Search This Blog

चालु घडामोडी वन लाईनर्स , २९ जून २०१९


● २९ जून : राष्ट्रीय सांख्यिकी दिन
● संकल्पना २०१९ : “Sustainable Development Goals
● २९ जून : International Day Of The Tropics
● जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा कार्यकाळ ६ महिन्यांसाठी वाढवण्यात आला
● सौदी अरेबियाकडून भारतीयांच्या हज कोट्यात ३० हजारांची वाढ करण्यात आली आहे
● केंद्र सरकार लवकरच “एक देश एक रेशन” कार्ड ही योजना राबवणार
● २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिक आफ्रिकेने श्रीलंकेला ९ गडी राखून पराभूत केले
● ३० जून रोजी इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले
● ‘स्टार्टअप इंडिया’ योजनेंतर्गत गेल्या ४ वर्षात सर्वाधिक ३ हजार ६६१ स्टार्टअप उद्योगांची नोंदणी महाराष्ट्रात झाली
● २८ ते ३० जून दरम्यान १२ वा गोवा मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार
● गोवा मराठी चित्रपट महोत्सवातर्फे दिला जाणारा कृतज्ञता पुरस्कार सुमित्रा भावे यांना प्रदान
● ३ दिवसीय मॉन्सून बीज महोत्सव म्हैसूर, कर्नाटक येथे २८ ते ३० जून दरम्यान आयोजित करण्यात येणार
● रेल्वेत ९ हजार पदांची भरती करण्यात येणार आहे , यामध्ये महिलांसाठी ५०% जागा राखीव
● रामविलास पासवान यांची बिहार विधानसभेतून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली
● बिजू जनता दलाचे अमर पटनायक व सस्मित पात्रा यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली
● इजिप्तसोबत संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने भारताची युद्धनौका आयएनएस “तरकश” इजिप्तमध्ये दाखल
● जम्मू काश्मीरमध्ये भारत-पाक सीमेवर राहणाऱ्या नागरिकांना ३ टक्के आरक्षणाचा प्रस्ताव गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत मांडला
● अमेरिकेने २०१९ फिफा महिला विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला
● भारतीय संघाने एशियन टीम स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला
● कुसानोव्ह मेमोरियल टूर्नामेंट २०१९ मधून द्युती चंदने माघार घेतली
● के. शनमुगम यांची तमिळनाडूचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली
● जे.के. त्रिपाठी यांची तमिळनाडूचे पोलिस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली
● २०१८ मध्ये १.४ दशलक्ष भारतीय पर्यटकांनी अमेरिकेला भेट दिली : अहवाल
● दीप्ती शर्मा किया सुपर लीगमध्ये खेळणारी चौथी भारतीय खेळाडू ठरली आहे
● राष्ट्रीय रँकिंग टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा सोनीपत येथे आयोजित करण्यात आली
● नॅशनल रैंकिंग टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत मानव ठक्कर ने पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले
● नॅशनल रैंकिंग टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत प्राप्ती सेन ने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले
● चिलीने कोलंबियाला ५-४ ने पराभूत करत कोपा अमेरिका स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली
● अर्जेंटिनाने व्हेनेझुएला ला २-० ने पराभूत करत कोपा अमेरिका स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली
● पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुढच्या महिन्यात अमेरिकेला भेट देणार
● भारतीय वंशाच्या प्रिया सेरराव ने “मिस युनिव्हर्स ऑस्ट्रेलिया” किताब पटकावला
● एअरटेलने कोलकाता , पश्चिम बंगाल मध्ये ३ जी नेटवर्क बंद करणार असल्याचे जाहीर केले
● भारताचे परकीय चलन भांडवल जून २०१९ च्या अखेरीस ४२६ अब्ज डॉलर्सवर पोहचले
● सेबॅस्टियन कोय यांची आंतरराष्ट्रीय एथलेटिक्स फेडरेशन संघटनेच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली
● जनरल अॅडम मोहम्मद यांची इथियोपिया आर्मी फोर्सचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली
● सौदी अरेबिया २०२० मध्ये जी-२० शिखर परिषद आयोजित करणार
● रशिया २०२० मध्ये ब्रिक्स संमेलन आयोजित करणार
● महाराजा रणजितसिंह यांच्या १८० व्या पुण्यतिथीनिमित्त लाहोर येथे महाराजा रणजितसिंह यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार
● सेंट पीटर्स युथ सेंटर ओपन हॉकी स्पर्धेत सेंट्रल रेल्वेने महिलांचे विजेतेपद पटकावले
● सेंट पीटर्स युथ सेंटर ओपन हॉकी स्पर्धेत युनियन बँक ऑफ इंडियाने पुरुषांचे विजेतेपद पटकावले
● सरकारने लहान बचत योजनांवरील व्याज दर ०.१ टक्क्यांने कमी केला
● २४ वा युरोपियन युनियन फिल्म महोत्सव २०१९ नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला
● स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाने पालकांना व प्रशिक्षकांना शुटिंग रेंजमध्ये बंदी घालणारा विवादित आदेश मागे घेतला
● भारतातील पहिली शाकाहार परीषद ७ ते ८ जुलै दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार
● आयआयटी कानपूरकडून बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना मानद डॉक्टरेट प्रदान
● हैदराबाद मध्ये २०१९ जागतिक डिझाइन असेंब्ली आयोजित करण्यात येणार
● २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची बैठक अथेन्स शहरात आयोजित करण्यात येणार
● केरळ आरोग्य पर्यटनाचे ७ वे संस्करण कोचीमध्ये ३ ते ४ जुलै दरम्यान आयोजित करण्यात येणार .

Current Affairs – 27/06/2019

एअर स्ट्राईकचे रणनीतीकार सामंत गोयल यांची 'रॉ'च्या प्रमुखपदी निवड

नवी दिल्ली- केंद्र सरकारने 1984 बॅचचे आयपीएस अधिकारी सामंत गोयल यांना रॉ (RAW) चे प्रमुख म्हणून नियुक्त केलं आहे. त्याचसोबत आयपीएस अधिकारी अरविंद कुमार यांची गुप्तचर संस्थेच्या संचालकपदावर नियुक्तीकेली आहे. 
पंजाब कॅडरमधील आयपीएस अधिकारी सामंत गोयल यांनी बालकोट एअर स्टाईकची पूर्ण योजना आखली होती. सामंत गोयल हे विद्यमान रॉ चे प्रमुख अनिल कुमार धस्माना यांच्याकडून पदभार स्वीकारतील. धस्माना निवृत्त होत आहेत.
1990 च्या दशकात पंजाबमध्ये उग्रवाद्यांनी दहशत माजवली होती त्याच्याविरोधात सामंत गोयल यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु केलं होतं. 
तर दुसरीकडे गुप्तचर संस्थेचे नवनियुक्त संचालक अरविंद कुमार हे काश्मीर प्रश्नाचे अभ्यासक आहेत. सध्या ते काश्मीर प्रकरणातील विभागातील विशेष सचिव म्हणून काम पाहतात. सामंत गोयल यांच्याप्रमाणे अरविंद कुमार हे 1984 बॅचमधील आसाम-मेघालय कॅडरमधील आयपीएस अधिकारी आहेत. 

जगातील हाय स्पीड इंटरनेट असलेल्या 10 देशांची यादी जाहीर

1) दक्षिण कोरिया : हाय स्पीड इंटरनेट स्पीड देण्यामध्ये दक्षिण कोरिया सर्वात अग्रस्थानी आहे. 97.5 टक्के 4G इंटरनेट उपलब्ध आहे. युजर्सना 52.4Mbps डाऊनलोड स्पीड मिळतो.
2) नॉर्वे : इंटरनेट स्पीडमध्ये साऊथ कोरियानंतर नॉर्वेचा दुसरा नंबर लागतो. या देशात 48.2Mbps डाऊनलोड इंटरनेट स्पीड आहे.
3) जपान : जपानमध्ये 96.3 टक्के 4G नेटवर्क आहे. तसेच युजर्स 33Mbps डाऊनलोड स्पीड मिळतो.
4) हाँग काँग : हाँग काँगमध्ये डाऊनलोड इंटरनेट स्पीड 16.7Mbps आहे. 4G इंटरनेट 94.1 टक्के आहे.
5) अमेरिका : अमेरिकेमध्ये 21.3Mbps डाऊनलोड इंटरनेट स्पीड आहे. तर 4G उपलब्धता 93 टक्के आहे.
6) नेदरलँड : नेदरलँडमध्ये 4G इंटरनेटची उपलब्धता 92.8 टक्के आहे. युजर्स येथे 42.4Mbps डाऊनलोड इंटरनेट स्पीड मिळतो.
7) तैवान : तैवानमध्ये डाऊनलोड इंटरनेट स्पीड 26.6Mbps आहे. 4G नेटवर्क 92.8 टक्के आहे.
8) हंगेरी : हंगेरीमध्ये 4G नेटवर्क 91.4 टक्के आहे. तर डाऊनलोड इंटरनेट स्पीड 32.7Mbps आहे.
9) स्वीडन : स्वीडनमध्ये 30.8Mbps डाऊनलोड इंटरनेट स्पीड आहे. तर 4G नेटवर्क 91.1 टक्के आहे.
10) भारत : भारतामध्ये डाऊनलोड इंटरनेट स्पीड 6.8Mbps आहे. तसेच 4G नेटवर्क 90.9 टक्के आहे.

इस्रो 5 'कमांडो' सॅटेलाईट सोडणार; सैन्याची ताकद वाढणार

दहशतवाद्यांच्या कॅम्पवर नजर ठेवण्यासाठी इस्रोची तयारी, यामुळे भारतीय सैन्याची ताकद वाढणार.
त्यानुसार पुढील 10 महिन्यांमध्ये ते 8 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडणार आहेत
यातील या 5 उपग्रहांपैकी एक कार्टोसॅट सिरिज आणि 4 रीसॅटचे उपग्रह असून अन्य 3 उपग्रह हे जीसॅट सिरिजमधीलआहेत.
फेब्रुवारी 2020 पर्यंत हे उपग्रह लाँच करण्यात येण्याची शक्यता आहे.
10 महिन्यांमध्ये खालील उपग्रह लॉन्च होणार:
▪ रीसॅट-2बी : मे 2019
▪ कार्टोसॅट-3 : जून 2019
▪ रीसॅट-2बीआर1 : जुलै 2019
▪ जीसॅट-1(न्यू) : सप्टेंबर 2019
▪ रीसॅट-2बीआर 2 : ऑक्टोबर 2019
▪ जीसॅट-2 : नोव्हेंबर 2019
▪ रीसॅट-1ए : नोव्हेंबर 2019
▪ जीसॅट-32 : फेब्रुवारी 2020

महाराष्ट्राचे रचनात्मक (प्राकृतिक) विभाग

1. कोकण किनारपट्टी

 • कोकणाचे भोगौलिक क्षेत्रफळ ३०,३९४ चौ. किमी. आहे.
 • कोकणाचा विस्तार उत्तरेस डहाणूपासून दक्षिणेस वेन्ग्यूर्ल्यापर्यंत पसरला आहे.
 • तसेच उत्तरेस दमनगंगा नदी ते दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत कोकणाचा विस्तार पसरलेला आहे.
 • सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली.
 • कोकणाची लांबी दक्षिणोत्तर ७२० किमी. आहे.
 • पश्चिम घाटामुळे कोकणाची रुंदी सर्वत्र सारखी नाही.
 • कोकणाची सरासरी उंची ३०-६० किमी. आहे.
 • उल्हास नदीच्या खोऱ्यात कोकणाची रुंदी १०० किमी. आहे.
 • कोकणाचा सर्वसाधारण उत्तर पूर्वेकडून – पश्चिमकडे आहे.
 • कोकणाची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची १५ मीटर आहे तर किनाऱ्यापासून पूर्वेकडे २५० मीटर पर्यंत वाढत जाते.
 • खलाटी : पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या सखल भागाला खलाटी म्हणतात.
 • खलाटी हा भाग समुद्रसपाटीपासून कमी उंचीचा आहे.
 • वलाटी : खलाटीच्या पूर्व भागास जो डोंगराळ भट आहे त्यास वलाटी म्हणतात.
 • वलाटी या प्रदेशाची सर्वसाधारण उंची २७५ ते ३०० मीटर पर्यंत आहे.
 • जसजसे सह्याद्रीच्या पायथ्याकडे जावे तशी त्यांची उंची वाढते.
 • कोकणाची किनारपट्टी रिया प्रकारची आहे.
 • कोकणातील खाड्याचा उत्तरेकडून – दक्षिणेकडे क्रम धरमतर – राजापूर – दाभोळ – विजयदुर्ग – तेरेखोल असा आहे.
 • कोकणातील सागरी किल्ले : वसईचा किल्ला, जंजीरा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग
 • महाराष्ट्रात एकूण ४९ बंदरे आहे.
 • कोकणातील बेटे : मुंबई, साष्टी, खांदेरी, उंदेरी, कुट्टे , जंजिरा, घारापुर, अंजनदीव.

2. सह्याद्री पर्वत

 • भारताच्या पश्चिम किनारपट्टीस सह्याद्री पर्वत समांतर पसरला आहे.
 • उत्तरेस सातमाळा डोंगर ते दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत सह्याद्रीचा विस्तार पसरला आहे.
 • सह्याद्रीची लांबी १६०० किमी. आहे त्यापैकी महाराष्ट्रात ४४० किमी. आहे.
 • कोकणाची सरासरी उंची ९१५ ते १२२० मीटर आहे.
 • महाराष्ट्रात सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढते तर दक्षिणेकडे कमी होते.
 • सह्याद्रीचा उतार पश्चिमेकडे तीव्र आहे.
 • सह्याद्री पर्वत वैतरणा व सावित्री नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ कंकणाकृती झालेला आहे.
 • सह्याद्री पर्वतामुळे अरबी समुद्रास मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या तसेच बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्यांचे जलविभाजक वेगवेगळे झाले आहे.
 • घाटमाथा : सह्याद्री पर्वताच्या व त्याच्या शिखरावर उंच व रुंद सपाट प्रदेशाला घाटमाथा म्हणतात.
 •  घाट किंवा खिंड : पर्वत रांगा जेव्हा लांबच – लांब पसरलेल्या असतात तेव्हा त्या उंच, लांब रांगेमध्ये कमी उंचीचा भाग असतो अशा कमी उंचीच्या भागास खिंड म्हणतात.

सह्याद्री पर्वतातील डोंगररांगा

अ) शंभू महादेव डोंगररांगा
 • रायेश्वरापासून शिंगणापूर पर्यंत हि डोंगररांग पसरलेली आहे.
 • या रांगेमुळे भीमा आणि कृष्णा नदीची खोरे वेगळे झाले आहेत.
 • महाराष्ट्र पठावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी शंभूमहादेव डोंगररांग आहे.
 • या रांगेचा विस्तार सातारा व सांगली जिल्ह्यात पसरलेला आहे.
ब) हरिश्चंद्र बालाघाट
 • या डोंगरांगामुळे गोदावरी व भीमा नदीची खोरे वेगळी झाली आहेत.
 • या डोंगरांगाच्या पश्चिम भागास हरिश्चंद्र घाट व पूर्वभागास बालाघाट या नावाने ओळखतात.
 • हि रांग अग्नेयास वळून आंध्रप्रदेशातील हैद्राबाद पर्यंत जाते.
क) सातमाळा अजिंठा डोंगररांग
 • गोदावरी व तापी या नद्या या डोंगररांगेमुळे वेगळी झाली आहेत.
 • नाशिक जिल्ह्यात सातमाळा डोंगररांग आहे.
 • देवगिरी किल्ला, अजिंठा लेणी, या वाघूर नदीच्या वळणाच्या खडकात आहेत.

3. सातपुडा पर्वतरांग

 • या पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे वेगळे झाली आहेत.
 • महाराष्ट्रात सातपुडा पर्वतात नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ हे पठार आढळते. त्यांची उंची १०३६ मी. आहे.
 • या पर्वतातील सर्वोच शिखर अस्तंभ १३२५ मीटर उंचीचे आहे.
 • गाविलगड टेकड्या अमरावती जिल्ह्यात आढळतात.
 • वैराट डोंगराची उंची ११७७ मी. तर चिखलदरा १११५ मी. आहे.
 • महाराष्ट्राच्या उत्तर सरहद्दीजवळ सातपुडा रांग पसरलेली आहे.

4. महाराष्ट्र पठार

 • सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस पसरलेल्या भागास महाराष्ट्र पठार म्हणतात.
 • या पठाराचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे.
 • या पठाराची पूर्व पश्चिम लांबी ७५० किमी. आहे.
 • या पठाराची दक्षिणोत्तर लांबी ७०० किमी. आहे.
 • या पठाराची सर्वसाधारण उंची ४५० किमी आहे.
 • महाराष्ट्राचा ९०% भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापला आहे.
 • या पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उपद्रेकामुळे झाली.
 • लाव्हारपासून महाराष्ट्र पठार तयार झाल्याने त्यास दख्खन लाव्हा असे म्हणतात.

चालु घडामोडी वन लाईनर्स , २० जून २०१९

● २० जून : जागतिक शरणार्थी दिवस
● संकल्पना २०१९ : #StepWithRefugees — Take A Step on World Refugee Day
● श्रीलंकेने आपला पहिला उपग्रह ‘रावण-१’ यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपित केला
● श्रीलंकेच्या ‘रावण-१’ या उपग्रहासोबत जपान व नेपाळचे ‘बर्ड थ्री’ श्रेणीतील प्रत्येकी एक असे दोन उपग्रहही अवकाशात सोडण्यात आले
● ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यात इच्छामरणाच्या तरतुदीचा कायदा मंजूर
● अमेरिकेच्या संरक्षणमंत्रिपदी मार्क एस्पर यांची निवड करण्यात आली
● ‘एक देश, एक निवडणूक’ घेण्याच्या संदर्भात समिती स्थापन केली जाणार आहे
● सर्वात जलद ८ हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा हाशिम आमला दुसरा खेळाडू ठरला आहे
● सलामीवीर शिखर धवन अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे विश्वचषक २०१९ स्पर्धेबाहेर गेला
● जायबंदी शिखर धवनच्या जागी ऋषभ पंतला बदली खेळाडू म्हणून अंतिम १५ खेळाडूंच्या संघात स्थान
● बीसीसीआयने रसिख सलामवर चुकीच जन्म प्रमाणपत्र दाखल केल्याबद्दल २ वर्षाची बंदी घातली
● इंग्लंडमध्ये केन विलियम्सन सर्वात जलद १००० धावांचा टप्पा पार करणारा क्रिकेटपटू ठरला ( १७ डाव )
● पी.यु. चित्रा ने आंतरराष्ट्रीय ग्रां.प्रि. मैदानी स्पर्धेतील १५०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले
● जिन्सन जॉन्सन ने आंतरराष्ट्रीय ग्रां.प्रि. मैदानी स्पर्धेतील १५०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले
● मुरली श्रीशंकर ने आंतरराष्ट्रीय ग्रां.प्रि. स्पर्धेत लांब उडीत सुवर्णपदक पटकावले
● संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे म्हणून वियतनामने भारताला पाठिंबा दिला
● बांगलादेश आणि दक्षिण कोरिया मध्ये डीडी इंडिया प्रसारित करण्यासाठी केंद्र सरकारने करार केला
● दक्षिण कोरिया आणि बांगलादेशची चॅनेल्स आता डीडी फ्री डिश वर प्रसारित होणार
● तेलंगाना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून एस. एस. चौहान यांची नियुक्ती करण्यात आली
● हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून व्ही. रामसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली
● ३१ व्या बीएमडब्ल्यू आंतरराष्ट्रीय ओपन गोल्फ टूर्नामेंट जर्मनीमध्ये आयोजित करण्यात येणार
● दक्षिण कोरियाने ५०००० हजार टन तांदूळ उत्तर कोरियाला दिले
● अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ यांनी आपला श्रीलंका दौरा रद्द केला
● कुवैती अमीर शेख सबाह अल अहमद अल-जहांर अल-सबा इराक दौऱ्यावर आले आहेत
● श्रीलंकेच्या संसदेला चीनने आधुनिक सुरक्षा उपकरणे दान केली
● भारत-संयुक्त राष्ट्र निधीतून पलाऊमध्ये आरोग्य केंद्राच्या पुनर्वसनसाठी १.५ मिलियन डॉलर्स अनुदान देण्यात आले
● एचडीएफसीने १३३६ कोटी रुपयांना अपोलो म्यूनिच हेल्थ इन्शुरन्समधील ५१% हिस्सा विकत घेतला
● रुद्रजित सिंह यांची बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली
● अमेझाॅनने हैदराबादमध्ये भारतातील दुसरे सर्वात मोठे डिलिव्हरी स्टेशन सुरू केले
● बांग्लादेशनंतर त्रिपुरा ४० मेगावॅट विजेचा पुरवठा नेपाळला करीत आहे
● युरोपियन युनियन न्यायालयाने एडिडास चा थ्री-स्ट्रिप ट्रेडमार्क अवैध घोषित केला
● रियल्टी गुंतवणूकीसाठी शीर्ष १० आशियाई शहरांमध्ये बंगळुरू चा समावेश करण्यात आला
● इथियोपियाची राजधानी अदीस अबाबा शहरात मोटारबाईकवर बंदी घालण्यात येणार
● रॉबर्ट मोरेनो यांची स्पेन फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली
● जे मुरली यांची आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले
● आरबीआयने साऊथ इंडियन बँक वर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे १० लाखांचा दंड ठोठावला
● अमिताभ बॅनर्जी यांची भारतीय रेल्वे वित्त महामंडळाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली
● संयुक्त अरब अमीरात व जॉर्डन यांच्या दरम्यान संयुक्त सैन्य अभ्यास “Bonds Of Strength 1” संपन्न
● मंगोलियाचा वार्षिक सैन्य अभ्यास “खान क्वेस्ट २०१९” मध्ये भारत सहभागी झाला
● यू.एस. ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानावर
● यू.एस. ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या यादीत कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर
● यू.एस. ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या यादीत तमिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर
● एनसीईआरटीने चौथा राष्ट्रीय योग ऑलिंपियाड नवी दिल्ली येथे आयोजित केला
● सिक्किमचे अॅडव्होकेट जनरल म्हणून विवेक कोहली यांची नियुक्ती करण्यात आली
● आंतरराष्ट्रीय स्केटिंग संघाचे (आयएसयू) अॅथलीट्स कमिशनचे अध्यक्ष म्हणून डी व्रिज यांची नियुक्ती करण्यात आली
● महानदी कोलफील्ड्स लिमिटेडचे ​​अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून बी एन शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली .

Current Affairs – 21/06/2019

‘फेमिना मिस इंडिया २०१९’ सुमन राव

विजेती :- सुमन राव ( राजस्थान)
फर्स्ट रनर अप (द्वितीय) :- संजना वीज ( तेलंगणा)
बिहारची श्रेया शंकर हिनं ‘मिस इंडिया युनायटेड कॉन्टिनेंट २०१९’ आणि छत्तीसगडच्या शिवानी जाधव हिनं ‘मिस ग्रँड इंडिया २०१९’ चे जेतेपद पटकावले.
७ डिसेंबर रोजी थायलंडच्या पट्टाया येथे होणाऱ्या ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत भारताकडून सुमन राव सहभागी होणार आहे.

कोल्हापूरची शान असलेल्या कोल्हापुरी चपलांना ‘जीआय’ अर्थात ‘भौगोलिक मानांकन’ प्राप्त झाले आहे

त्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. परिणामी, जगभरात कोल्हापुरी चपलाची शान वाढली आहे.
आतापर्यंत देशभरातील ३२६ उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून, महाराष्टतील ३२ उत्पादनांचा यात समावेश आहे.
यांपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापुरी गूळ आणि कोल्हापुरी चप्पल ही दोन उत्पादने आहेत.

मुंबई जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर, दिल्ली चौथ्या स्थानी

जगातील सर्वात जास्त वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांची यादी नुकतीच एका कंपनीने जाहीर केली.
या यादीमधील पहिले नाव मुंबई शहराचे आहे. Apple आणि उबर या कंपन्यांना लोकेशन्स पुरवण्याचे काम करणाऱ्या टॉमटॉम या कंपनीने जगभरातील 56 मोठ्या देशांचा अभ्यास करुन एक अहवाल सादर केला आहे.
जगातील वेगवेगळ्या देशांमधील मोठ्या शहरांमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा किती टक्के अधिक वेळ लागतो हे या अहवालात सांगण्यात आले आहे.
या अहवालानुसार मुंबईमध्ये एका जागेवरुन दुसऱ्या जागी प्रवास करण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा 65 टक्के अधिक वेळ लागतो असे म्हटले आहे.
मुंबई खालोखाल या यादीमध्ये भारतातील दुसरे शहर आहे ते म्हणजे राजधानी दिल्ली.
सर्वाधिक वाहतूक कोंडीच्या जागतिक यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या दिल्लीमध्ये एका जागेवरुन दुसऱ्या जागी प्रवास करण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा 58 टक्के अधिक वेळ लागतो.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets