Search This Blog

QUE & ANS- SET A - 201 TO 400

QUE & ANS- SET A - 201 TO 400


201. महाराष्ट्राच्या पूर्वेस __________ राज्य आहे.
A. उत्तरप्रदेश       B. छत्तीसगड       C. गुजरात         D. गोवा
Answer B. छत्तीसगड

202.महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याचे विभाजन होवून _________ जिल्हा अस्तित्वात आला.
A. नंदुरबार         B. वाशिम         C. गोंदिया   D. हिंगोली
Answer C. गोंदिया

203. नागपूर आणि अमरावती विभाग _________ या नावाने ओळखला जातो.
A. मराठवाडा       B. खानदेश         C. मावळ          D. विदर्भ किंवा वर्‍हाड
Answer D. विदर्भ किंवा वर्‍हाड

204. कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी सुमारे ________ कि.मी.आहे.
A. 720            B. 700            C. 750            D. 800
Answer A. 720

205. कोकणच्या दक्षिण सरहद्दीलगत ___________ खाडी आहे.
A. वसई           B. तेरेखोल         C. दाभोळ          D. विजयदुर्ग
Answer B. तेरेखोल

206. _____________ही कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे.
A. गोदावरी   B. पूर्णा      C. भीमा           D. प्रवरा
Answer C. भीमा

207. मुंबई-नाशिक हा रेल्वेमार्ग __________ घाटातून जातो .
A. थळघाट         B. बोरघाट         C. आंबोली घाट           D. कुंभार्ली घाट
Answer A. थळघाट208. भीमा नदिच्या खोर्‍यात दक्षिणेकडे ___________ ही डोंगर रांग आहे.
A. सातमाळा-अजिंठा             B. हरिश्‍चंद्र-बालाघाट       C. एलोरा डोंगर     D. शंभू महादेव
Answer D. शंभू महादेव

209. महाराष्ट्र दख्खन पठाराची पूर्व-पश्चिम लांबी _________कि.मी.आहे.
A. 750            B. 720            C. 700            D. 780
Answer A. 750

210. सातपुडा पर्वत रांगेमुळे __________ नद्यांचे खोरे अलग झालेले आहे.
A. कृष्णा व भीमा   B. कोयना व वारणा C. नर्मदा व तापी    D. मुळा व प्रवरा
Answer C. नर्मदा व तापी

211. महाराष्ट्राचा ____________% भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे.
A. 90       B. 70       C. 80       D. 50
Answer A. 90

212.महाराष्ट्रात कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो ?
A. मराठवाडा       B. पश्चिम महाराष्ट्र        C. खानदेश         D. कोकण
Answer D. कोकण

213. विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात __________ प्रकारचे खडक आढळतात.
A. धारवाड         B. आर्कियन              C. कडाप्पा         D. विंध्ययन
Answer B. आर्कियन

214. ___________ हे महाराष्ट्रातील मुख्य अन्न-धान्य पिक आहे.
A. ज्वारी           B. गहू             C. तांदूळ          D. नाचणी
Answer A. ज्वारी

215. कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी भूभाग वनाखाली आहे ?
A. ठाणे            B. पुणे            C. लातूर           D. जालना
Answer C. लातूर

216. 'भंडारदरा धरण' महाराष्ट्रातील ___________ या जिल्ह्यात आहे.
A. चंद्रपूर          B. नाशिक         C. जळगाव         D. अहमदनगर
Answer D. अहमदनगर

217. महाराष्ट्रातील __________या जिल्ह्यात सर्वाधिक 'ठिबक सिंचन' प्रगत आहे .
A. जळगाव   B. चंद्रपूर         C. औरंगाबाद       D. नांदेड
Answer A. जळगाव

218. ____________ हा कोकणातील 'कल्प वृक्ष' आहे.
A. लिंब            B. महूआ          C. नारळ          D. साल
Answer C. नारळ

219. महाराष्ट्रात सहकार तत्वावर सर्वात पहिला 'हातमाग' ________________ येथे सुरु झाला.
A. सातारा    B. भिवंडी   C. इचलकरंजी            D. मुंबई
Answer C. इचलकरंजी

220. बॉक्साइटचा उपयोग मुख्यत्वे ____________ मिळवण्यासाठी केला जातो . .
A. लोह            B. मँगनिज   C. अल्युमिनिम           D. तांबे
Answer C. अल्युमिनिम

221. महाराष्ट्रातील ग्रामीण ते शहरी स्थलांतराचे _____________ हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे .
A. सामाजिक       B. राजकीय  C. शैक्षणिक        D. आर्थिक
Answer D. आर्थिक

222. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता ___________प्रती चौ.कि.मी.आहे.
A. 315            B. 324            C. 365            D. 382
AnswerC. 365

223. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात स्त्री-पुरुष प्रमाण _____________ इतके आहे.
A. 925            B. 950            C. 940            D. 324
Answer A. 925

224. सह्याद्री पर्वत क्षेत्रात ____________ ही आदिवासी जमात आढळत नाही.
A. वारली    B. ठाकर           C. गोंड            D. महादेव कोळी
Answer C. गोंड225. नंदूरबार हा जिल्हा ____________ प्रशासकीय विभागात येतो.
A. नाशिक   B. धूळे            C. जळगाव         D. अमरावती
Answer A. नाशिक

226. खालीलपैकी कोणता जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात येत नाही ?
A. सातारा    B. सांगली   C. सोलापूर        D. अहमदनगर
Answer D. अहमदनगर

227. पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतर __________ असे करण्यात आले.
A. सिंधुदुर्ग   B. रायगड          C. अलिबाग        D. बृहन्मुंबई
Answer B. रायगड

228. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे ____________ येथे आहेत.
A. उमरखेड         B. बल्लारपूर       C. कामटी    D. सावनेर
Answer B. बल्लारपूर

229. महाराष्ट्रात सर्वात कमी शहरी लोकसंख्येचे प्रमाण ____________ जिल्ह्यात आहे.
A. र‍त्‍नागिरी        B. गडचिरोली             C. चंद्रपूर          D. सिंधुदुर्ग
Answer D. सिंधुदुर्ग

230. 20 मे 2011 रोजी भारताने जीसॅट-8 हा उपग्रह फ्रेंच गुआना येथून अवकाशात कशासाठी सोडलेला आहे?
A. दळणवळण व दूरचित्रवाणी     B. समुद्रावर निगराणी    C. दहशतवादाचे नियंत्रण   D. पीक संरक्षण
Answer दळणवळण व दूरचित्रवाणी

231. नेटवर्कमध्ये जोडलेला संगणक खालीलपैकी कशामुळे शोधता येईल ?
A. आय. पी. अड्रेस        B. सब नेट मास्क         C. स्वीच           D. मोडेम
Answer A. आय. पी. अड्रेस

232.माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या प्रयोजनार्थ " माहिती" मध्ये काय येत नाही ?
A. साउंड           B. कोड            C. मायक्रो फिल्म          D. वरीलपैकी कोणतेही नाही
Answer D. वरीलपैकी कोणतेही नाही233. यु. आर. एल.(URL) या शब्दाची फोड खालील प्रमाणे आहे ?
A. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर B. युनिवर्स रिसोर्स लोकेटर C. युनायटेड रिसोर्स लोकेटर D. युनिअन रिसोर्स लोकेटर
Answer A. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर

234. वेब पेजेस साठवण्यास व त्यांना ‍‌दृ‍‌‍‍‌श्यरुपात आणण्यास कोणता सर्व्हर उपयोगी येतो ?
A. वेब सर्व्हर       B. मेल सर्व्हर       C. प्रिंट सर्व्हर      D. वरीलपैकी नाही
Answer A. वेब सर्व्हर

235. एखादी व्यक्ती भू- तलावर कुठे आहे हे शोधण्यासाठी _______ या नवीन टेक्नोलॉजीचा वापर होतो .
A. जी.पी.एस.सिस्टम       B. रडार सिस्टम     C. रेडीओ व्हेव सिस्टम           D. रेडीओ फ्रिक्वेंसी सिस्टम
Answer A. जी.पी.एस.सिस्टम

236. मिडिया लॅब एशियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झीक्युटीव्ह ऑफीसर श्री _______ आहेत .
A. सी.व्ही.रामाराजू   B. जी.व्ही.रामाराजू         C. एस.व्ही.रामाराजू        D. यापैकी नाही
Answer B. जी.व्ही.रामाराजू

237. _______________ ही संस्था " कंट्रोलर ऑफ सर्टिफाइंग अथोरीटी " (CCA) म्हणून काम पहाते .
A. एन.आय.सी.           B. डि.आय.सी.            C. एल.आय.सी.           D. आय.आर.बी.
Answer A. एन.आय.सी.

238. मिडीया लॅब एशियाने टेलीमेडीसिन क्षेत्रात टाकलेले पाऊल ___________ या नावाने ओळखले जाते .
A. इ-मेडीसिन       B. इ-धन्वंतरी             C. इ-डॉक्टर        D. इ-मेडहेल्प
Answer B. इ-धन्वंतरी

239. ज्या लोकांना सर्वसाधारण पुस्तके व वाचनीय साहित्य वाचता येत नाही (अंध व्यक्ती) अशा लोकांना त्यांच्या वाचनाच्या माध्यमात पुस्तके व साहित्य उपलब्ध करून देणारी ___________ ही संस्था आहे .
A. डी.एफ.आय.           B सि.एफ.आय            .C. एन.ए.बी.एल.   D. एम.एफ.आय.
Answer C. एन.ए.बी.एल.

240. डी.आय.टी. या शासनाच्या संस्थेने 60,000 देशातील शाळांना संगणक सुविधा, परिपूर्ण लॅब , वेब प्रसारण आणि इ - लर्निंग ह्या सुविधा 3 वर्षात देणारा ___________________ हा उपक्रम सुरु केला
A. "विद्या वाहिनी"        B. "ज्ञान गंगा"            C. "सरस्वती वाहिनी"      D. "ज्ञानकेंद्र"
Answer A. "विद्या वाहिनी"

241. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे पुढील " स्वातंत्र्य" आवश्यक आहे ___________________
A. दर्जा व संधी  B. श्रद्धा , विश्वास व उपासना  C. एकता आणि एकात्मता D. सामाजिक, आर्थिक व राजनैतिक
Answer B. श्रद्धा , विश्वास व उपासना

242.राज्यघटना दुरुस्तीची पद्धती कलम ___________ मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे .
A. 370            B. 368            C. 357            D. 257
Answer B. 368

243. राज्यघटनेच्या कलम 248 नुसार उर्वरित अधिकार (रेसिडयुअल) कोणाकडे सोपविण्यात आले आहेत ?
A. संसद     B. राज्य सरकार    C. सर्वोच्च न्यायालय       D. केंद्रशासित प्रदेश
Answer A. संसद

244. "स्त्री व पुरुष दोहोंना समान कामाचे समान वेतन" हे तत्त्व भारतीय राज्यघटनेत कुठे आढळते ?
A. मुलभूत अधिकार B. मुलभूत कर्तव्य  C. मार्गदर्शक तत्त्वे  D. आर्थिक अधिकार
Answer C. मार्गदर्शक तत्त्वे

245. केंद्र - राज्य संबंधाचे परीक्षण करण्यासाठी 1983 साली कोणता आयोग नेमण्यात आला ?
A. राजमन्नार आयोग            B. सरकारिया आयोग       C. मेहता आयोग    D. पी.बी.पाटील आयोग
Answer B. सरकारिया आयोग

246.खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ नाही ?
A. कर्नाटक         B. महाराष्ट्र        C. गुजरात         D. बिहार
Answer C. गुजरात

247. राज्यघटनेच्या कलम 1 नुसार भारत हा एक ___________________ आहे .
A. राज्यांचा संघ     B. संघराज्य        C. सहकारी संघराज्य       D. अर्ध संघराज्य
Answer A. राज्यांचा संघ

248. भारतीय संसदेत कोणाचा समावेश होतो ?
A. राष्ट्रपती आणि दोन्ही सभागृहे   B. राष्ट्रपती,राज्यपाल आणि संसद
C. लोकसभा आणि राज्यसभा            D. पंतप्रधान आणि दोन्ही सभागृहे
Answer A. राष्ट्रपती आणि दोन्ही सभागृहे


249. भारतीय राज्यघटनेच्या कितव्या कलमाद्वारे जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी देण्यात आली आहे ?
A. 19       B. 20       C. 21       D. 22
Answer C. 21

250. लोकलेखा समितीचे _____ सदस्य लोकसभेतून आणि _____ सदस्य राज्यसभेतून निवडले जातात .
A. 15,7           B. 7,15           C. 17,5           D. 5,17
Answer 15,7

251. माहितीच्या अधिकाराची चळवळ महाराष्ट्रात सुरु करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे जाते
A. श्री.गोपीनाथ मुंडे B. श्री.शरद पवार    C. किरण बेदी            D. श्री. अण्णा हजारे
Answer D. श्री. अण्णा हजारे

252.कुलवल विरुद्ध जयपूर म्युनसिपल कॉर्पोरेशनच्या निवाड्यात सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय संविधानाने दिलेल्या खालीलपैकी कोणत्या "स्वातंत्र्यामध्ये" माहितीचा अधिकार अंतर्भूत आहे ?
A. धर्माविषयीचे स्वातंत्र्य                B. भाषण आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य
C. संघ किंवा संघटना बनविण्याचे स्वातंत्र्य       D. भारतीय संघराज्यात कोठेही भ्रमण करण्याचे स्वातंत्र्य
Answer B. भाषण आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य

253. माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार खालीलपैकी कोणते सार्वजनिक प्राधिकरण आहे ?
A. येस-बॅंक   B. शासकीय विधी महाविद्यालय मुंबई     C. इन्फोसिस       D. रिलायन्स उद्योगसमूह
Answer B. शासकीय विधी महाविद्यालय मुंबई

254. अपील प्रधिका‌‍र्‍याच्या निर्णयामुळे व्यथित झालेल्या एखाद्या व्यक्तीस राज्य माहिती आयोगाकडे दुसरे अपील करायचे असल्यास किती दिवसात करता येते ?
iA. नव्वद दिवसात   B. साठ दिवसात    C. पन्नास दिवसात D. अठेठ्चाळीस दिवसात
Answer A. नव्वद दिवसात

255. "माहिती" च्या व्याख्येमध्ये खालीलपैकी कशाचा अंतर्भाव होत नाही ?
A. ई-मेल    B. अधिकार्‍यांच्या वैयक्तिक डायर्‍या            C. अभिप्राय        D. सूचना
Answer B. अधिकार्‍यांच्या वैयक्तिक डायर्‍या

256.राज्य मुख्य माहिती आयुक्क्तांचा पदावधी ( पद धारण करण्याचा काल ) खालीलपैकी आहे ?
A. पाच वर्षे किंवा वयांची 65 वर्ष जे अगोदर असेल ते
B. तीन वर्षे किंवा वयांची 65 वर्ष जे अगोदर असेल ते
C. पाच वर्षे किंवा वयांची 67 वर्ष जे अगोदर असेल ते
D. तीन वर्षे किंवा वयांची 67 वर्ष जे अगोदर असेल ते
Answer A. पाच वर्षे किंवा वयांची 65 वर्ष जे अगोदर असेल ते

257. माहिती अधिकाराच्या कायद्याचा (2005) खालीलपैकी कोणत्या कायद्यांवर अधिभावी परिणाम (overriding effect) असेल ?
A. शासकीय गुपितांचा कायदा      C. अन्य कायद्याच्या आधारे अंमलात आलेले कोणतेही संलेख
B. त्या त्या वेळी अंमलात असलेला अन्य कोणताही कायदा      D. वरीलपैकी सर्वांवर
Answer D. वरीलपैकी सर्वांवर

258. केंद्रीय जनमाहिती अधिकार्‍याने कोणत्याही वाजवीकारणाशिवाय माहिती मिळवण्याबाबतचा अर्ज स्वीकारण्यास एखाद्या व्यक्क्तीला नकार दिला असेल तर किती रुपये दंड आकारता येतो ?
A. प्रत्येक दिवसाला रु.25 परंतु 250 रु.पेक्षा जास्त नाही
B. प्रत्येक दिवसाला रु.250 परंतु 25,000 रु.पेक्षा जास्त नाही
C. प्रत्येक दिवसाला रु.100 परंतु 1,000 रु.पेक्षा जास्त नाही
D. प्रत्येक दिवसाला रु.50 परंतु 500 रु.पेक्षा जास्त नाही
Answer B. प्रत्येक दिवसाला रु.250 परंतु 25,000 रु.पेक्षा जास्त नाही

259. खालीलपैकी कोणती संज्ञा माहितीचा अधिकार कायदा , 2005 याच्याशी संबंधित आहे ?
A. जन संपर्क अधिकारी    B. माहिती आणि नभोवाणी मंत्री
C. जन माहिती अधिकारी   D. मुख्य कार्यकारी अधिकारी
Answer C. जन माहिती अधिकारी

260. डिस्केट्स किंवा फ्लॉपी या स्वरूपातील माहिती पुरविण्यासाठी प्रत्येक डिस्केट्स किंवा फ्लॉपीकरिता टपाल खर्च वगळून खालीलपैकी किती रुपये फी आकारण्यात येते ?
A. दहा रुपये B. पन्नास रुपये     C. शंभर रुपये            D. वरीलपैकी कोणतीही नाही
Answer पन्नास रुपये

261. कोणत्या कालावधीमध्ये भारतीय घटना समिती कार्यरत होती ?
A. 1948 – 1950         B. 1949 – 1951         C. 1946 – 1949   D. 1951 - 1952
Answer C. 1946 - 1949

262. भारतीय राज्यघटनेमध्ये पहिली दुरुस्ती कोणी केली ?
A. लोकसभा        B. राज्यसभा       C. हंगामी संसद           D. गव्हर्नर
Answer C. हंगामी संसद

263. राज्यसभेने अर्थविधेयक प्राप्त झाल्यापासून किती दिवसात लोकसभेकडे परत पाठविणे बंधनकारक आहे ?
A. 1 महिना        B. 3 महिना       C. 6 दिवस        D. 14 दिवस
Answer D. 14 दिवस

264. नागपूर येथे हिंदू महासभेची स्थापना कधी झाली ?
A. 11 नोव्हेंबर 1923          B. 11 डिसेंबर 1923   C. 23 जानेवारी 1924     D. 02 मार्च 1924
Answer A. 11 नोव्हेंबर 1923

265. खानदेशातील कोणत्या जमातीने ब्रिटीश सरकार विरोधी उठाव केला ?
A. भिल्ल    B. कोळी     C. रामोशी   D. पारधी
Answer A. भिल्ल

266. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली ?
A. विश्वनाथ नारायण मंडलिक    B. डॉ.भाऊ दाजी लाड  C. गणेश वासुदेव जोशी   D. नाना शंकरशेठ
Answer D. नाना शंकरशेठ

267. कोणत्या अधिवेशनात राष्ट्रीय काँग्रेस व मुस्लीम लीगचे ऐक्य झाले ?
A. लखनौ          B. सुरत     C. दिल्ली         D. मुंबई
Answer A. लखनौ

268. राज्यसभेतील ____________ सदस्य हे घटकराज्य व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात.
A. 238            B. 248            C. 150            D. 138
Answer A. 238

269. खालीलपैकी कोणाचा घटनासमितीमध्ये समावेश नव्हता ?
A. दुर्गाबाई देशमुख  B. मुकुंदराव जयकर C. विनायक सावरकर D. डॉ .बाबासाहेब आंबेडकर
Answer C. विनायक सावरकर

270. राज्यघटनेतील कोणत्या परीशिष्टातील नमुन्याप्रमाणे संसदेतील प्रत्येक सभासद पदग्रहण करण्यासाठीची शपथ घेतो ?
A. पहिले     B. दुसरे     C. तिसरे    D. चौथे
Answer तिसरे


271. सध्या (2012 मध्ये) चंद्रपुरात सुरु असलेले अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलन हे कितवे संमेलन आहे ?
A. 81 वे           B. 83 वे           C. 85 वे         D. 90 वे
Answer C. 85 वे

272.2012 च्या फेब्रुवारीत चंद्रपुर येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलनाचे उ‍द्‍घाटक कोण ?
A. पृथ्वीराज चव्हाण  B. उत्तम कांबळे     C. वसंत आबाजी डहाके      D. न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी
Answer D. न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी

273. 2011 ची मिस इंडीया युनिव्हर्स कोण ठरली ?
A. हसलिन कौर     B. कनिष्ठ धनखड   C. वासुकी सुनकावली      D. निकोल फारीया
Answer C. वासुकी सुनकावली

274. 2011 मध्ये भारताच्या राष्ट्रगीताला किती वर्षे पूर्ण झाली ?
A. 60 वर्षे   B. 75 वर्षे   C. 100 वर्षे D. 150 वर्षे
Answer C. 100 वर्षे

275. भारताच्या घटना समितीने 'जन- गण- मन 'चा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार कोणत्या दिवशी केला ?
A. 26 नोव्हेंबर 1949      B. 24 जानेवारी 1950      C. 25 जानेवारी 1950     D. 26 जानेवारी 1950
Answer B. 24 जानेवारी 1950

276.' जन- गण- मन' ह्या भारताच्या राष्ट्रगीताचे कोणत्या काँग्रेस अधिवेशनात पहिल्यांदाच गायन झाले ?
A. 1905 , सुरत    B. 1911 , कोलकता       C. 1916 , लखनौ   D. 1942 , मुंबई
Answer B. 1911 , कोलकता

277. जगातील सर्वात आलीकडे अस्तीत्वात आलेला देश कोणता ?
A. दक्षिण सुदान           B. सर्बिया          C. कोसोवो         D. माँटेनिग्रो
Answer A. दक्षिण सुदान

278. 'दक्षिण सुदान ' हा देश कोणत्या खंडात आहे ?
A. आशिया   B. आफ्रीका        C. दक्षिण अमेरीका       D. युरोप
Answer B. आफ्रीका

279. ' इन्स्टीट्यूट ऑफ अर्नामेंट टेक्नॉलॉजी ' महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे ?
A. मुंबई           B. नागपूर          C. नाशिक         D. पुणे
Answer D. पुणे

280. तानिया सचदेव ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. टेबल टेनिस            B. बुद्धीबळ         C. लॉन टेनिस            D. नेमबाजी
Answer बुद्धीबळ

281. _______________ या प्रकारच्या संगणक आज्ञावलीचे अनुमतीपत्र त्याच्या वापरकर्त्याला ती संगणक आज्ञावली (Computer Software) अभ्यासणे , दुरुस्त करणे , वाढवणे व त्याचा कोणत्याही कामासाठी वापर करण्याचे स्वातंत्र्य देते तसेच तो मूळ व सुधारित आज्ञावली पुन्हा प्रसारित करु शकतो .
A. ओपन सोर्स            B. कॉपी रायटेड सोर्स       C. पायरेटेड सोर्स          D. फ्री सोर्स
Answer A. ओपन सोर्स

282. ई-गव्हर्नंस ________________ मधील संबंध सुधारते.
A. ग्राहक व ग्राहकातील संबंध            B. दुकानदार व ग्राहकातील संबंध
C. शासन व नागरीकातील संबंध   D. ग्राहक व बाजारपेठ यातील संबंध
Answer C. शासन व नागरीकातील संबंध

283. वेबसाईट उघडण्यासाठी यापैकी कोणते सॉफ्टवेअर वापरता येणार नाही ?
A. मोझीला   B. मायक्रोसॉफ्ट इंटरनेट          C. नेटस्केप        D. मायक्रो सॉफ्ट वर्ड
Answer D. मायक्रो सॉफ्ट वर्ड

284. "सायबर स्पेस " हा शब्द प्रथम यांनी संकल्पिला ____________
A. विल्यम गिब्सन  B. विल्यम वर्डसवर्थ  C. विल्यम मार्टीन   D. विल्यम ग्रॅण्डसन
Answer A. विल्यम गिब्स

285. इ.डी.आय. म्हणजे ______________
A. इलेक्ट्रीकल डेटा इंटरचेंज       B. इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज
C. इलेक्ट्रोमॅग्नेटीक डेटा इंटरचेंज   D. इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरफेस
Answer B. इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज

286. इंटरनेटवर सुरक्षित व्यवहार साधण्यासाठी या मानकाचा वापर करतात .
A. सेट            B. इ.टी.एस.        C. टी.इ.एस.        D. ई.ई.टी.
Answer A. सेट287.आयटी एक्ट,2000 च्या सेक्शन अन्वेय पोलिस अधिकारी त्या कायद्या खालील गुह्याचे अन्वेषण करू शकतो ?
A. 78       B. 56       C. 48       D. 59
Answer A. 78

288. "UNCITRAL चे मॉडेल लॉ ऑन इलेक्ट्रॉनिक कॉमर्स " यास सामावून घेणारा भारत हा __________ क्रमांकाचा देश ठरला.
A. तेविसावा        B. पंचविसावा             C. पस्तिसावा             D. एकोणसाठावा
Answer B. पंचविसावा

289. एस.एस.एल.ची संकल्पना __________ या कंपनीची असून त्यामुळे गोपनीयता, विश्वासार्हता व अधिकार आपणास डीजीटल सर्टिफिकेट मध्ये मिळतात.
A. मायक्रोसॉफ्ट           B. नेटस्केप         C. ऍपल           D. यापैकी नाही
Answer B. नेटस्केप

290. ____________ या दिवशी भारतीय संसदेने 'आय.टी.ऍक्ट 2000' संमत केला.
A. 16 मे 2001     B. 17 मे 2001     C. 15 मे 2001     D. कोणतेही नाही
Answer कोणतेही नाही

291. मानव अधिकारांचे संरक्षण अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी भारतीय संसदेने मानव अधिकार संरक्षण कायदा , 1993 च्या अंतर्गत _____________ ची स्थापना केली आहे .
A. राष्ट्रीय मानव अधिकार आयोग        B. राज्य मानव अधिकार आयोग
C. मानव अधिकार न्यायालय            D. वरील सर्व
Answer D. वरील सर्व

292.राज्य मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्ष पदी अशी व्यक्ती आरूढ होऊ शकते जी ने ___________ पदी काम केलेले आहे .
A. उच्च न्यायालयातील न्यायाधीश        B. त्या संबंधित राज्यातील जिल्हा न्यायाधीश
C. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश D. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश
Answer C. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश

293.. मानव अधिकारांच्या हननामुळे निर्माण झालेल्या गुन्ह्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यातील ______ ला त्या गुन्ह्यांचा निवडा करण्यासाठी मानव अधिकार न्यायालय म्हणून नामनिर्देश करू शकते
A. न्याय चौकशी न्यायालय B. सत्र न्यायालय    C. विशेष न्यायालय D. वरीलपैकी कोणतेही नाही
Answer B. सत्र न्यायालय

294. देऊन टाकता न येणार्‍या अधिकारांची संकल्पना ________________ यांनी केली .
A. थॉमस होबेज     B. रॉस्यो           C. जॉन लॉके       D. वरील कोणीही नाही
Answer C. जॉन लॉके

295. भारताने नागरी व राजकीय हक्कांनवरील आंतरराष्ट्रीय प्रसंविदा , 1966 ला , केव्हा मंजुरी दिली ?
A. 27 मार्च 1979   B. 27 एप्रिल 1978  C. 27 एप्रिल 1980        D. 27 मार्च 1978
Answer A. 27 मार्च 1979

296. भारतीय संविधानाच्या कोणत्या विभागात आर्थिक ,सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कावरील आंतरराष्ट्रीय प्रसंविदा, 1966 मधील हक्क नमूद केलेली आहे ?
A. विभाग 4-A            B. विभाग 2        C. विभाग 3        D. विभाग 4
Answer D. विभाग 4

297. नागरी व राजकीय हक्कांनवरील आंतरराष्ट्रीय प्रसंविदा , 1966 भारतातील खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे ?
A. वैधानिक हक्क   B. मुलभूत अधिकार C. पारंपारिक अधिकार     D. वरीलपैकी कोणतेही नाही
Answer B. मुलभूत अधिकार

298. खालील नमूद अधिकारांपैकी कोणत्या अधिकाराची भारतीय संविधानात स्पष्टपणे मुलभूत अधिकार म्हणून गणना केली आहे ?
A. गुप्ततेचा अधिकार                        B. जलद न्यायदानाचा अधिकार
C. कायदेविषयक सहाय्य देण्याचा अधिकार       D. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार
Answer D. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार

299. हुंडा घेण्यासाठी अथवा देण्यासाठी केलेला करार _________ ठरतो .
A. वैध      B. अवैधक्षम     C. शून्य (अंमलात येऊ न शकणारा ) D. वरीलपैकी कोणतेही नाही
Answer C. शून्य (अंमलात येऊ न शकणारा )

300कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनिय,2005 मध्य खालीलपैकी कोणता आदेश नमूद केलेला नाही ?
A. ताबा देण्यासंबंधीचा आदेश B. भरपाई देण्याचा आदेश C. निवासी आदेश D. मनाई आदेश
Answer मनाई आदेश301. 'शारीरिक छळ ' या शब्दाची परिभाषा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005 ने खालीलप्रमाणे केले आहे .
A. शारीरिक मारहाण       B. जीविताला धोका        C. हल्ला     D. वरीलपैकी सर्व
Answer D. वरीलपैकी सर्व

302.अस्पृश्यतेच्या नावाखाली सामाजिक दुर्बलता आणणार्‍या व्यक्तीच्या विरुद्ध खालीलपैकी कोणत्या कायद्याने शिक्षा दिली जाऊ शकते ?
A. मानवी हक्क संरक्षण अधिनियम,1993    B. अ.जाती व अ.जमाती(अत्याचारास प्रतिबंध)अधिनियम, 1989
C. नागरी हक्क संरक्षण अधिनियम,1955    D. वरीलपैकी एकही नाही
Answer C. नागरी हक्क संरक्षण अधिनियम,1955

303. 1961 च्या हुंडाबंदी कायद्यानुसार हुंडा देणे व हुंडा घेणे यासाठी कोणती शिक्षा होऊ शकते ?
A. कमीत कमी 1 वर्ष कारावास व कमीत कमी 5,000 रु. दंड
B. कमीत कमी 5 वर्ष कारावास व कमीत कमी 15,000 रु. दंड
C. कमीत कमी 3 वर्ष कारावास व कमीत कमी 5,000 रु. दंड
D. कमीत कमी 5 वर्ष कारावास व कमीत कमी 5,000 रु. दंड
Answer B. कमीत कमी 5 वर्ष कारावास व कमीत कमी 15,000 रु. दंड

304. विवाह झालेल्या महिलेच्या व्यतिरिक्त इतर कुणीही त्या विवाहासंबंधी हुंडा घेतला असल्यास ती हुंड्याची रक्कम त्या व्यक्तीने नमूद केलेल्या वेळेच्या आत कोणाच्या सुपूर्द करावयास हवी ?
A. संबंधित विवाहित महिला       B. विवाहित महिलेचे पालक C. विवाहित महिलेचा पती D. न्यायालय
Answer A. संबंधित विवाहित महिला

305. _______________ ह्या कायद्याचे कलम 7(1)(d) अनुसूचित जातीच्या लोकांना अस्पृश्यतेच्या आधारावर अपमानित करणे किंवा अपमानित करण्याचा प्रयत्‍न करणे, ह्यावर प्रकाश टाकते.
A. मानव अधिकार संरक्षण कायदा,1993         C. नागरी हक्क संरक्षण कायदा,1955
B. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, 1989    D. वरील सर्व
Answer C. नागरी हक्क संरक्षण कायदा,1955

306. मानवी हक्क संरक्षण अधिनियम,1993 च्या प्रयोजनार्थ मानवी हक्क म्हणजे ______________.
A. व्यक्तीचे जीवन व स्वातंत्र्य B. समता व प्रतिष्ठा  C. दोन्ही (1)व(2) बरोबर     D. दोन्ही (1)व(2) चुक
Answer C. दोन्ही (1)व(2) बरोबर307. हुंडा म्हणजे कोणतीही संपत्ती किंवा किमती रोखवस्तु जी _________ दिलेली आहे .
A. विवाहाच्या वेळी B. विवाहाच्या आधी C. विवाहानंतर            D. वरील सर्व वेळी
Answer D. वरील सर्व वेळी

308. आत्मनिर्धाराचा अधिकार ___________ चा मानव अधिकार आहे .
A. पहिल्या पिढी     B. दुसर्‍या पिढी    C. तिसर्‍या पिढी          D. वरीलपैकी कुठलाही नाही
Answer C. तिसर्‍या पिढी

309. बलात्कार ह्या गुन्ह्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या भारतीय संविधानाच्या ______________ ने हमी दिलेल्या मुलभूत अधिकाराचे हनन होते, हे मानवी अधिकाराच्या जागतिक मसुद्यात स्पष्ट केले आहे.
A. कलम 23       B. कलम 21 C. कलम 51       D. कलम 19
Answer B. कलम 21

310. नागरी व राजकीय अधिकारांच्या आंतराष्ट्रीय करारनाम्याचे 6 वे कलम __________ च्या प्रश्नांशी निगडीत आहे .
A. सशस्त्र संघर्ष     B. ओलीस ठेवणे    C. आंतरराष्ट्रीय दहशतवाद        D. देहांत शिक्षा
Answer देहांत शिक्षा

311. मुंबईमध्ये कोणत्या प्रकारची आपत्ती घन कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन करून सौम्य करता येईल ?
A. आग            B. पूर      C. चक्रीवादळ       D. वादळ
Answer B. पूर

312. पूर आपत्ती व्यवस्थापनासाठी संरचनात्मक उपायांपैकी एक कोणता आहे ?
A. पूर विमा        B. पूर पूर्वानुमान         C. ड्रेनेज सुधारणा   D. बाधित लोकांना मदत
Answer C. ड्रेनेज सुधारणा

313. कोणत्या कामाचा आपत्ती पश्चात कामांमध्ये समावेश होत नाही ?
A. सुटका कार्य            B. दुरुस्ती कार्य           C. पुननिर्माण       D. लोक जागृती
Answer D. लोक जागृती

314. खालीलपैकी कोणती आपत्ती पृथ्वीच्या भूगर्भातून उद्‍भवते ?
A. भूकंप           B. दरडी कोसळणे         C. पूर       D. वादळ
Answer A. भूकंप


315. भोपाळ गॅस दुर्घटना ही कोणत्या प्रकारच्या आपत्तीचे उदाहरण आहे ?
A. नैसर्गिक आपत्ती       B. रासायनिक आपत्ती           C. जैविक आपत्ती   D. आण्विक आपत्ती
Answer B. रासायनिक आपत्ती

316. मुंबईमध्ये इमारतींच्या ऊंचीमुळे कोणत्या खालील आपत्तीची संभाव्यता वाढू शकते ?
A. ज्वालामुखी                  B. आग            C. वादळ         D. त्सुनामी
Answer B. आग

317. आपत्ती व्यवस्थापन कोणती गोष्ट करू शकत नाही ?
A. जीवितहानी कमी करू शकत नाही            B. मालमत्तेची हानी कमी करू शकत नाही
C. आपत्ती टाळू शकत नाही             D. प्रभावित लोकांना मदत पुरवू शकत नाही
Answer C. आपत्ती टाळू शकत नाही

318. 'एसईझेड' म्हणजे काय?
A. स्पेशल इलेक्ट्रीक झोन         B. स्पेशल ऐसेन्शीयल कमोडीटी झोन
C. स्पेशल इकॉनॉमिक झोन             D. स्मॉल इकॉनॉमिक झोन
Answer C. स्पेशल इकॉनॉमिक झोन

319. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार मानवी हक्क कोणते आहेत ?
A. जीवन व स्वातंत्र्याचे हक्क                  B. जीवन व समता याविषयीचे हक्क
C. समता व प्रतिष्ठा याविषयीचे हक्क           D. वरील सर्व
Answer D. वरील सर्व

320. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या सभापती पदाचा कालावधी किती आहे ?
A.10 वर्षे          B. 7 वर्षे          C. 5 वर्षे          D. 8 वर्षे
Answer 5 वर्षे

321. टीपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A. यवतमाळ       B. अहमदनगर            C. सोलापूर         D. रायगड
Answer A. यवतमाळ322.जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो ?
A. ज्ञानेश्वरसागर    B. नाथसागर       C. शिवाजीसागर     D. बाजीसागर
Answer B. नाथसागर

323. स्वातंत्र्यपूर्व काळात 'कॉम्रेड' हे वृत्तपत्र कोणी चालविले होते ?
A. अब्दुल कलाम आझाद   B. मौलाना महमंद अली    C. बॅस्टीस्टर जीना   D. श्रीपाद अमृत डांगे
Answer B. मौलाना महमंद अली

324. भारताचे प्रमाणवेळ रेखावृत्त कोणते ?
A. 82030' पूर्व रेखावृत्त          B. 82030' पश्चिम रेखावृत्त
 C. 81030' पूर्व रेखावृत्त         D. 81030' पश्चिम रेखावृत्त
Answer A. 82030' पूर्व रेखावृत्त

325. भारतातील धवलक्रांतीचे प्रणेते म्हणून कोणाला ओळखले जाते ?
A. डॉ.एम.एस.स्वामीनाथन   B. वसंतराव नाईक         C. इंदिरा गांधी      D. डॉ. वर्गीस कुरीयन
Answer D. डॉ. वर्गीस कुरीयन

326. महाराष्ट्रात किती कृषी हवामान विभाग आहेत ?
A. 7        B. 8        C. 9        D. 16
Answer C. 9

327. नेपाळचे चलन कोणते आहे ?
A. डॉलर     B. पेसो     C. भारतीय रुपया         D. नेपाळी रुपया
Answer D. नेपाळी रुपया

328. थरचे वाळवंट कोणत्या देशात/देशांत आहे ?
A. फक्त भारत     B. फक्त पाकिस्तान C. भारत व पाकिस्तान     D. भारत, पाकिस्तान आणि अफगाणीस्तान
Answer C. भारत व पाकिस्तान

329. 'पिसाचा झुलता मनोरा' कोणत्या देशात आहे ?
A. फ्रान्स    B. इटली     C. अमेरीका             D. ब्रिटन
Answer B. इटली

330. 'पाचूचे बेट ' या नावाने भारताशेजारील देशांपैकी कोणता देश ओळखला जातो ?
A. मालदीव         B. इंडोनेशिया       C. मॉरीशस        D. श्रीलंका
Answer श्रीलंका

331. राष्ट्रीय कृषी विमा योजना केव्हा सुरु झाली ?
A. 1999-2000           B. 2001-2002           C. 2005-2010           D. 2010-2011
Answer A. 1999-2000

332.भारतीय बियाणे कायदा कोणत्या वर्षाचा आहे ?
A. 1948     B. 1965     C. 1971    D. 1991
Answer B. 1965

333. 'वैभव विळा ' हे औजार कोणत्या कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे ?
A. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी            B. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
C. मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी       D. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
Answer D. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

334. भारतात दर किती वर्षांनी कृषीगणना केली जाते ?
A. 5 वर्षे    B. 10 वर्षे         C. 15 वर्षे         D. 5 वर्षे
Answer B. 10 वर्षे

335. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था ( MERI ) कोणत्या शहरात आहे ?
A. नाशिक   B. औरंगाबाद            C. पुणे            D. नागपूर
Answer A. नाशिक

336. भारतातील कोणते राज्य रबराच्या उत्पादनात अग्रेसर आहे ?
A. केरळ     B. आसाम   C. तामिळनाडू           D. हिमाचल प्रदेश
Answer A. केरळ

337. काजू संशोधन केंद्र ________________ येथे आहे .
A. महाबळेश्वर            B. वेंगुर्ला    C. श्रीवर्धन   D. भाट्ये
Answer B. वेंगुर्ला

338. सामान्यत: मृदेमध्ये खनिज द्रव्यांचे प्रमाण किती असते ?
A. 45%     B. 25%     C. 5%            D. 10%

Answer A. 45%

339. _____________ ला ' हिरवे सोने ' असेही म्हणतात.
A. चहा            B. कॉफी     C. ताग            D. ऊस
Answer A. चहा

340. बाजरी उत्पादनात भारताचा जगात _____________ क्रमांक लागतो .
A. पहिला    B. दुसरा     C. तिसरा    D. यापैकी नाही
Answer पहिला

341. मानवी मेंदूचे वजन _______________ ग्रॅम्सच्या दरम्यान असते .
A. 500 ते 600     B. 800 ते 1000    C. 1300 ते 1400   D. 1500 ते 1600
Answer C. 1300 ते 1400

342.गोगलगाय _____________ ह्या संघात मोडते .
A. आथ्रोपोडा  B. नेमॅटोडा   C. मोलुस्का  D. इकायनोडर्माटा
Answer C. मोलुस्का

343. कोणाला 'वर्गीकरणशास्त्राचा जनक ' म्हणून ओळखले जाते ?
A. रॉबर्ट हूक B. कार्ल लिनियस   C. जगदीशचंद्र बोस       D. यापैकी नाही
Answer B. कार्ल लिनियस

344. कांदा ही __________________ वनस्पती आहे.
A. एकबीजपत्री            B. द्विबीजपत्री            C. कवक          D. नेचोद्‍भीदी
Answer A. एकबीजपत्री

345. भौतिक बदल ___________ हा आहे .
A. पाण्याचे बर्फात रुपांतर   B. लाकडाचे ज्वलन       C. कार्बनचे ज्वलन  D. दुधाचे दही होणे
Answer A. पाण्याचे बर्फात रुपांतर

346. ' इलेक्ट्रोएनसेफेलोग्राफ ' चा वापर _____________________ चे कार्य समजण्यासाठी केला जातो .
A. ह‍्दय     B. मेंदू      C. किडनी    D. मांसपेशी
Answer B. मेंदू
स्पष्टीकरण:'इलेक्ट्रोएनसेफेलोग्राफ '(EEG) चा वापर मेंदूचे कार्य समजण्यासाठी केला जातो.

347. 'व्हिब्रिओ कॉलरा ' ह्या जिवाणूमुळे माणसाला ______________ हा रोग होतो .
A. डिप्थेरिया  B. क्षय            C. पटकी    D. हिवताप
Answer C. पटकी

348. सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट कोणत्या शहरात आहे ?
A. नागपूर B. नाशिक C. पुणे D. मुंबई
AnswerC. पुणे

349. धावणारा खेळाडू _____________ ऊर्जा धारण करतो.
A. स्थितीज  B. गतिज          C. आण्विक  D. वरील सर्व
Answer B. गतिज

350. कांद्यामध्ये अन्न ________________ च्या स्वरुपात साठविले जाते .
A. प्रथिने    B. कर्बोदके         C. स्निग्ध पदार्थ          D. खनिज पदार्थ
Answer कर्बोदके

351. खालीलपैकी प्रकाशाचा निसर्गनिर्मित स्त्रोत कोणता ?
A. सूर्य            B. चंद्र      C. ज्योत    D. वरील सर्व
Answer A. सूर्य

352.प्रकाशकिरण प्रिझममधून जातो, तेव्हा _________________ हा सर्वात जास्त विचलित होणारा रंग असतो.
A. लाल            B. जांभळा         C. हिरवा          D. निळा
Answer B. जांभळा

353. 1 मिलिऍम्पिअर बरोबर ____________
A. 10-3ऍम्पिअर    B. 10-2ऍम्पिअर    C. 10-1ऍम्पिअर    D. 10 ऍम्पिअर
Answer A. 10-3ऍम्पिअर

354. खालीलपैकी अदिश राशी कोणती ?
A. वजन     B. ऊर्जा           C. संवेग     D. बल
Answer B. ऊर्जा355. ध्वनीचा हवेतील वेग सुमारे ____________ आहे .
A. 3400 m/s            B. 340 m/s       C. 1000 m/s            D. 34 m/s
Answer B. 340 m/s


356. पाण्यातील ध्वनीचा वेग हवेतील _________________________ .
A. वेगापेक्षा जास्त असतो .B. वेगाइतकाच असतो   C. वेगाच्या बरोबर निम्मा असतो.  D. वेगापेक्षा कमी असतो.
Answer A. वेगापेक्षा जास्त असतो.

357. पैलु पाडलेला हिरा _____________________ यामुळे चकाकतो .
A. प्रकाशाचे अपवर्तन B. प्रकाशाचे परिवर्तन C. प्रकाशाचे अपस्करण     D. पूर्ण आंतरिक परावर्तन
Answer D. पूर्ण आंतरिक परावर्तन

358. ____________ हा धातू रात्रीच्या अंधारात चमकतो .
A. रेडीयम    B. अल्युमिनियम    C. फॉस्फरस  D. युरेनियम
Answer C. फॉस्फरस

359. ___________ हा ग्रह 'सायंतारा ' म्हणूनही ओळखला जातो .
A. मंगळ     B. शुक्र      C. बुध D. शनि
Answer B. शुक्र

360. हाफकिन इन्स्टीट्यूट कोणत्या शहरात आहे?
A. मुंबई     B. पुणे     C. नाशिक   D. नागपूर
Answer मुंबई

361. महाराष्ट्र राज्याची निर्मीती केव्हा झाली ?
A. 1 मे 1960            B. 1 मे 1961            C. 1 मे 1962            D. 1 मे 1963
Answer A. 1 मे 1960

362.पहिली महिला मुख्यमंत्री कोण ?
A. सुचेता कृपलानी   B. सरोजीनी नायडू   C. विजयालक्ष्मी पंडीत      D. उमा भारती
Answer A. सुचेता कृपलानी


363. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?
A. मौलाना आझाद   B. सी.राजगोपालाचारी C. सरदार वल्लभभाई पटेल D. यशवंतराव चव्हाण
Answer C. सरदार वल्लभभाई पटेल

364. ब्रिटीशांनी ब्रम्हदेशाचा राजा थिबा याला कैदेत कोठे ठेवले होते ?
A. पुणे      B. महाड     C. रत्‍नागिरी        D. अलीबाग
Answer C. रत्‍नागिरी

365. मराठेशाहीतील शेवटचा पेशवा कोण ?
A. दुसरा बाजीराव   B. बाळाजी बाजीराव       C. बाळाजी विश्वनाथ       D. रघुनाथराव पेशवा
Answer A. दुसरा बाजीराव

366. कायमधार्‍याच्या पध्दतीशी कोण संबंधित आहे ?
A. लॉर्ड वेलस्ली           B. लॉर्ड कॉर्नवॉंलीस C. लॉर्ड रिपन      D. लॉर्ड डलहौसी
Answer B. लॉर्ड कॉर्नवॉंलीस

367. 1920 च्या महात्मा गांधींच्या अहिंसा चळवळीला कोणी विरोध दर्शविला होता ?
A. चित्तरंजन दास   B. सुभाषचंद्र बोस   C. लोकमान्य टिळक D. कोणीही नाही
Answer B. सुभाषचंद्र बोस

368. हिंदुस्थानचा दुसर्‍यांदा गव्हर्नर होणारी व्यक्ती कोण ?
A. बेंटिंक    B. हेस्टींग    C. कॉर्नवॉंलीस            D. कर्झन
Answer B. हेस्टींग

369. महात्मा गांधींची हत्या कोणत्या दिवशी झाली ?
A. 2 ऑक्टोबर 1948      B. 30 ऑक्टोबर 1948           C. 31 डिसेंबर 1948 D. 30 जानेवारी 1948
Answer D. 30 जानेवारी 1948

370. कोणत्या दिवशी दिल्ली भारताची राजधानी झाली ?
A. 12 डिसेंबर 1909 B. 12 डिसेंबर 1911 C. 12 डिसेंबर 1913       D. 12 डिसेंबर 1915
Answer 12 डिसेंबर 1911

371. 'ब१' जीवनसत्त्वास _____________ असेही म्हणतात.
A. नायसिन  B. थायोमिन  C. अस्कॉर्बिक आम्ल D. यापैकी नाही
Answer B. थायोमिन

372. 1 ज्यूल = _______________ अर्ग
A. 10       B. 103            C. 105            D. 107
Answer D. 107

373. कार्बनची संयुजा ___________ आहे .
A. 2        B. 3        C. 4        D. 1
Answer C. 4

374. ________________ ला पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात.
A. पेशीभित्तिका     B. पेशिकेंद्रक            C. तंतूकणिका            D. केंद्रक द्रव्ये
Answer C. तंतूकणिका

375. विजेचा दाब _______________________ या उपकरणाचा वापर केला जातो .
A. व्होल्टमीट       रB. ऍमीटर         C. युडीऑमीटर            D. क्रोनोमीटर
Answer A. व्होल्टमीटर

376. नायट्रोजनचा शोध _________________ या शास्त्रज्ञाने लावला.
A. जेम्स चॅडविक    B. डॅनियल रुदरफोर्ड  C. लॅव्हासिए  D. रॉन हेलमाँड
Answer B. डॅनियल रुदरफोर्ड

377. दुधामध्ये ______________ नावाची शर्करा असते.
A. लॅक्टोज   B. फ्रॅक्टोज C. ग्लुकोज         D. ग्लायकोजेन
Answer A. लॅक्टोज

378. भारत सरकारने कोणत्या वर्षी ' भेसळ प्रतिबंधक कायदा ' जारी केला.
A. 1948           B. 1954           C. 1962          D. 1968
Answer B. 1954

379. खालीलपैकी कोणता पदार्थ तयार करताना किण्वन प्रक्रीयेचा वापर केला जातो .
A. जिलेबी    B. इडली     C. पाव            D. वरील सर्व
Answer D. वरील सर्व380. संयुगांमधून __________________ काढून टाकण्याच्या रासायनिक अभिक्रीयेला 'क्षपण' म्हणतात .
A. ऑक्सीजन B. कार्बन डायऑक्साईड    C. हायड्रोजन      D. नायट्रोजन
Answer ऑक्सीजन

381. अलीकडेच CSO ( केंद्रीय सांख्यीकीय कार्यालय ) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2010-11 या वर्षासाठी भारताचे दरडोई उत्पन्न (Per Capital Income ) किती होते ?
A. 46,117 रु.            B. 53,331 रु.            C. 4617 रु.        D. 5333 रु.
Answer B. 53,331 रु.

382.: रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने अलीकडेच ( सर्वप्रथम ) किती रुपयांच्या नोटा रुपयाचे नवीन चिन्ह अंकीत करून बाजारात आणल्या आहेत ?
A. 5 रु.     B. 100 रु.   C. 500 रु.         D. 1000 रु.
Answer C. 500 रु.

383. भारत सरकारने अलीकडेच शिकोगा विद्यापीठात कोणाच्या नावाने मानद ' चेअर ' स्थापन करून संबंधित विषयांतील संशोधनासाठी उत्तेजन मिळावे यासाठी करार केला आहे ?
A. डॉ. एस.चंद्रशेखर  B. डॉ. हरगोविंद खोराणा    C. डॉ. वेंकटरामन         D. स्वामी विवेकानंद
Answer D. स्वामी विवेकानंद

384. भारत सरकारने 1320 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक विद्युत प्रकल्प 'खुलना' येथे स्थापन करण्यासाठी ____________________ देशाबरोबर करार केला आहे .
A. नेपाळ    B. भूतान          C. बांगलादेश       D. अफगाणिस्तान
Answer C. बांगलादेश

385. ' करीयर ग्रॅण्ड स्लॅम' जिंकण्याचा भीम पराक्रम करणारी पहिली भारतीय व्यक्ती ठरण्याचा बहुमान कोणी पटकविला ?
A. सानिया मिर्झा          B. प्रकाश अमृतराज        C. महेश भूपती          D. लिएंडर पेस
Answer D. लिएंडर पेस
स्पष्टीकरण : लॉन टेनिसच्या चारही मुख्य स्पर्धा म्हणजेच अमेरिकन ओपन, फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन करियरमध्ये एकदा तरी जेतेपद प्राप्त करण्याच्या पराक्रमास ' करीयर ग्रॅण्ड स्लॅम ' म्हणतात .

386. नुकतेच निधन झालेले एम.ओ.एच.फारूक हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते ?
A. आंध्रप्रदेश  B. केरळ     C. त्रिपुरा    D. आसाम
Answer B. केरळ

387. 2012 च्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्याच्या विशेष अतिथी श्रीमती यिंगलक शिनवात्रा ह्या कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत ?
A. त्रिनिनाद-टोबॅगो   B. थायलंड         C. फिलीपाइन्स           D. दक्षिण कोरीया
Answer B. थायलंड

388. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा मान सर्वप्रथम कोणत्या महिला अध्यक्ष / पंतप्रधान / राष्ट्रप्रमुखास मिळाला ?
A. श्रीमती भंडारनायके            B. यिंगलक शिनवात्रा       C. राणी एलिझाबेथ-II            D. शेख हसीना
AnswerC. राणी एलिझाबेथ-II

389. चार दिवसांचा ' एलोरा - अजंठा फेस्टीवल ' 3 वर्षानंतर कोणत्या शहरात साजरा झाला ?
A. औरंगाबाद       B. दौलताबाद       C. पुणे      D. मुंबई
Answer A. औरंगाबाद

390. ' मतदार दिन ' भारतात कधी साजरा केला गेला ?
A. 1 जानेवारी            B. 12 जानेवारी           C. 25 जानेवारी           D. 26 जानेवारी
Answer 25 जानेवारी

391. _________च्या आमसभेने 14 डिसेंबर 1960 रोजी शिक्षणातील अन्यायाविरुद्धचा ठराव स्वीकारला.
A. एफ् ए ओ       B. आय एल ओ     C. डब्लु एच् ओ    D. युनेस्को
Answer D. युनेस्को

392.यु एन् एच् सी आर् __________________________ ना सुरक्षा व सहायता प्रदान करते.
A. निर्वासित B. स्थानांतरित व्यक्ती           C. कोणत्याही राज्यांचे नसलेले व्यक्ती           D. वरील सर्व
Answer D. वरील सर्व

393. 1949 च्या तिसर्‍या जिनेव्हा करारातील 4 था अनुच्छेद __________________ ह्या वर्गात येणार्‍या व्यक्ती बद्दल सांगतो .
A. लढाई बळी पडलेले व्यक्ती                              C. नागरिक
B. सशस्त्र लढाईत रणांगणावरील जखमी व आजारी व्यक्ती     D. युद्ध कैदी
Answer D. युद्ध कैदी

394. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार राज्य मानवी हक्क आयोगाच्या सदस्याची नेमणूक कोण करतो ?
A. राष्ट्राध्यक्ष       B. राज्यपाल        C. पंतप्रधान        D. उच्च न्यायालय
Answer B. राज्यपाल

395. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार विशेष सरकारी वकील होण्यासाठी काय अट आहे ?
A. 5 वर्ष वकीलीचा अनुभव       B. 3 वर्ष वकीलीचा अनुभव
C. 6 वर्ष वकीलीचा अनुभव       D. 7 वर्ष वकीलीचा अनुभव
Answer D. 7 वर्ष वकीलीचा अनुभव

396. नैसर्गिक न्यायाचे तिसरे तत्त्व " डोनोघे कमेटी " नुसार कोण आहे ?
A. कुणालाही त्याचे म्हणणे मांडण्यासाठी नकार देता येणार नाही
B. व्यक्तिला निर्णयाचे कारण समजण्याचा हक्क आहे
C. कुठलेही कारण नसताना व्यक्तिला शिक्षा करता येत नाहीD. वरीलपैकी कुठलेही नाही
Answer B. व्यक्तिला निर्णयाचे कारण समजण्याचा हक्क आहे

397. 'नैसर्गिक न्याय तत्त्वांनी' खालीलपैकी कोणत्या दोन गोष्टींमध्ये दृढ संबंध प्रस्थापित केलेला आहे ?
A. कायदा आणि नितीमत्ता B. कायदा आणि शिक्षा     C. कायदा आणि गुन्हेगारी   D. कायदा आणि सुव्यवस्था
Answer A. कायदा आणि नितीमत्ता

398. मानवाधिकार संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षामध्ये अंमलात आला ?
A. 1990     B. 1993     C. 2000    D. 2003
Answer B. 1993

399. महाराष्ट्र मानवाधिकार आयोग कोठे स्थित आहे ?
A. हजारीमल सोमाणी मार्ग, छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळ, मुंबई     B. मुंबई उच्च न्यायालयाचे परिसर, मुंबई
C. कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग, मुंबई                            D. रेल्वे स्टेशन जवळ, पुणे
Answer A. हजारीमल सोमाणी मार्ग, छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळ, मुंबई

400. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने सार्वत्रिक मानवाधिकार जाहीरनामा कधी अंगीकृत केला ?
A. 1945     B. 1948     C. 1990          D. 1993
Answer 1948

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets