Search This Blog

पृथ्वीच्या अंतरंगाची रचना आणि स्थिती

प्रस्तावना

 • पृथ्वीच्या अंतररंगावरच पृथ्वीच्या पृष्ठभागाची रचना अवलंबून असते.
 • भूउपशास्त्रामध्ये पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास जातो.
 • पृथ्वीचा भूपृष्ठापासून भूकेंद्रापर्यंतचे अंतर ६३७१km आहे.
 • पृथ्वीच्या अंतर्गत भागातील दाब कमी झाल्यामुळे अंतरंगातील घनपदार्थ वितळून सिलारस तयार होतो. हा सिलारस ज्वालामुखीच्या रूपाने भूपृष्ठावर येतो.

पृथ्वीच्या अंतरंगाची रचना

१. शिलावरण (Lithosphere)
 • शिलावरण म्हणजे पृथ्वीच्या सर्वात वरचा बाह्य घनरूप आवरण होय.
 • शिलावरणाची जाडी १६ ते ४० km पर्यंत आहे तर सरासरी जाडी ३३ km मानली गेली आहे.
 • महासागराखाली शिलावरणाची जाडी १० km पेक्षा कमी आढळते.
 • हिमालय, रॉकीसारख्या पर्वतश्रेणीखाली हि जाडी ४० km पेक्षा जास्त आढळते.
 • मैदानी प्रदेशात हि जाडी ३१ km पर्यंत आढळते.
सियालचे दोन प्रकार आहेत
 1. सियाल
 2. सीमा
 
१. सियाल (Sial)
 • भूपृष्ठलगतच्या सर्वात वरच्या घन थरास ‘सियाल ‘ म्हणतात.
 • भूखंड प्रामुख्याने सियालची बनलेली असतात.
 • सियाल मध्ये सिलिका व अल्युमिनियम ही तत्व आढळतात.
 • सियाल थराची घनता २.६५ ते २.७७ एवढी आहे.
 • सियाल थराची भूपृष्ठाखाली जाडी २९km आहे.
 • सियाल ग्रॅनाईटसारख्या अधिसिलिक (acid ) व अवसदि (जलजन्य) खडकापासून बनलेले आहे तर काही ठिकाणी सियाल बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे.
 • सियाल मध्ये प्राथमिक लहरी सेकांदाला ५.६ km वेगाने तर दुय्यम लहरी सेकांदाला ३.२ km वेगाने प्रवास करतात.
कॉनरॅड विलगता (Conrad Discontinuity)
सियाल व सिमा यांची ज्या भागात घनता बदलते त्यास कॉनरॅड विलगता म्हणतात. या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे हा विभाग ठिकठिकाणी वेगवेगळ्या थरावर आढळतो.
२. सिमा (Sima)
 • सियाल थराच्या खालच्या थरास सीमा म्हणतात.
 • सिमा थरात सिलिका व मॅग्नेशियम हि मूलद्रव्य आढळतात.
 • महासागरतळ प्रामुख्याने सीमा थराचे बनलेले असते.
 • सीमा थरात प्रामुख्याने बेसाल्ट खडक आढळते.
 • सीमा थराची जाडी भूखंडाखाली १३ km तर महासागराखाली ३ ते ५ km आहे.
 • सीमा थराची घनता २.८५ ते ३.३ ग्रॅम /घन सें. मी. आहे.
 • सिमा थरात भूकंपाचा प्राथमिक लहरींचा दर सेकंदाला वेग ६ ते ७.२ km आहे.
 • सीमा थरात भूकंपाचा दुय्यम लहरींचा दर सेकंदाला वेग ३ ते ४ km आहे.
Note: सियाल थर सिमा थरावर तरंगते. शिलावरणाचा थर ४२ km चा आहे (सियाल २९ km / सिमा १३ km)

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets