‘फेमिना मिस इंडिया २०१९’ सुमन राव
विजेती :- सुमन राव ( राजस्थान)
फर्स्ट रनर अप (द्वितीय) :- संजना वीज ( तेलंगणा)
बिहारची श्रेया शंकर हिनं ‘मिस इंडिया युनायटेड कॉन्टिनेंट २०१९’ आणि छत्तीसगडच्या शिवानी जाधव हिनं ‘मिस ग्रँड इंडिया २०१९’ चे जेतेपद पटकावले.
७ डिसेंबर रोजी थायलंडच्या पट्टाया येथे होणाऱ्या ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत भारताकडून सुमन राव सहभागी होणार आहे.

कोल्हापूरची शान असलेल्या कोल्हापुरी चपलांना ‘जीआय’ अर्थात ‘भौगोलिक मानांकन’ प्राप्त झाले आहे
त्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. परिणामी, जगभरात कोल्हापुरी चपलाची शान वाढली आहे.
आतापर्यंत देशभरातील ३२६ उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून, महाराष्टतील ३२ उत्पादनांचा यात समावेश आहे.
यांपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापुरी गूळ आणि कोल्हापुरी चप्पल ही दोन उत्पादने आहेत.

मुंबई जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर, दिल्ली चौथ्या स्थानी
जगातील सर्वात जास्त वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांची यादी नुकतीच एका कंपनीने जाहीर केली.
या यादीमधील पहिले नाव मुंबई शहराचे आहे. Apple आणि उबर या कंपन्यांना लोकेशन्स पुरवण्याचे काम करणाऱ्या टॉमटॉम या कंपनीने जगभरातील 56 मोठ्या देशांचा अभ्यास करुन एक अहवाल सादर केला आहे.
जगातील वेगवेगळ्या देशांमधील मोठ्या शहरांमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा किती टक्के अधिक वेळ लागतो हे या अहवालात सांगण्यात आले आहे.
या अहवालानुसार मुंबईमध्ये एका जागेवरुन दुसऱ्या जागी प्रवास करण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा 65 टक्के अधिक वेळ लागतो असे म्हटले आहे.
मुंबई खालोखाल या यादीमध्ये भारतातील दुसरे शहर आहे ते म्हणजे राजधानी दिल्ली.
सर्वाधिक वाहतूक कोंडीच्या जागतिक यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या दिल्लीमध्ये एका जागेवरुन दुसऱ्या जागी प्रवास करण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा 58 टक्के अधिक वेळ लागतो.
No comments:
Post a comment