Search This Blog

United Nations Organizations (संयुक्त राष्ट्रसंघ व त्यातील इतर संस्था)


                                                        संयुक्त राष्ट्रसंघ
                          United Nations Organizations

ही आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्व शांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. 'संरा' ची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाच्या जागी देशा-देशांमधील युद्धे थांबविण्यासाठी आणि संवादासाठी अधिष्ठान पुरविण्याच्या उद्देशाने झाली होती.
ही संस्था स्थापन करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला होता, पण भारताचे या संस्थेच्या कामापासून नेहमी अलिप्त राहण्याचे धोरण राहिले आहे. आपले कार्यक्रम रावबिण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अनेक दुय्यम संस्था आहेत.
जगातील बहुतांश सर्व सार्वभौम राज्यांचा समावेश असणारी १९३ राष्ट्रे सांप्रत तिची सदस्य आहेत. जगभरात असलेल्या कार्यालयांमधून वर्षभरात होणाऱ्या नियमित बैठकांमधून ’संरा’ आणि तिच्या खास संस्था सारलक्षी आणि प्रशासकीय बाबींवर निर्णय घेतात.सध्याचे अध्यक्ष अन्तेनिओ गुटेरास .

संस्थेची सहा मुख्य उपांगे आहेत :
१) आमसभा (मुख्य चर्चाकारी सभा);
२) सुरक्षा परिषद (शांती आणि सुरक्षेसाठीचे विवक्षित ठराव करणारी);
३) आर्थिक व सामाजिक परिषद (आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक सहकार्य व विकासास चालना देण्यात सहकार्यासाठी);
४) सचिवालय (’संरा’ला आवश्यक अभ्यासकार्ये, माहिती आणि सुविधा देण्यासाठी);
५) आंतरराष्ट्रीय न्यायालय (प्रमुख न्यायिक अंग) आणि
६) ’संरा’ विश्वस्त संस्था (सध्या अक्रिय).
’संरा’ व्यवस्थेतील इतर प्रमुख संस्थांमध्ये
विश्व स्वास्थ्य संघटना, विश्व अन्न कार्यक्रम आणि युनिसेफ यांचा समावेश होतो.
महासचिव ही ’संरा’ची सर्वात ठळक व्यक्ती असते आणि २००७ मध्ये हे पद दक्षिण कोरियाचे बान की-मून यांनी मिळविले. सदस्य राष्ट्रांकडून मिळणाऱ्या निर्धारित आणि ऐच्छिक देणग्यांमधून संस्थेला वित्तपुरवठा होतो
आणि
१) अरेबिक,
२) चिनी,
३) इंग्लिश,
४) फ्रेंच,
५) रशियन आणि
६)स्पॅनिश
या तिच्या सहा अधिकृत भाषा आहेत. ही विश्व संघटना आहे. सचिवालयातील मुख्य हा महासचिव आहे

> राष्ट्रसंघाची उद्दीष्टे :
राष्ट्रसंघ कशासाठी स्थापन झाला, त्याचे हेतू व उद्दिष्टे काय आहेत हे राष्ट्रसंघाच्या घटनेत स्पष्ट केले आहे. त्यानुसार त्यांची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे-
जागतिक शांसता व सुरक्षितता प्रस्थापित करणे
राष्ट्रांराष्ट्रांत मैत्रीचे व सहकार्याचे संबंध प्रस्थापित करणे.
आंतराष्ट्रीय प्रश्न युद्धाच्या मार्गाने न सोडविता ते शांततेच्या मार्गाने सोडविणे.
राष्ट्रसंघातील सर्व राष्ट्रे सार्वभौम व स्वतंत्र्य आहेत आणि त्यांनी सामुदायिक सुरक्षिततेसाठी राष्ट्रसंघाचे नियम पाळावेत.
आंतराष्ट्रीय कायद्याचे पालन करावे.

> संयुक्त राष्ट्रांच्या खालील विशेष संस्था आर्थिक व सामाजिक परिषदेमार्फत चालवल्या जातात :

१) संयुक्त राष्ट्रे खाद्य व कृषी संस्था
(FAO : Food and Agriculture Organization)
स्थापना : १६ ऑक्टोबर १९४५
मुख्यालय : रोम, इटली
ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. भूकनिवारणासाठी जगभर प्रयत्न करणे हे ह्या संस्थेचे मुख्य कार्य आहे. सध्या जगातील १९१ देश ह्या संस्थेचे सदस्य आहेत.

२) आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था :(IAEA : International Atomic Energy Agency)
स्थापना : २९ जुलै १९५७ रोजी
मुख्यालय : ऑस्ट्रियातील व्हियेना
ही अणुकेंद्रकीय ऊर्जेच्या शांततामय वापराचा प्रसार करणारी आणि आण्विक शस्त्रांसाठीच्या लष्करी उद्देशासाठी तिचा वापर करण्यास प्रतिबंध घालणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. एक स्वतंत्र संस्था म्हणून २९ जुलै १९५७ रोजी ’IAEA’ची स्थापना केली गेली.
‘आंअसं संविधी’ या संयुक्त राष्ट्रांहून अलग अशा सनदेने स्वतःच्या वेगळ्या आंतरराष्ट्रीय करारातून ही संस्था जन्माला आली असली तरी ती संयुक्त राष्ट्रे आमसभा आणि सुरक्षा समिती या दोहोंना आपल्या कार्याची माहिती देते.
‘IAEA’चे मुख्यालय ऑस्ट्रियातील व्हियेना ह्या शहरी आहे. कॅनडाच्या ओंटारियो प्रांतातील टोरोन्टो इथे आणि जपानमधील टोक्योत अशी ’IAEA’ची दोन “विभागीय खबरदारी कार्यालये” आहेत. याव्यतिरिक्त तिची दोन संबंध कार्यालये न्यू यॉर्क प्रांतातील त्याच नावाच्या शहरी आणि स्वित्झर्लंडमधील जिनिव्हात आहेत. याशिवाय ऑस्ट्रियातील विएन्ना व सिबेर्सडॉर्फ इथे आणि मोनॅकोत ’IAEA’च्या प्रयोगशाळा आहेत. जगभरातील आण्विक तंत्रज्ञानाच्या आणि आण्विक शक्तीच्या शांततापूर्ण कार्यातील शास्त्रीय आणि तांत्रिक सहकार्यासाठी ’IAEA’ आंतरशासकीय मंच म्हणून कार्य करते.
’IAEA’चे कार्यक्रम आण्विक तंत्रज्ञानाच्या शांततामय वापरांच्या विकासासाठी प्रोत्साहन देतात, आण्विक तंत्रज्ञान आणि आण्विक द्रव्यांच्या गैरवापराविरूद्ध आंतरराष्ट्रीय खबरदारी घेतात आणि आण्विक सुरक्षा (विकिरण संरक्षणासह) व आण्विक सुरक्षा प्रमाणकांचा आणि त्यांच्या अंमलबजावणीचा पुरस्कार करतात.
’IAEA’ आणि तिचे माजी महानिदेशक मोहमद अल बर्देई यांना ७ ऑक्टोबर २००७ रोजी नोबेल शांतता पुरस्कार संयुक्तपणे देण्यात आला.

३) आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था :
(ICAO) : The International Civil Aviation Organization)
स्थापना : इ.स. १९४७
मुख्यालय : माँत्रियाल, कॅनडा
आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे. ही संस्था आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक प्रगत व सुरक्षित व्हावी ह्यासाठी अनेक उपक्रम राबवते व धोरणे ठरवण्यास मदत करते.

४) आंतरराष्ट्रीय मजूर संस्था :
(ILO : International Labour Organization)
स्थापना : इ.स. १९१९
मुख्यालय : जिनिव्हा, स्वितझर्लंड
ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे. ही संस्था जगातील मजूर वर्गाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते.
1969 मध्ये, शांतता सुधारणे, कामगारांसाठी चांगले काम करणे आणि न्याय मिळवून देणे, आणि इतर विकसनशील देशांना तांत्रिक साहाय्य देणे यासाठी संस्थेला नोबेल शांतता पुरस्कार मिळाला.

५) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी :
(IMF : International Monetary Fund आयएमएफ)
स्थापना : २७ डिसेंबर, १९४५
मुख्यालय : वॉशिंग्टन, डी.सी. अमेरिका
उद्देश्य : आंतरराष्ट्रीय व्यापारातील देवाण-घेवाणीत समतोल राखणे.
ही सदस्य राष्ट्रांना मुख्यतः विनिमय दरावर आणि देवघेवींच्या ताळेबंदावर प्रभाव टाकणार्या बृहत-अर्थशास्त्रीय धोरणांबाबत पाठपुरावा करावयास लावून जागतिक वित्तीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. आंतरराष्ट्रीय विनिमय दरांमध्ये स्थिरता आणणे आणि कर्जे, पुनर्रचना किंवा मदतीच्या मोबदल्यात इतर राष्ट्रांना आपली आर्थिक धोरणे अधिक उदार बनवावयास लावून विकास घडवून आणण्याचे घोषित ध्येय असणारी ही संस्था आहे.
मुख्यतः गरीब राष्ट्रांना ती दीर्घमुदतीची कर्जे देते. तिचे मुख्यालय संयुक्त संस्थानातील वॉशिंग्टन, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलम्बिया इथे आहे.
आयएमएफ निधी कोश हा सभासद देशांनी जमा केलेल्या कोशाने बनलेला असतो. प्रत्येक सभासद देशाने धीकोशाचा किती वाटा द्यावा, हे संबंधित देशाचे राष्ट्रीय उत्पन्न, उपलब्ध विदेशी चलन व सुवर्णसाठा, आंतरराष्ट्रीय देवाण घेवाणविषयक स्थिती इत्यादी बाबी विचारात घेऊन ठरविण्यात येते.
सभासद देशांनी त्यांच्या कोट्यापैकी २५ % भाग हा डॉलर व सुवर्णात जमा करावा लागतो. या पद्धतीने संचलित झालेला निधी सामान्य खात्यात जमा ठेवण्यात येतो. दर पाच वर्षांनी सभासद देशाचा कोटा बदलण्यात येतो.
आयएमएफ चा आणखी एक निधी कोश म्हणजे स्पेशल ड्रॉईंग राईट्स (एसडीआर) होय. हा निधीकोश विशेष खात्यात जमा असतो. या खात्यातील निधी अमेरिका, जपान, फ्रांस, इंग्लंड या देशांच्या चलनाद्वारे संकलित झालेला असतो.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कारभारावर मुख्य नियंत्रण हे बोर्ड ऑफ गव्हर्नर्स चे असते. प्रत्येक सभासद देशाचा एक गव्हर्नर व तसेच एक पर्यायी गव्हर्नर या मंडळावर घेण्यात येतो. या मंडळाद्वारे कार्यकारी संचालक मंडळाची निवड केली जाते. संचालक मंडळ वीस सदस्यांचे असते. व त्यापैकी चौदा निर्वाचित व सहा अधिकतम कोटा देणारे सदस्य असतात. रोजचे व्यवस्थापन संचालक मंडळाद्वारे चालते. संचालक मंडळातून एक व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवडला जातो.
सभासद देशांना त्यांच्या कोट्याच्या प्रमाणात मताचा अधिकार दिलेला असतो. एकूण ८५ % मताधिक्याने धोरण बदलण्यात येते.
एखाद्या देशाच्या कोटा रकमेच्या पंचवीस टक्यांपर्यंत निधीकडून विनाअटीचे कर्ज मिळते. अन्य प्रकारच्या कर्जासाठी अनेक जाचक अटी असतात. विदेशी देवाण घेवाणीचे संतुलन साधण्यासाठी निधीतर्फे सुचविण्यात येणार्या आर्थिक बदलांची पूर्तता करण्याची लेखी हमी दिल्यासच अन्य काही पव्रकारचे कर्ज मिळू शकते.
आंतरराष्ट्रीय पातळीवर प्राथमिक वस्तूंचा साठा करण्यासाठी कोट्याच्या ४५%, पूर - दुष्काळ इत्यादीमुळे आंतरराष्ट्रीय देवाण घेवाणीत असंतुलनाची समस्या असणार्या देशांना ७० % ते १४० % कर्ज संबंधित अटींसह मिळण्याची सोय आयएमएफ अंतर्गत उपलब्ध असते. त्याचबरोबर आर्थिक तूट, चलन विनिमय दर, आयशात निर्यात कर, आर्थिक धोरण इत्यादीसंबंधी निधीकडून सल्ला व मार्गदर्शन देण्यात येते.

६) संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था अथवा(युनेस्को) : (UNESCO : United Nations Educational, Scientific and Cultural Organization)
स्थापना : १६ नोव्हेंबर १९४५
मुख्यालय : पॅरिस, फ्रान्स
ही १६ नोव्हेंबर १९४५ रोजी स्थापन करण्यात आलेली संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे. शिक्षण, विज्ञान व संस्कृतीमधील आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगामध्ये शांतता व सुरक्षा कायम करण्याचे कार्य युनेस्को पार पाडते. युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस येथे असून जगभर ५० पेक्षा अधिक कार्यालये आहेत.

७) जागतिक बँक :
(WB : World Bank, वर्ल्ड बँक)
स्थापना : डिसेंबर २७, इ.स. १९४४
मुख्यालय : वॉशिंग्टन डी. सी., अमेरिका
ही एक आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे. हीची स्थापना डिसेंबर २७, इ.स. १९४4 मध्ये झाली. ब्रेटन वुडस् पद्धती (Bretton Woods System)
समितीच्या जागतिक आर्थिक नियंत्रण शिफारशीं वापरण्यात आल्या होत्या. या समिती मध्ये ४५ मित्रराष्ट्रे होती. विकसनशील देश व अविकसित देश यांना विकासासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था असे याचे स्वरूप आहे. या बंकेने पहिले कर्ज फ्रांस या देशाला दिले.
गरीबी दूर करण्यासाठी ही बँक जगभरात विषेश प्रयत्नशील आहे.

> जागतिक बँकेची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत :
✓ सरकारांचे सबलीकरण व सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
✓ अर्थव्यवस्थांचा विकास
✓ भ्रष्टाचार निर्मूलन
✓ गरीबी हटाव
✓ संशोधन व शिक्षण
✓ शिक्षणासाठी जागतिक बँक विषेश परिश्रम घेते. या साठी आंतरजालाधारित प्रशिक्षण व इतर पर्यायांचा उपयोग केला जात आहे.
भारतासहित अनेक देशांना या बँकेने विवीध प्रकल्पासाठी कर्जे दिली आहेत. पैकी भारतातील गुजरात मधील नर्मदा नदी वरील विवादास्पद धरण सरदार सरोवर प्रकल्पाचे कर्ज या बेंकेने प्रकल्पातील धोके दिसून आल्याने परत घेतली आहे.
इ.स. १९९८ सालातल्या मंदीच्या काळात या जागतिक बँकेने मेक्सिको व इंडोनेशिया या देशांना दिलेला सल्ला आर्थीक दॄष्ट्या अतिशय धोक्याचा ठरला आहे.

८) विश्व स्वास्थ्य संस्था :
(WHO : World Health Organization :
स्थापना : ७ एप्रिल, इ.स. १९४८
मुख्यालय : जिनेव्हा, स्वित्झर्लंड
उद्देश्य : आरोग्यविषयक संस्था
ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात सुसंवादाचे कार्य करणारी संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. एप्रिल ७ १९४८ रोजी स्थापन झालेल्या आणि स्वित्झर्लंडमधील जिनिव्हात मुख्यालय असणाऱ्या या संस्थेने एका अर्थी राष्ट्रसंघाचे एक उपांग असणाऱ्या आरोग्य संस्थेचे कार्यच पुढे चालविले आहे.
त्याची चालू अग्रक्रमांमध्ये संसर्गजन्य रोग, विशेषत: एचआयव्ही / एड्स, इबोला, मलेरिया आणि क्षयरोग यांचा समावेश आहे. गैर-संचारीजन्य रोगांचे परिणाम कमी करणे; लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य, विकास आणि वृद्धत्व; पोषण, अन्नसुरक्षा आणि निरोगी खाणे; व्यावसायिक आरोग्य; पदार्थ दुरुपयोग; आणि अहवाल तयार करणे, प्रकाशने आणि नेटवर्किंगचा विकास करणे.
WHO जागतिक आरोग्य अहवालासाठी, जगभरातील जागतिक आरोग्य सर्वेक्षण आणि जागतिक आरोग्य दिन साठी जबाबदार आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेडोरोज अदानाम यांनी 1 जुलै 2017 रोजी पाच वर्षांचा कार्यकाल सुरू केला.

>संयुक्त राष्ट्रे बाल निधी किंवा युनिसेफ
(UNICEF : United Nations Children's Fund) :
स्थापना : डिसेंबर १९४६
मुख्यालय : न्यूयॉर्क शहर
ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. जगभरातील लहान मुलांना अन्न व आरोग्याची सेवा पुरविणे हे युनिसेफचे ध्येय आहे.
7 सप्टेंबर 2006 रोजी, युनिसेफ आणि स्पॅनिश कॅटलान एसोसिएशन फुटबॉल क्लब एफसी बार्सिलोना यांच्यात एक करार करण्यात आला ज्यायोगे क्लबने प्रतिवर्ष 1.5 दशलक्ष युरोंची संस्था पाच वर्षांसाठी दान केली. कराराचा एक भाग म्हणून, एफसी बार्सिलोना त्यांच्या युनिफॉर्मच्या पुढच्या बाजूला युनिसेफ लोगो घालणार आहे. हा फुटबॉल क्लबने एखाद्या संघटनेचे प्रायोजक बनविण्याचा प्रथमच प्रयत्न केला होता. एफसी बार्सिलोनाच्या इतिहासातील पहिल्यांदाच ते त्यांच्या वर्दीच्या समोरच्या दुसर्या संस्थेचे नाव होते.
34 [औद्योगिकीकरण] देशांमध्ये राष्ट्रीय समित्या आहेत, प्रत्येक स्वतंत्र स्थानिक गैर-सरकारी संस्था म्हणून स्थापन झाल्या आहेत. राष्ट्रीय समित्या खासगी क्षेत्रातून निधी उभारतात.
⚫ युनिसेफला स्वैच्छिक योगदान देऊन संपूर्णपणे निधी उपलब्ध केला जातो, आणि राष्ट्रीय समित्या युनिसेफच्या वार्षिक उत्पन्नापैकी एक तृतीयांश वाढ एकत्र करतात. हे जगभर सुमारे 60 लाख वैयक्तिक देणगीदारांसह कंपन्या, नागरी संस्था यांच्या योगदानाच्या माध्यमातून येते.
✔ संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त (UNHCR : United Nations High Commissioner for Refugees)
स्थापना : १४ डिसेंबर १९५०
मुख्यालय : जिनिव्हा
⚫ ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक समिती आहे. ही समिती जगभरातील निर्वासितांचे रक्षण करते. जगात चालणाऱ्या विविध युद्ध, लढाया, संघर्ष इत्यादींमध्ये स्थानिक जनतेला निर्वासित व्हावे लागते. अशा वेळी यजमान देशाच्या अथवा संयुक्त राष्ट्रांच्या विनंतीवरून ही समिती ह्या निर्वासितांसाठी तात्पुरत्या सोयी करते व त्यांना संरक्षण पुरवते. आजवर पॅलेस्टाइन, इराक, अफगाणिस्तान, सीरिया, सुदान, काँगो इत्यादी देशांमध्ये यू.एन.एच.सी.आर.ने कार्य केले आहे. संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त कार्यालयाला आजवर १९५४ व १९८१ ह्या दोन वेळा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे.
⚫ पोर्तुगालचा माजी पंतप्रधान अँतोनियो गुतेरेस २००५ सालापासून संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त पदावर आहे. प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री अँजेलिना जोली संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त समितीची सदिच्छा राजदूत (Goodwill ambassador) आहे.

✔ आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ : International Court of Justice)
स्थापना : १९४५
मुख्यालय : हेग, नेदरलँड्स
⚫ हे संयुक्त राष्ट्रसंघाचे एक अंग आहे. नेदरलँड्समधील हेग ह्या शहरात हे न्यायालय स्थित आहे. आंतरराष्ट्रीय कायदेशीर विवाद व तंटे सोडवणे हे ह्या न्यायालयाचे मुख्य कार्य आहे.
⚫ नेदरलॅंड्स येथील हैग येथील पीस पॅलेसमध्ये बसलेले हे न्यायालय राज्यांद्वारे सादर केलेल्या कायदेशीर विवादांचे निर्धारण करते आणि योग्य आंतरराष्ट्रीय शाखा, एजन्सीज आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंब्लीद्वारे सादर केलेल्या कायदेशीर प्रश्नांवर सल्ला देते.
⚫ खटले निकालात काढताना, आयसीजेच्या कलम 38 नुसार न्यायालयाने आंतरराष्ट्रीय कायदा लागू केला आहे, जो आपल्या निर्णयांवर पोहोचण्यासाठी न्यायालय आंतरराष्ट्रीय अधिवेशन, आंतरराष्ट्रीय प्रथा आणि "सुसंस्कृत राष्ट्रांद्वारे मान्यताप्राप्त कायद्याचे सामान्य तत्त्व" लागू करेल. हे कायदे स्पष्ट करण्यात मदत करण्यासाठी शैक्षणिक लेखन ("विविध राष्ट्रांतील सर्वात उच्च पात्रतेचे जनतेचे शिक्षण") आणि पूर्वीचे न्यायालयीन निर्णय देखील संदर्भित करू शकतात.
⚫ न्यायालयाचा निर्णय त्या विशिष्ट विवादास केवळ पक्षांना बांधतो. 38 (1) (डी) च्या अंतर्गत, तथापि न्यायालय आपल्या स्वतःच्या आधीच्या निर्णयावर विचार करेल.

✔ संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद :
(UNSC : United Nations Security Council) :
स्थापना : इ.स. १९४६
मुख्यालय : सेबास्टियन कार्डी, इटली
⚫ हे संयुक्त राष्ट्रसंघाचे एक मुख्य अंग आहे. सुरक्षा समितीवर जागतिक सुरक्षा व शांतता राखण्याची जबाबदारी आहे.सुरक्षा परिषदेत एकूण पंधरा सभासद राष्ट्रे असतात.अमेरिका,फ
्रान्स,इंग्लैंड, रशिया व चिन हि पाच राष्ट्रे सुरक्षा परिषदेची स्थायी सभासद आहेत.
⚫ दहा अस्थायी सभासद राष्ट्रांची निवड इतर सदस्य राष्ट्रांमधून दोन वर्षासाठी केली जाते.सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सभासदांना नकाराधिकार असतो.स्थायी सभासद राष्ट्रांच्या संमती नाकारण्याच्या अधिकाराला नकाराधिकार म्हणतात.कोणत्या
ही निर्णयात या पाच राष्ट्रांचा होकार असावा लागतो.यांपैकी एकाही राष्ट्राने संमती न दिल्यास निर्णय फेटाळला जातो.
⚫ कार्ये : जागतिक शांतता व सुरक्षिततेची जोपासना करणे, वादग्रस्त आंतरराष्ट्रीय प्रश्नांची चौकशी करणे, आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्याच्या दृष्टीने उपाय सुचवणे, गरज भासल्यास आक्रमक देशाविरुद्ध आर्थिक किंवा लष्करी कारवाई करणे इत्यादी कामे सुरक्षा परिषद पार पाडते.
खालील ५ स्थायी सदस्यांना नकाराधिकार आहेत.
✓ अमेरिका
✓ रशिया
✓ चीन
✓ फ्रान्स
✓ युनायटेड किंग्डम

✔ संयुक्त राष्ट्रे आर्थिक व सामाजिक परिषद :
(UNESC : United Nations Economic and Social Council)
स्थापना : इ.स. १९४५
मुख्यालय : न्यू यॉर्क शहर
⚫ हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुख ६ अंगांपैकी एक आहे. ही परिषद संयुक्त राष्टांच्या १४ महत्त्वाच्या समित्यांच्या आर्थिक व इतर कामकाजांचे सुचालन करते. ५४ सदस्य असलेल्या ह्या परिषदेची सभा दरवर्षी जुलै महिन्यात चार आठवडे चालते.
⚫ जगातील आर्थिक समस्या व धोरणांवर चर्चा करण्यासाठी ही परिषद हा एक प्रमुख मंच आहे. १९९८ सालापासून ह्या परिषदेमार्फत अनेक देशांचे अर्थमंत्री, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक ह्यांदरम्यान संवाद घडवून आणला जातो. सध्याच्या घडीला स्लोव्हाकिया देशाचे राजदूत मिलोस कोतेरेक हे आर्थिक व सामाजिक परिषदेचे प्रमुख आहेत.

✔ संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम
(UNDP : United Nations Development Programme)
स्थापना : इ.स. १९६५
मुख्यालय : न्यू यॉर्क शहर
पालक संस्था : आर्थिक व सामाजिक परिषद
⚫ हे संयुक्त राष्ट्रसंघातर्फे राबविण्यात येणारा एक प्रमुख विकास कार्यक्रम आहे.ह्या कार्यक्रमद्वारे जगातील १७७ देशांमध्ये नागरिकांना राहणीमान सुधारण्याची संधी उपलब्ध केली जाते. हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्रे आमसभेच्या सहा विशेष बोर्डांपैकी एक असून तो आर्थिक व सामाजिक परिषदेच्या अखत्यारीत येतो.
⚫ हा कार्यक्रम संपूर्णपणे सदस्य देशांनी दिलेल्या ऐच्छिक देणग्यांमधून चालवला जातो. दारिद्र्य निर्मुलन, एच.आय.व्ही./एड्स इत्यादी रोगांचे उच्चाटन, लोकशाहीचा प्रसार तसेच मानवी हक्कांसाठी लढा इत्यादी अनेक लोकोपयोगी परियोजना यू.एन.डी.पी.मार्फत चालवल्या जातात.
⚫ रोनाल्डो, झिनेदिन झिदान, मारिया शारापोव्हा इत्यादी लोकप्रिय खेळाडू यू.एन.डी.पी.चा प्रसार करण्यासाठी राजदूत म्हणून नेमले गेले आहेत.

✔ व्यापार आणि विकास संयुक्त राष्ट्रसंघ परिषद :
(UNCTAD : United Nations Conference on Trade and Development) :
स्थापना : १९६४
मुख्यालय : जिनेवा, स्वितझर्लंड
⚫ भागीदारीची पुढाकार
UNCTAD युनायटेड नेशन्स सस्टेनेबल स्टॉक एक्स्चेंज (एसएसई) च्या पुढाकाराने जबाबदार गुंतवणूक तत्त्वांसह, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम वित्त उपक्रम (UNEP-FI), आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या ग्लोबल कॉम्पॅक्ट यांच्या सह-संस्थापक सदस्य आहे.
⚫ व्यापार, गुंतवणूक आणि विकास समस्यांशी संबंधित यूएन नॅशनल जनरल असेंबलीचा मुख्य अंग आहे. संस्थेचे ध्येय म्हणजे: "विकसनशील देशांतील व्यापार, गुंतवणूक आणि विकास संधी वाढवणे आणि त्यांना न्याय्य तत्त्वावर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये एकत्रित करण्याच्या प्रयत्नांमध्ये मदत करणे.

✔ संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती :
(UNHRC : United nation Human Rights council) :
स्थापना : इ.स. २००६
मुख्यालय : जिनिव्हा, स्वितझर्लंड
⚫ ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक समिती आहे. ही समिती जगभर मानवी हक्कांची पायमल्ली थांबवण्याचा प्रयत्न करते. २००६ साली स्थापन झालेल्या ह्या समितीच्या कामावर अनेक वेळा टीका झाली आहे.
19 जून 2007 रोजी पहिली सभा घेतल्यानंतर एक वर्षाने, यूएनएचआरसीने आपला संस्था-उभारणीचा पॅकेज स्वीकारला, जे त्याच्या भविष्यातील कार्यासाठी मार्गदर्शन करण्यास तत्व प्रदान करते. आणखी एक घटक म्हणजे एक सल्लागार समिती आहे जी यूएनएचआरसीच्या थिंक टॅंक म्हणून कार्य करते आणि विषयातील मानवाधिकारांच्य
ा मुद्यांवरील तज्ञ आणि सल्ला प्रदान करते, म्हणजेच, जगाच्या सर्व भागांशी संबंधित मुद्दे. आणखी एक घटक तक्रार तक्रार प्रक्रिया आहे, ज्याद्वारे व्यक्ती आणि संघटना मानवी अधिकार उल्लंघनाबद्दल तक्रारी दाखल करू शकते.
⚫ "मानवाधिकारांच्या हानीचे सर्वच बळी मानवाधिकार परिषदेकडे मंच म्हणून पहायला सक्षम असले पाहिजेत." - बान की मून, संयुक्त राष्ट्र महासचिव, 2007

भारतीय संविधान-मुळ प्रत व काही अपरिचित गोष्टी

भारतीय संविधानाच्या मुळ प्रतीतील शिवराय, राम, कृष्ण, हनुमान आणि इतर…

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने राज्यघटनेचा मसुदा संमत केला आणि २६ जानेवारी १९५० राज्यघटनेचा अंमल सुरु झाला. सुरुवातीला राज्यघटनेची कोणतीही छापील प्रत उपलब्ध नव्हती. दिल्लीच्या प्रेमबिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांनी संविधानाचे इंग्रजी आणि वसंत वैद्य यांनी हिंदी हस्तलिखीत तयार करण्याची जबाबदारी स्विकारली.
प्रेमबिहारी रायजादांनी अत्यंत सुंदर अक्षरात, वळणदार शैलीत राज्यघटनेचे २२ भाग, ३९५ कलमे आणि ८ परिशिष्टे यांचे कॅलिग्राफी काम केले. पहिल्या पानापासुन शेवटच्या पानापर्यंतचे हस्तलेखन अप्रतिम आहे. त्यासाठी त्यांना २५४ पेन आणि ३०३ निब लागल्या. त्यांनी लिहलेल्या प्रास्ताविकाला बिओहर राममनोहर सिन्हा यांनी अत्यंत उत्कृष्ट नक्षीकाम केले. तसेच प्रत्येक पानावर महान चित्रकार नंदलाल यांच्या नेतृत्वाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी चौकटीचे नक्षीकाम केले.
रायजादांचे ते महत्वपुर्ण कार्य पाहुन सरदार पटेल व जवाहरलाल नेहरु त्यांना भेटले आणि त्यांच्या कामाचे मुल्य, खर्च याबद्दल विचारले. तेव्हा रायजादांनी सांगितले की, “मला काहीही पैसे नकोत, फक्त मी हस्तलिखिताच्या प्रत्येक पानाच्या डाव्या कोपऱ्यात माझं छोटंसं हस्ताक्षर PREM लिहतो आणि शेवटच्या पानावर आपलं पुर्ण नाव तसेच चित्रकार नंदलाल बोस यांचे नाव लिहतो.” पटेल आणि नेहरुंनी ते मान्य केले आणि डॉ.राजेंद्रप्रसाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना त्याबद्दल सुचित केले.
महान चित्रकार नंदलाल बोस यांनी मुळ हस्तलिखीत प्रतीच्या प्रत्येक भागाची सुरुवात करताना भारतीय उपखंडाची संस्कृती आणि इतिहास यांना समोर एकुण २२ ठेवुन दृश्ये रेखाटली आहेत. वेगवेगळ्या कालखंडातील बाबींचे प्रातिनिधिक चित्रण त्यात केले आहे. जवळजवळ चार हजार वर्षांच्या समृद्ध ऐतिहासिक परंपरेचा धावता आढावा त्यांनी घेतला आहे. त्यांनी २२१ पृष्ठांना आपल्या कुंचल्यातुन सजवल्याबद्दल त्यांना २१००० रुपये श्रममोबदला देण्यात आला.
नंदलाल बोस यांनी रेखाटलेल्या चित्रांमध्ये मोहेंजोदडो, सिंधु संस्कृतीतील वृषभ, वैदिक काळातील गुरुकुल पद्धती, रामायणातील श्रीराम-लक्ष्मण-सीता-हनुमान, महाभारतातील श्रीकृष्ण-अर्जुन संवाद, गौतम बुद्ध-महावीरांचा तत्वज्ञान प्रचार, सम्राट विक्रमादित्य-अशोकाची न्यायव्यवस्था, मोगल कालखंडातील औरंगजेब, अकबर बादशहा, मराठा कालखंडातील छत्रपती शिवाजी महाराज यांची निवडप्रक्रिया, चोल कांस्य परंपरेतील नटराज मुर्ती याशिवाय गुरु गोविंदसिंह, राणी लक्ष्मीबाई, टिपु सुलतान, गांधीजींची दांडी यात्रा, सुभाषचंद्र बोस, नालंदा विद्यापीठ, भारताचे प्राकृतिक हिमालय, वाळवंट, महासागर घटक अशा बाबींची चित्रे वेगवेगळ्या प्रकरणांच्या सुरुवातीला रेखाटण्यात आली आहेत.
राज्यघटनेच्या विविध प्रकरणात असणाऱ्या मुल्यांशी संबंधित ऐतिहासिक संदर्भ घेऊनच ती चित्रे काढण्यात आली आहेत. उदा.रामराज्यात प्रजा आदर्शवत जीवन जगत होती, त्यांच्यावर कुणाची बंधने नव्हती; म्हणुन मुलभुत हक्कांच्या प्रकरणावर रामाचे चित्र आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला आदर्श क्षत्रियाचे कर्तव्य समजावुन सांगितले, म्हणुन राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणावर श्रीकृष्ण-अर्जुनाच्या संवादाचे चित्र आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात लोकांना त्यांचे गुण, कर्तृत्व बघुन पदे देण्यात आली. छत्रपती शिवरायांनी त्या पदांसाठी योग्य व्यक्तीची निवड केली. त्यामुळे राज्यघटनेतील १५ वे प्रकरण निवडणुका यावर छत्रपती शिवरायांचे चित्र रेखाटले आहे. आपल्या सर्वांसाठी ती अभिमानाची बाब आहे.
राज्यघटनेच्या ११ पानांवर घटना समितीच्या सदस्यांच्या सह्या आहेत. पहिली सही डॉ.राजेंद्रप्रसाद यांची तर शेवटची सही फिरोज गांधी यांची आहे.
भारतीय संविधानाच्या मुळ हस्तलिखीतात श्रीराम, श्रीकृष्ण, हनुमान, बुद्ध, महावीर यांची चित्रे असली तरी त्याला कुठल्या धर्माच्या नजरेतुन पाहिलं गेलं नाही. ही चित्रे सांगतात की भारताचा नवा कायदा हा भारताच्या ऐतिहासिक परंपरा आणि आदर्शांवर टिकुन आहे.
भारतीय संविधानाची मुळ इंग्रजी व हिंदी प्रत सध्या भारतीय संसदेच्या लायब्ररीत हेलियम केसमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहे. प्रेमबिहारी नारायण रायजादा यांच्या हस्तलेखनातुन साकार झालेल्या आणि चित्रकार नंदलाल बोस, बिओहर राममनोहर सिन्हा व शांतिनिकेतनमधील इतर कलाकारांच्या आकर्षक चित्र, नक्षीकामातुन साकार झालेल्या या मुळ प्रतीच्या फोटोलिथोग्राफी (शिलाप्रकाशलेखन) पद्धतीचा वापर करुन “The Survey Of India” च्या डेहराडुन कार्यालयात १००० प्रती तयार करण्यात आल्या. त्यातल्याच एका प्रतीच्या पानांच्या फोटोवरुन तयार केलेली PDF फाईल तुम्ही पुढील लिंक वरुन डाऊनलोड करु शकता.
Courtesey – World Digital Library.

MPSC CSAT Reading Comprehension (वाचन व आकलन काैश्यल्य) याचा अभ्यास कसा करावा ।।राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2018


CSAT चा अभ्यास आज पासुनच करायला हवा. Prelim चा विचार करता CSAT ला ही GS इतकेच महत्व आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून पुर्व परीक्षा clear करणे शक्य नाही.

CSAT साठी पुस्तके -
Reading comprehension (वाचन व लेखन काैशल्य)- हा CSAT चा सर्वात महत्वाचा भाग आहे. पण याकडेच सर्वात जास्त दुर्लक्ष केल जात. यावर साधारणतः ५० प्रश्न असतात (१२५ marks).
यासाठी अजित थाेरबाेले यांच्या CSAT simplified या पुस्तकाचा वापर करावा. त्याचबराेबर Newspaper(Marathi+ English) चे वाचन राेज ठेवावे. तसेच वाचनातील चुका सुधारण्याचा प्रयत्न करावा.(यासाठी विशेष मार्गदर्शन मी पुढे करेलच).

Apti & reasoning साठी अभिनव प्रकाशनच्या पुस्तका पासुन (लेखक- फिराेज पठाण)सुरूवात करावी. त्यानंतर Banking साठी असणारे काेणत्याही पुस्तकांमधुन practice करावी.

📌आकलन घटकाची तयारी

Reading Comprehension (वाचन व आकलन काैश्यल्य) याचा अभ्यास कसा करावा....


वाचन व आकलन याचा अभ्यास काही एका दिवसात हाेणारा अभ्यास नाही. या साठी सततचा सराव हाच एक मार्ग आहे.
वाचन तर आपण अगदी शाळेत पहिल्या वर्गात असल्या पासुन करत आलेलाे आहाेत. परंतु वाचन करण्याच्या काही चुकीच्या पद्धती आपण नकळत अंगीकारताे व त्या तश्याच आपण वापरत राहाताे. त्यामुळे आपला वाचन करण्याचा वेग हा कमी राहाताे व आपला CSAT चा पेपर पुर्ण वाचुनही हाेत नाही.
त्यामुळे सर्वात आधी या चुका काेणत्या ते आपण पाहू...
१. वाचताना बाेलणे- खुप जण हे वाचताना आपण जे काही वाचताे तेच ताेंडाने बाेलून वाचतात. त्यामुळे आपल्या वाचनाचा वेग हा आपल्या बाेलन्याच्या वेगा इतका कमी हाेताे. आपल्या बाेलन्याचा वेग हा कमीच असताे त्यामुळे मग आपन वाचन्यातही मागे पडताे. त्यामुळे वाचताना बाेलण्याची किंवा हळुहळू बडबडण्याची सवय साेडा.

२. वाचताना आेळी वर बाेट किंवा पेन फिरवने- काही जणांना वाचताना त्या आेळीवर बाेट/पेन फिरवीन्यची सवय असते. या सवयी मुळे ही वाचनाचा वेग कमी हाेताे.

३. Regression - ही चुक आपल्यातील बरेच जण करतात. Regression म्हनजे वाचन करताना एकच शब्द, एकच आेळ किंवा एक paragraph परत परत वाचने. असे आपन करताे कारण पहिल्या वेळेस वाचल्यावर ते आपल्याला कळाले नाही असे आपल्याला वाटते. त्यामुळे तेच तेच आपण परत परत वाचत राहाताे. या सवयी मुळे एखादा उतारा वाचण्यासाठी आपल्याला गरजे पेक्षा दिड ते दाेनपट जास्त वेळ लागताे.

४. Word by word वाचने- शाळेपासुनच आपल्याला एक-एक शब्द वेगवेगळा वाचन्याची सवय लागलेली आहे. पण वाचनाचा वेग वाढवायचा असल्यास एक-एक शब्द वेगवेगळा न वाचता meaningful group of words एकदा वाचन्याची सवय लावुन घेने गरजेचे आहे. पण यासाठी खुप सराव करणे गरजेचे आहे.

वरील चुका जर आपण करत असू तर लवकरात लवकर सरावाने त्या सुधारण्याचा प्रयत्न करावा.

शेवटी प्रत्येकाची वाचनाची एक पद्धत असते. व त्या पद्धतीने तुम्ही जर वेगाने वाचू शकत असाल तर त्याच पद्धतीचा वापर करावा.




📌वेळेचे नियोजन -Time management



राज्य सेवा पेपर २ म्हणजे Csat च्या पेपर ला ८० प्रश्न असतात. त्या पैकी साधारणतः ४५ ते ५० प्रश्न हे वाचन व आकलन यावर असतात. त्यात ९ ते १० passages आपल्याला साेडवावे लागतात.



त्यानंतर mathematical aptitude व reasoning यावर साधारणतः २५ प्रश्न असतात. उरलेले ५ प्रश्न हे Decision making चे असतात.



काही जनांचा हा गैरसमज आहे की Csat म्हणजे 'गणित'. पण वरिल माहीती वरून असे लक्षात येते की Csat म्हणजे काही गणित हा विषय नाही. गणित या विषयाचे फार तर १०-१२ प्रश्न या पेपर ला असतात. त्या मुळे गणित कच्चे असले तरी त्याचा काही फार फरक पडत नाही.



Reasoning या विषयात दाेन प्रकार येतात. एक म्हणजे verbal reasoning व दुसरे non verbal reasoning. Verbal reasoning म्हणजे puzzles, blood relationship वरिल प्रश्न, syllogism etc.

Non-verbal reasoning म्हणजे diagram based प्रश्न.



वेळेचे व्यवस्थापन साधारणतः असे करता येईल.


Reading comprehension - प्रत्येक passage ला 7 min या प्रमाने 70 min



Apti & reasoning - 35 min



Decision making - 15 min


यात आपल्या expertise नुसार काही बदल केले जाऊ शकतात. जसे की आपले वाचन आकलन चांगले असेल तर १ तासात ताे विभाग पुर्ण करून आपण त्या नुसार adjustment करू शकताे.

मी स्वतः काय करताे ते पुढच्या लेखात आपण पाहू. तसेच आपण काेणता घटक आधी साेडवायचा व काेणता नंतर ते ही पाहू.


📌RC चे passages येतात काेठुन?

हे passages काेणत्यातरी पुस्तकातुन, वर्तमानपत्रातुन, मासिकातुन, घेतले जातात. हे passages साधारणतः इतिहास, साहित्य, science, पर्यावरण, कृषी या विषयांचे असतात. म्हणजे GS चा अभ्यास हा RC साठी पण उपयाेगी ठरताे.


हे passages २५०-३५० शब्द संख्या या दरम्यान असतात. १० पैकी ८-९ passages हे मराठी व इंग्रजी या दाेन्ही भाषेत दिलेले असतात. म्हणून आपण ज्या भाषेत comfortable आहाेत त्या भाषेत आपण ते साेडवू शकताे. पण प्रत्येक passages हा काेणत्या तरी source मधुन घेताना ताे मराठी किंवा इंग्रजी मध्ये असताे, व ताे correspondingly इंग्रजी किंवा मराठी मध्ये translate करून दाेन्ही भाषांमध्ये आपल्याला दिला जाताे. हे translation खुप वेळेस accurate नसते. त्या मुळे passages साेडवताना आपल्या चुका हाेतात.



त्या टाळण्या साठी आपण काही गाेष्टी करू शकताे, जसे

१. passages चा source आेळखा. म्हणजे ताे passages मराठी source मधुन घेतला आहे की इंग्रजी मधुन ते आेळखुण त्या भाषेत ताे passages वाचा. साधारणतः science, literature, environment, international affairs, या बाबत चे passages इंग्रजी source मधुन घेतले जातात, ते इंग्रजी मध्येच वाचावेत. महाराष्ट्राचा च्या बाबत चे passages, संत परंपरा, कृषी असे passages मराठी source मधुन घेतलेले असतात, ते मराठी तुन वाचावेत. मागील पेपर चा अभ्यास केल्यास आपण सरावाने passage चा source आेळखने शिकू शकताे.


२. passages वाचताना एखादा शब्द किंवा एखाद्या आेळीचा अर्थ न कळाल्यास आपण तेव्हडा भागच दुसर् या भाषेत वाचावा.


वरील पैकी काेणतीही पद्धत आपण वापरू शकताे.

📌Passage Structure decoded -

काेणताही passage हा साधारणतः खालील structure चा असताे.

१. मुख्य मुद्दा - हा उतार् या मधील main idea असते. हा आकलणाच्या दृष्टीने खूप महत्वाची असताे. हा कळाल्या शिवाय उतार् या चे आकलन हाेत नाही. या बाबत hint ही पहिल्या किंवा शेवटच्या paragraph मध्ये साधारणतः असते.

२. पार्श्वभूमी (background) - मुख्य मुद्दा समजण्या साठी दिली जाणारी background information.

3. पुरक माहीती (support) - मुख्य मुद्दा पटवून देण्या साठी दिली जाणारी उदाहरणे. ही आकलना साठी गरजेची असली तरी तसा फारसा उपयाेग या माहीतीचा नसताे. साधारणतः middle paragraphs are मध्ये ही माहीती असते.

४. परिणाम (implications) - मुख्य मुद्द्याचे परिणाम यात दिलेले असतात. साधारणतः शेवटच्या paragraph मध्ये ही माहीती असते. ही माहीती महत्वाची असते.


आता काेणताही passage वाचताना हे मुद्दे आेळखण्याचा प्रयत्न करावा.


सौजन्य : सौरभ जोशी ,मुख्याधिकारी
Join Channel
 www.t.me/mpscguidance

दहावी (SSC) व बारावी (HSC) चं Marksheet & Certificate pdf स्वरूपात मिळवा

तुमचे दहावी (SSC) किंवा बारावी (HSC) चं प्रगतीपुस्तक गहाळ झालाय काय? तुमच्या सर्टिफ़िकेटवर डाग पडलेत का? तर नो टेन्शन आम्ही तुम्हाला काही पर्याय देत आहोत. असं असेल तर आता बोर्डाने तुम्हा-आम्हा सर्वांसाठी आणली आहे एक खास सुविधा ई-मार्क्सशीटची. तुम्ही तुमच्या मार्कशीटचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तपासू शकता आणि एक प्रत PDF स्वरूपात साठवून ठेवू शकता. यासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स…


१) http://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/INDEX.jsphttp://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/INDEX.jsp ही वेबसाईट आपल्या ब्राउझरमध्ये उघडा

२) या साईटवर नाव, फोन नंबर, इमेल आय डी, पासवर्ड टाकून तुमचे खाते बनवा.

३) तुमचे परिक्षेचे वर्ष, परिक्षा क्रमांक, तुम्हाला मिळालेले मार्क भरून तुमचे मार्कशीट मिळवु शकता.

१९९० सालापासूनच्या मार्कशीट्स या साईटवर उपलब्ध आहेत. आपल्या बोर्डाने ही एक चांगली सोय आपल्यासाठी केलेली आहे.
हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा…

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets