Search This Blog

चालू घडामोडी – 09/01/2020

इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट, 2019

30 डिसेंबर, 2019 रोजी केंद्रीय पर्यावरण आणि हवामानमंत्री प्रकाश जावडेकर यांनी “इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट, 2019” जाहीर केला. हा अहवाल दर दोन वर्षांनी जाहीर केला जातो. 
या अहवालात वनक्षेत्र, जंगलातील वनस्पती घनता, वृक्षारोपण दर इत्यादींबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
अहवालाची ठळक वैशिष्ट्ये
  • या अहवालानुसार देशाचे एकूण वनक्षेत्र (वन कवच) हे  7,12,249चौरस किलोमीटर आहे जे देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 21.67%आहे.  
  • देशाच्या झाडाचे क्षेत्रफळ सुमारे 95,027 चौरस किलोमीटर आहे जे देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 2.89% आहे.
  • भारतीय वन राज्य अहवाल, 2017 च्या तुलनेत यावर्षी देशाच्या वनक्षेत्रात 3,976 चौरस किलोमीटर (0.56%) वाढ झाली आहे.
सर्वात जास्त वृद्धी दर्शविणारे राज्य
1. कर्नाटक (1025 चौरस किमी),
2. आंध्र प्रदेश (990  चौरस किमी),
3. केरळ (823 चौरस किमी),
4. जम्मू-काश्मीर (371 चौरस किमी),
5.हिमाचल प्रदेश (334 चौ किमी)
देशातील डोंगराळ जिल्ह्यांमधील वनक्षेत्र 2,84,006 चौरस किलोमीटर आहे, जे या जिल्ह्यांच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 40.

गुजरातमध्ये ‘विक्रम साराभाई चिल्ड्रेन इनोव्हेशन सेंटर’ उभारणार

गुजरात राज्यात ‘विक्रम साराभाई चिल्ड्रन इनोव्हेशन सेंटर’ उभारण्याची घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी ह्यांनी केली आहे.
6 जानेवारी 2020 रोजी गांधीनगर येथे ‘चिल्ड्रेन्स इनोव्हेशन फेस्टिवल’ या कार्यक्रमाच्या सत्कार समारंभात बोलताना ही घोषणा केली गेली.
ठळक बाबी
  • ‘विक्रम साराभाई चिल्ड्रन इनोव्हेशन सेंटर’ राज्यातल्या लहान मुला-मुलींमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देणार. त्यांना नवसंशोधन करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.
  • हे केंद्र नावकल्पना मांडणार्‍या विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना त्या दिशेने कार्य करण्यासाठी पाठबळ पुरविणार आहे.
  • हे केंद्र गुजरात विद्यापीठाच्या ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम सेंटर फॉर एक्सटेंशन रिसर्च अँड इनोव्हेशन’ येथे उभारले जाणार आहे.
  • गुजरात विद्यापीठ आणि संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF) यांच्या संयुक्त भागीदारीतून ही सुविधा उभारली जाणार आहे.

ओडिशातल्या भितरकनिका राष्ट्रीय उद्यानात प्राण्यांची गणना

ओडिशा राज्यातल्या भितरकनिका राष्ट्रीय उद्यानातल्या जलकुंभात खार्‍या पाण्यातल्या इस्टुराइन मगरींची गणना पूर्ण करण्यात आली आहे. अहवालानुसार, त्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
ठळक बाबी
  • भितरकनिका राष्ट्रीय उद्यान केंद्रपाडा जिल्ह्यात आहे.
  • गणनेत 1,757 मगरी मोजल्या गेल्या आहेत.
  • गेल्या वर्षी या भागात 1,742 मगरी मोजल्या गेल्या होत्या.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets