
- केंद्रीय दक्षता आयुक्त के. व्ही. चौधरी यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर 9 जून 2019 रोजी भारत सरकारने दक्षता आयुक्त शरद कुमार यांची प्रभारी केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे.
- ही नियुक्ती 10 जूनपासून प्रभावी झाली आहे आणि पदावर पुढील नियुक्ती होतपर्यंत ते या पदाचा कारभार सांभाळतील.
- भारताचे केंद्रीय दक्षता आयोग (CVC) भारत सरकारच्या विभिन्न विभागांच्या अधिकारी/कर्मचारी यांच्या संबंधित भ्रष्टाचार नियंत्रणाची सर्वोच्च संस्था आहे. याची स्थापना सन 1964 मध्ये झाली. ही कोणत्याही कार्यकारी अधिकारीच्या नियंत्रणापासून मुक्त आहे आणि केंद्र सरकाराच्या अंतर्गत सर्व दक्षता कृतींवर देखरेख ठेवते. आयोगात एक केंद्रीय दक्षता आयुक्त (CVC) आणि दोन दक्षता आयुक्त नियुक्त केले जातात.
No comments:
Post a comment