Search This Blog

Current Affairs – 03/05/2019

पंतप्रधान मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

  • फेब्रुवारी २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दक्षिण कोरियाच्या दौऱ्यादरम्यान झालेल्या समारंभात २०१८ सालासाठीचा सेऊल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • दक्षिण कोरियाच्या कॅल्चरल फौंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप २ लक्ष डॉलर्स, पदक अँड प्रमाणपत्र असे आहे.
  • हा पुरस्कार मिळवणारे मोदी हे १४ वे व्यक्ती ठरले.
  • कोरियाची राजधानी सेऊल येथे २४ व्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन झाल्याच्या निमित्ताने १९९० पासून सेऊल शांतता पुरस्कार दिला जातो.
  • या क्रीडा स्पर्धेसाठी जगातील २६० देश उपस्थित होते.
  • हा पुरस्कार शांततेच्या क्षेत्रात दैवार्षिक पुरस्कार दिला जातो.
  • हा पुरस्कार सेऊलराष्ट्राचे माजी सरचिटणीस कोफी अन्नान, जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्फेल, डॉक्टर्स विदाऊट बोर्डससारख्या आंतरराष्ट्रीय सहकार्य संघटनांना दिला आहे.

उपराष्ट्रपती व्यंकया नायडू

  • संयुक्त राष्ट्रांद्वारे स्थापित ‘शांती विद्यापीठाच्या’ (युनिव्हर्सिटी ऑफ पीस] वतीने उपराष्ट्रपती नायडू यांना मार्च २०१९ मध्ये डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.
  • शांती विद्यापीठाची मानद मिळवणारे नायडू हे पहिले भारतीय ठरले.
  • भारताचा शाश्वत विकास, कायद्याचे राज्य आणि लोकशाहीच्या संवर्धनासाठी त्यांनी दिलेला योगदानासाठी त्यांना हा सन्मान मिळाला.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets