Search This Blog

‘चंद्रयान-2’ मोहिमेच्या दोन महिला प्रमुख


भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) पहिल्यांदाच दोन महिला शास्त्रज्ञांची एका अंतराळ मोहिमेसाठी प्रमुख म्हणून नेमणूककेली आहे.
रितू करिधल (मिशन डायरेक्टर) आणि मुथैय्या वनिता (प्रकल्प संचालक) ही त्यांची नावे आहेत.
ISRO 15 जुलैला चंद्रयान-2 मोहीम आंध्रप्रदेशाच्या श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केली जाईल.

रितू करिधल▪यांना ‘रॉकेट वूमन ऑफ इंडिया’ असंही म्हटले जाते.
▪त्या मंगळयान मोहिमेच्या म्हणजेच ‘मार्स ऑर्बिटर मिशन’च्या डेप्युटी डायरेक्टरही होत्या.
▪ 2007 साली त्यांना माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते इस्रो यंग सायंटिस्ट पारितोषिक मिळाले.

एम. वनिता▪ यांच्याकडे डिजाईन इंजिनिअरिंगची पदवी आहे.
▪ त्यांना अस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाकडून 2006 साली बेस्ट वुमन सायंटिस्ट पारितोषिक मिळाले आहे.
▪ त्यांनी अनेक वर्ष उपग्रहांवर काम केले आहे.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets