Search This Blog

चालु घडामोडी - 28/11/2019

13 सूक्ष्म उपग्रहांसहि त भारताच्या ‘कार्टोसॅट-3’चे प्रक्षेपण यशस्वी

दिनांक 27 नोव्हेंबर 2019 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी 1625 किलो वजनाच्या ‘कार्टोसॅट-3’ उपग्रहाचे प्रक्षेपण करून इतिहास रचला आहे. PSLV C-47 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे 102 वे उड्डाण आहे.

‘कार्टोसॅट-3’ सह अमेरिकेचे 13 व्यवसायिक अतीसूक्ष्म उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा इथल्या सतिश धवन अंतराळ कें द्रावरून हे प्रक्षेपण करण्यात आले.

‘कार्टोसॅट-3’ उपग्रहाविषयी

“कार्टोसॅट” ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) पृथ्वीच्या निरीक्षणासाठी बनविलेल्या उपग्रहांची मालिका आहे. ‘कार्टोसॅट-3’ हे कार्टोसॅट मालिकेतले सातवे उपग्रह आहे.

पृथ्वीची छायाचित्रे काढण्यासाठी, तसेच नकाशा निर्मितीसाठी ‘कार्टोसॅट-3’ उपग्रहाचा उपयोग होणार आहे. उपग्रह अंतराळात पाच वर्षे कार्यरत राहणार आहे. उपग्रहामध्ये हाय-रिझोल्युशनची छायाचित्रे घेण्याची क्षमता आहे. याचा उपयोग नगर नियोजन, पायाभूत सुविधा विकास, किनारपट्टी विकासात होणार आहे.

‘कार्टोसॅट-३’ हा प्रगत उपग्रह 509 किलोमीटरच्या कक्षेत पाठवण्यात आला असून PSLV-XL प्रक्षेपकाचे हे 21 वे उड्डाण आहे. अमेरिकेच्या 13 अतीसूक्ष्म उपग्रहांमध्ये ‘फ्लोक-4P’ शृंखलेचे 12 आणि एक ‘MESHBED’ उपग्रह आहेत.

ISRO चा ऐतिहासिक प्रवास

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे. याचे बेंगळुरू येथे मुख्यालय आहे.
  • 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापना झालेल्या ISRO ने पूर्वी च्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) याला बदलले. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते.
  • ISRO ने 1999 सालापासून व्यावसायिक शाखेच्या मदतीने विदेशी उपग्रह अवकाशात सोडण्याचा कार्यक्रम सुरू केला. ISRO ने साधलेल्या प्रशंसनीय यशाचा आढावा पुढीलप्रमाणे आहे -
  • 19 एप्रिल 1975 रोजी भारताने सोवियत संघाच्या मदतीने आपला पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला.1980 साली पुर्णपणे स्वदेशी बनावटीच्या SLV-3 प्रक्षेपकाद्वारे ‘रोहिणी’ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला.22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वी झाली. या मोहिमेमधून चंद्राच्या ध्रुव क्षेत्रात पाणी असण्याची पुष्टी केली.
  • ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात आणि अगदी कमी खर्चा त मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.
  • फेब्रुवारी 2017 मध्ये एकाचवेळी 7 देशांचे 104 उपग्रह अवकाशात सोडत रशियाचा 37 उपग्रहांचा विक्रम मोडीत काढला.
  • ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (PSLV) आणि भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान (GSLV) विकसित केले.
  • सॅटलाइट सुचालन प्रणाली ‘गगन’ आणि क्षेत्रीय सुचालन उपग्रह प्रणाली ‘IRNSS’ विकसित केले.
  • यानाला पुढे नेणारे अत्यावश्यक असलेले स्वदेशी ‘क्रायोजेनिक इंजन’ तयार केले.

ISRO च्या प्रक्षेपकांचा इति हास

ISRO ने भारतीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे काम 1970 साली सुरू केले. ह्या कामाचे नेतृत्व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याकडे दिले गेले होते. अग्निबाणात सॉलिड प्रोपेलंट मोटारी वापरल्या जातात. प्रथम प्रक्षेपण सन 1979 मध्ये झाले.

भारताचा अतिप्रगत असा पहिला संवर्धित उपग्रह प्रक्षेपण यान (ऑगमेंटेड SLV) हा 5 टप्प्यांत काम करणारा सॉलिड प्रॉपेलंट अग्निबाण होता. त्याची क्षमता 150 किलो वजनी उपग्रह अवकाशात नेण्याची होती.भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान (GSLV) - GSLV हे प्रामुख्याने पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत उपग्रहाच्या INSAT वर्गातील उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याकरिता विकसित केले गेले. GSLV हे उपग्रहाच्या GSAT मालिकेच्या प्रक्षेपणासाठी वापरले जात आहे. GSLV मध्ये तीन टप्पे आहेत - घन इंधन वापरणारे रॉकेट मोटर स्टेज, अर्थ स्टोअरेबल लिकुइड स्टेज आणि क्रायोजेणीक स्टेज.

सर्व काही संविधानाविषयी

देशभरात आज 'संविधान दिवस' साजरा केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली तो हाच दिवस. या निमित्तान देशभात विविध कार्यक्रमांचं आजोयन करण्यात आलं आहे. या निमित्तानं जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी...

१. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो?
- २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.

२. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?
- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.

३. कसं लिहीलं गेलं संविधान?
- आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?
- २९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.

५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?
- ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.

६. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
- फाळणीनंतर संविधान सिमितीच्या संदस्यांची संख्या २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.

७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?
- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे
आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.

८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?
- २६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.

९. संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?
- भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.

१०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?
- आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets