Search This Blog

Current Affairs – 27/06/2019

एअर स्ट्राईकचे रणनीतीकार सामंत गोयल यांची 'रॉ'च्या प्रमुखपदी निवड

नवी दिल्ली- केंद्र सरकारने 1984 बॅचचे आयपीएस अधिकारी सामंत गोयल यांना रॉ (RAW) चे प्रमुख म्हणून नियुक्त केलं आहे. त्याचसोबत आयपीएस अधिकारी अरविंद कुमार यांची गुप्तचर संस्थेच्या संचालकपदावर नियुक्तीकेली आहे. 
पंजाब कॅडरमधील आयपीएस अधिकारी सामंत गोयल यांनी बालकोट एअर स्टाईकची पूर्ण योजना आखली होती. सामंत गोयल हे विद्यमान रॉ चे प्रमुख अनिल कुमार धस्माना यांच्याकडून पदभार स्वीकारतील. धस्माना निवृत्त होत आहेत.
1990 च्या दशकात पंजाबमध्ये उग्रवाद्यांनी दहशत माजवली होती त्याच्याविरोधात सामंत गोयल यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु केलं होतं. 
तर दुसरीकडे गुप्तचर संस्थेचे नवनियुक्त संचालक अरविंद कुमार हे काश्मीर प्रश्नाचे अभ्यासक आहेत. सध्या ते काश्मीर प्रकरणातील विभागातील विशेष सचिव म्हणून काम पाहतात. सामंत गोयल यांच्याप्रमाणे अरविंद कुमार हे 1984 बॅचमधील आसाम-मेघालय कॅडरमधील आयपीएस अधिकारी आहेत. 

जगातील हाय स्पीड इंटरनेट असलेल्या 10 देशांची यादी जाहीर

1) दक्षिण कोरिया : हाय स्पीड इंटरनेट स्पीड देण्यामध्ये दक्षिण कोरिया सर्वात अग्रस्थानी आहे. 97.5 टक्के 4G इंटरनेट उपलब्ध आहे. युजर्सना 52.4Mbps डाऊनलोड स्पीड मिळतो.
2) नॉर्वे : इंटरनेट स्पीडमध्ये साऊथ कोरियानंतर नॉर्वेचा दुसरा नंबर लागतो. या देशात 48.2Mbps डाऊनलोड इंटरनेट स्पीड आहे.
3) जपान : जपानमध्ये 96.3 टक्के 4G नेटवर्क आहे. तसेच युजर्स 33Mbps डाऊनलोड स्पीड मिळतो.
4) हाँग काँग : हाँग काँगमध्ये डाऊनलोड इंटरनेट स्पीड 16.7Mbps आहे. 4G इंटरनेट 94.1 टक्के आहे.
5) अमेरिका : अमेरिकेमध्ये 21.3Mbps डाऊनलोड इंटरनेट स्पीड आहे. तर 4G उपलब्धता 93 टक्के आहे.
6) नेदरलँड : नेदरलँडमध्ये 4G इंटरनेटची उपलब्धता 92.8 टक्के आहे. युजर्स येथे 42.4Mbps डाऊनलोड इंटरनेट स्पीड मिळतो.
7) तैवान : तैवानमध्ये डाऊनलोड इंटरनेट स्पीड 26.6Mbps आहे. 4G नेटवर्क 92.8 टक्के आहे.
8) हंगेरी : हंगेरीमध्ये 4G नेटवर्क 91.4 टक्के आहे. तर डाऊनलोड इंटरनेट स्पीड 32.7Mbps आहे.
9) स्वीडन : स्वीडनमध्ये 30.8Mbps डाऊनलोड इंटरनेट स्पीड आहे. तर 4G नेटवर्क 91.1 टक्के आहे.
10) भारत : भारतामध्ये डाऊनलोड इंटरनेट स्पीड 6.8Mbps आहे. तसेच 4G नेटवर्क 90.9 टक्के आहे.

इस्रो 5 'कमांडो' सॅटेलाईट सोडणार; सैन्याची ताकद वाढणार

दहशतवाद्यांच्या कॅम्पवर नजर ठेवण्यासाठी इस्रोची तयारी, यामुळे भारतीय सैन्याची ताकद वाढणार.
त्यानुसार पुढील 10 महिन्यांमध्ये ते 8 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडणार आहेत
यातील या 5 उपग्रहांपैकी एक कार्टोसॅट सिरिज आणि 4 रीसॅटचे उपग्रह असून अन्य 3 उपग्रह हे जीसॅट सिरिजमधीलआहेत.
फेब्रुवारी 2020 पर्यंत हे उपग्रह लाँच करण्यात येण्याची शक्यता आहे.
10 महिन्यांमध्ये खालील उपग्रह लॉन्च होणार:
▪ रीसॅट-2बी : मे 2019
▪ कार्टोसॅट-3 : जून 2019
▪ रीसॅट-2बीआर1 : जुलै 2019
▪ जीसॅट-1(न्यू) : सप्टेंबर 2019
▪ रीसॅट-2बीआर 2 : ऑक्टोबर 2019
▪ जीसॅट-2 : नोव्हेंबर 2019
▪ रीसॅट-1ए : नोव्हेंबर 2019
▪ जीसॅट-32 : फेब्रुवारी 2020

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets