Search This Blog

MPSC Mains Topicwise Book List & Study Plan (राज्यसेवा मुख्य तयारी )


MPSC BOOK LIST & STUDY PLAN

राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी

                राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी


पूर्वपरीक्षेची Answerkey 🗝 आलेली आहे. सुरवातीच्या या काळात cutoff किती लागेल🤔 जागा वाढतील का🤔 मुख्य परीक्षेसाठी कोणते संदर्भ बुक्स वापरू🤔 या प्रश्नात आणि मुख्य परीक्षेची बुक्स आणि मटेरियल यांची जमवाजमव करण्यात खूप वेळ जातो ☹, म्हणून सुरवातीच्या या काळात पेपर 2 इंडियन पॉलिटी हा विषय अभ्यासासाठी घ्यावा असे मला वाटते. एकतर या विषयासाठी स्टॅंडर्ड आणि ऑथेंटिक मटेरियल available आहे 🏻आणि दुसरी गोष्ट या विषयात तुम्ही जितके इन्पुटस द्याल तितकं outputs सुद्धा मिळेल😋 सुरवातीला syllabus wise अभ्यास करण्यापेक्षा बुक्स wise अभ्यास करावा असे मला वाटते. syllabus चा एखादा छोटा पॉईंट घेऊन आपण उगीच त्यात शोधाशोधित जास्त वेळ घालवतो..
1⃣ सुरवातीला M.Laxmikant यांची 4th एडिशन मधील एक एक टॉपिक पूर्ण समजून वाचावा आणि M. Laxmikant यांच्याच Question बँक मधील त्या चॅप्टर वरील Questions सोडवावेत Questions सोडवल्याने बऱ्याच गोष्टी ज्या वाचताना राहिल्या त्या क्लिअर होतील.
2⃣ इंडियन पॉलिटी या विषयावर ऑनलाइन Quiz खूप आहेत त्यातील Gktoday बेस्ट आहे Daily ठरवून gktoday quiz वरचे पॉलिटीचे Q सोडवणे. या मुळे पॉलिटी विषयातील तुमचा कॉन्फिडन्स वाढेल.
3⃣ज्ञानदीप magazine,unique अकादमी magazine, मधून राजकीय घटना नावाचा जो भाग येतो तो त्या-त्या chapt ला laxmikant मध्ये चिकटवणे करणे म्हणजे त्या विषयातील चालू घडामोडी पण तिथेच लक्षात राहतील.
4⃣इंडिया अँड गव्हर्नन्स मधून syllabuswise टॉपिक बघून घेणे
ex. पब्लिक सर्विसेस chapt, commissions, some ऍक्टस (This is a must book for paper-3)
5⃣ कायद्याचे चार्ट बनवणे- पेपर 2 ला कायद्यावर बरेच Q विचारतात यात त्या कायद्यातील तरतुदी, कायद्याचे कार्यक्षेञ, शिक्षा, शिक्षा देणारी ऑथॉरिटी, काही महत्वाची कलमे, त्या कायद्याचा इतर कायद्याशी संबंध यावर factual आणि काहीवेळा अप्लाइड प्रश्न विचारले जातात या गोष्टींमध्ये बरेच छोटे छोटे बारकावे असल्याने कायद्यांचे चार्ट बनवून अभ्यास केल्यास गोंधळ होणार नाही आणि कायद्यांची तुलना करून लक्ष्यात ठेवायला सोप्प जाईल. unique academy चं पार्ट 2 खूप छान आहे त्यात addition करू शकता.
6⃣हे सर्व झाल्यावर unique academy चा पार्ट 1 वाचावा
7⃣ काही चाप्टर syllabus मध्ये repeat झालेले आहेत उदा. शिक्षण हा टॉपिक तिन्ही पेपर मध्ये आहे त्याचा एकत्र अभ्यास करावा.
8⃣ज्ञानदीप अकादमी चे मुख्य परीक्षा विश्लेषण छान आहे syllabus आणि मागील प्रश्न नेहमी सोबत असू द्यावे.
9⃣पेपर 2 मध्ये चालू राजकीय घटना, घडामोडी, निवडणुका, कायदे, आयोग, पक्ष, आणि एकूणच राज्यकारभार यांची syllabus शी लिंक लावणे आणि त्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास खूप फायदा होतो.
🔟पॉलिटी चा अभ्यास करताना P.M. बक्षी यांचे छोटे बुक जवळ ठेवावे कोणतेही कलम पहायचे असल्यास यातून पहावे.
1⃣1⃣टीप- पॉलिटी साठी जितके इंग्लिश मटेरियल मधून वाचाल तितका फायदाच होईल.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets