Search This Blog

Important Articles to Read – 15th July to 31st July 2019

Download the important articles related to current affairs from 15th July 2019 to 31st July 2019.
This compilation is provided by ‘Dnyanjyoti Free Learning University’ to help students to learn and prepare for their Government exams.
Points covered in the PDF notes:
 • India is home to 1,256 species of orchid, says first comprehensive survey
 • Law Commission to be formed soon
 • The milestones of Chandrayaan-2, India’s second lunar probe
 • Speed restrictions and sound alerts mooted for protection of dolphins
 • Draft Model Tenancy Act: what govt proposes for house owners, tenants
 • Poverty index: how Jharkhand reduced its poor the fastest
 • And many more…

Current Affairs – 21/07/2019

हिमाचा गोल्डन पंच, 19 दिवसांत पटकावलं पाचवं सुवर्ण

भारताची धावपटू हिमा दासने गेल्या 19 दिवसांत पाचवं सुवर्णपदक पटकावलं.
   
भारताची युवा धावपटू हिमा दासची सोनेरी घोडदौड सुरूच आहे. हिमाने आता 400 मीटर धावण्याच्या प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहे.
याआधी हिमाने चार सुवर्ण पटकावली आहेत. गेल्या 20 दिवसांत तिचं हे पाचवं सुवर्णपदक आहे. यातील चार सुवर्ण पदकं 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेतील आहेत.
झेक रिपब्लिकमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिनं 400 मीटर अंतर 52.09 सेकंदात पूर्ण केलं.

One Liners

🎯 संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) याचे स्थापना वर्ष – सन 1958.
🎯 आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) याचे स्थापना वर्ष – सन 1924.
🎯 भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) – स्थापना वर्ष: सन 1969; मुख्यालय: बेंगळुरू. 
🎯 ISRO चा पहिला उपग्रह – आर्यभट्ट (सन 1975).
🎯 भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम – 22 ऑक्टोबर 2008
🎯 आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन – 20 जुलै.
🎯 सकल स्थानिक उत्पन्न (GDP) याची पहिल्यांदा मूलभूत संकल्पना मांडणारे ब्रिटिश अर्थशास्त्री – विलियम पेटी (सन 1654-1676 या काळात).

भारतातील PINK CITY जयपूर World Heritage Sites मध्ये निवड

 • UNSCO चे मुख्यालय पॅरिस(फ्रांस ची राजधानी) ला आहे युनेस्को वारसा समितीही 21 सदस्यांची असून त्यांची बैठक दरवर्षी होते.
 • आतापर्यंत 167 देशांतील 1092 ठिकाणांची निवड युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये झाली आहे.
 • UNSCO ची 43 वी बैठक 6 जुलै ला अझरबैजान देशाची राजधानी ‘बाकु’ येथे पार पडली.
 • भारतात आता 38 world heritage sites झाली आहेत. सर्वात जास्त WHS चीन मध्ये आहेत.
 • राजस्थान चे सध्या चे मुख्यमंत्री अशोक गेलोत आहेत.
Pink City
1876 इंग्लंड राजा आणि राणी व्हिक्टोर या भारत भेटीला आल्या त्या वेळचे राजा राम सिंग यांनी पूर्ण शहर गुलाबी रंगाने रंगवले होते.तेव्हा पासुन गुलाबी शहर नावाने ओळखले जात आहे.
Most World Heritage Sites
🇨🇳  China: 55
🇮🇹  Italy: 54
🇩🇪  Germany: 47
🇪🇸  Spain: 47
🇫🇷  France: 45
🇮🇳  India: 38

देशातील 18 वा रेल्वे विभाग - दक्षिण किनारी रेल्वे विभाग

 • रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी 18 वा रेल्वे विभाग स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
 • 18 व्या रेल्वे झोनचे मुख्यालय – विशाखापट्टणम , आंध्रप्रदेश
 • 18 व्या रेल्वे विभागात – गुंटकल , गुंटूर , विजयवाडा डिव्हिजनचा समावेश असणार
 • भारतात सध्या – 17 रेल्वे विभाग व 73 रेल्वे डिव्हिजन

स्पर्धा परीक्षेतील हमखास यशासाठी

हाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विश्व म्हणजे ऊन आणि पावसाचा खेळ झाला आहे. दुर्दम्य आशावाद आणि टोकाची निराशा एकाच वेळेस दोन्ही स्पर्धा परीक्षा विश्वातील उमेदवार अनुभवत आहे.
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने संपूर्ण शिक्षण व्यवस्था ताब्यात घेतलेली असताना स्पर्धा परीक्षा एकच विश्व असे आहे जे विद्यार्थ्यांना पैसा आणि वशिल्याच्या शिवाय समाजाच्या मुख्य प्रवाहात आणू शकते.
परंतु सध्याच्या वातावरणात प्रचंड अस्थिरता स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी अनुभवताहेत. लाखोच्या संख्येने असणारे विद्यार्थी आणि दिवसेंदिवस कमी होत जाणाऱ्या नोकऱ्या यांचे समीकरण काही केल्या बसत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पैसा आणि इंग्रजीची भीती या दोन गोष्टी स्पर्धा परीक्षा शिवाय असणाऱ्या संधींची दरवाजे उघडू देत नाहीत अशा दुहेरी कात्रीत अडकलेला स्पर्धा परीक्षांचा विद्यार्थी सध्या प्रचंड दडपणाखाली जगत आहे परंतु ही स्पर्धा परीक्षा विश्वाची एक बाजू असली तरी दुसरी बाजू सुद्धा समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे आज स्पर्धा परीक्षा विश्वातील विद्यार्थ्यांना पारंपारिक एक किंवा दोनच परीक्षांच्या तयारी शिवाय राज्य आणि देश पातळीवरील उपलब्ध वेगवेगळ्या  पर्यायांचा वापर करणे क्रमप्राप्त आहे.
यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगा शिवाय Staff सिलेक्शन कमिशन, बँकिंग सेक्टर, Defence सेक्टर (CAPF, CDS etc.) ज्यामध्ये अनेक वर्ग-1 व वर्ग-2 वर्ग तीन आणि चार च्या सुद्धा हजारो जागा उपलब्ध आहेत. या सर्वांच्या तयारीला विद्यार्थ्यांनी सुरुवात केली पाहिजे. याशिवाय पुढील काही गोष्टी स्पर्धा परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांनी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत.
1) स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी वयाच्या शक्य तेवढ्या लवकर हा पर्याय निवडून व्यावसायिक पद्धतीने तयारी केली पाहिजे. याचा अर्थ प्रत्येकाने क्लासच लावला पाहिजे असे अजिबात होत नाही. परंतु प्रत्येक विद्यार्थी व्यावसायिक पद्धतीने तयारी करू शकतो. पैशाशिवाय अशी तयारी करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत ज्ञानज्योती फ्री लर्निंग युनिव्हर्सिटी हा असाच एक उपक्रम आहे.
2) स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला तयारीसाठी चा कालावधी आधीच निश्चित करून ही कालमर्यादा कुठल्याही परिस्थितीत पाळली पाहिजे वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेच्या तयारी मध्ये घालण्यापेक्षा ठराविक कालमर्यादेच्या बंधनात राहून स्पर्धापरीक्षेची तयारी करणे अधिक फायद्याचे आहे. हे कसे साध्य करावयाचे ते योग्य नियोजन आणि मार्गदर्शकाच्या मदतीने ठरवावे.
3) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयारी सोबतच कौशल्य विकासाचे काही कार्यक्रम पूर्ण करून व्यावहारिक जगामध्ये सक्षम करिअरचा पर्याय उभा करून ठेवला पाहिजे.
4) स्पर्धा परिक्षांचे जग हे बेभरवशाचे आहे हे खरे असले तरी लेखामध्ये वर उल्लेख केलेल्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या एकत्रित तयारीने आणि वरील तीन मुद्द्यांच्या अनुषंगाने तयारी केली असता शंभर टक्के यशाची खात्री उमेदवार स्वतःच स्वतःला देऊ शकतो. चमकते ते सगळेच सोने नसते. जाहिरातींच्या आधारावर यशाचे खोटे वलय उभे करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पासून स्वतःला वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःची बुद्धी वापरली पाहिजे.

विशाल भेदुरकर 

वित्त आणि लेखा अधिकारी पुणे
iasvishalbhedurkar@gmail.com    |    9975806127

बेटी बचाव बेटी पढाओ योजना

सुरुवात – 22 जानेवारी 2015
दूत – साक्षी मलिक  
 • बाल लिंगगुणोत्तर सुधारणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
 • हरियाणा येथील पानिपत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
 • ‘बेटा बेटी एक समान’ हा आपला मंत्र असला पाहिजे असे सांगत लिंग भेदभाव संपुष्टात आणला पाहिजे.
 • हरियाणातील बाल लिंगगुणोत्तर परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे या योजनेच्या उद्घाटनासाठी हरियाणाची निवड करण्यात आली. यात 10 वर्षाखालील मुलींचे बँक खाते उघडावे लागते.
 • भारतीय टपाल खात्याच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ टपाल तिकिटेही काढण्यात आली. सध्या भारतातील 100 जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर लागू
महाराष्ट्रातील निवड करण्यात आलेले जिल्हे (लिंगगुणोत्तर दर)
2001 – 2011
1) बीड – 894 – 807 
2) जळगाव – 880 – 842 
3) अहमदनगर – 884 – 452 
4) बुलढाणा – 908 –  855
5) औरंगाबाद – 890 – 858 
6) वाशिम – 918 – 863 
7) कोल्हापूर – 839 – 863 
8) उस्मानाबाद – 894 – 867 
9) सांगली – 867 – 851 
10) जालना – 903 -870

चालु घडामोडी वन लाईनर्स, १३ जुलै २०१९

● जूनमध्ये किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा ३.१८ पर्यंत पोहचला
● नोव्हाक जोकोव्हीच २०१९ विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल
● राँजर फेडरर २०१९ विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल
● आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंच म्हणून श्रीलंकेचे कुमार धर्मसेना व दक्षिण अफ्रिकेचे मारियस इरॅस्मस यांची नियुक्ती करण्यात आली
● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या ८१ किलो वजनी गटात सचिन सिंहने सुवर्णपदक पटकावले
● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या ८१ किलो वजनी गटात पापुल चांगमईने रौप्यपदक पटकावले
● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या ८७ किलो वजनी गटात पी अनुराधाने सुवर्णपदक पटकावले
● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या ८९ किलो वजनी गटात आर वी राहुलने रौप्यपदक पटकावले
● यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा तुर्की मध्ये आयोजित करण्यात आली
● यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत मंजु कुमारीने ५९ कीलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले
● यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत सीमा कुमारीने ५० कीलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले
● यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत उत्कर्षा काळेने ६१ कीलो वजनी गटात कांस्यपदकपदक पटकावले
● यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत राहुल आवारेने पुरुषांच्या ६१ कीलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले
● टीव्हिएस मोटर्सने भारतातील पहिली इथेनॉलवर चालणारी दुचाकी लाँच केली
● स्टेट बँक आँफ इंडियाकडून एनईएफटी , आरटीजीएस व्यवहारांवरील शुल्क रद्द
● अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने क्रिकेटच्या सर्व प्रकारासाठी राशिद खानकडे कर्णधार पदाची जबाबदारी स्वीकारली
● अंशुला कांत यांची जागतिक बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नेमणूकझाली आहे
● जागतिक बँकेच्या मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत
● उत्तराखंड २८ जुलैरोजी मसुरी येथे पहिली हिमालयी राज्य परिषद आयोजित करणार
● पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर मध्ये अमेरिकेला भेट देणार आहेत
● २०-२३ जुलै दरम्यान होणा-या संयुक्त राष्ट्र महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील
● कर्नाटक सरकारने २०१८ साठी कन्नड आणि संस्कृती विभागाच्या राष्ट्रीय पुरस्कारांची यादी जाहीर केली
● स्वातंत्र्यसैनिक एच एस डोरेस्वामी यांना कर्नाटक सरकारकडून “बसवा राष्ट्रीय पुरस्कार” जाहीर
● चनम्मा हल्लीकेरी यांना कर्नाटक सरकारकडून “भगवान महावीर राष्ट्रीय शांतता” पुरस्कार जाहीर
● सी टी मालगे व हिंकल महादेवीया यांना कर्नाटक सरकारकडून “जनपद राष्ट्रीय” पुरस्कार जाहीर
● भारतीय महिला फुटबॉल संघ ताज्या फीफा वर्ल्ड क्रमवारीत ५७ व्या क्रमांकावर
● नेपाळ १७ जुलैपासून पर्यटकांसाठी व्हिसा फी मध्ये वाढ करणार
● दक्षिण कोरियाचे पंतप्रधान ली नॅक-यु १३ जुलैरोजी बांग्लादेशला भेट देणार आहेत
● अच्युत सामंता यांना गांधी मंडेला शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
● जी साथियान व ए अमलराज जोडीने ऑस्ट्रेलिया टेबल टेनिस ओपन स्पर्धेत कांस्यपदक पटकावले
● १९ वा वार्षिक ग्रीनटेक पर्यावरण पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथे संपन्न
● एनबीसीसीला १९ वा वार्षिक ग्रीनटेक पर्यावरण पुरस्कार प्रदान करण्यात आला
● जर्मनी २०२० मध्ये ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग इंडियलायझेशन परिषद आयोजित करणार
● २०१९ आफ्रिकन युनियन परिषद नायजर मध्ये आयोजित करण्यात आली
● जागतिक आरोग्य संघटनेने श्रीलंकेला “गोवर मुक्त” देश म्हणून घोषित केले
● भारत – आशियान देशांच्या व्यापार मंत्र्यांची बैठक नवी दिल्ली येथे पार पडली
● पहिली जागतिक मिडीया परिषद लंडनमध्ये आयोजित करण्यात आली
● आयएसएफएफ ज्युनियर नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धा आजपासून जर्मनीत सुरु होणार
● लोकसभेने केंद्रीय विद्यापीठे (दुरुस्ती) विधेयक, २०१९ पारीत केले
● पर्यावरण प्रबंधन व हवामान बदलावर आयोजित २१ वी परिषद बंगळुरूमध्ये पार पडली
● नालकोला “गोल्डन पीकॉक पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार २०१९” ने सन्मानित करण्यात आले
● मोहम्मद बर्किंडो यांची पुन्हा ओपेकच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली
● आॅडी इंडियाचे प्रमुख म्हणून बलिबीर सिंह ढिल्लोन यांची नियुक्ती करण्यात आली
● गोवा शिपयार्ड लिमिटेडचे ​​संचालक म्हणून श्री जगमोहन यांची नियुक्ती करण्यात आली
● उरुग्वेमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून दिनेश भाटिया यांची नियुक्ती करण्यात आली
● भारत – पाकिस्तान दरम्यान करतारपुर कॉरिडॉरवरील बैठक १४ जुलै रोजी वाघा बाॅर्डरवर होणार आहे .

Current Affairs - 03/07/2019


34th Sailing Championship inaugurated in Telangana

Objective of this Championship is to put Hyderabad into World sailing map.
The event will take place between 2 to 7 July. The 2019 is a landmark year for EME Sailing Association as this year event has been accredited as YAI National Ranking Event hence participant’s sailor’s performance will be ranked and this will give them points for selection into National team.
Participants includes 190 plus sailors, 16 sailing clubs with round 21 sailors from Telangana state alone. Technical part of championship is being taken care of by foreign sailing members.
Event is jointly organised by Secunderabad Sailing Club and EME Sailing Association (EMESA) under the aegis of Laser Class Association of India supported by Sports Authority of Telangana State.
Why Hyderabad? The wind conditions in city are most favourable to hone sailor’s skills in yacht handling and understanding wind shifts.

Center to raise Health Services Expenditure to 2.5% of GDP by 2025

Union Health Minister Dr. Harsh Vardhan while addressing a query during Question Hour in Rajya Sabha announced that Government has set a target to raise health services expenditure to 2.5% of country’s GDP (Gross domestic product) by 2025. He also highlighted that poublic expenditure on health services has increased continuously over the years and continues to increase.
The government’s objective is in line with National Health Policy 2017 which envisages increasing public health expenditure to 2.5% of GDP by 2025.
The policy also recommends that State governments should spend more than 8% of their budget on health sector by 2020.
Steps taken by Government
Under Aayushman Bharat programme ( or Pradhan Mantri Jan Arogya Yojana or National Health Protection Scheme), Government envisions setting up 1.5 lakh health and wellness centres by 2022 and out of this 18,000-19,000 have already been established. These centres will boost healthcare facilities in country’s Urban as well as rural areas.
The 3% Education Cess on personal income tax and corporation tax to is already replaced with 4% Health and Education Cess so as to cater to education and health needs of poor and rural families.
Higher Education Funding Agency (HEFA) has also started supporting infrastructure works of medical institutions.

General Knowledge Notes – 2/07/2019

‘युनएड्स‘ द्वारे शुन्य भेदभाव दिन साजरा

 • संयूक्त राष्ट्रे आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थाद्वारे दरवर्षी 1 मार्च हा दिवस शुन्य भेदभाव दिन (Zero Discrimination Day) म्हणून साजरा केला जातो.
 • शुन्य भेदभाव दिनाचे चिन्ह ‘फुलपाखरू‘ आहे.
 • वय, लिंग, लैंगिकता, राष्ट्रीयत्व, वंश, रंग, इत्यादी बाबीच्या आधारावर भेदभाव न करता प्रत्येकाच्या हक्कांना प्रोत्साहन देणे आणि ते साजरे करण्याच्या उद्देशाने हा दिन साजरा केला जातो.
 • 1 डिसेंबर 2013 रोजी जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने ‘युएनएड्स‘च्या कार्यकारी संचालकांनी बिजिंग येथे शुन्य भेदभाव दिन सुरू केला.
 • त्यानुसार 1 मार्च 2014 रोजी सर्वप्रथम हा दिन साजरा करण्यात आला.

उषा थोरात कृतीदल

 • देशाबाहेरील रूपायाच्या बाजारपेठेसंबंधी समस्येचे परिक्षण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंकेने माजी उप-गव्हर्नर उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय कृतीदलाची स्थापना मार्च 2019 मध्ये केली.
 • हे कृतीदल देशाबाहेरील रूपयाच्या बाजारपेठेच्या विकासामागील कारणाचे मुल्यांकण करणार आहे. तसेच स्थानिक बाजारपेठेतील रूपयाचा विनीमय दर आणि बाजारातील तरलता या गोष्टींवर देशाबाहेरील बाजारपेठेचा प्रभाव हे कृतीदल अभ्यासणार आहे.
 • स्थानिक बाजारात प्रवेश करण्याबाबत अनिवासी भारतीयांना प्रोत्याहन देण्यासाठी उपाययोजनाची शिफारस कृतीदल करणार आहे.

मनोहर पर्रीकर

 • गोव्याचे मुख्यमंत्री व माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले ते 63 वर्षाचे होते. त्याचा मृत्यू कर्करोगामूळे झाला.
 • पर्रीकर यांचा जन्म 13 डिंसेबर 1955 गोव्यातील म्हापसा येथे झाला.
 • शालेय शिक्षण लोयोला हायस्कुलमध्ये
 • 1978 मध्ये त्यांनी आयआयटी बॉम्बे येथून मेटलर्जिस्ट विषयात पदवी मिळविली.
 • पर्रीकर यांनी तारूण्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला होता. RSS च्या उत्तर गोवा युनिटमध्ये ते सक्रिय होते.
 • 1988 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला 1991 मध्ये उत्तर गोवा लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा लोकसभा लढवली मात्र पराभूत झाले.
 • 1994 मध्ये पणजी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर सलग 4 वेळा त्या मतदार संघातून निवडून आले.
 • 2000 मध्ये पहिल्यांदा ते गोव्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी चार वेळा मुख्यमंत्री पद भूषवले. 2000, 2002, 2012, 2017 मध्ये
 • देशातील पहिले आयआयटी पदवीधर मुख्यमंत्री हा बहुमान पर्रीकर यांनी मिळवला.
 • नोव्हेंबर 2014 मध्ये मोदी सरकारमध्ये संरक्षण मंत्री पदावर काम केले. मार्च 2017 मध्ये संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा आणि चौथ्यांदा गोवाचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरूवात.
 • मनोहर पर्रीकर हे उत्तर प्रदेशातून राज्यसभा सदस्य होते.

खुल्या गटाच्या चार टक्के जागा वाढणार

आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा अधिकार मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केला असला तरी राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के आरक्षण ठेवावे, असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. त्याची अंमलबजावणी झाल्यास शिक्षणातील जागांची फेररचना होऊन वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य पदवी अभ्यासक्रमांसाठी उर्वरित चार टक्के जागा खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध होतील.
उच्च न्यायालयाच्या निकालानुसार आता मराठा समाजाच्या १६ टक्क्यांऐवजी १२ टक्के जागा शैक्षणिक प्रवेशांमध्ये राखीव ठेवण्यात येणार असल्याने अभियांत्रिकी, वैद्यकीय व अन्य पदवी अभ्यासक्रमांमध्ये त्यानुसार उपलब्ध जागांची फेररचना होईल आणि प्रवेशप्रक्रिया राबविली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशांना मात्र यंदा अभय मिळाले आहे. वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यात १६ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. हा मुद्दा राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील विजय थोरात आणि अ‍ॅड. अनिल साखरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. हे प्रवेश या टप्प्यावर रद्द करणे योग्य ठरणार नाही. तसे केल्यास गोंधळ निर्माण होईल, असेही न्यायालयाला सांगण्यात आले.
त्यामुळे हे प्रवेश यंदा ‘जैसे थे’च ठेवण्यात यावे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी १२ टक्के आरक्षण लागू करण्यात येईल, अशी विनंती सरकारने केली. त्यावर स्वतंत्र अर्ज करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले असून राज्य सरकारतर्फे सोमवारीच यासाठीचा अर्ज करण्यात येणार आहे.

निती आयोगाच्या आरोग्य क्रमवारीत केरळ प्रथम

एकूण आरोग्य कामगिरीत देशात केरळने पहिला क्रमांक पटकावला असून बिहार व उत्तर प्रदेश सर्वात खालच्या  क्रमांकावरआहेत. निती आयोगाने आरोग्य निर्देशांक क्रमवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागला आहे.
आरोग्य निर्देशांकाची दुसरी फेरी ही २०१५-१६ पायाभूत वर्ष व २०१७-१८ संदर्भ वर्ष मानून तयार  केली आहे. अहवालात म्हटले आहे की, आंध्र प्रदेश व महाराष्ट्र हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. ‘दी हेल्दी स्टेट्स, प्रोग्रेसिव्ह इंडिया’ नावाचा अहवाल निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी जाहीर केला.
आरोग्य निर्देशांकात २३ आरोग्य निकषांचा विचार करून क्रमवारी तयार केली आहे, त्यात वेगवेगळ्या घटकांवरचा भर ठरलेला आहे.
हरयाणा, राजस्थान, झारखंड या तीन मोठय़ा राज्यांची क्रमवारी खालावली आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये पहिल्या फेरीचे आरोग्य निर्देशांक जाहीर करण्यात आले होते. ते वार्षिक व वर्धित कामगिरीच्या आधारे २०१४-१५ हे पायाभूत वर्ष व २०१५-१६ संदर्भ वर्ष मानून तयार केले होते. आरोग्य मंत्रालय व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जागतिक  बँकेच्या तांत्रिक सहकार्याने ही क्रमवारी तयार केली आहे.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets