Search This Blog

Current Affairs – 21/07/2019

हिमाचा गोल्डन पंच, 19 दिवसांत पटकावलं पाचवं सुवर्ण

भारताची धावपटू हिमा दासने गेल्या 19 दिवसांत पाचवं सुवर्णपदक पटकावलं.
   
भारताची युवा धावपटू हिमा दासची सोनेरी घोडदौड सुरूच आहे. हिमाने आता 400 मीटर धावण्याच्या प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहे.
याआधी हिमाने चार सुवर्ण पटकावली आहेत. गेल्या 20 दिवसांत तिचं हे पाचवं सुवर्णपदक आहे. यातील चार सुवर्ण पदकं 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेतील आहेत.
झेक रिपब्लिकमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिनं 400 मीटर अंतर 52.09 सेकंदात पूर्ण केलं.

One Liners

🎯 संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) याचे स्थापना वर्ष – सन 1958.
🎯 आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) याचे स्थापना वर्ष – सन 1924.
🎯 भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) – स्थापना वर्ष: सन 1969; मुख्यालय: बेंगळुरू. 
🎯 ISRO चा पहिला उपग्रह – आर्यभट्ट (सन 1975).
🎯 भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम – 22 ऑक्टोबर 2008
🎯 आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन – 20 जुलै.
🎯 सकल स्थानिक उत्पन्न (GDP) याची पहिल्यांदा मूलभूत संकल्पना मांडणारे ब्रिटिश अर्थशास्त्री – विलियम पेटी (सन 1654-1676 या काळात).

भारतातील PINK CITY जयपूर World Heritage Sites मध्ये निवड

  • UNSCO चे मुख्यालय पॅरिस(फ्रांस ची राजधानी) ला आहे युनेस्को वारसा समितीही 21 सदस्यांची असून त्यांची बैठक दरवर्षी होते.
  • आतापर्यंत 167 देशांतील 1092 ठिकाणांची निवड युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये झाली आहे.
  • UNSCO ची 43 वी बैठक 6 जुलै ला अझरबैजान देशाची राजधानी ‘बाकु’ येथे पार पडली.
  • भारतात आता 38 world heritage sites झाली आहेत. सर्वात जास्त WHS चीन मध्ये आहेत.
  • राजस्थान चे सध्या चे मुख्यमंत्री अशोक गेलोत आहेत.
Pink City
1876 इंग्लंड राजा आणि राणी व्हिक्टोर या भारत भेटीला आल्या त्या वेळचे राजा राम सिंग यांनी पूर्ण शहर गुलाबी रंगाने रंगवले होते.तेव्हा पासुन गुलाबी शहर नावाने ओळखले जात आहे.
Most World Heritage Sites
🇨🇳  China: 55
🇮🇹  Italy: 54
🇩🇪  Germany: 47
🇪🇸  Spain: 47
🇫🇷  France: 45
🇮🇳  India: 38

देशातील 18 वा रेल्वे विभाग - दक्षिण किनारी रेल्वे विभाग

  • रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी 18 वा रेल्वे विभाग स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
  • 18 व्या रेल्वे झोनचे मुख्यालय – विशाखापट्टणम , आंध्रप्रदेश
  • 18 व्या रेल्वे विभागात – गुंटकल , गुंटूर , विजयवाडा डिव्हिजनचा समावेश असणार
  • भारतात सध्या – 17 रेल्वे विभाग व 73 रेल्वे डिव्हिजन

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets