Search This Blog

चालू घडामोडी – 9/12/2019

चौथी ‘भारत जल प्रभाव शिखर परिषद’ नवी दिल्लीत संपन्न झाली

परिषदेबद्दल अधिक
–  5 डिसेंबर ते 7 डिसेंबर या काळात ‘व्हॅल्यूइंग वॉटर – ट्रान्सफॉर्मिंग गंगा’ या विषयाखाली चौथी ‘भारत जल प्रभाव शिखर परिषद’ पार पडली.
–  या कार्यक्रमाचे उद्घाटन जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या हस्ते झाले.
– IIT कानपूरच्या नेतृत्वात भारत सरकारचे जल शक्ती मंत्रालय आणि सेंटर फॉर गंगा रिव्हर बेसिन मॅनेजमेंट अँड स्टडीज (cGanga) या संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमातल्या ठळक बाबी
– पाणीपुरवठ्याशी संबंधित मुद्द्यांवर आणि त्याच्या संवर्धनाबाबत उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
-कार्यक्रमादरम्यान, ‘रिव्हर रिस्टोरेशन अँड कन्झर्वेशन – ए कॉन्सिस मॅन्युअल अँड गाईड’ यासंबंधीचा अहवाल तसेच आतापर्यंत विकसित केलेल्या ‘गंगा हब’ यांचा हवाला जाहीर करण्यात आला.बैठकीत ग्रामीण व शहरी भागातल्या जलसंपत्तीच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर देण्यात आला.

पृथ्वी २ क्षेपणास्त्रची चाचणी

– भारताने जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणाऱ्या पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
– ओडिशाच्या बालासोर येथील प्रक्षेपण केंद्रावरुन ही चाचणी करण्यात आली. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडद्वारे ही चाचणी घेण्यात आली.
– यापूर्वी, याच ठिकाणाहून २० नोव्हेंबर रोजी पृथ्वी-२ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते.
– काल झालेल्या क्षेपणास्त्राची चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली असून त्याने सर्व आवश्यक मानकं पूर्ण केली आहेत.
– या क्षेपणास्त्रामध्ये ५०० ते १००० किलो वजनाची स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता आहे.
– या क्षेपणास्त्रामध्ये लिक्विड प्रोपल्शन इंजिन वापरण्यात आले आहेत. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३५० किमीपर्यंत आहे.
– यामध्ये अडव्हान्स गाईडन्स सिस्टिमही बसवण्यात आली आहे. ही यंत्रणआ आपल्या लक्ष्याचा अचूनकतेने वेध घेते.
– पृथ्वी क्षेपणास्त्र सन २००३ पासून अद्यापपर्यंत भारतीय लष्कराला सेवा पुरवत आहे.
– डीआरडीओद्वारे निर्माण करण्यात आलेले हे पहिले क्षेपणास्त्र आहे. काल झालेल्या या क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीच्या चाचणीवर डीआरडीओच्या वैज्ञानिकांची नजर होती.

मिस युनिव्हर्स 2019 चा खितांब झोजिबिनी टुंझी (दक्षिण आफ्रिका) हिला मिळाला

– दक्षिण आफ्रिकेच्या झोजिबिनी टुंझी हिने यंदाचा ‘मिस युनिव्हर्स 2019’ म्हणजेच विश्वसुंदरीचा किताब जिंकला आहे. मिस प्युर्टो रिको हिने द्वितीय क्रमांक तर मिस मेक्सिकोने तृतीय क्रमांक पटकावले.
– अमेरिकेच्या अॅटलांटा शहरात 9 डिसेंबर 2019 रोजी 68 वी ‘मिस युनिव्हर्स’ ही सौंदर्य स्पर्धा झाली. गतवर्षीची मिस युनिव्हर्स कॅटरिना ग्रे हिने मानाचा मुकूट विजेतीला चढविला.
-उपांत्य फेरीत पोहचलेली भारताची वर्तिका सिंग शेवटच्या 20 जणींमध्ये होती. मात्र अंतिम 10 जणींमध्ये तिला स्थान मिळवता आले नाही.
स्पर्धेविषयी
– मिस युनिव्हर्स (विश्वसुंदरी) ही दरवर्षी घेतली जाणारी एक जागतिक सौंदर्य स्पर्धा आहे.
– अमेरिकेच्या न्युयॉर्क शहरात मुख्यालय असलेली मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन ह्या स्पर्धेचे आयोजन करते.
-1952 साली कॅलिफोर्नियामध्ये ही सौंदर्य स्पर्धा सर्वप्रथम भरवली गेली होती.
– विश्वसुंदरी ठरलेल्या भारतीय – सुष्मिता सेन (सन 1994) व लारा दत्ता (सन 2000)

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets