Search This Blog

भारताचे संविधान

Quick Links

भाग 1 : संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र

कलम 1    : संघराज्याचे नाव आणि भुप्रदेश (राज्यक्षेत्र)
कलम 2    : प्रदेश किंवा नवीन राज्याची निर्मिती
कलम 3    : नवीन राज्य निर्माण करणे आणि अस्तित्वात असलेल्या राज्याचे क्षेत्रफळ, सीमारेषा आणि नाव बदलणे.
कलम 4    : पहिल्या आणि चौथ्या अनुसूचीमध्ये घटनादुरूस्ती करण्यासाठी कलम 2आणि कलम 3अंतर्गत केलेले कायदे

भाग 2 : नागरिकत्व

कलम 5    : राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली त्यावेळचे नागरिकत्व
कलम 6    : पाकीस्थानातून भारतात स्थलांतरित करून आलेल्या विवक्षित व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्क
कलम 7    : पाकीस्थानात स्थलांतरित केलेल्या विवक्षित व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्क
कलम 8    : मूळच्या भारतीय असलेल्या मात्र भारताबाहेर राहणाÚया विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क
कलम 9    : स्वच्छेने परकीय देशाचे नागरिकत्व स्विकारणाÚया व्यक्तींचे भारतीय नागरिकत्व रद्द होणे
कलम 10   : नागरिक हक्कामधील सातत्य चालू राहणे.
कलम 11   : संसद कायदा करून नागरिकत्व हक्कांचे नियंत्रण करू शकते.

भाग 3 : मूलभूत हक्क

कलम 12   : राज्यसंस्थेची व्याख्या
कलम 13   : मुलभूत हक्कांशी विसंगत असलेले किंवा विरोधातील कायदे

समानता हक्क

कलम 14   : कायद्यापुढे समानता
कलम 15   : धर्म, वंश, जात, लिंग, किंवा जन्मस्थळ या आधारावर भेदभाव करण्यास प्रतिबंध
कलम 16   : सार्वजनिक रोजगाराच्या बाबींमध्ये सर्वाना समानता
कलम 17   : अस्पृश्यता निवारण करणे
कलम 18   : किताब नष्ट करणे

स्वातंत्र्याचा हक्क

कलम 19   : अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतचे काही हक्कांचे संरक्षण
कलम 20   : अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण
कलम 21   : जीवित आणि व्यक्तीगत स्वातंत्र्याचे संरक्षण
कलम 21अ  : प्राथमिक शिक्षणाचा हक्क
कलम 22   : ठराविक खटल्यामध्ये अटक आणि स्थानबद्धतेविरोधी संरक्षण
कलम 23   : मानवी अपव्यापार आणि वेठबिगारी यांना प्रतिबंध
कलम 24   : कारखाण्यामध्ये मुलांच्या रोजगाराला प्रतिबंध

धर्मस्वातंत्र्याचा हक्क

कलम 25   : सदसद्विवेकाचे स्वातंत्र्य आणि धर्माचा प्रसार, प्रचार आणि व्यवहाराचे स्वातंत्र्य
कलम 26   : धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य
कलम 27   : एखाद्या विशिष्ट धर्माच्या उत्तेजनासाठी कर देण्याचे स्वातंत्र्य
कलम 28   : ठराविक शिक्षण संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासनांना उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य

सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क

कलम 29   : अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण
कलम 30   : शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्याचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्यांकाचा हक्क
कलम 31   : रद्द केला.
कलम 31 अ :मालमत्ता प्राप्त, ताब्यात घेण्याचे कायदे
          31 ब  : विवक्षित कायद्यांची व विनियमनांची विधिग्राहयता
          31 क : काही मार्गदर्शक तत्वांना परिणामकारकता देणारे कायदे 
          31 ड : रद्द

घटनात्मक उपायांचा हक्क

कलम 32  : आदेश जारी करण्यासह मुलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी उपाय
कलम 33  : सैन्य दलांसाठी अंमलबजावणी करताना मुलभूत हक्कांमध्ये बदल करण्याचा संसदेचा अधिकार
कलम 34  : कोणत्याही प्रदेशात, भागात लष्करी कायदा लागू असल्यास मुलभूत हक्कांवरील निबंध
कलम 35  : मुलभूत हक्कांच्या काही तरतुदींना परिणामकारता देण्यासाठी कायदे.

भाग 4 : राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे

कलम 36  : राज्यसंस्थेची व्याख्या
कलम 37  : मार्गदर्शक तत्वांचे उपयोजन
कलम 38  : राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे.
कलम 39  : राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विवक्षित तत्वे
कलम 39अ : समान न्याय व मोफत कायदेशीर सहाय्य यांची तरतूद
कलम 40  : ग्रामपंचायतीचे संघटन
कलम 41  : कामाचा, शिक्षणाचा आणि विवक्षीत बाबतीत लोकसाहयाचा हक्क
कलम 42  : कामाच्या ठिकाणी रास्त आणि मानवी परिस्थिती आणि प्रसूतीविषयक सहाय्य यांची तरतूद
कलम 43अ : उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग
कलम 43ब : सहकारी संस्थेचे प्रवर्तन
कलम 44  : नागरिकासाठी समान नागरी कायदा
कलम 45  : 6 वर्षाखालील मुलांच्या बालसंगोपनाची आणि शिक्षणाची तरतूद
कलम 46  : अनुसूचित जाती, जमाती आणि इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना चालना देणे.
कलम 47  : पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य
कलम 48  : शेती आणि पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे.
कलम 48अ : पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन आणि वन व जंगली प्राणी, जीवांचे संरक्षण करणे.
कलम 49  : राष्ट्रीयदृष्टया महत्वाची स्मारके, ठिकाणे आणि वस्तू यांचे संरक्षण
कलम 50  : कार्यकारी यंत्रणेपासून न्यायव्यवस्था विभक्त ठेवणे.
कलम 51  : आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन

भाग 4 अ : मुलभूत कर्तव्य

कलम 51अ : मुलभूत कर्तव्य

भाग 5 : संघराज्य

राष्ट्रपती व उपराष्ट्रपती

कलम 52  : भारताचे राष्ट्रपती
कलम 53  : संघशासनाचे कार्यकारी अधिकार
कलम 54  : राष्ट्रपतीची निवडणूक
कलम 55  : राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीची पद्धत
कलम 56  : राष्ट्रपतीचा कार्यकाळ
कलम 57  : राष्ट्रपतीच्या पुनर्निवडणुकीस पात्रता
कलम 58  : राष्ट्रपती पदासाठी पात्रता
कलम 59  : राष्ट्रपतीच्या शर्ती
कलम 60  : राष्ट्रपती पदाची शपथ
कलम 61  : राष्ट्रपतीवरील महाभियोगाची कार्यपद्धती
कलम 62  : रिक्त झालेल्या राष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्याचा कालावधी आणि हंगामी रिक्तता पूर्ण करण्यासाठी    निवडलेल्या व्यक्तीची पदाचा कार्यकाळ
कलम 63  : भारताचे उपराष्ट्रपती
कलम 64  : भारताचा उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असणे.
कलम 66  : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक
कलम 67  : उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ
कलम 68  : रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्याचा कालावधी आणि हंगामी रिक्तता पूर्ण करण्यासाठी निवडलेल्या व्यक्तीच्या पदाचा कार्यकाळ
कलम 69  : उपराष्ट्रपती पदाची शपथ
कलम 70  : इतर आकस्मीक परिस्थितीमध्ये राष्ट्रपतीचे कार्य पार पाडणे.
कलम 71  : राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींच्या निवडणूकीसंबंधी विषय
कलम 72  : राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार
कलम 73  : संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती

मंत्रिपरिषद

कलम 74  : राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रीपरिषद
कलम 75  : मंत्र्यासंबंधी अन्य तरतूदी

भारताचा महान्यायवादी

कलम 76  : भारताचा महान्यायवादी

सरकारी कामकाज चालवणे

कलम 77  : भारत सरकारचे कामकाज चालवणे
कलम 78  : राष्ट्रपतीस माहिती देण्यासंदर्भातील पंतप्रधानाचे कर्तव्य

संसद

कलम 79  : संसदेची रचना
कलम 80  : राज्यसभेची रचना
कलम 81  : लोकसभेची रचना
कलम 82  : प्रत्येक जनगणनेनंतर “मतदारसंघाची पुनर्रचना”
कलम 83  : संसदेच्या सभाग्रहाचा कालावधी
कलम 84  : संसद सदस्यासाठी पात्रता
कलम 85  : संसदेची अधिवेशन, बैठक पूढे ढकलणे आणि बरखास्ती
कलम 86  : अभिभाषण करण्याचा आणि सभागृहांना संदेश पाठवण्याचा राष्ट्रपतींचा हक्क
कलम 87  : राष्ट्रपतीचे विशेष अभिभाषण
कलम 88  : सभागृहांबाबत मंत्र्याचा आणि महान्यायवादी न्यायप्रतिनिधींचा हक्क

संसदेचे पिठासण अधिकार

कलम 89  : राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष
कलम 90  : उपाध्यक्षाचे पद रिक्त, राजीनामा आणि बडतर्फी
कलम 91  : अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचे अधिकार आणि कर्तव्य
कलम 92  : बडतर्फीचा ठराव विचाराधीन असताना अध्यक्ष वा उपाध्यक्षाने सभाग्रहाचे अध्यक्षस्थान भूषवणे.
कलम 93  : लोकसभेचा सभापती आणि उपसभापती
कलम 94  : सभापती, उपसभापती पदाची रिक्तता, राजीनामा आणि बडतर्फी
कलम 95  : सभापती आणि उपसभापतींचे अधिकार व कार्य
कलम 96  : बडतर्फीचा ठराव विचाराधीन असताना सभापती व उपसभापतीने अध्यक्षस्थान न भूषवणे.
कलम 97  : अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती, उपसभापती, उपसभापती यांचे वेतन आणि भत्ते
कलम 98  : संसदेचे सचिवालय​

कामकाज चालवणे

कलम 99  : सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे.
कलम 100 : सभागृहांमधील मतदान, जागा रिक्त असतानाही कार्य करण्याचा सभागृहांचा अधिकार व गणपूर्ती

सदस्यांची अपात्रता

कलम 101 : जागा रिक्त करणे
कलम 102 : सदस्यांची अपात्रता
कलम 103 : सदस्यांच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नावर निर्णय
कलम 104 : कलम 99 अन्वये शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी अथवा पात्र नसताना अथवा अपात्र झाल्यावर स्थानापन्न होण्याबाबत व मतदान करण्याबद्दल शास्ती.

संसद व तिचे सदस्य यांचे अधिकार, विशेषाधिकार व उन्मुक्ती

कलम 105 : संसदेची सभागृहे आणि त्यांचे सदस्य व समित्या यांचे अधिकार, विशेषधिकार इत्यादी.
कलम 106 : सदस्याचे वेतन व भत्ते

कार्यपद्धती

कलम 107 : विधेयक सादर आणि संमती करण्याविषयी तरतूद
कलम 108 : ठराविक प्रकरणामध्ये दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक
कलम 109 : धनविधेयकाबाबत विशेष कार्यपद्धती
कलम 110 : धनविधेयकाची व्याख्या
कलम 111 : विधेयकाला मंजुरी

वित्तीय बाबीमधील तरतूद

कलम 112 : वार्षिक वित्तीय विधेयक (अंदाजपत्रक)
कलम 113 : अंदाजपत्रकाबाबत संसदेतील कार्यपद्धती
कलम 114 : विनियोजन विधेयक
कलम 115 : पूरक, अतिरिक्त किंवा अधिक अनुदान
कलम 116 : लेखानुदाने, प्रत्ययानुदाने व अपवादात्मक अनुदाने
कलम 117 : वित्तिय विधेयकाबाबत विशेष तरतूदी
कलम 118 : कार्यपद्धतीचे नियम
कलम 119 : वित्तिय कामकाजासंबंधी संसदेच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे नियमन
कलम 120 : संसदेमध्ये वापरावयाची भाषा
कलम 121 : संसदेमधील चर्चेवर मर्यादा
कलम 122 : संसदेच्या कार्यपद्धतीबाबत न्यायालय चौकशी करू शकत नाही.
कलम 123 : संसदेच्या विरामकाळात अध्यादेश काढण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार

सर्वोच्च न्यायालय

कलम 124 : सर्वोच्च न्यायालय स्थापना आणि घटना
कलम 125 : न्यायाधिशाचे वेतन वगैरे
कलम 126 : हंगामी मुख्य न्यायधीशाची नियुक्ती
कलम 127 : तर्द्थ न्यायधीशांची नियुक्ती
कलम 128 : सर्वोच्च न्यायालयांच्या बैठकींना सेवानिवृत्त न्यायधीशाची उपस्थिती
कलम 129 : सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असणे.
कलम 130 : सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान (आसन)
कलम 131 : सर्वोच्च न्यायालयाचे प्रांरभिक अधिकार क्षेत्र
कलम 131अ : (रद्द)
कलम 132 : विशिष्ट खटल्यामध्ये उच्च न्यायालयाकडून आलेल्या अपिलाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अपीलाचे अधिकारक्षेत्र
कलम 133 : दिवाणी प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाकडून आलेल्या अपीलाबाबत सर्वाच्च न्यायालयाचे अपील अधिकारक्षेत्र
कलम 134 : फौजदारी खटल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अपीलाचे अधिकारक्षेत्र
कलम 134अ : सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करण्यासाठी प्रमाणपत्र
कलम 135 : अस्तित्वात असलेल्या कायद्यांतर्गत संघ न्यायालयाचे अधिकारक्षे़त्र आणि अधिकार जे सर्वोच्च न्यायालयाला उपयोगात आणता येतात.
कलम 136 : सर्वोच्च न्यायालयाद्वारे अपीलाची विशेष परवानगी.
कलम 137 : सर्वोच्च न्यायालयाकडून निकालपत्र किंवा आदेशांचे पुनर्परीक्षण
कलम 138 : सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राचा विस्तार
कलम 139 : विशेष आदेश जारी करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार
कलम 139अ : विशिष्ट प्रकरणात हस्तांतरण
कलम 140 : सर्वोच्च न्यायालयाचे दुय्यम अधिकार
कलम 141 : सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा सर्व न्यायालयांवर बंधनकारक असणे.
कलम 142 : सर्वोच्च न्यायालयाच्या हुकुमणाम्याची आणि आदेशांची अंमलबजावणी
कलम 143 : सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार
कलम 144 : सर्वोच्च न्यायालयाच्या साहाय्यासाठी नागरी आणि न्यायिक अधिकाऱ्यांची कृती
कलम 144अ : रद्द केले.
कलम 145 : न्यायालयाचे नियम, इत्यादी
कलम 146 : सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि खर्च.
कलम 147 : अर्थ लावणे

भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक

कलम 148 : भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक
कलम 149 : नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाची कर्तव्य आणि अधिकार
कलम 150 : संघ आणि राज्यांच्या लेख्याचे स्वरूप
कलम 151 : लेखा अहवाल

भाग 6 : राज्ये

कलम 152 : राज्याची व्याख्या
कलम 153 : राज्यांचे राज्यपाल
कलम 154 : राज्याचे कार्यकारी अधिकार
कलम 155 : राज्यपालाची नियूक्ती
कलम 156 : राज्यपालाचा पदावधी
कलम 157 : राज्यपाल पदावर नियूक्तीसाठी पात्रता
कलम 158 : राज्यपाल पदाच्या शर्ती
कलम 159 : राज्यपाल पदाची शपथ
कलम 160 : विशिष्ट परिस्थितीमध्ये पार पाडावयाची राज्यपालाची कार्य
कलम 161 : राज्यपालांचा दयेचा अधिकार
कलम 162 : राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती

मंत्रिपरिषद

कलम 163 : राज्यपालास सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ
कलम 164 : मंत्र्यासंबंधी इतर तरतूदी
कलम 165 : राज्याचा महाधिवक्ता

सरकारी कामकाज चालवणे

कलम 166 : राज्य शासनाच्या व्यवहारांचे कर्तव्य
कलम 167 : राज्यपालांना माहिती देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य

राज्यविधीमंडळ

कलम 168 : राज्यामधील विधीमंडळाची रचना
कलम 169 : राज्यांमध्ये विधानपरिषद निर्माण वा रद्द करणे
कलम 170 : विधानसभांची रचना
कलम 171 : विधान परिषदांची रचना
कलम 172 : राज्य विधीमंडळाचा कालावधी
कलम 173 : राज्य विधीमंडळाच्या सदस्यत्वासाठी पात्रता
कलम 174 : राज्य विधीमंडळाची अधिवेशन, बैठक पुढे ढकलणे आणि बरखास्ती.
कलम 175 : विधीमंडळाच्या सभागृहापुढे भाषण करण्याचा आणि संदेश पाठवण्याचा राज्यपालाचा हक्क.
कलम 176 : राज्यपालाचे विशेष अभिभाषण
कलम 177 : सभाग्रहामध्ये मंत्री आणि महाधिवक्ता यांचे हक्क.

राज्य विधीमंडळाचे पिठासन अधिकारी

कलम 178 : विधानसभेचा सभापती आणि उपसभापती
कलम 179 : सभापती आणि उपसभापती पदांची रिक्तता, राजीनामा आणि बडतर्फी
कलम 180 : सभापती म्हणून कर्तव्य पार पाडण्यासाठी उपसभापती आणि इतर व्यक्तीला असलेले अधिकार
कलम 181 : सभापती व उपसभापती यांना पदावरून दुर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्यांने अध्यक्षस्थान स्विकारणे.
कलम 182 : विधान परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष
कलम 183 : अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची रिक्तता राजीनामा वा बडतर्फी
कलम 184 : अध्यक्ष म्हणून कृती व कर्तव्य पार पाडण्यासाठी उपाध्यक्ष व एखाद्या व्यक्तीला असलेले अधिकार
कलम 185 : अध्यक्ष व उपाध्यक्षास पदावरून दुर करण्याचा ठराव विचारात असताना त्याने अध्यक्षस्थान न स्विकारणे.
कलम 186 : अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती, उपसभापती यांचे वेतन व भत्ते
कलम 187 : राज्य विधीमंडळाचे सचिवालय
कलम 188 : सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे
कलम 189 : सभागृहामध्ये मतदान, रिक्तता आणि गणसंख्येची अडचण न ठेवता सभागृहांचा अधिकार
कलम 190 : पदाची रिक्तता
कलम 191 : सदस्यत्वासाठी अपात्रता
कलम 192 : सदस्याच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नांवर निर्णय
कलम 193 : कलम 188 अन्वये शपथघेण्यापूर्वी वा पात्र नसताना वा अपात्र घोषितकेल्यानंतर बैठक आणि मतदान केल्यास शिक्षा

राज्य विधानमंडळे व त्यांचे सदस्य यांचे अधिकार, विशेषाधिकार व उन्मुक्ती

कलम 194 : राज्यविधीमंडळाचे सभागृह सदस्य आणि समित्याचे अधिकार आणि विशेषाधिकार
कलम 195 : सदस्याचे वेतन व भत्ते.

कायदेकारी कार्यपद्धती

कलम 196 : विधेयक सादर आणि संमत करण्याच्या तरतूदी
कलम 197 : धनविधेयक सोडून इतर विधेयकाबाबत विधान परिषदेच्या अधिकारावर मर्यादा
कलम 198 : धन विधेयकाबाबत विशेष कार्यपद्धती
कलम 199 : धनविधेयकाची व्याख्या
कलम 200 : विधेयकाला संमती
कलम 201 : राष्ट्रपतीच्या विचारार्थ विधेयक राखून ठेवणे.

वित्तीय बाबीविषयक तरतूद

कलम 202 : वार्षिक वित्तीय विधेयक (अंदाजपत्रक)
कलम 203 : अंदाजपत्रकाबाबत विधानमंडळातील कार्यपद्धती.
कलम 204 : विनियोजक विधेयके
कलम 205 : पूरक, अतिरिक्त वा अधिक अनुदान.
कलम 206 : लेखानुदाने, प्रत्ययानुदाने व अपवादात्मक अनुदाने.
कलम 207 : वित्तीय विधेयकासंबंधी विशेष तरतूदी

सर्वसाधारण कार्यपद्धती

कलम 208 : कार्यपद्धतीचे नियम
कलम 209 : वित्तिय व्यवहाराबाबत राज्यविधीमंडळातील कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे नियमन
कलम 210 : विधीमंडळात वापरावयाची भाषा
कलम 211 : विधीमंडळातील चर्चेवर मर्यादा, बंधन
कलम 212 : विधीमंडळाच्या कार्यपद्धतीबाबत न्यायालयाला चौकशी करता येत नाही.

राज्यपालाचे कायदेकारी अधिकार

कलम 213 : विधीमंडळाच्या विश्रांतीकाळात वटहुकुम जारी करण्याचा राज्यपालाचा अधिकार

राज्यामधील उच्च न्यायालये

कलम 214 : राज्यासाठी उच्च न्यायालये
कलम 215 : उच्च न्यायालये अभिलेख न्यायालये असणे
कलम 216 : उच्च न्यायालये स्थापन करणे
कलम 217 : उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशाची नियुक्ती व त्या पदाच्या शर्ती
कलम 218 : सर्वोच्च न्यायालयासंबंधीच्या विशिष्ट तरतूदी उच्च न्यायालयांना लागू असणे.
कलम 219 : उच्च न्यायालयांच्या न्यायाधिशांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे
कलम 220 : स्थायी न्यायाधिश झाल्यानंतर व्यवसायावर निर्बंध
कलम 221 : न्यायाधिशाची वेतन वगैरे.
कलम 222 : न्यायाधिशाची एका उच्च न्यायालयातून दुसÚया उच्च न्यायालयात बदली
कलम 223 : हंगामी मुख्य न्यायाधिशाची नियुक्ती
कलम 224 : अतिरिक्त व हंगामी न्यायाधिशाची नियुक्ती
कलम 224अ : उच्च न्यायालयाच्या न्यायपीठामध्ये निवृत्त न्यायाधिशाची नियुक्ती.
कलम 225 : उच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र
कलम 226 : प्राधिलेख काढण्याचे उच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र
कलम 226अ : (रद्द)
कलम 227 : उच्च न्यायालयाचे सर्व न्यायालयावर पर्यवेक्षण करण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार
कलम 228 : विशिष्ट खटले उच्च न्यायालयाकडे हस्तांतरीत करणे
कलम 228अ : रद्द केले.
कलम 229 : उच्च न्यायालयाचे अधिकारी व सेवक आणि खर्च
कलम 230 : उच्च न्यायालयाचे केंद्रशासित प्रदेशावर विस्तार करणे.
कलम 231 : दोन वा अधिक घटकराज्यासाठी सामाईक उच्च न्यायालयाची स्थापना करणे.
कलम 232 : अर्थ लावणे (रद्द)

दुय्यम न्यायालये

कलम 233 : जिल्हा न्यायाधिशाची नियूक्ती
कलम 233अ : विशिष्ट जिल्हा न्यायाधिशांच्या नियुक्तीची वैधता आणि दिलेल्या निवाडयाची वैधता.
कलम 234 : जिल्हा न्यायाधिशांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींची न्यायिक सेवेतील भरती
कलम 235 : दुय्यम न्यायालयांवरील नियंत्रण
कलम 236 : अर्थ लावणे
कलम 237 : दंडाधिकाऱ्यांच्या विवक्षित वर्गाला किंवा वर्गांना या प्रकरणाच्या तरतूदी लागू असणे.

भाग 7 : पहिल्या अनुसूचीच्या भाग B मधील राज्ये

कलम 238 : (रद्द)

भाग 8 : केंद्रशासित प्रदेश (संघ राज्यक्षेत्र)

कलम 239 : केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासन
कलम 239अ : विशिष्ट केंद्रशासित प्रदेशासाठी स्थानिक विधीमंडळ व मंत्रिमंडळ किंवा दोन्ही निर्माण करणे.
    कलम 239अ-अ : दिल्लीच्या बाबतीत विशेष तरतूद
    कलम 239अ-ब : घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्यासंदर्भात तरतूदी
कलम 239 ब : विधीमंडळाच्या विरामकाळात अध्यादेश काढण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार
कलम 240 : विशिष्ट केंद्रशासित प्रदेशासाठी कायदे करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार
कलम 241 : केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालये
कलम 242 : (रद्द)

भाग 9 : पंचायती

कलम 243 : व्याख्या
कलम 243A : ग्रामसभा
कलम 243B : पंचायतीची घडण (गठीत करणे)
कलम 243C : पंचायतीची रचना
कलम 243D : जागांचे आरक्षण
कलम 243E : पंचायतीचा कालावधी इत्यादी
कलम 243F : सदस्यत्वाबाबत अपात्रता
कलम 243G : पंचायतीचे अधिकार, सत्ता आणि जबाबदारी
कलम 243H : पंचायतीचे कर लादण्याचा अधिकार
कलम 243I : वित्तीय स्थितीचे पुनर्विलोकन करण्यासाठी वित्त आयोगाची स्थापना
कलम 243J : पंचायतीच्या लेख्याचे परिक्षण
कलम 243K : पंचायतीच्या निवडणूका
कलम 243L : केंद्रशासित प्रदेशाकरिता उपयोजन
कलम 243M : विशिष्ट क्षेत्रांना लागू नसलेला भाग
कलम 243N : अस्तित्वात असलेल्या कायद्यांचे सातत्य आणि पंचायती
कलम 243O : निवडणूक विषयांमध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपास बंदी

भाग 9 A : नगरपालिका

कलम 243P : व्याख्या
कलम 243Q : नगरपालिकांची स्थापना
कलम 243R : नगरपालिकांची रचना
कलम 243S : प्रभाग समित्यांची स्थापना आणि रचना
कलम 243T : जागांचे आरक्षण
कलम 243U : नगरपालिकांचा कालावधी
कलम 243V : सदस्यांची अपात्रता
कलम 243W : नगरपालिकांचे अधिकार, सत्ता आणि जबाबदारी
कलम 243X : नगरपालिकांचे कर लादण्याचा अधिकार आणि नगरपालिकांचे निधी
कलम 243Y : वित्त आयोग
कलम 243Z : नगरपालिकांच्या लेख्यांचे परिक्षण
कलम 243ZA : नगरपालिकांच्या निवडणूका
कलम 243ZB : केंद्रशासित प्रदेशांना लागू असणे
कलम 243ZC : विवक्षित क्षेत्रांना हा भाग लागू नसणे.
कलम 243ZD : जिल्हा नियोजन समिती
कलम 243ZE : महाराष्ट्र नियोजन समिती
कलम 243ZF : विद्यमान कायदे व नगरपालिका अस्तित्वात राहणे
कलम 243ZG : निवडणूकीसंबंधीच्या बाबीमध्ये न्यायालयीन हस्तक्षेप करण्यास मनाई

भाग 9 B : सहकारी संस्था

कलम 243ZH  : व्याख्या
कलम 243ZI  : सहकारी संस्थांचे विस्थापन
कलम 243ZJ  : मंडळाच्या सदस्याची व त्याच्या पदाधिकाऱ्यांची संस्था व त्याचा पदावधी
कलम 243ZK  : मंडळाच्या सदस्याची निवडणूक
कलम 243ZL  : मंडळाचे निष्प्रभावन व निलंबन आणि अंतरिम व्यवस्थापन
कलम 243ZM  : सहकारी संस्थेच्या लेख्यांचे लेखापरिक्षण
कलम 243ZN  : सर्वसदस्य मंडळाची सभा बोलावणे.
कलम 243ZO  : सदस्याची माहिती मिळवण्याचा अधिकार
कलम 243ZP  : विवरणे
कलम 243ZQ  : अपराध व शास्ती
कलम 243ZR  : बहुराज्यीय सहकारी संस्थांना लागू असणे.
कलम 243ZS  : केंद्रशासित प्रदेशांना लागू असणे.
कलम 243ZT  : विद्यमान कायदे पुढे चालू राहणे.

भाग 10 : अनुसूचित क्षेत्र व आदिवासी क्षेत्र

कलम 244 : अनुसूचित प्रदेश आणि आदिवासी प्रदेशांचे प्रशासन
कलम 244अ : आसाममधील विशिष्ट आदिवासी प्रदेशासहित स्वायत्त राज्याची निर्मिती आणि त्यासाठी स्थानिक विधिमंडळ    वा मंत्रीमंडळ वा दोन्हींची निर्मिती करणे.

भाग 11 : संघराज्य आणि राज्ये यामधील संबंध

कलम 245 : संसद आणि राज्य विधीमंडळांनी केलेल्या कायद्यांचा विस्तार
कलम 246 : संसद आणि राज्य विधीमंडळांनी केलेल्या कायद्यांचे विषय
कलम 247 : विशिष्ट अतिरिक्त न्यायालयांची स्थापना करण्याचे संसदेचे अधिकार
कलम 248 : कायदा करण्याचे शोषधिकार
कलम 249 : राज्यसभेच्या ठरावाद्वारा राष्ट्रीय हितासाठी राज्यसुचीतील विषयावर कायदा करण्याचा संसदेचा अधिकार
कलम 250 : आणीबाणी लागू असताना राज्यसुचीतील कोणत्याही विषयाबाबत कायदा करण्याचा संसदेचा अधिकार 
कलम 251 : संसदेने कलम 249 आणि 250 अंतर्गत केलेले कायदे आणि राज्यांच्या विधानमंडळानी केलेले कायदे यामधील विसंगती
कलम 252 : दोन वा अधिक घटकराज्याच्या संमतीने त्या राज्यांसाठी कायदा करण्याचा संसदेचा अधिकार आणि असा कायदा इतर घटकराज्यांनी स्वीकारणे.
कलम 253 : आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी करण्याकरीता कायदे.
कलम 254 : संसदेने केलेला कायदा आणि राज्यविधीमंडळाने केलेल्या कायद्यामध्ये सुसंगती असणे.
कलम 255 : शिफारशीची आवश्यकता आणि मागील मान्यता यांना केवळ कार्यपद्धती मानले जाईल.

केंद्र राज्य प्रशासकीय संबंध

कलम 256 : संघ आणि राज्याचे दायित्व
कलम 257 : ठराविक प्रकरणामध्ये संघाचे राज्यावरील नियंत्रण
कलम 258 : विशिष्ट प्रकरणामध्ये राज्यांना अधिकार वगैरे बहाल करण्याचा केद्रांचा अधिकार
कलम 258अ : संघराज्याकडे कार्य सोपवण्याचा राज्यांचा अधिकार
कलम 259 : रद्द केले.
कलम 260 : भारताबाहेरील भुप्रदेशाबाबत केंद्राचे अधिकारक्षेत्र
कलम 261 : सार्वजनिक कायदे, अभिलेख आणि न्यायालयीन कार्यपद्धती
कलम 262 : आंतर – राज्य नदीजल वाटप किंवा नद्यांच्या खोऱ्यांसंदर्भातील विवादांचा न्यायनिवाडा
कलम 263 : आंतरराज्यीय परिषेदेबाबतच्या तरतूदी.

भाग 12 : वित्त, मालमत्ता, संविदा आणि दावे

केंद्र राज्यामधील वित्तीय संबंध

कलम 264 : अर्थ लावणे.
कलम 265 : कायद्याच्या अधिसत्तेशिवाय कर लादले जाणार नाहीत.
कलम 266 : भारताचा आणि राज्यांचा संचित निधी आणि सार्वजनिक लेखा
कलम 267 : आपत्कालीन निधी (आकस्मीकता निधी)

संघराज्य आणि राज्य यामधील महसुलांचे वाटप

कलम 268 : केंद्राने लागू केलेले मात्र राज्यांनी गोळा आणि विनियोजन केलेले शुल्क.
कलम 269 : केंद्राकडून लागू आणि गोळा केले जाणारे मात्र राज्यांना देण्यात येणारे कर.
कलम 270 : केंद्र व राज्य यांमध्ये आकारणी व वसुली केलेले कर.
कलम 271 : केंद्राच्या प्रयोजनार्थ विशिष्ट शुल्के आणि कर यावर अधिभार
कलम 272 : रद्द
कलम 273 : ज्युट(ताग) आणि ज्युट उत्पादनावर निर्यात अनुदान
कलम 274 : राज्यांना अपेक्षित करांच्या परिणामकारकतेसाठी अशा विधेयकास राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी
कलम 275 : विशिष्ट राज्यांना केंद्राकडून अनुदान
कलम 276 : व्यवसाय, व्यापार, आजीविका आणि नोकÚया यावरील कर
कलम 277 : बचत
कलम 278 : रद्द
कलम 279 : निव्वळ उत्पन्नाची गणना
कलम 280 : वित्त आयोग
कलम 281 : वित्त आयोगाच्या शिफारसी
कलम 282 : संघराज्याने किंवा राज्याने आपल्या महसुलातून मागविण्याजोगा खर्च
कलम 283 : संचित निधी, आपात्कालीन निधी आणि सार्वजनिक लेख्याकडे सोपविलेल्या पैसा वगैरेची सुरक्षा.
कलम 284 : लोकसेवक आणि न्यायालये यांना मिळालेल्या वाद पक्षकारांच्या ठेवी व इतर पैसे यांची अभिरक्षा
कलम 285 : राज्याच्या करातून केंद्राच्या मालमत्तेला सुट
कलम 286 : वस्तूची विक्री किंवा खरेदी यावर कर बसवण्यासंबंधी निर्बंध
कलम 287 : विजेवरील करांपासून सुट
कलम 288 : विशिष्ट प्रकरणामध्ये पाणी वा वीज याबाबत राज्यांच्या करांमधून सुट
कलम 289 : केंद्राच्या करप्रणालीतून राज्याची मालमत्ता आणि आय यांना सुट
कलम 290 : विशिष्ट खर्च आणि निवृत्तीवेतन यासंदर्भात तडजोड
कलम 290अ : विशिष्ट देवस्वम् निधीमध्ये वार्षिक भरणा
कलम 291 : रद्द
कलम 292 : केंद्र सरकारने कर्ज उभारणी करणे
कलम 293 : राज्यांनी कर्ज उभारणी करणे.

शासनाचे हक्क व दायित्व

कलम 294 : विशिष्ट प्रकरणात मालमत्ता, संपत्ती हक्क, दायित्व आणि यांच्याबाबत वारसाहक्क
कलम 295 : इतर प्रकरणात मालमत्ता, संपत्ती, हक्क, दायित्व आणि यांच्याबाबत वारसाहक्क
कलम 296 : वारसदार नसणे वा रद्द होणे वा योग्य मालकाच्या अभावी जमा झालेल्या मालमत्ता
कलम 297 : केंद्राच्या अखत्यारीतील भुप्रदेशांच्या जलाशयातील मौल्यवान वस्तू, भुखंडीय लगत जल क्षेत्र आणि विस्तृत   आर्थिक क्षेत्र.
कलम 298 : व्यापार सुरू ठेवण्याचे अधिकार
कलम 299 : करारनामा
कलम 300 : फिर्याद आणि कार्यवाही

मालमत्ता हक्क

कलम 300अ : कायद्याच्या अधिसत्तेशिवाय व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित केले जाणार नाही

भाग 13 : भारताच्या राज्यक्षेत्रातील व्यापार, दळणवळण आणि परस्परसंबंध

कलम 301 : व्यापार, दळणवळण आणि परस्परसंबंधाचे स्वातंत्र्य
कलम 302 : व्यापार, दळणवळण आणि परस्परसंबंधावर निर्बंध लावण्याचा केंद्राचा अधिकार
कलम 303 : व्यापार आणि दळणवळणासंदर्भात केंद्र आणि राज्य यांच्या कायदेशीर अधिकारावर निर्बंध
कलम 304 : राज्यातंर्गत व्यापार, दळणवळण आणि परस्पर व्यवहाराववर निर्बंध
कलम 305 : राज्याच्या मक्तेदारीविषयक कायदे.
कलम 306 : (रद्द)
कलम 307 : कलम 301 ते 304 या कलमांची प्रयोजने पार पाडण्याकरीता प्राधिकाऱ्यांची नियुक्ती.

भाग 14 : केंद्र आणि राज्य यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सेवा

लोकसेवा

कलम 308 : अर्थ लावणे.
कलम 309 : केंद्र वा राज्यामध्ये सेवा करणाऱ्या व्यक्तीची भरती आणि सेवाशर्ती
कलम 310 : केंद्र वा राज्यामध्ये सेवारत व्यक्तीच्या पदाचा कार्यकाळ
कलम 311 : केंद्र वा राज्य यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या नागरी पदावर सेवानियुक्त केलेल्या व्यक्तींना बडतर्फ करणे, पदावरून दुर करणे किंवा पदावनत करणे.
कलम 312 : अखील भारतीय सेवा
कलम 312अ : विशिष्ट प्रकरणांमध्ये अधिकाÚयाची  पडताळणी करणे
कलम 313 : संक्रमणकालीन तरतुद
कलम 314 : (रद्द केले)

लोकसेवा आयोग

कलम 315 : केंद्र आणि राज्यांसाठी लोकसेवा आयोग
कलम 316 : सदस्यांची नियुक्ती आणि कार्यकाळ
कलम 317 : लोकसेवा आयोगाच्या सदस्यास पदावरून दुर करणे आणि निलंबीत करणे.
कलम 318 : आयोगाचे सदस्य आणि कर्मचारी यांच्या सेवाशर्तीसाठी नियम करण्याचा अधिकार
कलम 319 : सदस्य म्हणून कार्यकाळ तहकुब केल्यावर इतर लाभाचे पद स्वीकारण्यास प्रतिबंध
कलम 320 : लोकसेवा आयोगाचे कार्य
कलम 321 : लोकसेवा आयोगांच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार
कलम 322 : लोकसेवा आयोगाचा खर्च
कलम 323 : लोकसेवा आयोगांचे अहवाल

भाग 14 A : न्यायाधिकरणे

कलम 323अ : प्रशासकीय न्यायाधिकरणे

भाग 15 : निवडणूका

कलम 324 : निवडणूकांचे पर्यवेक्षण, निर्देश आणि नियंत्रण याबाबत निवडणूक आयोगाचा अधिकार
कलम 325 : धर्म, वंश, जात व लिंग या आधारे मतदान यादी मधून वगळण्यास वा समावेश करण्यास किंवा विशेष यादीत नमुद करण्यास प्रतिबंध
कलम 326 : लोकसभा व राज्याच्या विधानसभा यांच्या निवडणूका प्रौढ मताधिकाराच्या आधारे होणे
कलम 327 : विधानमंडळाच्या निवडणूकाबाबत तरतुद करण्याचा संसदेचा अधिकार
कलम 328 : राज्य विधीमंडळाच्या निवडणूकासंदर्भात तरतुदी करण्याचा संबंधीत राज्य विधीमंडळास अधिकार
कलम 329 : निवडणूक विषयामध्ये हस्तक्षेप करण्यास न्यायालयांना प्रतिरोध
कलम 329अ : (रद्द केले)

भाग 16 : अनुसूचित जाती, जमाती आणि इतरसाठी विशेष तरतुद

कलम 330 : लोकसभेत अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव जागा
कलम 331 : लोकसभेत अॅग्लो – इंडियन समाजाचे प्रतिनिधीत्व
कलम 332 : राज्याच्या विधानसभेमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरीता जागा राखून ठेवणे.
कलम 333 : राज्यांच्या विधानसभेमध्ये अॅग्लो – इंडियन समाजाचे प्रतिनिधीत्व
कलम 334 : राखीव जागा व विशेष प्रतिनिधीत्व सत्तर वर्षांनंतर समाप्त होणे.
कलम 335 : सेवा आणि पदाबाबत अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षित जागा
कलम 336 : विशिष्ट सेवामध्ये अॅग्लो – भारतीय समुदायासाठी विशेष तरतूदी
कलम 337 : अॅंग्लो इंडीयन समाजाच्या लाभाकरिता शैक्षणिक आनुदानाबद्दल विशेष तरतूदी
कलम 338 : अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग
कलम 339 : अनुसूचित क्षेत्राचे प्रशासन आणि अनुसूचित जमातीचे कल्याणकार्य यावर संघराज्याचे नियंत्रण
कलम 340 : मागास वर्गाच्या स्थितीची चौकशी करण्यासाठी आयोगाची नियुक्ती
कलम 341 : अनुसूचित जाती
कलम 342 : अनूसूचित जमाती

भाग 17 : राजभाषा

कलम 343 : संघराज्याची राजभाषा
कलम 344 : राजभाषेसाठी आयोग व संसदीय समिती
कलम 345 : राज्याची किंवाव राज्यांच्या राजभाषा
कलम 346 : दोन घटकराज्यामध्ये किंवा केंद्र आणि राज्यांमध्ये संवाद साधण्यासाठी कार्यालयीन भाषा
कलम 347 : राज्याच्या लोकसंख्येपैकी एखाद्या वर्गाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेविषयी विशेष तरतूद.
कलम 348 : सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कायदे, विधेयक वगैरेसाठी वापरली जाणारी भाषा
कलम 349 : भाषेविषयक विशिष्ट कायदे करण्याची विशेष कार्यपद्धती

विशेष मार्गदर्शक तत्वे

कलम 350 : तक्रार निवारण्याच्या निवेदनामध्ये वापरावयाची भाषा
कलम 350अ : प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी
कलम 350ब : भाषिक अल्पसंख्यांकांसाठी विशेष अधिकारी
कलम 351 : हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश

भाग 18 : आणीबाणीसंबंधी तरतूदी

कलम 352 : आणीबाणी घोषित करणे (राष्ट्रीय आणीबाणी)
कलम 353 : आणीबाणी घोषणेचा परिणाम
कलम 354 : आणीबाणीची उद्धोषणा अंमलात असतांना महसुलाच्या वाटपासंबंधीच्या तरतूदी लागू असणे.
कलम 355 : बाहय आक्रमण आणि अंतर्गत अशांतता यापासून राज्याचे संरक्षण करणे हे संघराज्याचे कर्तव्य.
कलम 356 : राज्यामधील घटनात्मक यंत्रणा बंद पडल्यास आणीबाणीची तरतूद (राष्ट्रपती राजवट)
कलम 357 : कलम 356 अंतर्गत आणीबाणी घोषित केल्यावर कायदेशीर अधिकाराचा वापर
कलम 358 : आणीबाणीच्या कालावधीत कलम 19 च्या तरतुदी निलंबीत असणे.
कलम 359 : आणीबाणीमध्ये मुलभूत हक्कांच्या अंमलबजावणीची तहकुबी
कलम 359अ : (रद्द)
कलम 360 : आर्थिक आणीबाणीसंबंधी तरतूदी

भाग 19 : संकीर्ण

कलम 361 : राष्ट्रपती, राज्यपाल आणि राज्यप्रमुखांचे संरक्षण
कलम 361अ : संसद आणि राज्य विधीमंडळाच्या कार्यपद्धतीच्या प्रकाशनाचे संरक्षण
कलम 362 : (रद्द केले)
कलम 363 : विशिष्ट तह, करार, इत्यादीतून उद्धभवणाÚया विवादामध्ये न्यायालयीन हस्तक्षेपास मनाई
कलम 363अ : भारतीय संस्थानाच्या अधिपतींना दिलेल्या मान्यता संपुष्ठात येणे व तनखे नष्ठ करणे
कलम 364 : मोठी (प्रमुख) बंदरे व विमानतळ यासंदर्भात विशेष तरतूदी
कलम 365 : संघराज्याने दिलेल्या निदेशांचे अनुपालन करण्यात किंवा त्याची अंमलबजावणी करण्यात कसुर केल्याचा परिणाम
कलम 366 : व्याख्या
कलम 367 : अर्थ लावणे

भाग 20 : घटनादुरूस्ती

कलम 368 : राज्यघटना आणि त्यातील कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचा संसदेचा अधिकार
कलम 369 : एखाद्या विषय समवर्ती सुचीमध्ये असला तर, त्यादृष्टीने राज्यसुचितील विशिष्ठ विषयाबाबत कायदा करण्याचा
कलम 370 : जम्मु व काश्मीर राज्याबाबत अस्थायी तरतूद
कलम 371 : महाराष्ट्र आणि गुजरात
कलम 371A : नागालॅड राज्याबाबत विशेष तरतूद
कलम 371B : आसाम राज्याबाबत विशेष तरतूद
कलम 371C : मणिपूर राज्याबाबत विशेष तरतूद
कलम 371D : आंध्रप्रदेशात केंद्रिय विद्यापीठ स्थापना
कलम 371E : सिक्कीम राज्याबाबत विशेष तरतूद
कलम 371F : मिझोराम राज्याबाबत विशेष तरतूद
कलम 371G : अरूणाचल राज्याबाबत विशेष तरतूद
कलम 371H : गोवा राज्याबाबत विशेष तरतूद
कलम 371I : कर्नाटक राज्याबाबत विशेष तरतूद
कलम 372 : अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या अंमलामध्ये सातत्य आणि त्यांची जूळवणी
कलम 372अ : कायद्यांचे अनुकूलन करण्याचे राष्ट्रपतीचे अधिकार
कलम 373 : विशिष्ट खटल्यामध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेखाली असलेल्या व्यक्तीबाबत आदेश देण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार
कलम 374 : सांघिक न्यायालयातील न्यायधिश आणि सांघिक न्यायालयात अनिर्णित असलेल्या कार्यपद्धती किंवा परिषदेमध्ये वरिष्ठांपुढील अनिर्णित खटले याबाबत तरतूदी.
कलम 375 : संविधानाच्या तरतूदींना अधीन राहून न्यायालये, प्राधिकारी व अधिकारी यांनी कार्याधिकार बजावण्याचे चालू ठेवणे
कलम 376 : उच्च न्यायालयातील न्यायाधिशाबाबत तरतूदी
कलम 377 : भारताचा नियंत्रक आणि महालेखापरिक्षक विषयक तरतूदी
कलम 378 : लोकसेवा आयोगासंबंधी तरतूदी
कलम 378अ : आंध्रप्रदेश विधानसभेच्या कार्यकाळाविषयी विशेष तरतूदी कलम 379 ते कलम 391 (रद्द केले)
कलम 392 : अडचणी दुर करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार

भाग 21 : संक्षिप्त नाव, प्रारंभ, प्राधिकृत हिंदी पाठ व निरसने

कलम 393 : राज्यघटनेचे लघू शिर्षक
कलम 394 : राज्यघटनेचा प्रारंभ
कलम 394अ : राज्यघटनेची हिंदी भाषेमध्ये प्रमाणभूत संहिता
कलम 395 : कायदा रद्द करणे.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets