Search This Blog

JOB ALERT

सिडकोमध्ये वर्ग-२ च्या विविध पदांची भरती (२२१ जागा)सिडकोमध्ये वर्ग-२ च्या असिस्टंट इंजिनीअर (सिव्हिल) (१७३ जागा), असिस्टंट इंजिनीअर (इलेक्ट्रीकल) (३ जागा), असिस्टंट इंजिनीअर (टेलिकॉम) (१ जागा), ज्युनियर प्लॅनर (१६ जागा), फिल्ड ऑफिसर (आर्किटेक्ट) (१० जागा), अकाऊंटंट (६ जागा), फिल्ड ऑफिसर (जनरल) (४ जागा), हायर ग्रेड स्टेनोग्राफर (६ जागा), फायर स्टेशन ऑफिसर (१ जागा), सब ऑफिसर (१ जागा) पदांसाठी आनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २८ जानेवारी २०१६ आहे. ऑनलाईन अर्ज व अधिक माहितीwww.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत ई.सी.जी. तंत्रज्ञ पदाच्या ५ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयात ई.सी.जी. तंत्रज्ञ पदाच्या ५ जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज दिनांक २१ ते २२ जानेवारी २०१६ या दरम्यान सादर करावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी दै.लाकसत्ता किंवा दै.सकाळचा दिनांक ७ जानेवारी २०१६ रोजीचा अंक पहावा. 

महात्मा गांधी स्मारक रुग्णालयात हाऊसमन व रजिस्ट्रार पदाच्या एकूण ५८ जागा
महात्मा गांधी स्मारक रुग्णालयात तात्पुरत्या स्वरुपात हाऊसमन (३२ जागा) व रजिस्ट्रार (२६ जागा) पदाच्या ५८ जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ११ जानेवारी २०१६ आहे. अधिक माहितीसाठी दै.महाराष्ट्र टाइम्सचा दि. ७ जानेवारी २०१६ रोजीचा अंक पहावा. 
भारतीय मानक ब्युरोमध्ये विविध पदांच्या ४ जागा
भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) मध्ये सहाय्यक संचालक (जनसपंर्क) (२ जागा), सहाय्यक संचालक (प्रशासन व वित्त) (१ जागा), सिनीअर मास्टर टेक्निशिअन (१ जागा) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज नोंदणी दि. १२ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१६ दरम्यान करता येईल. अधिक माहिती www.bis.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

गेल इंडिया लिमिटेडमध्ये अपंगांसाठी विविध पदांची विशेष भरती (११ जागा)
गेल इंडिया लिमिटेडमध्ये अपंगांसाठी सिनीअर इंजिनिअर (इन्स्ट्रुमेंटेशन), सिनीअर ऑफिसर (मार्केटिंग), सिनीअर ऑफिसर (लॉ), सिनीअर ऑफिसर (सीसी), सिनीअर सुप्रिटेंडंट (हिंदी), सिनीअर अकाऊटंट, सिनीअर सुप्रिटेंडंट (एचआर), सिनीअर केमिस्ट, फोरमन (मॅकेनिकल), फोरमन (ईलेक्ट्रीकल), फोरमन (इन्स्ट्रुमेंटेशन) या पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ जानेवारी २०१६ आहे. अधिक माहिती www.gailonline.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा – 2016 (109 पदे)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदाच्या भरतीकरीता आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2016 आयोजित करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी, गट-अ (एकूण 5 पदे), पोलीस उपअधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट-अ (एकूण 16 पदे), सहायक विक्रीकर आयुक्त, गट-अ (एकूण 6 पदे), उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी, गट-अ (एकूण 6 पदे), सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ, (एकूण 8 पदे), मुख्याधिकारी, नगरपालिका/नगर परिषद, गट अ (एकूण 2 पदे), तहसिलदार, गट-अ (एकूण 19 पदे), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब (एकूण 1 पद), कक्ष अधिकारी, गट-ब (एकूण 20 पदे), सहायक गट विकास अधिकारी, गट-ब (एकूण ५ पदे), सहायक निबंधक सहकारी संस्था, गट-ब (एकूण ८ पदे), उप अधीक्षक, भूमी अभिलेख, गट ब (एकूण १ पद), उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण २ पदे) नायब तहसिलदार, गट-ब (एकूण १० पदे) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १२ जानेवारी २०१६ आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in तसेचhttps://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

भारतीय रेल्वे बोर्डाच्या आस्थापनेवर विविध पदांची भरती (18252 जागा)
भारतीय रेल्वे बोर्डाच्या आस्थापनेवर कमर्शिअल ॲप्रेंटीस (सीए), ट्रॅफिक ॲप्रेंटीस (टीए), एन्क्वॉयरी-कम-रिझर्वेशन क्लर्क (इसीआरसी), गुड्स गार्ड, सिनीअर क्लर्क-कम-टायपीस्ट, ज्युनिअर अकाऊंटस असिस्टंट-कम-टायपिस्ट (जेएए) असिस्टंट स्टेशन मास्टर (एएसएम), ट्रॅफिक असिस्टंट ॲण्ड सिनीअर टाईम किपर पदाच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 25 जानेवारी 2016 आहे. अधिक माहिती रेल्वे बोर्डाच्या www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

रोजगारासंदर्भात आता हेल्‍पलाईन
सर्वंकष ई- प्रशासन प्रणाली प्रकल्‍पांतर्गत विकसित केलेल्‍या www.maharojgar.gov.in या वेबपोर्टलव्‍दारे लाभार्थी घटक उमेदवार, नियोक्‍ते, प्रशिक्षण संस्‍था, शासनाची विविध कार्यालये, शासनाच्‍या स्‍वयंरोजगार योजना राबविणारी महामंडळे, सेवा पुरविणारे व सेवा घेणारे इ. लाभार्थी घटक यांना रोजगार, स्‍वयंरोजगार, व प्रशिक्षणाबाबतच्‍या विविध सेवा सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या आहे. सदर लाभार्थी घटकांना या सेवाचा लाभ घेताना काही अडचणी असल्‍यास त्‍यांचे निराकरण व त्‍यांना सहाय्य करण्‍यासाठी नविन हेल्‍पलाईन क्रमांक - 18602330133 दिनांक 27 ऑक्‍टोबर 2015 पासून सोमवार ते शनिवार (दुसरा व चौथा शनिवार आणि सार्वजनिक सुट्या वगळून) सकाळी 10 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत कार्यान्वित करण्‍यात आला आहे. 


बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपीक पदाच्या २० जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील महानगरपालिका चिटणीस कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपीक पदाच्या २० जागांसाठी विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ११ जानेवारी २०१६ आहे. अधिक माहिती www.mcgm.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये विविध तांत्रिक पदाच्या 1230 जागा
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये कंत्राटी तत्त्वावर विविध तांत्रिक पदे (१२३० जागा) भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २१ जानेवारी २०१६ आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सहाय्यक अभियंता पदाच्या ६६ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध आस्थापनांवरील सहाय्यक अभियंता (स्थापत्य) (४२ जागा), सहाय्यक अभियंता (यांत्रिकी व विद्युत) (२४ जागा) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज दि. ५ जानेवारी २०१६ पासून उपलब्ध होईल. अधिक माहिती http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

कृषी आयुक्तालयाच्या विविध विभागात कृषी सेवक पदाच्या 730 जागा
कृषी आयुक्तालच्या अधिनस्त विभागीय कार्यालयाअंतर्गत गट-क संवर्गातील कृषी सेवकांची पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पुणे - 156 पदे, ठाणे - 181 पदे, नाशिक - 31 पदे, कोल्हापूर - ८६ पदे, औरंगाबाद - १०७ पदे, लातूर - २२ पदे, अमरावती - ९ पदे, नागपूर - १३८ पदे अशी विभागनिहाय पदसंख्या आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १२ जानेवारी २०१६ आहे. अधिक माहिती www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ लेखापरीक्षा व लेखा सहाय्यक पदाची भरती (३३९ जागा)
बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ लेखापरीक्षा व लेखा सहाय्यक पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज दिनांक 23 डिसेंबर 2015 ते 18 जानेवारी 2016 या कालावधीत करावयाचे आहेत. ऑनलाईन अर्ज व अधिक माहितीhttp://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

गेल (इंडिया) लिमिटेडमध्ये विकलांग व्यक्तींसाठी विशेष भरती मोहिम (11 जागा)
गेल (इंडिया) लिमिटेड, महारत्न पीएसयू हे सीनिअर इंजिनियर (इन्स्ट्रुमेंटेशन), सीनिअर ऑफिसर (मार्केटिंग), सीनिअर ऑफिसर (लॉ), सीनिअर ऑफिसर (सीसी), सीनिअर सुपरिटेंडन्ट (हिंदी), सीनिअर अकाऊन्टन्ट, सीनिअर सुपरिटेंडन्ट (एचआर), सीनिअर केमिस्ट, फोरमन (मॅकेनिकल), फोरमन (ईलेक्ट्रिकल), फोरमन (इन्स्ट्रुमेंटेशन) अशा एकूण 11 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 11 जानेवारी 2016 आहे. ऑनलाईन अर्ज तसेच अधिक माहिती www.gailonline.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets