Search This Blog

चालु घडामोडी – 08/12/2019

1. मुंबई सेंट्रल: “ईट राइट स्टेशन” प्रमाणपत्र मिळविणारे देशातले पहिले रेल्वे स्थानक

मुंबई सेंट्रल रेलवे स्थानक हे FSSAI कडून फोर स्टार रेटिंगसह “ईट राइट स्टेशन” प्रमाणपत्र मिळविणारे देशातले पहिले रेल्वे स्थानक ठरले आहे.
‘ईट राइट इंडिया’ चळवळ
भारतीय खाद्यान्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) यांनी सन 2018 मध्ये ‘ईट राइट इंडिया’ चळवळ राबवविण्यास सुरुवात केली. प्रवाश्यांना निरोगी आणि स्वच्छ अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी ही मोहीम चालवली जात आहे.
या कार्यक्रमात खाद्यान्न सुरक्षा व स्वच्छतेसंबंधी नियमांची अंमलबजावणी, निरोगी आहाराची उपलब्धता, पुरवठा केंद्र, खरखट्याचे व्यवस्थापन, अन्नपदार्थांची हाताळणी, स्थानिक आणि हंगामी खाद्यपदार्थाची जाहिरात आणि जनजागृती अश्या विविध मुद्द्यांना लक्षात घेण्यात आले आहेत.
त्यासंदर्भात विभागीय रेल्वे क्षेत्र यांच्या सहयोगाने FSSAI आणि IRCTC यांच्यातर्फे कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
भारतीय खाद्यान्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) 
FSSAI याची स्थापना 2011 साली केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत झाली. भारतात खाद्यान्न सुरक्षा आणि त्याच्या नियमनाशी संबंधित कायदेशीर चौकट प्रदान करणार्‍या ‘खाद्यान्न सुरक्षा आणि मानके अधिनियम-2006’ याच्या अन्वये FSSAIची स्थापना करण्यात आली. ही एक स्वायत्त संस्था आहे. त्याचे नवी दिल्लीत मुख्यालय आहे.

2. बायोमेट्रिक माहितीच्या हाताळणीत भारत जगातला पाचव्या क्रमांकाचा सर्वात वाईट देश

कंपेयरिटेक (ब्रिटन) या संस्थेनी बायोमेट्रिक माहितीची हाताळणी याबाबत आपला एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
अश्या अभ्यासासाठी, संशोधकांनी बायोमेट्रिक्स माहिती कुठे घेतली जात आहे, ते कशासाठी घेतले जात आहे आणि ते कसे संग्रहित केले जात आहेत, हे शोधण्यासाठी 50 वेगवेगळ्या देशांचे विश्लेषण केले.
प्रत्येक देशाला 25 पैकी गुण देण्यात आले आहेत, ज्यामध्ये अधिक गुण म्हणजे सर्वात वाईट तर कमी गुण म्हणजे योग्यप्रकारे माहितीचा नियंत्रित वापर असा अर्थ होतो.
ठळक बाबी
  • बायोमेट्रिक माहितीचा व्यापकपणे आणि अनियंत्रित वापर करण्याच्या संदर्भात भारत जगातला पाचव्या क्रमांकाचा सर्वात वाईट देश आहे. यादीत, भारत तैवान, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स यांच्यासह पाचव्या क्रमांकावर आहे.
  • तर या बाबतीत चीन जगातला सर्वात वाईट देश ठरत आहे. त्याच्या पाठोपाठ मलेशिया, पाकिस्तान आणि अमेरिका या देशांचा क्रम लागतो.
  • चीनने 25 पैकी 24 गुण मिळाले आहेत, तर भारताला 19 गुण मिळालेत.
  • या बाबतीत सर्वात वाईट देशांच्या यादीमध्ये भारत तुलनेने खाली आहे कारण तो कायद्याच्या अंमलबजावणीला राष्ट्रीय बायोमेट्रिक (आधार) डेटाबेसमध्ये प्रवेश मिळविण्यास परवानगी देत ​​नाही.
  • योग्य निर्बंधांमुळे युरोपीय संघातले देश यादीत तळाशी आहेत, ज्यात आयर्लंड, पोर्तुगाल, सायप्रस, ब्रिटन आणि रोमेनिया हे पाच सर्वोत्तम देश म्हणून उदयास आले आहेत.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets