाराज हे वेदांचे प्रचंड अभिमानीहोतेत्यांनी वेदोक्त मंत्रोच्चारण करा असे सांगितल्यावरहि तो ब्राह्मण ऐकेनात्यातुन त्याने स्वतशुचिर्भूत  होताहे मंत्र सांगितले होतेकोल्हापुरच्या ब्राह्मणांनीही या मूर्ख ब्राह्मणाच्या गाढवपणाचा निषेधच केलामात्र हा विधी पणसंस्थानचे रेव्हेन्यु अधिकारी सत्यशोधक भास्करराव जाधव यांनी पुढे हा वाद निर्माण केला  वाढवला.
स्वतशाहू राजांना वैदिक धर्म आणि स्थूल स्वरुपाची समाजरचना मान्य होती का नाहीत्यांचे एक पत्र यावर प्रकाशटाकतेकोल्हापुरच्या विद्याविलास च्या संपादकांना लिहिलेले हे पत्र,
"माझ्या मतासंबंधि बराच गैरसमज करण्यात येत आहे म्हणून माझे मत जनतेपुढे मांडण्याकरता पाठवतआहे.सत्यशोधकसमाजिस्टांचा हलल माझेवर काज्याप्रमाणे ख्रिस्त ,बुद्ध ,थिऑसफी पंथांची काही तत्वे मलामान्य आहेत त्याप्रमाणे सत्यशोधक समाजाची काही तत्वे मला मान्य आहेतमी सत्यसमाजिस्ट कधीही नव्हतो नाहीहुबळीस ब्राह्मणेतर समाजाअची बैठक झाली तेव्हा तेथील सत्यशोधक समाजाने मला पानसुपारीस बोलावलेअसता मी इतर संस्थांना जसा पाहुणा म्हणून तसा येईल असे सांगितले .मग मला सत्यशोधक का म्हणवले जाते?मला वेद मान्य असून ,मी वेदास चिकटून रहाणारा आहे असे असता माझ्यावर हल्ला का?
कळावे,
शाहू छत्रपती

मुंबई , ता २३ मार्च /१९२१
एवढे स्वच्छ विचार असणारा हा राजा या वेदोक्त वादात कसा फसला वा इंग्रजांच्या राजकारणाने फसून  काहीलोकांच्या सल्ल्याने का वागला लोकमान्यांची भूमिका काय होती याचा हा इतिहास.(एकांगी वैयक्तिअक मत वगळावेविकिप्डीयास अनुपयूक्त)

लोकमान्य टिळक विरुध्द चिरोल
चिरोलच्या ’दि अनरेस्ट एन इंडिया’ या लोकमान्यांवर आणि चित्पावन ब्राह्मणांवर गरळ ओकणारे पुस्तक त्याचेमराठी भाषांतर भास्करराव जाधव  अण्णासाहेब लठ्ठे  प्रो..गो.डोंगरे या तिघांनी केले  ते पुस्तक स्वखर्चानेछापून शाहूमहाराजांनी फुकट वाटलेमहाराजांनी सर व्हलेंटाईन चिरोलल पुस्तकाच्या लेखनासाठी दरबारी पाहुणाम्हणून ठेऊन घेतलेकागदपत्र परवलेपैसा दिलामहाराजांचे ॠण चिरोलने स्वतप्रस्तावनेतच मान्य केले आहे.मंडालेहून आल्यावर टिळकांनी चिरोलवर अब्रुनुकसानी चा दावा दाखल केलाया खटल्यात भास्करराव जाधव आणिडोंगरे चिरोल साहेबाचे साक्षिदार म्हणून उभे राहिलेशाहु महाराजांच्या वेदोक्त प्रकरणात टिळकांनी विरोध केला असेचिरोलने म्हंटले होते त्यासंदर्भात टिळकांच्या वकिलांनी १९०१ ते १९०८ या काळातले केसरीचे अंक समोर ठेऊन प्रश्नकेला की "टिळकांनी शाहुमहाराजांच्या वेदोक्ताच्या अधिकाराला कोठे विरोध केला ते दाखवा." कारण या ब्राह्मणद्वेषाने प्रेरित झालेल्यांनी तसा लेखी  तोंडि प्रचार केला होतातेव्हा या दोघांनीही टिळकांनी वेदोक्ताच्या संबंधातलोकमान्यांनी शाहूमहाराजांना कधिही विरोध केला नाही हे कबूल केले. डोंगरे म्हणाले वेदोक्त "प्रकरणात व्यक्तीश:छत्रपतिंविरुद्ध टिळकांनी लिहिल्याचे मला दाखब्वता येणार नाहीकिंबहुना शिवाजीच्या वंशजांना वेदोक्ताचा अधिकारआहेच असे टिळक म्हणत होते असे मला वाटते."
याच केस मधे सत्यशोधक भास्कररवांची जी साक्ष झाली ती त्यांची मनोवृत्ती स्पष्ट दाखवतातजाधव म्हणाले , "मला या वेदोक्तामधे काहिहि अर्थ दिसत नाही ब्राह्मण विरोधी जातात म्हणून आम्ही हा हक्क मागतोहिंदुंनाचकाय पण मुसलमान ख्रिस्ती यांनाहि हा अधिकार असावा असे मला वाटते!" तेव्हा वकिलांनी प्रश्न केला कि मगतुमच्या मागणीप्रमाणे मुसलमान  ख्रिश्चनांनिही वेदोक्ताची मागणी केली असेलत्यावर जाधवांनी उत्तर दिले.अद्याप त्यांनी ती मागणी केली नाहीजाधवांनी हे प्रकरण कसे रंगवले असेल याचा अंदाज करता येईल.

भास्करराव जाधव यांची कार्यशैली
राजोपाध्ये यांची भूमिका मांडणारे पत्र पुढे देतो पण हे सविस्तर पत्र  मे १९०२ ला पाठवले त्यावर दुसऱ्याच दिवशीमहाराजांच्या खाजगी कारभार्याचे उत्तर आले  त्यात राजोपाध्यांना बडतर्फ केले गेले जप्तीचा हूकूम दिला१३मे ला शाहू लंडनला निघाले  १५ मे ला मुंबईला बोटित बसलेत्यांच्या पाठीमागे सत्यशोधक भास्करराव जाधवयांनी राजोपाध्ये यांची उत्पन्ने जप्त केली पण ती केवळ उपाध्येपणाशी संबंधित  करता खाजगी मालकिचीउत्पन्नेसुद्धा जप्त केली . एवढेच नव्हे तर या वादाशी संबंध नसलेल्या छोट्या गावातील शेकडो ब्राह्मणांना च्यालहानसहान जमिनी जप्त करून त्यांना देशॊधडिला लावलेही सर्व उत्पन्ने मंदिरांची व्यवस्था लावण्यास पूर्वापार यामंडळिंना दान म्हणून मिळाली होती ही सर्व ब्राह्मण परागंदा होऊन ब्रिटिश हद्दीत निघून गेलीमूळ प्रश्न होता केवळक्षत्रियत्वाचे संस्कार लोप पावल्याने छत्रपतींनी प्रायश्चित्त घेण्याचा होतात्यांचे क्षत्रियत्व ब्राह्मण समाजालामान्यच होतेजाधवांनी खुनशिपणाने राजोपाध्येंवर जप्तीचा हुकूम बजावण्याची वेळ राजोपाध्यांच्या मुलाच्यालग्नघडीलाच काढलीया सत्यशोधक जाधव यांनी  मे १९१९ ला एक व्याख्यान दिले त्यात कुणबई वैदिक वर्गनिर्माण करु नये असे उद्गार काढलेवेदपठ्ण करण्यातच पुरुषार्थ नाही असे म्हटलाने वेदाभिमानी असल्यानेछत्रपति शाहू संतापले मग जाधवांनाच सपशेल माफी मागावी लागली.

टिळकांची भूमिका
शाहु छत्रपतीं प्रकरणाचा फायदा घेऊन सत्यशोधकांनी ब्राह्मण -क्षत्रिय समाज सोडून सर्वच हिंदु समाजाला,-परधर्मियांनाहिवेदोक्ताचा अधिकार मिळाव म्हणून प्रचार करत होतीयासंबंधि टिळकांनी लिहिलेले शब्द, "जातिभेद हा हिंदु समाजाच्य हाडी खिळलेला आहे. .... हे परंपरागत किंबहुना रचनासंगत भेदाभेद अजीबात सोडूनटाकून सर्व हिंदुस्थानातील जातींचा सबगोलंकार करणे इष्ट असले तरी शेकडो वर्षे ते शक्य नाही हे कोणासहि मान्यकेले पाहिजे  आम्ही आजच्या प्रश्नांचा जो विचार करणार आहोत तो याच धोरणावर करणार आहोतसमाजाच्यास्थितीत जो काही पालट कोणास करावयाचा असेल तो व्यवस्थेने बेताबेतानेच केला पाहिजे  तोही असा असलापाहिजे कि त्याची उपयुक्तता लोकांच्या चटकन लक्षात येईलहल्ली जी वेदोक्ताची चळवळ सुरू झाली आहे ती त्याप्रकारची नाही...मराठे लोकांस वेदोक्त कर्म करणे असल्यास त्यांनी ते खुशाल करावे त्यांचा हात धरणारा या काळातकोणी राहिला नाहीपण अमक्या ब्राह्मणानेच तो आमच्या घरी केला पाहिजे असा आग्रह मात्र त्यास धरता येणारनाही.... निरनिराळ्या जातीतील लोकांचा सलोखा कसा व्हावा हे आम्हास पाहणे आहे  तशा दृष्टीनेच या विषयावरीललेख आम्ही लिहीले आहेत."(नेमके कुठे आणि केव्हा लिहीले

वेदोक्ता बाबत टिळकांचे जाहीर मत
-११-१९०१ च्या केसरीत टिळक लिहीतात कोणास वेदोक्ताचा संस्कार करावयाचा असल्यास तो त्याने खुशालकरावा उगाच जातीजातीतील तंटे वाढवण्याची आमची इच्छा नाही  या विषयावरील दोन लेखात तशा प्रकारचामजकूरही आलेला नाहीतेव्हा नसता दोष आमच्या माथी मारुन आम्हास भलत्याच वादात गोवण्याची कोणाचीइच्छा असेल तर ती आमच्याकडून सफल होणार नाही..."
लोकमान्य टिळक यांना विद्धंसक सुधारक होण्यापेक्षा विधायक सुधारणावादी व्हावेसे वाटत होते हे स्वच्छ दिसते.आधी याजकिय स्वातंत्र का आधी सामाजिक सुधारणा हा वाद प्रसिद्ध आहेचपण या प्रकरणात त्यांची अकारणबदनामी केली गेली.
टिळक विधायक सुधारणावादी होतेजातीभेद मोडणे त्यांना इष्ट ही वाटत होते पण क्रमाक्रमनेखुद्द शाहु राजांनीतंजावर प्रकरणात मराठा समाजातील भोसलेघोरपडे,पवार ,जाधव आदि केवळ १२ मराठा घराण्यांतच वेदोक्ताचाअधिकार आहे असे सांगीतले म्हणजे खुद्द छत्रपतींनीही सर्व मराठा समाज किंवा सर्व ब्राह्मणेतरांना वेदोक्ताचाअधिकार आहे किंवा हवा असे १९१७ पर्यंत म्हटले नव्हते..

सयाजी महाराजांची भूमिका
सयाजीराव महराजांनी या प्रकरणात विधायक भूमिका घेऊन हा वाद कोल्हापूरप्रमाणे बडोदे संस्थानात माजू दिलानाहीत्यांनी १८९६ ला एका पत्रात म्हंटले आहे की "मला पुराणोक्त आणि वेदोक्त यात स्वत:ला काही कमी जास्तश्रेष्ठ वाटत नाहीमात्र सामाजिक दृष्ट्या वेदोक्त श्रेष्ठ पद्धत मानली जातेपण अशा रितीने लोक केवळ विधी आणिकर्मे यातच बुडुन धर्माची तत्वे विसरुन गेली आहेत ही खेदाची गोष्ट आहेम्हणून मी सुधारणा हाती घेतली आहे."

राजोपाध्यांची भूमिका
शाहु महाराजांना अंघोळ  करता पूजा सांगू पहाणार्या मूर्ख ब्राह्मणाला शासन केल्यावर जे मुख्य राजोपाध्ये त्यांनादरबारातर्फे काही विचारणा झाली.त्यात त्यांना वेदोक्त पद्धतीने विधी करण्याची आपली इच्छा आहे किंवा कसे असेविचारले गेले ते पत्र किंवा यादी  - १० - १९०१ चे आहे.
यावर राजोपाध्ये ते मुंबईला एका परिक्षेसाठी निघाले होते त्यांनी राजांची समक्ष भेट घेऊन परत आल्यावरशास्त्राप्रमाणे विचार करण्यासाठी बंद पडलेले वेदोक्त विधी कशा प्रकारे सुरू करता येतील याच्याविचारविनिमयासाठी स्वखर्चाने निरनिराळ्या ठिकाणाचे शास्त्री बोलावतो असे सांगीतले . छत्रपती शाहू राजांचीमान्यता मिळाल्यावर ते मुंबाईला निघून गेलेशंकराचार्य ,काशी ,वाई स्वखर्चाने घेऊन येतो असे राजोपाध्ये यांनीराजांना लेखी कळवले होतेत्यास मूक संमती मिळालीराजोपाध्ये परतल्यानंतर मधल्या -१० दिवसात कोणीतरीशाहू राजांचे कान भरले  राजोपाध्यांना काशी आदी हून शास्त्री लोकांना आणण्यास मनाई करण्यात आलीवरउल्लेखलेले पत्र ही राजोपाध्यांना -१० ऐवजी  महिना १० दिवस एवढे उशीरा म्हणजे १८-११-१९०१ ला मिळाले.
मे १९०२ ला राजोपाध्ये यांनी महाराजांना पाठवलेल्या पत्राचा सारांश,
रा..दिवाण यांस कळवले ते असे का कळवले ते समजत नाहीआपण वस्तुस्थिती सोडून कळवले हे माझे दुर्दैवआहे. .... .सरकरवाड्यातील हव्यकव्य कृत्ये वेदोक्त वा पुराणोक्त करायचे काम माझे नाही तर सरकारास जे विधिअसतात ते सरकार नसताना मी करायचे असतात.विशेष प्रसंगी सरकार असताना मी फक्त त्यांचे सन्निध असावेएवढेच माझे काम आहे.पद्धत कोणतीही असोआजपर्यंतची वहिवाट काहीही असोयेथून पुढे सर्व धार्मिकविधीवेदोक्त पद्धतीने केले जावे अशी सरकारांची इच्छा आसल्यास तसे करण्यास माझि काहीही हरकत नाही.मलानेहमीच्या वहिवाटिप्रमाणे सूचना मिळाली नाही म्हणून मी हजर झालो नाहीनेहमीप्रमाणेच सूचना मिळताच मीहजर झालो हि.यावरुन असे दिसेल कि मी उपाध्यायाचे काम सोडलेले नाहीकाशी,नाशिक .क्षेत्रांकडून निर्णयआणवले पाहिजेत त्यास हुजुरांची मान्यता पाहिजे.शास्त्राची अनुज्ञा आणल्याशिवाय हे काम केलेसंस्कार लोपपावल्याने प्रायश्चित्त करून पुन्हा वेदोक्त पद्धत सुरू करण्यासंबंधितर माझेब्वर येथील ब्रह्मवृंदाचा बहिष्कारपडेलमजवर बहिष्कार पडल्यास माझी हरकत नाही पण मीच बहिष्ख्रुत झालो तर धार्मिक विधी करणार कोण.१५ मे ला माझ्या मुलाचे लग्न बावड्याचे जहागिरदार यांचे मुलीशी ठरले आहेते झाले की मी शास्त्राच्या निर्णयमिळवण्याच्या उद्योगाला लागतो तसा निर्णय मिळवून मी जुलै १९०२ चे आत उत्तर देतोएखादी वहिवाट बंदपडली कि नव्याने सुरू करताना शास्त्राचा निर्णय आणवण्याव्चा पूर्वापार चालत आलेला सामान्य नियम आहेतो याबाबत सोडून एकदम वेदोक्त पद्धतीने धार्मिक कृत्ये करण्याचा प्रारंभ केला गे;ला यामुळे हे प्रकरण या थरावर आले हेमाझे दुर्दैव आहेसरकरांच्या परंपरागत उपाध्येपणावरुन मला दूर का करण्यात येऊ नये असा प्रश्न प्रस्तुत यादितमला विचारला आहेया प्रश्नाला सध्या एवढेच उत्तर देतो कि शास्त्राज्ञेस  पिढ्यानपिढ्या चालत आलेल्यावहिवाटिस अनुसरून मी आपले काम करण्यास सिद्ध आहे तोपर्यंत हा प्रश्नच उद्भवत नाहि.
पण यावर लगेच  मेला तुमचे उत्तर समाधनकारक नाही असे उत्तर आले  लगेच जप्तीचा हूकुम काढला जाउणराजोपाध्येंना काढून टाकण्यात आले. जोडीला त्यांच्यावर राजद्रोह आणि क्षत्रियत्वाचा वाद उकरुन काढला असाखोटाच आरोप केला गेलावास्तविक राजोपाद्ये यांनी उत्तर दिले त्यात हुजुरांचे घराणे क्षत्रिय का शूद्र याचा प्रश्नचउद्भवत नाही असे लिहिले होते.
मधे ३०-३५ वर्षांच्या काळात अज्ञान छत्रपतिंच्या मुंजीही झाल्या नव्हत्याकारण सर्व कारभार इंग्रजांच्या ताब्यातहोतापण स्वतशाहु महाराज छत्रपती झाल्यावर याच राजोपाध्यांनी शाहूंना गायत्री मंत्र दिला होताआणि हे स्वत:महाराजांनीच एका हुकुमात मान्य केले होतेपुढे महाराज श्रावणीही करत असतजो श्रावणी करतो त्यालावेदोक्ताचाही अधिकार असतोच असतो हे जो धर्मशास्त्र जाणतो त्यालाच कळेलमहाराजांसाठीचे सर्व श्रावणीचे विधीस्वतराजोपाध्येच करतया श्रावण्या जुन्या राजवाड्यात भवानी देवीसमोर होत  १६ कायदेकरी म्हणजेधर्मपंडीतहि आपल्या श्रावण्या महाराजांच्या उपस्थितीतच करत.
याचा अर्थच असा होता कि , राजोपाध्ये  अन्य पंडीतांना राजांच्या क्षत्रीयत्वाची किंवा वेदोक्ताच्या अधिकाराचीकधीही शंका नव्हतीमधल्या काळात ४० वर्षे संस्कार लोप पावला होतातो प्रायश्चित्ताशिवाय सुरू करणे हेअशास्त्रीय एवढेच राजोपाध्ये  अन्य ब्रह्मवृंदाचे म्हणणे होतेआणि शास्त्राला ते धरुनच होते.
१९१२ ला तंजावरच्या वारसा हक्काबद्दल वाद निघाला असता शाहू राजांनी अर्ज केलाएकूण २४ हक्कदार होतेयाखटल्यात खालच्या कोर्टाने तंजावर वंश हा धर्मशास्त्र दृष्ट्या संस्कार  केला गेल्याने (लग्न ,मुंज सारखेशूद्र ठरवला धर्मशास्त्र दृष्ट्या धर्मपत्नी नसलेल्या व्यक्तीचा अधिकार मान्य केलायावर शाहु राजांनी अपिल केले  आपल्याघरात कित्येक वर्षे वेदोक्त विधी बंद होते म्हणून आपणही शूद्र आहोत असा मुद्द्दा मांडलामद्रास हायकोर्टातूननिकाल आलाकोल्हापुरचे वेदोक्त प्रकरणही हायकोर्टात निघाले.. ब्राह्मण ज्या पद्धतीने विधी करतात तोचमहाराजांना हवा होताशककर्त्या शिवरायांचाही तसा आग्रह नव्हताक्षत्रियांस उचित असे विधी गागाभट्टांनी ठरवलेत्या प्रमाणे विधी होतत्यास  प्रायश्चित्तास कोल्हापुरचे महाराज तयार होते तर वाद तेव्हाच मिटला असता .
"तेव्हा क्षत्रिय संभाळणे हे मुख्यतयजमानांच्याच हाती आहे.कोल्हापुरच्या महाराजांनी त्यात चूक करून पुन्हाउपाध्यायाला आपल्या म्हणण्याप्रमाणे वाकवण्यासाठी कामावरुन काढून टाकले  जप्ती आणण्याचा अन्याय केला "असा अप्रत्यक्ष शेरा मद्रास च्या हायकोर्टाने मारलाशिवरायांप्रमाणे प्रायश्चित्त घेऊन वेदोक्त विधी सुरू करावेत काहीकाळ विधी केले नाहीत म्हणून त्यांचे क्षत्रियत्व रद्द होत नाहि  ते शूद्र ही ठरत नाहीत असे कोर्टाने सूचित केले.मद्रासहायकोर्टाचा निकाल सुमारे २२५ पानांचा असून तो इंडियन लॉ रिपोर्टरच्या मद्रास्च्या १९२५ च्या vol x L VIII मधेदिलेला आहेसर्वांत गंमत ही की क्षत्रीयत्वासाठी भांडणार्या महाराजांनी ब्राह्मणांप्रमाणे वेदोक्त विधी सुरू केलेतेअद्याप तसेच चालु आहेतहायकोर्टात मधे काही काळ मुंजी वगेरे वेदोक्त विधी झाअले नव्हते असे पुराव्यातूननिषपन्न झाले त्यामुळे कोल्हापुर घराणे किषत्रिय का शूद्र याचा निर्णय देऊ नये अशी विनंती राजांतर्फे करण्यातआलीतशी नोंद निकालात स्पष्टपणे करण्यात आली आहेमहाराजांच्या मृत्युनंतर धर्मविधींपुरते छत्रपती ब्राह्मणपद्धतीने वेदोक्त करतात  त्यापुरते ते ब्राह्मण झालेत आणि हे त्यांनी सुरू केलेले ब्राह्मण पद्धतीचे विधी मराठापुरोहित करतात.
१९१८ ला युवराजांचे लग्न सयाजीरावांच्या नातीशी ठरलेत्यांनी आवश्यक असलेले प्रायश्चित्त यावे असे सुचवले.७५ वर्षात कोल्हापुरच्या औरस वारसाचा विवाह होणार तेव्हा परंपरेप्रमाणे पहिले केळवण राजोपाध्ये यांचे व्हायचे.त्याप्रमाणे राजोपाध्येंना राजांचा निरोप गेलापण राजोपाध्ये यांनी मी आता राजोपाध्ये नसल्याने ते शक्य नाही असेकळवलेतेव्हा राजे स्वतत्यांना भेटले.शेवटि केळवण ही झालेरितसर प्रायश्चित्थी राजांनी घेतलेराजोपाध्येंच्या त्यांच्या मुलाच्या देखरेखीखाली सर्व विधी कोल्हापुर  बडोदे येथे झाआले१६ कायदेकरी ब्राह्मणांपैकी एकाने आपलेजप्त उत्पन्न सोडावे म्हणून अर्ज केला तो मन्य झालासर्वांची उत्पन्ने सोडण्याचे मान्य करून छत्रपतींनी आपल्यामनाचा थोरपणा दाखवलामात्र राजोपाध्ये आणि अन्य ब्राहमणांनी आमची चूक नसता आम्ही अर्ज का करावा अशीभूमिका घेतली  अर्ज केले नाहीत .पुढे महाराजही ही गोष्ट विसरले  कोणाचीही उत्पन्ने सुटली नाहित.
केसरीचा राजोपाध्येंना सल्ला काय होता?
"...कोल्हापुर येथले राजोपाध्ये यांच्या मूळ सनदा कशा आहेत ते आम्हाला बरोबर माहित नाही. - राजोपाध्ये यांनाआमची सूचना आहे की महाराज परत आल्यावर त्यांचे पुढे हे प्रकरण पुन्हा मांडावे  निस्पृह रितीने त्यांची समजूतघालण्याची खटपट करावी आणि ते नच जुळले तर हे प्रकरण इंग्रज सरकार कडे न्यावेदिवाणी किंवा फौजदारि हक्कदेणे ही राजांच्या खुषीतील गोष्ट आहेपण मामुल वहिवाटीप्रमाणे उपाध्येपण करण्यास तयार असता इनाम गावकाढून घेणे महाराजांच्या खुषीतील अधिकारातील गोष्ट नाही."राजोपाध्ये हे नामदार गोखले यांचे वर्गमित्र असूनराजकिय दृष्ट्याही टिळक पक्षिय नव्हतेटिळकांचा त्यांच्याशी कोणताही संबंध नव्हताकेवळ जी माहिती उपलब्धहोत्अ असे त्यातून टिळकांनी भूमिका मांडलीत्यात विधायक सुधारक आणि न्यायाची बूज राखणे एवढाच आधारहोता.

इंग्रजांची भूमिका
परंतु राजोपाध्यायांनी टिळकांची सूचना  मनता छत्रपती येण्याअगोदरच राजांनी लंडनला जाण्यापूर्वी नेमलेल्यासंस्थानाच्या काळजीवाहू कौन्सिल कडे जप्तीच्या फेरविचारासाठी अर्ज केलाकौन्सिल ने तो फेटाळलात्यवरराजोपध्ये यांनी तो संस्थानच्याच पोलिटिकल एजंट कडे अपिल केलेएजंट ने महाराजंच्य अखत्यारीतला विषयम्हणुन नाकारलेशेवटि राजोपाध्ये यांनी मुंबईच्या गव्हर्नर कडे अर्ज केलात्यावेळी लॉर्ड नॉर्थकोट हा गव्हर्नर होता.त्याने प्रथम राजोपाध्ये यांच्या बाजूने निकाल दिलातेवढ्यत शाहु राजे लंडनहून परतले  त्यांनी गव्हर्नरची भेटघेऊन हा निकाल फिरवायला लावलाहा निकाल महाराजांच्य हुषारिमुळे फिरला असे त्यांचे पहिले चरित्रकारकोल्हापुरचे दिवाण लठ्ठे यांनी शाहू मेमॉयर्स भाग  पृ २०८ वर दिलेल्या टिपात म्हटले आहे   यानंतर राजोपाध्ये यांनीव्हाइसरोय लॉर्ड कर्झन कडे अर्ज केलापण - वर्षे फ्रेजरने तो दाबून ठेवला.संदर्भ हवा ] . -०१-१९०५ ला नामदारगोखले यांच्या सांगण्यावरुन उपाध्यायंनी पुन्हा अर्ज पाठवलातेव्हा सर्वच कागदपत्रे मागवली गेलीत्यावर फ्रेजर नेएक टिपण करून पाठवले त्यावरुन इंग्रजांनी जातीय वाद वाढवणे , कर्झन विरुद्ध फाळणीविरुद्ध टिळकपक्षीयांनीउठवलेल्य रानाला खीळ घालणे  फॊडा आणि झोड या कुटिल राजकारणाचा डाव खेळणे कसे साध्य केले ते दिसेल..याटिपणाच्या सुरुवातीला आलेल्या वाक्यांचा भावार्थ - मी या केसचा विचार करताना मझे एकेकाळचे पाल्य म्हणूनशहू छत्रपतींकडे ओढा असल्याने त्यांचा पक्षपती म्हणून विचार करत आहे हे कबुल करतो."याच टिपणात फ्रेजरम्हणतोसनदेच्या अर्थासंबंधि शंक असेल तर मला वाटत की राजकारणाच्या दृष्टिने आपण यचा विचार केलापहिजे.जर राजोपाध्येला पूर्ण चेचला नाही तर सरकरची इभ्रत जाईल आणि महाराजांचा पराभव होईल." अश प्रकारे हान्यायाचा प्रश्न  रहाता इभ्रत  राजकारण यंचा प्रश्न झालाब्राह्मणद्वेष्ट्या सत्यशोधक आणि फोडा अणि झोडअशा राजकारणपटु इंग्रजांची युती झालीराजोपाध्ये कर्झनला पाठवलेल्या प्त्रात म्हणतात, "वेदोक्ताची चळवळ यानावाने कही उपद्य्वापी लोक समाजात विसरल्या गेलेल्या जातीय तेढी पुन्हा पेटवून स्वत:चा फायदा होतोका ते पहतआहेतलावालाव्या करून चुकीचे अर्थ सांगून छत्रपतींचे मन कलुषित केले गेले आहेराजांविषयी आदर राखुन मीसांगूतो की या ने अन्यायकारक सामाजिक बिघाड झाला आहे.""राजोपाध्यायांनी महाराजांना शूद्र म्हणून त्यांनावेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हटले " असा खोटा प्रचर जाधव  अन्य सत्यशोधकांनी केलाब्रिटिशांनी टिळकपक्षियांवर सूड उगवण्यासाठी त्यास उचलून धरुन ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर असा वादाला खतपाणी घातलेब्राह्मणवर्गाला अन्य समाजापासून फोडायचे त्यांना राजकारणासफायद्याचे होतेअसे असले तरी इंग्रजांना हा वाद जातीयनाही हे महित होतेयाबाबत हिंदुस्तान सरकारच्या सेक्रेटरीला मुंबई सरकारचा सेक्रेटरी सी.एच.हिल याने  मर्च१९०५ ला एक पत्र लिहिले त्याच भावार्थ,
"कोल्हापुरचे महाराज हे क्षत्रिय आहेत हे राजोपाध्ये पत्रातच म्हणत आहेत.आणि ते तसे म्हणत नाहित असेम्हणण्याचा काहिंचा प्रयत्न या वादाच्या मूळाशी आहेराजोपाध्ये  थ्या उताऱ्यात म्हणतातमराठी राज्याचेसंस्थापक शिवाजी महाराज यांच्या वेळेपासून कोल्हापुरचे राजघरणे क्षत्रिय असून त्यांना वेदोक्ताचा पूर्ण अधिकारआहे , त्यात कोणताही वाद नाही."


परीक्षेला जाताना शेवटच्या काही दिवसांमध्ये थोडक्यात वाचावे.
------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्रातील समाजसुधारक:

जन्म आणि मृत्यू
महात्मा फुले:
जन्म:  11 एप्रिल 1827                              जन्मगाववानवडी ( जिल्हापुणे )
पूर्ण नावज्योतीराव गोविंदराव फुले
मृत्यू:  28  नोव्हेंबर 1890

.राजर्षी शाहू महाराज :
जन्म: 26 जून 1874                                  जन्मगावकागल ( जि.कोल्हापूर )
पूर्ण नावयशवंतराव जयसिंगराव घाटगे
मृत्यू: 6 मे 1922 ( मुंबई )

.सुधारक गोपाळ गणेश आगरकर :
जन्म:  14  जुलै 1856                                 जन्मगावटेंभू ( जिल्हासातारा )
पूर्ण नावगोपाळ गणेश आगरकर
मृत्यू: 17  जून 1895 ( पुणे )

.महर्षी  धोंडो केशव कर्वे:
जन्म:  18 एप्रिल 1858                               जन्मगावशेरवली ( जिल्हारत्नागिरी )
पूर्ण नाव:धोंडो केशव कर्वे
मृत्यू: 9 नोव्हेंबर 1962

.डॉ.बाबासाहेब आंबडेकर:
जन्म:  14 एप्रिल 1891                               जन्मगावमहू (मध्यप्रदेश )
पूर्ण नावभीमराव रामजी आंबेडकर
मृत्यू:  6 डिसेंबर 1956  (चैत्यभूमी ,दादर , मुंबई )

_______________________________________________________________________
निगडीत संस्था आणि स्थापना वर्षे :
महात्मा फुले:
महार  , मांग .लोकांस विद्या शिकवणारी मंडळी =>  1853
सत्यशोधक समाजाची स्थापना => 24  सप्टेंबर 1873

.राजर्षी शाहू महाराज :
मराठा  एज्युकेशन सोसायटीची स्थापना => 1901
मागासवर्गीयांना नोकरीत 50%  जागा राखीव =>1902
मिस क्लार्क वसतीगृह => 1907
सहकारी कापडगिरणी =>1907
कोल्हापूरात सत्यशोधक समाजाची शाखा =>1913
पाटीलशाळा => 1913
मोफत प्राथमिक शिक्षण सर्वांना सक्तीचे => 25/07/1917
आर्य समाजाची शाखा =>  1918

.सुधारक गोपाळगणेश आगरकर :
टिळकआगरकर आणि चिपळूणकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे ची स्थापना केली.=>24ऑक्टोबर1884
फर्ग्युसन महाविद्यालय पुणे चे प्राचार्य => 1892 ते 1895

.महर्षी  धोंडो केशव कर्वे:
विधवाविवाहोत्तेजक मंडळी => 1893
अनाथ  बालिकाश्रम => 1899
निष्काम कर्ममठ => 1910
महिला विद्यापीठाची स्थापना =>1916
ग्राम शिक्षण मंडळ /महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ => 1936
समता  संघ =>1944
जाती  निर्मूलन संघाची स्थापना => 1948
बालमनोहर मंदिराची स्थापना (सातारा ) => 1960

.डॉ.बाबासाहेब आंबडेकर:
समाज समता संघ => 1927
मजूर पक्ष (लेबर पार्टी ऑफ इंडिया )=> 15 ऑगस्ट 1936 
ऑल इंडिया शेड्यूलड कास्ट फेडरेशन (अखिल भारतीय अस्पृश्य समाज संघटन)=> 1942
पीपल्स एज्युकेशन सोसायटी => 1945
______________________________________________________________________वृत्तपत्रे :
महात्मा फुले
स्वतफुले यांनी कोणतेही वृत्तपत्र चालविले नाहीपरंतु.फुलेंच्या प्रेरणेने कृष्णराव भालेकर यांनी 'दीनबंधू ' हेवृत्तपत्र मुंबई येथून चालविले.
'अंबालहरीहे सत्यशोधक समाजाशी संबंधित अजून एक वृत्तपत्र होते.

.राजर्षी शाहू महाराज :.

.सुधारक गोपाळ गणेश आगरकर :
सुरुवातीच्या काळात अकोल्याच्या  'वर्हाड समाचार ' मधून लेखन केले.
1881  साली लोकमान्य टिळकांच्या केसरीच्या संपादक पदाची धुरा सांभाळली . 1888  ला केसरी सोडले.
सन 1888  लाच त्यांनी 'सुधारकवृत्तपत्र सुरु केले . त्याच्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी संपादक या नात्याने नामदार गोपाळ कृष्ण गोखल्यांनी सांभाळलीतर मराठी आवृत्ती स्वतः आगरकर सांभाळत असत.
.महर्षी  धोंडो केशव कर्वे:

मानवी समता (मासिक )
.डॉ.बाबासाहेब आंबडेकर:
बहिष्कृत भारत
मुकनायक
समता
शुद्रातीशुद्र  (पाक्षिक )
___________________________________________________________________________
ग्रंथसंपदा :
महात्मा फुले:
सार्वजनिक सत्यधर्म  (मरणोत्तर प्रकाशित )
गुलामगिरी
शेतकर्याचा आसूड
अस्पृश्यांची कैफियत
इशारा
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा
सत्सार
तृतीय रत् (नाटक )

.राजर्षी शाहू महाराज :

.सुधारक गोपाळ गणेश आगरकर :
गुलामांचे राष्ट्र
हिंदुस्तानचे राज्य कोणासाठी
डोंगरीच्या तुरुंगातील  101  दिवस
विकारविलसित
स्त्रियांनी जाकिटे घातलीच पाहिजेत
 स्त्री दास्य विमोचन
स्वराज्याच्या दिशेने वाटचाल
राजकारणाचे दिशेने वाटचाल
वाक्य मीमांसा  वाक्याचे पृथ:करण

.महर्षी  धोंडो केशव कर्वे:
आत्मवृत्त
Looking Back

.डॉ.बाबासाहेब आंबडेकर:
रिडल्स इन हिंदूइझम
हू वेअर शूद्राज् ?
कास्टस्  इन इंडिया
थॉटस् ऑन पाकिस्तान
प्रॉब्लेम ऑफ रुपी
बुध्दा अँड हिज धम्म (मरणोत्तर प्रकाशित )

_________________________________________________________________________________

इतर महत्त्वपूर्ण बाबी :

महात्मा फुले:

.राजर्षी शाहू महाराज :
1902 => केंब्रिज विद्यापीठाची एल.एल.डी.

.सुधारक गोपाळ गणेश आगरकर :
'सुधारकवृत्तपत्राचे शीर्षक : ' इष्ट असेल ते बोलणार शक्य असेल ते करणार '

.महर्षी  धोंडो केशव कर्वे:
1955  मध्ये 'पद्मविभूषणतर 1958  मध्ये 'भारतरत् ' ने सन्मानित .

.डॉ.बाबासाहेब आंबडेकर:
त्यांची  जयंती - समता दिवस म्हणून देशभर  साजरी होते.
1991 साली त्यांच्या स्मृतीत पोस्टाचे तिकीट जारी .
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री
1990  साली 'भारतरत् ' पुरस्काराने सन्मानित .
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets