Search This Blog

YCMOU All Ebooks Free Download

YCMOU चे सर्व पुस्तके येथे Download करा 


01. Agricultural Science
02. Architecture, Science and Technology
03. Commerce and Management
04. Computer Science
05. Continuing Education
06. Education
07. Health Science
08. Humanities and Social Sciences
09. Academic Services Division
School of Education
 Bachelor of Education (B.Ed)

--- Ebooks : Free download ---
 Sr.
 No
 Code  Name of E-book Click Here
01EDU426  शैक्षणिक तंत्रविज्ञान (वैकल्पिक अभ्यासक्रम)Click Here
02EDU427  शिक्षक आणि बालशिक्षण - भाग १ (वैकल्पिक अभ्यासक्रम)Click Here
03EDU427  शिक्षक आणि बालशिक्षण - भाग २ (वैकल्पिक अभ्यासक्रम)Click Here
04EDU428  शिक्षक आणि स्वयंसहाय्य गट - भाग १ (वैकल्पिक अभ्यासक्रम)Click Here
05EDU428  शिक्षक आणि स्वयंसहाय्य गट - भाग २ (वैकल्पिक अभ्यासक्रम)Click Here
06EDU429  मूल्यशिक्षण (वैकल्पिक अभ्यासक्रम)  Plz. wait
07EDU430  प्राथमिक शिक्षकांसाठी इंग्रजी : भाग १  (वैकल्पिक अभ्यासक्रम)Click Here
08EDU431  प्राथमिक शिक्षकांसाठी इंग्रजी : भाग २  (वैकल्पिक अभ्यासक्रम)Click Here
09EDU432  प्राथमिक शिक्षकांसाठी इंग्रजी : भाग ३  (वैकल्पिक अभ्यासक्रम)Click Here
10EDU433  शिक्षणातील संज्ञापन प्रकार (वैकल्पिक अभ्यासक्रम)Click Here
11EDU434  प्राथमिक स्तरावरील शिक्षण व शिक्षकाची कार्ये (वैकल्पिक अभ्यासक्रम)Click Here
12EDU435  माध्यमिक स्तरावरील शिक्षण व शिक्षकाची कार्ये (वैकल्पिक अभ्यासक्रम)Click Here
13EDU436  कृतिसंशोधन Click Here
14EDU476  सैद्धांतिक भागांवरील प्रात्यक्षिके कार्यफाईल Click Here
15EDU477  सूक्ष्म अध्यापनाशी संबंधित प्रात्यक्षिके कार्यफाईल Click Here
16EDU478  सरावपाठ संबंधित प्रात्यक्षिके कार्यफाईल - भाग १Click Here
17EDU478  सरावपाठ संबंधित प्रात्यक्षिके कार्यफाईल - भाग २Click Here
18EDU479  अभ्यासपूरक प्रात्यक्षिके कार्यफाईलClick Here
19EDU480  स्वाध्याय पुस्तिकाClick Here
20EDU481  नमुना प्रश्नपत्रिका व उत्तरलेखन Click Here

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ चे स्वरूप व अभ्यास नियोजन

                      राज्यसेवा पूर्व परीक्षा चे स्वरुप

एमपीएससी राज्यसेवा परीक्षा आयोगाने त्यांच्या प्रीलियमचा पॅटर्न बदललाय. हा पॅटर्न ब‍-याच अंशी यूपीएससीसारखा आहे. एप्रिल २०१७  महिन्यातील प्रस्तावित राज्यसेवा पूर्व परीक्षा या नव्या पॅटर्ननुसार होईल. या नव्या पॅटर्नबद्दल थोडंसं. 
एमपीएससीने प्रीलियमच्या अभ्यासक्रम म्हणजे युपीएससीच्या प्रीलियमच्या अभ्यासक्रमाची कॉपीपेस्ट आवृत्ती आहे. त्यात भर फक्त महाराष्ट्र या शब्दाची आहे. अभ्यासक्रमात ज्या ज्या ठिकाणी देश वा भारत आहे तेथे राज्यमहाराष्ट्र हे शब्द अॅड केले आहेत. बाकी अभ्यासक्रम सेम टू सेम.
अभ्यासक्रम आणि त्याचं स्वरूप : 
प्रीलियमसाठी प्रत्येकी २०० गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतील. दोन तास वेळ असेल. या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजीत असतील. 

पेपर- १ (गुण २००- २ तास) 

१ .राज्य , राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. 
२ .भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ 
३. महाराष्ट्र , भारत आणि जगाचा भूगोल- भौतिक , सामाजिक आणि आर्थिक
४ .महाराष्ट्रभारत - राज्यव्यवस्था आणि शासन- राज्यघटना , राजकीय व्यवस्था ,पंचायती राज , शहरी प्रशासन , शासकीय धोरणं , हक्कविषयक घडामोडी आदी 
५ .आर्थिक आणि सामाजिक विकास- शाश्वत विकास , गरिबी , समावेशन ,लोकसंख्याविषयक मुद्दे , सामाजिक धोरणं इ.
६ .पर्यावरणीय परिस्थिती , जैव विविधता ,हवामान बदल यामधील सर्वसामान्य मुद्दे , सामान्य विज्ञान 
जुन्या अभ्यासक्रमाशी तुलना 
पेपर -१ मध्ये जुन्या प्रीलियमच्या तुलनेत बरेच बदल आहेत. आर्ट‍्समधली इतिहास ,भूगोल व राज्य व्यवस्था यावर स्वतंत्र तीन विभाग केलेत. त्याचा अभ्यासही विस्तारलाय. भूगोलामध्ये महाराष्ट्राबरोबरीनेच भारत व जगाचाही अंतर्भाव आहे. महाराष्ट्रातील समाजसुधारक व त्यांची कार्ये हा विषयही गाळलाय. वाणिज्य आणि अर्थव्यवस्था घटकांमध्ये सामाजिक विकासाला जास्त महत्त्व दिलंय. कृषि घटक तर पार बादच केला आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाऐवजी सामान्य विज्ञानाचा समावेश केलाय. या विषयातील तपशील दिलेला नाही. बुध्दिमापन विषयक प्रश्नांचा अंतर्भाव पेपर २ मध्ये केलाय. 
नवीन अभ्यासक्रमासाठी अभ्यास कसा कराल 
पेपर १ साठी 
1) वस्तुनिष्ठ माहिती - यामध्ये आकडेवारी , तारखा , कलमे , कायद्याच्या अंमलबजावणीचे वर्ष , व्यक्ती/ प्रदेशांची नावे इ.चा समावेश होईल. उदा. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रथम मुख्य न्यायमूर्ती कोण होत ? 
2) संकल्पनांवर आधारीत प्रश्न 
आपण वस्तूनिष्ठ माहिती पाठांतराने लक्षात ठेवू शकतो. मात्र संबंधित संकल्पना समजून घ्या. उदा. भारतीय राज्यघटनेने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला ही वस्तुनिष्ठ माहिती आहे. मात्र संसदीय लोकशाही म्हणजे काय ? हा संकल्पनेवर आधारीत प्रश्न आहे. 
3) विश्लेषणात्मक / प्रयोजनात्मक प्रश्न 
नुसताच नियम वा कायदा माहीती असणं महत्त्वाचं नाही तर त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे. उदा. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांची कमाल संख्या किती असू शकते? यामध्ये ९१ व्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळातील मंत्र्यांची कमाल संख्या कनिष्ठ सभागृहाच्या एकूण संख्येच्या १५ % इतकीच असते. महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २८८ आहे. त्याच्या १५ टक्के म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्र्यांची कमाल संख्या ४३ असू शकते. 
4) आर्थिक व सामाजिक विकासाच्या अभ्यासासाठी शासकीय योजनांची पूर्ण माहिती घेणं आवश्यक. केंद्राचा व राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल अभ्यासा. रोजचा पेपर वाचा. इतिहास , भूगोल , राज्य शास्त्र , विज्ञान यांच्या मूलभूत अभ्यासासाठी आठवी ते बारावीची पुस्तकं वाचा. 


पेपर- २ (गुण २००-२ तास) 

आकलन (कॉम्प्रिहेन्शन) 
इंटरपर्सनल स्किल्स (कम्युनिकेशन स्किलसह) 
तर्कशुद्ध युक्तिवाद आणि मीमांसा/ पृथ:करण क्षमता (लॉजिकल रिझनिंग आणि अॅनालिटिकल अॅबिलिटी) 
निर्णय क्षमता व प्रश्नांची उकल ( डिसिजन मेकींग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग) 
सामान्य बुद्धिमापन क्षमता (जनरल मेंटल एबिलिटी) 
बेसिक न्यूमरसी , डेटा इंटरप्रिटेशन (चार्ट , ग्राफ , टेबल्स) (दहावीचा स्तर असेल) 
इंग्लिश व मराठी भाषा आकलन क्षमता - कॉम्प्रिहेन्शन स्किल (दहावीस्तर) 
कॉम्प्रिहेन्शन
यात आकलन क्षमतेची परीक्षा घेतली जाते. उता‍ऱ्यावर प्रश्न , पॅराग्राफ उलटेसुलटे करुन त्याची संगती लावणं , वाक्यरचना ओळखणं , योग्य शब्दाची निवड करणं , समानार्थी-विरुद्धार्थी शब्द लिहीणं अशा अनेक गोष्टी त्यात येतात. 
लॉजिकल रिझनिंग आणि अॅनॅलॅटिकल अॅबिलिटी 
यामध्ये एखाद्या गोष्टीचा तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता जोखली जाते. दोन विधानांचा परस्परसंबंध , त्यावरचं अनुमान काढावं लागंत. 
डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग
प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना सतत विविध प्रश्नांना- समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यावेळी समस्येचा सर्वांगीण विचार करून योग्य , अधिकाधिक जनतेला उपयोगी ठरेल , असा निर्णय घ्यावा लागतो. प्रीलियमचे काही प्रश्न हे या क्षमतेची चाचपणी करणारे असतील. 
जनरल मेंटल एबिलिटी : 
आत्तापर्यंत सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये या घटकाचा समावेश असे. आता नवीन पेपर (पेपर दोन) मध्ये याचा समावेश आहे. यामध्ये काळ , काम , वेग , गुणोत्तर , कोडिंग ,डिकोडिंग , प्रोबॅबिलिटी , घड्याळ , कॅलेंडर , दिशा आदींवर आधारित प्रश्न असतात. 
बेसिक न्यूमरसी आणि डेटा इंटरप्रिटेशन
यात आकड्यांमधील संबंध ओळखून क्रम किंवा रिक्त स्थानं भरणं , लसावि/ मसाविवर आधारित प्रश्न , सरासरी , वयांचे गुणोत्तर नफा-तोटा , क्षेत्रफळ , आकारमान ,प्रोबॅबिलिटी आदींवर आधारित प्रश्नांचा समावेश होतो. तर डेटा इंटरप्रिटेशनमध्ये आकृती ,ग्राफ , टेबल्स याचं आकलन करणं अपेक्षित असतं. कॉम्प्रिहेन्शन तसंच न्यूमरसीचे प्रश्न हे दहावीस्तराचे असणार आहेत , असंही जाहीर केलं गेलंय. त्यामुळे त्याचा नियमित सराव हमखास यश देऊ शकेल. 
इंटरपर्सनल स्किल्स (कम्युनिकेशन स्किलसह) : 
सरकारी नोकरीत उच्चपदावर काम करत असताना अनेक व्यक्ती , संस्था , राजकारणी ,अधिकारी , कर्मचारी आदींशी नियमित संपर्क येत असतो. त्यावेळी तुमची इंटरपर्सनल स्किल्स आणि कम्युनिकेशन स्किल्स कामाला येतात. 

MPSC STI Book List

MPSC STI Book Listअनेक Toppers सोबत चर्चा केल्यानंतर आणि आमच्या मागच्या अनुभवानुसार.....
" STI पूर्व परीक्षा- पुस्तक संदर्भसूची " जाहीर करत आहोत...I. इतिहास ( वाचन जास्त आणि output कमी ) -१. 5वी ते 11 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोव्हर & YCMOU SYBA चे पुस्तक
३. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कटारे
४. कथा स्वातंत्र्याची - कुमार केतकर ( एकदा वाचा )
५. इंडिया'स स्ट्रगल फॉर इंडिपेंडेन्स- बिपन चंद्रा

II. भूगोल ( Scoring विषय )
१. 5 वी ते 12 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. NCERT 11 वी & 12 वी ( Physical & India )
३. महाराष्ट्राचा भूगोल - खतीब (limited)
४. भूगोल व पर्यावरण - सवदी
५. Oxford ATLAS Book

III. राज्यशास्त्र ( scoring विषय )
१. ११वी & १२ वी राज्यशास्त्र
२. आपली संसद- सुभाष कश्यप
३. भारतीय राज्यव्यस्था - लक्ष्मीकांत ( VIMP) / कोळंबे
४. पंचायत राज - खंदारेIV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )१. 9 वी, १० वी क्रमिक
२. NCERT - 11वी
३. अर्थशास्त्र - किरण देसले 
४.आर्थिक पाहणी - भारत & महाराष्ट्र
५. प्रतियोगीता दर्पण - Special issue ऑन Economics

V. सामान्य विज्ञान
१. 5वी ते 10 वी क्रमिक पुस्तके
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science
VI. गणित & बुद्धिमत्ता
१. जी किरण

VII. चालू घडामोडी
१.  सकाळ + महाराष्ट टाइम्स
२. द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस ( कोणतेही एक )
३. PIB website (VIMP)- pib.nic.in

VII. Revision साठी Bee Publication चा नवीन अत्यंत उपयुक्त असे गाइड वापरा 

MPSC STI Book List

MPSC PSI Book Listअनेक Toppers सोबत चर्चा केल्यानंतर आणि आमच्या मागच्या अनुभवानुसार.....
" PSI पूर्व परीक्षा- पुस्तक संदर्भसूची " जाहीर करत आहोत...I. इतिहास ( वाचन जास्त आणि output कमी ) -१. 5वी ते 11 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोव्हर & YCMOU SYBA चे पुस्तक
३. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कटारे
४. कथा स्वातंत्र्याची - कुमार केतकर ( एकदा वाचा )
५. इंडिया'स स्ट्रगल फॉर इंडिपेंडेन्स- बिपन चंद्रा

II. भूगोल ( Scoring विषय )
१. 5 वी ते 12 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. NCERT 11 वी & 12 वी ( Physical & India )
३. महाराष्ट्राचा भूगोल - खतीब (limited)
४. भूगोल व पर्यावरण - सवदी
५. Oxford ATLAS Book

III. राज्यशास्त्र ( scoring विषय )
१. ११वी & १२ वी राज्यशास्त्र
२. आपली संसद- सुभाष कश्यप
३. भारतीय राज्यव्यस्था - लक्ष्मीकांत ( VIMP) / कोळंबे
४. पंचायत राज - खंदारे

IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )१. 9 वी, १० वी क्रमिक
२. NCERT - 11वी
३. अर्थशास्त्र - किरण देसले 
४.आर्थिक पाहणी - भारत & महाराष्ट्र
५. प्रतियोगीता दर्पण - Special issue ऑन Economics

V. सामान्य विज्ञान
१. 5वी ते 10 वी क्रमिक पुस्तके
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science
VI. गणित & बुद्धिमत्ता
१. जी किरण

VII. चालू घडामोडी
१.  सकाळ + महाराष्ट टाइम्स
२. द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस ( कोणतेही एक )
३. PIB website (VIMP)- pib.nic.in

VII. Revision साठी Bee Publication चा नवीन अत्यंत उपयुक्त असे गाइड वापरा 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets