Search This Blog

MPSC EXAM 2019 TIME TABLE

2019 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक 

                                     Download in pdf

MPSC 2017 EXAM TIME-TABLE


संधी रोजगाराची

राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मध्ये विकास सहायक पदाच्या 85 जागा राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मध्ये विकास सहायक अधिकारी (85 जागा ) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर 2015 आहे. अधिक माहिती https://www.nabard.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत विविध पदाच्या 54 जागा
आरोग्य सेवा संचालनालय, ‘प्रकल्प प्रेरणा’ शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत कंत्राटी पद्धतीने औरंगाबाद, जालना, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, अकोला, यवतमाळ व वाशिम या नऊ जिल्हांमध्ये प्रोग्राम ऑफिसर (मानसोपचार तज्ज्ञ) (9 जागा), चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ (9 जागा), मनोविकृती सामाजिक कार्यकता (9 जागा), मनोविकृती परिचारिका (9 जागा), सामाजिक परिचारिका (9 जागा), असिस्टंट (9 जागा) या पदासाठी थेट मुलाखतीचे आयोजन 15 ऑक्टोबर 2015 रोजी करण्यात आले आहे. सामाजिक परिचारिका व असिस्टंट या पदासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज 12 ऑक्टोबर 2015 पर्यंत करावा. मुलाखत संबंधीत जिल्ह्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयात होईल. 


बार्टी, पुणे अंतर्गत कोकण विभागात समतादूत या पदाच्या 79 जागा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत कोकण विभागात समतादूत (79 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ, लोकसत्ता 9 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई येथे विविध पदाच्या 9 जागा
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई येथे प्रोफेसर (डिपार्टमेंट ऑफ पॉप्युलेशन पॉलिसीज ॲण्ड प्रोग्राम) (1 जागा), प्रोफेसर (डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिकल डेमोग्राफी ॲण्ड स्टीडज) (1 जागा), असोसिएट प्रोफेसर (डिपार्टमेंट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज) (1 जागा), असोसिएट प्रोफेसर (डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिकल डेमोग्राफी ॲण्ड स्टीडज) (1 जागा), ऑफीस सुपरिन्टेंण्‍डन्‍ट (1 जागा), असिस्टंट (कर्णबधिरांकरिता) (1 जागा), अप्पर डिव्हीजन क्लर्क (2 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 8 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीwww.iipsindia.org संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एनपीसीआयएल मध्ये विविध पदाच्या 84 जागा
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये अपंग व्यक्तिंकरिता विशेष भरती मोहिमेंतर्गत तांत्रिक अधिकारी अधिकारी/डी , वैज्ञानिक अधिकारी/सी, कार्यकारी प्रशिक्षणार्थी (57 जागा), उप व्यवस्थापक (मानव संसाधन)/ उप व्यवस्थापक (वित्त आणि लेखा) (2 जागा), कनिष्ठ हिंदी भाषांतरकार (1 जागा) तसेच अनुसूचित जातीकरिता विशेष भरती मोहिमेंतर्गत कार्यकारी प्रशिक्षणार्थी (24 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स 8 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.npcilcareers.co.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबई विद्यापीठात परीक्षा नियंत्रक पदाची जागा
मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवरील परीक्षा नियंत्रक (1 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 8 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mu.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नागपूर सुधार प्रन्यास, येथे सहाय्यक विधी अधिकारी पदाची जागा
नागपूर सुधार प्रन्यास, येथे सहाय्यक विधी अधिकारी पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झालेपासून 15 च्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात लोकमत 8 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती https://maharecruitment.mahaonline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

समाज कल्याण आयुक्तालय पुणे अंतर्गत सहाय्यक शिक्षक पदाच्या 126 जागा 
समाज कल्याण आयुक्तालय पुणे अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या अनुसूचित जातीच्या शासकीय निवासी शाळेत (वरिष्ठ प्राथमिक) सहाय्यक शिक्षक (इतिहास व भूगोल) (16 जागा) व माध्यमिक शाळेत सहाय्यक शिक्षक (गणित) (45 जागा), सहाय्यक शिक्षक (विज्ञान) (48 जागा), सहाय्यक शिक्षक (इतिहास व भूगोल) (16 जागा), सहाय्यक शिक्षक (इतिहास व भूगोल) (17 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2015 आहे. अधिक माहितीhttp://barti.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक सर्विसेस बोर्ड, मुंबई येथे ग्रेड ‘बी’ अधिकारी पदाच्या 134 जागा
भारतीय रिझर्व्ह बँक सर्विसेस बोर्ड, मुंबई येथे ग्रेड ‘बी’ अधिकारी (सामान्य) (134 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 7 ऑक्टोबर 2015 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारतीय वायू सेनेत एअरमन पदाची भरती
भारतीय वायू सेनेत पुरुष उमेदवारांना एअरमन पदाच्या भरतीसाठी आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी आंमत्रित करीत आहे. हा मेळावा शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे 17 ते 24 नोव्हेंबर 2015 या कालावधीत होणार आहे. त्यावेळी ग्रुप ‘एक्स’ यात एज्युकेशनल इन्स्ट्रक्टर-शिक्षण प्रशिक्षक या व्यवसायात (ट्रेड) एअरमन आणि ग्रुप ‘वाय’ (अ-तांत्रिक तसेच ऑटोमोबाइल टेक्निकल) व ग्राऊंड ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर आणि भारतीय वायू सेनेमध्ये पोलीस या व्यवसायांमध्ये एअरमन या पदासाठी होणाऱ्या भरतीमधून भारतीय वायू सेनेत सामील होता येईल. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 7 ऑक्टोबर 2015 च्या अंकात आली आहे. अधिक माहितीwww.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने प्रोग्रामर पदाची जागा 
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने आयोगाच्या कार्यालयात प्रोग्रामर (1 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर 2015 आहे. अधिक माहिती या www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

टिआयएफआर मध्ये विविध पदाच्या 16 जागा 
रेडीओ खगोलभौतिकी राष्ट्रीय केंद्र, पुणेच्या टाटा इन्स्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) या संस्थेत ॲडमिनीस्ट्रेटीव्ह असिस्टंट- बी (1 जागा), क्लार्क (1 जागा), लॅबरोटरी असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) (2 जागा), ॲडमिनीस्ट्रेटीव्ह ट्रेनी (4 जागा), कुक (1 जागा), सिक्युरिटी गार्ड (3 जागा), वर्क असिस्टंट (गार्डनर) (2 जागा), वर्क असिस्टंट (हाऊसकिपिंग) (2 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ 6 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 

महानगरपालिका ठाणे अंर्तगत प्लेन रजिस्ट्रार/हाऊस मन 27 जागासाठी थेट मुलाखत
महानगरपालिका ठाणे अंर्तगत राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे विविध विभागामध्ये रजिस्ट्रार (14 जागा), प्लेन हाऊस मन (13 जागा) या पदांसाठी दिनांक 15 ऑक्टोबर 2015 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 6 ऑक्टोबर 2015 च्या अंकात आली आहे. अधिक माहितीwww.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदाच्या 329 जागा
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदाच्या 329 पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2015 आहे. अधिक माहितीhttp://www.esic.nic.in/index_hindi.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कर्मचारी राज्य विमा महामंडळात विमा वैद्यकीय अधिकारी पदाच्या 450 जागा
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर विमा वैद्यकीय अधिकारी (450 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://www.esic.nic.in/index_hindi.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था, (WSSO) बेलापूर, नवी मुंबई येथे विविध पदाच्या 14 जागा
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था, (WSSO) बेलापूर, नवी मुंबई येथे कंत्राटी पद्धतीने संनियंत्रण व मुल्यमापन सल्लागार (1 जागा), माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार (1 जागा), मन्युष्यबळ विकास सल्लागार (1 जागा), विभागीय समन्वयक (4 जागा), लघुटंकलेखक (1 जागा), समन्वयक (पाणी गुणवत्ता) (1 जागा), अभियंत्रिकी सल्लागार (सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन) (1 जागा), अभियंत्रिकी सल्लागार (पाणी गुणवत्ता) (1 जागा), सहा. संनियंत्रण व मुल्यमापन सल्लागार (1 जागा), सहा. मन्युष्यबळ विकास सल्लागार (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स 5 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://water.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत विविध पदाच्या 3 जागा
आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई येथे ‘प्रकल्प प्रेरणा’ शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत कंत्राटी पद्धतीने प्रोग्राम ऑफिसर (1 जागा), मॉनिटरिंग ॲण्ड इव्हालुएशेन ऑफिसर (1 जागा), सांख्यिकी अन्वेशक (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ 3 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 

प. कुटीर रुग्णालय जव्हार, जि.पालघर येथे 7 विविध पदासाठी थेट मुलाखत 
एनआरएचएम अंतर्गत प. कुटीर रुग्णालय जव्हार, जि.पालघर येथे वैद्यकीय अधिकारी (1 जागा), अधिपरिचारीका (2 जागा), आहार तज्ज्ञ (1 जागा), स्वयंपाकी (1 जागा), परिचर (2 जागा) या पदासाठी थेट मुलाखतीचे आयोजन 14 ऑक्टोबर 2015 रोजी करण्यात आले आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 5 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 

आययूसीएए (आयुका) मध्ये पर्सनल असिस्टंटची एक जागा 
इंटर युनिवर्सिटी सेंटर फॉर अस्ट्रोनॉमी ॲण्ड अस्ट्रोफिजीक्स( आयुका) या संस्थेत पर्सनल असिस्टंट (1 जागा) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2015 आहे. अधिक माहितीhttp://www.iucaa.ernet.in/Opportunities.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
यशदा, पुणे नागरी सेवा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात 70 जागा डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा (IAS/IPS/IFS इ.) साठी अंदाजे एक वर्ष कालावधीचा मार्गदर्शन केंद्र राबविते. सन 2016 मधील या कार्यक्रमाकरिता विविध प्रवर्गातील एकूण 70 जागांसाठी राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा 22 नोव्हेंबर 2015 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ 30 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीwww.yashada.org/acec किंवा www.geexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, मुंबई येथे वाहन चालक पदाच्या 7 जागा

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, मुंबई येथे वाहन चालक (7 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 30 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे विविध पदाच्या 9 जागा
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे कायम तत्वावर ज्युनिअर ड्राफ्ट्समन (1 जागा), फिटर (2 जागा), स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर (1 जागा), पाईप फिटर (1 जागा), इलेक्ट्रीशियन (1 जागा), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (1 जागा), पेंटर (1 जागा), कॉम्पोझिट वेल्डर (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 30 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जिल्हा परिषद रायगड येथे विविध पदाच्या 90 जागा
जिल्हा परिषद रायगड येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (ग्रापापु) (1 जागा), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम) (1 जागा), विस्तार अधिकारी (कृषी) (1 जागा), पर्यवेक्षिका (एकात्मिक बालविकास सेवायोजना) (1 जागा), औषध निर्माण अधिकारी (3 जागा), आरोग्य सेवक (महिला) (24 जागा), आरोग्य सेवक (पुरुष)(फवारणी कर्मचारी) 50% (3 जागा), आरोग्य सेवक (पुरुष) 40% (2 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (21 जागा), स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक (3 जागा), पशुधन अधिकारी (4 जागा), वरिष्ठ साहाय्यक (लिपिक) (1 जागा), कनिष्ठ साहाय्यक (लिपिक) (5 जागा), कनिष्ठ साहाय्यक (लेखा) (1 जागा), विस्तार अधिकारी (सांख्यिकी) (1 जागा), स्त्री परिचर (1 जागा), परिचर (17 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2015आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता आणि सकाळ 30 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीwww.raigad.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कृषिसमृद्धी : समन्वयीत कृषि विकास प्रकल्प, अमरावती येथे विविध पदाच्या 6 जागा
कृषिसमृद्धी : समन्वयीत कृषि विकास प्रकल्प, अमरावती येथे कंत्राटी पद्धतीने ॲग्रोनॉमिस्ट (प्रकल्प व्यवस्थापक यंत्रणा) (1 जागा), मार्केट लिंकेज स्पेशालिस्ट (प्रकल्प व्यवस्थापक यंत्रणा) (1 जागा), जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक (प्रकल्प व्यवस्थापक यंत्रणा) (2 जागा), कृषि व्यवसाय तज्ज्ञ (प्रकल्प व्यवस्थापक यंत्रणा) (1 जागा), लेखापाल (प्रकल्प व्यवस्थापक यंत्रणा) (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ 30 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मिलिटरी इंजिनिअर सर्व्हिसेस : विविध पदाच्या 187 जागामिलिटरी इंजिनिअर सर्व्हिसेस : साउथ वेर्स्टन कमांड/संरक्षण मंत्रालय येथे मेट (इलेक्ट्रीकल) (71 जागा), मेट (रेफ्रिजरेटर ॲन्ड मेकॅनिकल) (15 जागा), मेट (सुतार) (17 जागा), मेट (गवंडी) (17 जागा), मेट (पेंटर) (6 जागा), मेट (एफजीएम) (37 जागा), मेट (पाईप फिटर) (24 जागा) या पदासाठी विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2015आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ 29 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mes.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भाभा अणू संशोधन केंद्र (बीएआरसी) येथे विविध पदाच्या 7 जागा भाभा अणू संशोधन केंद्र (बीएआरसी) येथे मेडिकल ऑफिसर (जनरल मेडिसिन) सायन्टिफिक ऑफिसर (डी श्रेणी) ( 2 जागा ), मेडिकल ऑफिसर (न्यूक्लिअर मेडिसिन) सायन्टिफिक ऑफिसर (डी श्रेणी) ( 2 जागा ), मेडिकल ऑफिसर (ऑफ्थलमिक सर्जन) सायन्टिफिक ऑफिसर (डी श्रेणी) (1 जागा), मेडिकल ऑफिसर (ऑब्स्टेट्रिक व गायनेकोलॉजी ) सायन्टिफिक ऑफिसर (डी श्रेणी) (1 जागा), टेक्निकल ऑफिसर (1 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2015आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 26 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.barcrecruit.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे विविध पदाच्या 47 जागामाझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे दोन वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने फिटर (16 जागा), स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर (8 जागा), पाईप फिटर (4 जागा), इलेक्ट्रीशियन (10 जागा), पेंटर (4 जागा), कारपेंटर (2 जागा), कॉम्पोझिट वेल्डर (3 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 19 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कामगार राज्य विमा महामंडळ, मुंबई येथे विविध पदाच्या 6 जागाकामगार राज्य विमा महामंडळ, मुंबई येथे वरिष्ठ विभाग लिपीक (4 जागा), बहुकार्मिक कर्मचारी (2 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 13 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.esicmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मुंबई येथील केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग कार्यालयात विविध पदाच्या 14 जागा मुंबई येथील केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग कार्यालयात विविध पदाच्या 14 जागासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2015 आहे. अधिक माहिती http://www.handlooms.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

JOB ALERT


कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवर विविध पदांच्या 62 जागा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सरळसेवेने सिस्टीम मॅनेजर (01), मुख्य अग्निशमन अधिकारी (01), उपसचिव (01), सिस्टीम ॲनालिस्ट (01), स्तानक अधिकारी (02), उप स्थानक अधिकारी (01), ड्रायव्हर-कम-ऑपरेटर (09) आणि फायरमन (46) अशा एकूण 62 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 16 जुलै 2015 असून याबाबतची जाहिरात 25 जूनच्या लोकमतच्या मुंबई आवृत्तीत प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी www.maharecruitment.mahaonline.gov.in यावर संपर्क साधावा.


राष्ट्रीय संरक्षण अॅकडमीमध्ये (एनडीए) विविध अभ्यासक्रमाच्या 375 जागा
केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय संरक्षण अॅकडमीमध्ये (एनडीए) विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्थलसेना (208), नौसेना (42), वायूसेना (70) आणि कॅडेट एन्ट्री स्किमसाठी (55) अशा एकूण 375 जागांसाठी सामुदायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2015 आहे. अधिक माहितीसाठी www.upsc.gov.in यावर संपर्क साधावा किंवा 20 जूनचा एम्प्लॅायमेंट न्यूजचा अंक पाहावा.

भारत पेट्रोलियम कॅार्पोरेशन लि. कोचीसाठी विविध पदाच्या 73 जागा
कोची येथील भारत पेट्रोलियम कॅार्पोरेशन लिमिटेड या कंपनीमध्ये केमिस्ट (ट्रेनी-06 जागा), जनरल वर्कमन (51), जनरल वर्कमन (ट्रेनी-16) अशा एकूण 73 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 जुलै 2015 आहे. अधिक माहितीसाठी www.bpclcareers.in यावर संपर्क साधावा किंवा 20 जूनचा एम्प्लॅायमेंट न्यूजचा अंक पाहावा.

संरक्षण मंत्रालय, ऑर्डनंस इक्युपमेंट फॅक्टरीमध्ये विविध पदांच्या 153 जागा
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत कानपूर येथील ऑर्डनंस इक्युपमेंट फॅक्टरीमध्ये वरिष्ठ नर्स (01), वॅार्ड सहायक (02), एलडीसी (14), स्टोअर किपर (04), फायरमन (01), कूक (01), सीएमडी (01), स्टाफ कार चालक (01), स्टेनोग्राफर (01), वेल्डर (01), कारपेंटर (01), लेदर वर्कर (10), फिटर (13) आणि टेलर (102) अशा एकूण 153 जागासाठी ऑनलाईन अर्ज 27 जून ते 17 जुलै 2015 या दरम्यान मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी www.oefkanpur.gov.in यावर संपर्क साधावा किंवा 20 जूनचा एम्प्लॅायमेंट न्यूजचा अंक पाहावा.

जिल्हाधिकारी परभणीकरिता तलाठी संवर्गाच्या 20 जागा
जिल्हाधिकारी परभणी उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 20 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 4 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.parbhani.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी जालना आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक, तलाठी, चालक व शिपाई पदाच्या 34 जागा
जिल्हाधिकारी जालना कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 06, तलाठी (23), वाहन चालक (02) आणि शिपाई (03) या जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 3 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.jalna.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी नागपूर आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 12 तर तलाठी संवर्गाच्या 18 जागा
जिल्हाधिकारी नागपूर कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 12 तर उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 18 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 6 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.nagpur.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी नांदेड आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 09 तर तलाठी संवर्गाच्या 40 जागा
जिल्हाधिकारी नागपूर कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 09 तर उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 40 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. लिपिकसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 6 जुलै 2015 तर तलाठीसाठी 12 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.nanded.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत सहायक भविष्य निर्वाह आयुक्ताच्या 170 जागा
केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत सहायक भविष्य निर्वाह आयुक्त पदाच्या 170 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 9 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.upsc.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी उस्मानाबाद आस्थापनेवर विविध पदांच्या 10 जागा
जिल्हाधिकारी उस्मानाबाद कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या (05), तलाठी संवर्गाच्या (02) आणि शिपाई (03) अशा एकूण 10 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 3 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.osmanabad.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग आस्थापनेवर विविध पदांच्या 28 जागा
जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या (05), तलाठी संवर्गाच्या (18), शिपाई (04) आणि वाहन चालक (01) अशा एकूण 28 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 30 जून 2015 असून अधिक माहितीसाठी www.sindhudurg.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

रिजर्व बँक ऑफ इंडियात सहायक पदाच्या 504 जागा
भारतीय रिजर्व बँकेतील आस्थापनेवर सहायक पदाच्या 504 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 3 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.rbi.org.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी रायगड व पोलीस अधीक्षक आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 12 जागा
रायगड जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 12 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 30 जून 2015 असून अधिक माहितीसाठी www.raigad.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी रत्नागिरी आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 9 तर तलाठी संवर्गाच्या 34 जागा
जिल्हाधिकारी रत्नागिरी कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 09 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. शिवाय उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 34 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 1 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.ratnagiri.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

पशुसंवर्धन आयुक्‍तालयांतर्गत विभागनिहाय विविध पदाच्या 269 जागा
पशुसंवर्धन आयुक्‍तालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील शिपाई पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे :
पुणे (15 जागा), मुंबई (1 जागा), नाशिक (2 जागा), औरंगाबाद (1 जागा), नागपूर(2 जागा) व लातूर (2 जागा). परिचर पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : पुणे (61 जागा), मुंबई (27 जागा), नाशिक (53 जागा), औरंगाबाद (19 जागा), अमरावती (5 जागा), नागपूर(36 जागा) व लातूर (10 जागा). रात्रपहारेकरी या पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : औरंगाबाद (2 जागा), लातूर (1 जागा). स्वच्छक/सफाई कामगार या पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : नाशिक (2 जागा). मजदूर पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : पुणे (8 जागा), औरंगाबाद (12 जागा), नागपूर(4 जागा) व लातूर (6 जागा). या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2015 आहे. अधिक माहितीसाठी https://ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपल्पब्ध आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळ, मुंबई येथे प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदाच्या 918 जागा
भारतीय आयुर्विमा महामंडळ, पश्चिम क्षेत्रीय कार्यालय, मुंबई येथे प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (918 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 3 जून 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी www.licindia.inhttp://www.licindia.in/careers.htm या संकेतस्थळावर उपल्पब्ध आहे.

पावर ग्रिड कारपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नागपूर येथे विविध पदाच्या 15 जागा
पावर ग्रिड कारपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पश्चिम क्षेत्र कार्यालय नागपूर येथे डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रीकल) (11 जागा), डिप्लोमा ट्रेनी (स्थापत्य) (4 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 3 जून 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी www.powergridindia.com या संकेतस्थळावर उपल्पब्ध आहे.

‎All‬ the best for Rajyaseva Prelim 2015 from MPSC राज्यसेवा मार्गदर्शन

                    All‬ the best for Rajyaseva Prelim 2015
                                      from
                     MPSC राज्यसेवा मार्गदर्शन
________________________________________
या परीक्षेची तयारी करताना खालील बाबी विचारात घ्या :
1. सराव विशेषतः अंकगणित व बुद्धिमापन चाचणीचा आणि चालू घडामोडींवरील पकड गरजेची आहे.
2. परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहचा. दिलेल्या सूचनांप्रमाणे अर्धा तास आधी परीक्षा हॉल मध्ये जावून बसा.
3. परीक्षेचा क्रमांक उत्तरपत्रिकेत भरण्यापूर्वी ते कसे भरायचे ते समजावून घ्या. लक्षात ठेवा , खाडाखोड किंवा क्रमांक नोंदवताना केलेली चूक खूप महागात पडू शकते.
4. प्रश्नपत्रिका मिळाल्याबरोबर तिच्यात सर्व प्रश्न आणि पृष्ठ आहेत हे तपासा. प्रश्नपत्रिकेची सेरीज व्यवस्थितपणे उत्तरपत्रिकेवर लिहा शिवाय वर्तुळात ते नीटपणे 'डार्क' करा.
5. ज्या परिक्षार्थींनी गेल्या 2/3 वर्षात आयोगाची परीक्षा दिलेली नसेल त्यांनी अनुभवी लोकांकडून उत्तरपत्रिकेच्या दोन प्रती (स्वत:ची आणि आयोगाची ) असतात आणि त्या परीक्षा संपल्यावर वेगळ्या करायच्या असतात, ते नेमके कसे ते समजावून घ्या. तसे फाडताना तुमचा पेपर फाटणार नाही ह्यासाठी दक्ष राहा.
6. डोके शांत ठेवा.
7. सर्वप्रथम परफेक्ट येत असलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
8. येत नसलेल्या / आठवत नसलेल्या प्रश्नावर आता मेहनत नको. सर्व प्रश्नांना सारखेच गुण आहेत हे नेहमी लक्षात ठेवा.
9. प्रश्नपत्रिकेचा पहिला राउंड वरीलप्रमाणे संपवल्यावर आता शक्यतो (ज्या पेपर मध्ये असतील त्या ठिकाणी गणिताचे आणि बुध्दीमापनाचे प्रश्न) हाती घ्या. मध्ये मध्ये हातावरच्या घड्याळावरही लक्ष असू द्या.
10. आता परत प्रश्नपत्रिकेचा दुसरा राउंड घ्या . ह्यावेळी ठामपणे माहित नसलेले पण दोन उत्तरांपैकी एकाची खात्री वाटते असे प्रश्न निवडा. पर्याय 'एलीमिनेट ' करत जा. म्हणजे हे उत्तर नक्कीच नाही, असे करून कमीतकमी पर्याय मागे ठेवा . शक्यतो दोनच. आणि आता थोडे आठवायचा प्रयत्न करा शक्यता आहे तुम्हाला नेमके उत्तर येईल. येथे मर्यादित स्वरुपाची रिस्क घ्यायला हरकत नसावी.
11. आता प्रश्नपत्रिकेचा शेवटचा राउंड घ्या. उरलेल्या प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरे लिहायची ते ठरवा . निगेटिव्ह गुणदान पद्धतीचा विसर नको.
12. हे सर्व करताना तुम्ही प्रश्न क्रमांक आणि उत्तर पत्रिकेतील क्रमांक ह्यांचा ताळमेळ ठेवा . चुकूनही एखाद्या प्रश्नाचे उत्तर दुसर्यारसमोर लिहू नका. आणि तसे झालेच तर टेन्शन घेवू नका. जे झाले ते झाले आता तरी डोके शांत ठेवा.
13. सर्व काही करताना आपल्याकडे असणारा वेळ आणि अटेम्प्ट करायचे प्रश्न ह्यांचा ताळमेळ बिघडू देवू नका.
ALL THE BEST !!!

संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान(Computer & IT) by Dheeraj Chavan


स्पर्धा परीक्षा **संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान **
by धीरज चव्हाण **

MPSC,STI-PSI-ASST मुख्य परीक्षा ,IBPS,PO व इतर सर्व स्पर्धा परीक्षा मधील संगणक घटकासाठी उपयुक्त ...
वैशिष्ट्ये :
 #VAT&GST #IT ACT2008 #CyberSecurity #CLOUD COMPUTING#Computer Hardware &Software #Data Communication #Mobile and T.V. Communication #Android #IPV4,VOIP,Protocols #ecommerce
वरील सर्व घटकांची अत्यंत सोप्या पद्धतीने मांडणी ...
मागील सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets