Search This Blog

MPSC च्या मोफत तयारीसाठी असलेला एकमेव खात्रीचे ठिकाण


प्रिय,
विद्यार्थी मित्र मैत्रिणींन
सप्रेनमस्कार.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१८ मधील होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक दिलेले आहे.

   राज्यसेवा पूर्व              -     ८ एप्रिल २०१८
  PSI/ASO/STI Combine   -     ६ मे २०१८
Combine Group C   -       १० जून २०१८

सतराचा खतरा संपल्यात जमा आहे. अठराला नशिब चमकवायचे असेल तर या सारखी दुसरी सुवर्ण संधी नाही. तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या यशाची आस बाळगली आहे. तुम्ही अजून होप सोडलेली नसून आपणधिकारी होणारच ! अशी दुर्दम्य इच्छाशक्तीतुमच्या ठायी असेल तर मौका पाहून चौका मारायची ही वेळआत्ता आलेली आहे. फार गंभीर होऊ नका कारण MPSC हे Serious होण्यासाठी नाही तर Sincere होणाऱ्यांसाठी आहे.
नवीन वर्ष लागण्यापूर्वी काय चुका दुरुस्त करायच्या असती त्या करून घ्या कारण आम्ही म्हणजे Team Dnyanjyoti ने 2018 ची संपूर्ण तयारी करून ठेवली आहे.श्री. विशाल पाटील सरांचे संपूर्ण मार्गदर्शन आणि आमचे प्रयत्न तुमच्या सगळ्यांसोबत  असणार आहेत. पुण्यातील अभ्यासाच्या वातावरणाचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्या सगळ्यांनाच इथल्या खास पुणेरी महागाईचा फटका घ्यावाच लागतो. जागेचा मोठा प्रोब्लेम आपल्या सगळ्यांना face करावा लागतो. रूम पाहणे, पार्टनर शोधणे, ब्रोकरेज, डिपोजीट नंतर अव्वाच्या सव्वा भाडे, होस्टेल कॉटबेस मिळाले तर ढेकूण राजाची उपस्थिती/अनुपस्थिती. इतके करून जागा मिळालीच तर खास पुणेरी शब्दातल्या अटी आणि शर्ती या सगळ्यातून जाताना पुण्यात येण्याच्या  उत्साहाची पार अर्धी वात लागून जाते. अडचणींचा हा सिलसिला संपला असे वाटत असेल तर जरा थांबा आत्ता कुठे अडचणी सुरु झाल्यात, राहायची व्यवस्था झाली की दुसरा प्रॉब्लेम येतो भोजनाचा. इथेही अनंत तऱ्हा तुम्हाला पाहायला मिळतात. पुण्यात राहून अभ्यास करणे म्हणजे शरीराच्या पोषणाची पार वाट लागणार हे नक्की. आपली गाडी अजून नवीन असते म्हणून जास्त घसाई दिसत नाही मात्र सततच्या अपुऱ्या पोषणाने शरीराचे होणारे नुकसान पुढच्या आयुष्यात आपला परिणाम दाखवतात. पोटोबाची व्यवस्था झाली की विठोबा आठवतो. आपला विठोबा म्हणजे आपला अभ्यास, त्यासाठी पाहिजे अभ्यासिका. स्टडी रूमचा तर धंदा सध्या सगळ्यात जोरदार चाललाय जेवढे ओरबाडता येईल तेवढे ओरबाडण्याचा प्रयत्न इथेही होतोच. इथला सगळ्यात मोठा issue असून बाकीचं आहे तो class. Class हा Mass साठी नाहीच तो आहे ‘Class’ साठीच. हा क्लास अर्थातच पैसेवाल्यांचा क्लास. एक एका क्लासची फी प्रचंड. शिवाय फी भरूनही खात्री नावाची काही गोष्ट इथे पाहायला मिळणार नाही. शेकडो आणि हजारोंच्या संख्येने विद्यार्थी असलेल्या क्लासला सुरवातीच्या पटामधून शेवटी पात वजा केला तर जो आकडा मिळतो त्याला म्हणतात गळती. गळती हा काही फक्त जिल्हा परिषदांच्या शाळांचाच प्रॉब्लेम नाही तर हजारो लाखोंची फी भारत क्लासला अॅडमिशन घेणाऱ्या मुलांमधली गाती इतकी मोठी असते की प्रश्न पडतो की शेवटपर्यंत प्रामाणिकपणे व मेहनतीने क्लास पूर्ण करायचेच प्रयत्न त्यांना करता येत नाही ते तुम्हाला अधिकारी बनवणार कसे? पण हा मोठा गेम आहे. जो दिखता हे वह होता नही और जो होता है वह दिखता नही बॉस! तभी तो ऐसा चलता है. तर मित्रांनो स्पर्धा परीक्षांच्या बाजारात माहोल हा असं आहे सध्या एकंदर. पण आता मी इथ काही बोलत नाही. तो एक स्वतंत्र विभागच आहे. तर मुल विषय असं आहे की या सगळ्या वादळातून आपल्याला आपली नौका बरोबर पैलतीरी न्यायची आहे. म्हणजे काय की शक्य तेवढ्या लवकर एखादी परीक्षा पास करत कोन्तिहीव एखादी नोकरी तेवढी मिळवायची आहे. अर्थात सन्माननीय अपवाद वगळून; बर का ? नाहीतर उद्याचे भावी अधिकारी आजच माझ्यावर उभा दावा ठोकतील. ते असो, तर हे आपले पुण्यकर्म कसे पूर्ण करायचे? तर त्यासाठीचा प्लॅन मी तुमच्या समोर मांडतोय. पटतेय का पहा. पटला तर पुढे बोलू नाही तर तुम्ही तुमच्या मार्गाने , आम्ही आमच्या.

    तर आम्ही करणार आहोत की, तुमच्या सारख्या हुशार, अभ्यासू, प्रामाणिक विद्यार्थ्यांची निवड करणार आहोत. त्यासाठी आम्ही एक परीक्षा घेणार आहोत. हो हो तीच ती प्रवेश परीक्षा. (ती सध्या काय करते ? असं विचारू नका.) पण आम्ही प्रवेश परीक्षेचे नाटक करणार नाही आहोत, तर खरोखरच प्रवेश परीक्षा घेणार आहोत. पण खरी गंमत तर पुढे आहे. आम्ही या प्रवेश परीक्षेची फी काही ठेवणार  नाही आहोत. आता हे पहा जास्तच वाटत अईल तुम्हांला. कारण तुम्हांला याची सवय नाही. प्रवेश परिक्षेच्या नावावर काही शे रुपये भरायची तुम्हांला सवय झाली आहे. तर असू द्या, तुमचे पैसे तुमच्या कडेच असू द्या, आम्हांला ते नकोत. पण आम्हांला दुसरी एक गोष्ट पाहिजे ती म्हणजे ‘हमीपत्र’. तुम्ही नोकरीला लागल्यानंतर हे पैसे म्हणजे प्रवेश फी नक्की भराल पण प्रवेश फी तुमची नव्हे तर त्यावेळेस आमच्याकडे येणाऱ्या आत्ताच्या तुमच्या सारख्याच कोणत्याही एका विद्यार्थ्यांची. तर हे असं झालं की आम्ही निवडलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण मार्गदर्शन म्हणजेच क्लासरूम कोचिंग, पुस्तके, अभ्यासिका, जेवण, इत्यादी. सर्व सुविधा देऊ अतिशय माफक फी मध्ये. सोबत एका विशिष्ट कालावधीत तुम्हांला यशस्वीपणे प्रशासनात जाता येईल याची हमी पण देणार. नाही गेलात तर अर्थातच तुमची सगळी फी परत अगदी व्याजासकट. आता तुम्ही नक्कीच हल्ला असणार. कारण हे पहिल्यांदाच होतंय आणि आम्ही ते करतोय. कारण आम्हांला आमच्या कामावर “भरोसा” हाय.

  •  आपलाच 
  •  श्री. विशाल भेदुरकर 
  • (वित्त व लेखा अधिकारी)
  • 9975806127 या क्रमांकावर संपर्क करा.No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets